विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 26 January 2022

राजे भोसलेंची वावी

 




राजे भोसलेंची वावी
पोस्तसांभार : -रमेश पडवळ, नाशिक
ऐतिहासिक नोंदी अभावी विस्कटू लागलेले इतिहासाचे धागे कधी कधी अज्ञात पैलूंचा उलगडा करून देतात. असे पैलू न कधी ऐकलेले असतात न कधी पाहिलेले. पण त्यांच्या अज्ञातपणातही एक मोठा इतिहास दडलेला असतो. गावागावात जमीनदोस्त होत असलेल्या ऐतिहासिक वास्तू हा इतिहास कुरवाळून उभ्या असतात. यादवकाळाशी ऋणानुबंध सांगत छत्रपतींच्या घराण्यांची वंशावळ उलगडणारे सिन्नरमधील वावी हे गाव वरद परशरामाच्या समृद्ध लोककलेचीही ओळख करून देते. मन प्र‌सन्न करणारा हा प्रवास आपल्याला इतिहासाच्या पानांपलीकडे घेऊन जातो.
वावीतील राजे भोसले घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याशी असलेला संबंध वावीची ऐतिहासिक गूढता वाढव‌ितो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचे दक्षिणेत येण्यापासून ते पणजोबा बाबाजी भोसले यांच्यापर्यंतचा प्रवास वावी उलगडताना दिसते. अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडवर स्वारी केली. यानंतर घडलेल्या अनेक घडामोडीनंतर सजनसिंह आणि त्याचा पुत्र दिलिपसिंह बहामनी राज्याची स्थापना करणाऱ्या हसन बहामनीकडे आले. याच दिलिपसिंहापासूनच‌ी १३ वी पिढी म्हणजे बाबाजी भोसले, असे संदर्भ मराठी रियासत, शिवछत्रपती समज-अपसमज व क्षत्रियकुलावतंस छत्रपती श्रीशिवाजी महाराज या पुस्तकात म‌िळते व वावीतील राजे भोसले घराण्यातील वंशजही त्यास दुजोरा देतात. बाबाजी भोसलेंकडे आठ गावाची पाटीलकी होती. त्यांना मालोजी राजे व विठोजी राजे अशी दोन मुले होती. दोघेही निजामशाहीत वेरूळ-घृष्णेश्वर भागात पराक्रमी व उत्तम प्रशासक होते. पुढे मालोजींना पुणे व सुपे जहागिरी मिळाली तर विठोजी भोसलेंना मुंगी, पैठण, हिरडी, बेरडी, जिंती, वेरूळ, वांबोरी व वावी ही गावे मिळाली. विठोजींनी आपल्या आठ मुलांना प्रत्येक गाव दिले. यात नागोजी यांना वावी हे गाव मिळाले अन् वावी राजे भोसलेंची म्हणून ओळखली जाऊ लागली. दुसरीकडे विठोजींचे भाऊ मालोजींना शहाजी व शरीफजी ही मुले झाली. यामागेही एक कथा आहे. मालोजीराजे भोसलेंनी शहाशरीफ नावाच्या नगरजवळील पिरास पुत्र व्हावा म्हणून नवस केला होता. पुत्र झाल्यावर शहाशरीफ या पिराचे नाव दोन्ही मुलांना शहाजी व शरीफजी असे ठेवले. शहाजी राजांचा सुपुत्र शिवाजी महाराज हे पुढे सुरत लुटीतून परतताना विश्रामगडावर असताना वावीत आपल्या नातलगांना भेटण्यासाठी आल्याचे वावीतील राजे भोसले घराण्याचे वंशज विठ्ठल राजे भोसले व सागर राजे भोसले सांगतात. मालोजींचा दुसरा मुलगा शरीफजी नगर येथील भातवडी (भातोडी) येथील लढाईत ऑक्टोबर १६२४ रोजी धारातीर्थी पडला. हा इतिहास पाहिल्यावर वावीमध्ये भोसले घराणे कसे आले याचा उलगडा होतो. मात्र वावीचा प्रवास येथेच थांबत नाही तर येथून सुरू होतो.
सिन्नरपासून शिर्डीरोडवर वीस किलोमीटरवर वावी हे गाव लागते. उजव्या हाताच्या दिल्ली दरवाजातून गावात प्रवेश केल्यावर पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे वावी म्हणजे काय? असा. सिन्नर परिसर हा यादवांची राजधानी. यादवकालीन शिलालेखातून वावी हा शब्द बारवेसाठी (विहीरीसाठी) उपयोगात आणलेला दिसतो. असाच उल्लेख चक्रधर स्वामींच्या साहित्यात सापडतो. त्यांनी वावी पोखरणी (विहिर खणणे) असे म्हटल्याने वावी म्हणजे बारव. याला वावीतील वैजेश्वराच्या मंदिरासमोर असलेल्या यादवकालीन बारव दुजोरा देते. या बारवेतून लग्नासाठी भांडी बाहेर येतात, अशी अख्यायिका ग्रामस्थ सांगतात. पाण्याने काठोकाठ भरलेली ही बारव त्यात साचलेल्या कचऱ्यामुळे आज उपेक्षित आयुष्य जगताना दिसते. वाल्ह्याकोळ्याची वावी अन् वैजेश्वर महादेव मंदिरामुळे गावाला वावी म्हटले जात असावे, असेही ग्रामस्थ सांगतात. या विहिरीसमोरच तटबंदीतील महादेवाचे वैजेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्याचे दगडी प्रवेशद्वार सुंदर नक्षीकामाने सजलेले आहे. मंदिरातील शिलालेखाची हेळसांड झाल्याने हा इतिहास अज्ञात आहे. याच मंदिरासमोरील बारवे शेजारी उभा असलेला प्राचीन मंदिराचा दगडी स्तंभ वावीत आणखी काही आखीवरेखीव मंदिरे असावीत याची साक्ष देतो. वैजेश्वर मंदिराचे पुजारी दत्तात्रेय शिंदे-गुरव यांच्या घरी महादेवाचा पंचमुखी मुखवटा आहे. हा वारसा पेशवाईपासून त्यांनी जपला आहे. हा सोहळा अनुभवून थोडे पुढे गेल्यावर राजे भोसले घराण्याच्या तीन मोठाल्या वाड्यांचे अवशेष दिसतात. त्यातील एकच वाड्याचे अवशेष थोडेफार शिल्लक आहेत. वाड्याचा उंच बुरूज कणा ताट करून वावीतील भोसले घराण्याचे महत्त्व आजही सांगताना उभा असल्याचा दिसतो. वावीतील राजे भोसले घराण्याने साताऱ्याची छत्रपतींची गादी चालविण्यासाठी वावीतून शाहू राजे दुसरे (आबासाहेब, मूळ नाव विठोजी त्र्यंबक भोसले, वावी) दत्तक म्हणून गेले. हा विठोजींच्या घराण्याचा गौरवशाली इतिहास मात्र अंधारात राहिला. हा वाडा पाहताना वावीतील राजे भोसले घराण्याचे ऐश्वर्य डोळ्यापुढे उभे राहते. वाड्याच्या आजूबाजूला पडलेले अनेक दगडी अवशेष, वाड्यातील भुयार अन् भिंतींवरील देवळींचे लहानमोठे नमुने पाहताना हा वाडा पुन्हा उभा राहिला तर अनेक अज्ञात पैलू पुढील शेकडो वर्ष भोसले घराण्याचा इतिहास सांगत राहतील, असे वाटायला लागते. शहाजी राजांकडून वावीतील घराण्याला मिळालेली तलवार विष्णूच्या दशावताराने सजली आहे. तर दुसऱ्या तलवारीची मूठ सोन्याची आहे. मात्र हे वैभव आता वावीत नाही. राजे भोसले घराण्याचा इतिहास संग्रही करण्याचीही गरज आहे.
वावीत भटकंती करताना अनेक मंदिरे पहायला मिळतात. गावात दोन मारूती मंदिरे आहेत. गावात पिराचे ठाण अन् साती आसराही पहायला मिळते. वावीचे वारकरी संत रामगीरी महाराजांची समाधीही येथे आहे. गावाला चार दरवाजे होते. दिल्ली दरवाजा सोडला तर इतर वेशी आता नाहीत. मात्र दिल्ली दरवाजा व पुणे दरवाजा सोडला तर इतर वेशीच्या आठवणीही आता शिल्लक नाहीत. आखाडात बोहाड्यात सोंगे मिरविण्याची परंपरा वावीकरांनी जपली आहे. वावीचा प्रवास वरदी परशरामांची वावी या ओळखीशिवाय पूर्ण होत नाही. परशराम आपल्या वेगळ्याशैलीत सांगतात की,
विठू परशराम येशूचे तोंड अति गोड रसिकरंग भरून/
रामकृष्ण रामाचे छंद ऐकती चतुर जिवी धरून/
वावी नांव गांव धनवटात आडा जबरू
कोणी विरळा एकादा राहील सांभाळून अबरू/
इषकाचे पायी सजण मारिला गबरू/
वरदी परशराम यांचा जन्म (जन्म १७५४- मृत्यू १८४४)मध्ये सिन्नर-शिर्डी मार्गावरील वावी या गावात झाला. देवपूरच्या भागवतबाबांनी त्यांना अभंग करण्याऐवजी आताच्या समाजाचे लावण्यांमाध्यमातून प्रबोधन करण्याचा सल्ला दिला. त्यामुळेच त्यांच्या अनेक लावण्या पौराणिक कथांवर व आध्यात्मिक विषयांवर असून, त्यावर संतकाव्याची छाया आहे. तत्कालीन समाजस्थितीचे उत्कृष्ट चित्रण त्याच्या कवनांत आढळून येते. पेशवाईच्या काळात तमाशा ही लोककला बहरली. वरदी परशराम यांनी आपल्या लावणीनं महाराष्ट्रात आपला ठसा उमटवला. पेशवे तसेच इंदोरचे होळकर व बडोद्याचे गायकवाड घराण्याने त्यांच्या कलेचा गौरवही केला. परशराम यांची `आध्यात्मिक लावणी' हे त्यांचं वेगळेपण अनेकांना भावल्याने त्यांना वरदी परशराम म्हटले जाऊ लागले. आपले गाव असलेल्या वावीबद्दलचा अभिमान वरदी परशरामाच्या शाहिरीतून ओथंबून वाहताना दिसतो. म्हणून ते म्हणतात...
वावी गाव तेथे परशराम येसू वर्णी हरीच्या गुणा/
रमारंगे श्रीरंगे अभंगे तारि-तारि मज..//
लोककलेतील एक अनोखी संस्कृतीनिर्माण करणारा हा कवी व कुटुंबिय अज्ञात आहेत. त्यांची परंपरा निष्ठेने पुढे घेऊन जाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज आहे. मात्र वावीत परशरामाचे मंदिराशिवाय काहीच नाही. असे म्हणतात की, मरणापूर्वी वरदी परशरामाने आपल्या मृत्यूची वार्ता आईला कळविली होती व मृत्यूपूर्वी चार दिवस आधी त्यांनी वावीतून कोपरगाव येथील गोदाकाठचे मंजूर या गावी प्रस्थान केले. त्यांनी सांगितलेल्या दिवशीच कवने करताना त्यांनी प्राण सोडले. ‘वरदी’ नावाला शोभावी अशी त्यांच्या मृत्यूबद्दलची अख्यायिका आजही गावात सांगितली जाते.
वैजेश्वराचे सान्निध्य, बारवेचा गारवा, बोहाड्यांची परंपरा, मंदिरांचा साज, राजे भोसले घराण्याचे ऐश्वर्य अन् परशरामाची अध्यात्मिक काव्यभक्तीने वावी मंत्रमुग्ध झालेली दिसते. दुष्काळी परिसर असला तरी हा ऐतिहासिक गारवा वावीची सफर आनंददायी करतो.

छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे दत्तक पुत्र श्रीमंत छत्रपती त्रिंबकजी उर्फ शाहू (शहाजी) उर्फ जंगली महाराज

 छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे दत्तक पुत्र श्रीमंत छत्रपती त्रिंबकजी उर्फ शाहू (शहाजी) उर्फ जंगली महाराज 

पोस्तसांभार :: ©



श्रीमंत राजेभोसले वावीकर

सन १८४० ला खान्देश च्या पुढे जंगलात काशीच्या वाटेवर सांगवी मुक्कामी जन्म झाला स्वराज्याच्या छत्रपतींचा... छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे दत्तक पुत्र श्रीमंत छत्रपती त्रिंबकजी उर्फ शाहू (शहाजी) उर्फ जंगली महाराज यांचा. श्रीमंत छत्रपती शाहू (शहाजी) उर्फ जंगली महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा...!
श्रीमंत छत्रपती शाहू (शहाजी) उर्फ जंगली महाराज :
हे जंगली महाराज अध्यात्मिक क्षेत्रातील नावाजलेले जंगली महाराज नाहीत. तर श्रीमंत जंगली महाराज म्हणजे स्वराज्याचे छत्रपती शाहू महाराज धाकटे यांचे लहान बंधू, स्वराज्यासाठी, छत्रपतींसाठी पराक्रमाची पराकाष्ठा करणारे स्वराज्याचे सेनापती श्रीमंत चतुरसिंग राजे भोसले वावीकर यांचे नातू . श्रीमंत चतुरसिंग राजे भोसले यांचा वारसा समर्थपणे चालवणारे स्वराज्याचे सेनापती श्रीमंत बळवंतराव राजे भोसले यांचे चिरंजीव.
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी ७ डिसेंबर १८३९ ला काशीला प्रयाण केले. तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या दोन महाराणी, कन्या गोजराबाई साहेब, श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती, त्यांची पत्नी गुणवंताबाई साहेब , सेनापतीचे काका - श्रीमंत छत्रपती शाहू महाराज धाकटे यांचे लहान बंधू श्रीमंत परशराम राजे भोसले वावीकर, महाराजांना मानणारे सर्व आप्तेष्ठ होते. या प्रवासात खान्देशात सांगवी मुक्कामी १२ जानेवारी १८४० रोजी श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती यांची पत्नी गुणवंताबाई साहेब प्रसूत होऊन त्यांनी एका मुलाला जन्म दिला. त्याचे नाव त्रिंबकजी असे ठेवण्यात आले. जंगलात जन्म झाल्याने त्यांना जंगली महाराज हे नाव पडले. त्यांच्या जन्माचा कुठला उत्सव तर सोडा साधा आराम सुद्धा न करू देता इंग्रज अधिकाऱ्याने भोयांना पालखी उचलण्याचा इशारा केला. पालख्या काशीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.
श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती यांना ताप येऊ लागला होता. इंग्रज अधिकाऱ्याने त्यांच्यावर कुठलाही औषधोपचार करू दिला नाही. ज्वर वाढत गेला. मुलगा झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांनी २७ जानेवारी १८४० ला स्वराज्याचे सेनापती आपल्या तान्ह्या मुलाला परकं करून, गुणवंताबाई साहेब यांना विधवा करून इहलोकी गेले. मध्य प्रदेशातील महू जवळील तिकुराई येथे स्वराज्याच्या सेनापतींचे श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती उर्फ बाळासाहेब सेनापती यांचे निधन झाले. प्रबोधनकार ठाकरे आपल्या रंगो बापूजी आणि प्रतापसिंह महाराज या पुस्तकात बाळासाहेब सेनापती यांचे निधन आमांशाने म्हणजे अतिसाराने झाले आहे असं मांडले आहे.
२५ मार्च १८४० ला श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे सर्व लवाजम्यासह काशी नगरीत आगमन झाले. ऑक्टोबर १८४५ मध्ये श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी जंगली महाराज उर्फ त्रिंबकजी राजे यांना मेजर कारपेण्टरच्या समक्ष विधीपुर्वक दत्तक घेतले.१० आॕक्टोबर १८४५ च्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी मृत्युपत्रात लिहले की,” माझ्या दोन्ही राण्यांना पुत्र झाला नाही. सबब आमच्या हिंदुधर्माप्रमाणे मी माझे आप्त कै. बळवंतराव राजे भोसले यांचा पुत्र त्रिंबकजी राजेभोसले यास विधीपुर्वक दत्तक घेऊन त्याचे नाव शाहाजी असे ठेवले आहे. सदरहु त्रिंबकजी याच्या मातोश्री गुणवंताबाई हिची या दत्तक विधानाला संमती असुन तीला दुसरा मुलगा दत्तक घेण्याची आम्ही परवानगी दिलेली आहे. माझ्या मागे माझ्या राज्याचा खाजगी आणि सरकारी खजिना नि मालमत्तेचा, माझ्या पदव्यांचा आणि मी उपभोगलेल्या सर्व अधिकारांचा आणि सत्तेचा त्रिंबकजी हा कायदेशिर वारस समजण्यात यावा. विलायतेतल्या मोकादम्याचा निकाल माझ्या हयातीत लागला तर ठिकच. न लागल्यास तो आमचे दत्तकपुत्र शाहाजीराजे यांच्या नावाने पुढे चालवावा आणि ब्रिटीश सरकारने त्यांना न्याय द्यावा.” (मराठी रियासतीमध्ये दत्तकविधानाची तारीख २५ जानेवारी १८४७ आहे. )
त्रिंबकजी राजे यांचेच नाव शहाजी उर्फ शाहू महाराज झाले. या दत्तकविधानानंतर लगेचच गुणवंताबाई साहेब यांनी संताजी राजेभोसले शेडगावकर यांचे कनिष्ठ चिरंजीव तात्याबा यांस दत्तक घेऊन त्याचे नाव दुर्गासिंह ठेवले. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी त्यांना दुर्गासिंह सेनापती असे संबोधले. त्यासोबतच श्रीमंत परशराम राजे भोसले वावीकर यांनी जानराव राजेभोसले शेडगावकर यांचे कनिष्ठ चिरंजीव जिजाबा यांस दत्तक घेतले.
दत्तकविधानानंतर काही दिवसांनी १४ ऑक्टोबर १८४७ ला स्वराज्याचे धनी छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे दुःखद निधन झाले. महाराजांच्या निधनानंतर त्यांची कन्या गोजराबाईसाहेब यशवंतराव गुजर १३ जानेवारी १८५० ला साताऱ्यात आल्या. त्यानंतर अवघ्या तीन वर्षांनी ३० ऑगस्ट १८५३ ला त्यांचे दुःखद निधन झाले.
इसवी सन १८५४ मध्ये श्रीमंत जंगली महाराज, त्यांच्या मातोश्री राजसबाईसाहेब, जनकमता गुणवंताबाई, दुर्गासिंह सेनापती यांचे कृष्णा नदीच्या तीरावर मौजे आरले येथे आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी मातोश्री सगुणाबाईसाहेब आणि व्यंकोजी राजे हे स्वतः आरले येथे जाऊन त्यांना सातारा शहरात घेऊन आले. आणि जुन्या वाड्यात राहू लागले.
इसवी सन १८५७ च्या सुरुवातीलाच इंग्रजांविरुद्ध जनमानसात असंतोष वाढू लागला होता. छत्रपती प्रतापसिंह महाराजांना पदच्युत करून त्यांची काशीला रवानगी केल्याने सातारकर मंडळी जास्त चिडलेली होती. त्यात छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे चिरंजीव छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज साताऱ्यात आल्याने सातारकर मंडळीत उत्साह संचारला होता. छत्रपती प्रतापसिंह महाराजांची बाजू इंग्लंड मध्ये मांडणारे रंगो बापूजी हेही साताऱ्यात दाखल झाले होते. त्यांच्या वाटाघाटी सुरु झाल्या होत्या. इंग्रज अधिकाऱ्यास ठार मारणार असल्याची बातमी साताऱ्यात पसरली. एके दिवशी छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज आणि दुर्गासिंह सेनापती यांचे घोडे रात्रभर जीन घालून वाड्यापुढे सज्ज असल्याचे आढळले. साताऱ्यात इंग्रजांविरुद्ध उठाठेवी वाढू लागल्या होत्या. जुलै महिन्यात इंग्रजांनी धरपकड चालू केली. ८ सप्टेंबर १८५७ ला रंगो मापूजी यांच्या मुलाला पकडून फाशी देण्यात आली. त्यापूर्वीच ६ ऑगस्ट १८५७ ला छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज, त्यांचे चुलते काकासाहेब, मातोश्री राजसबाईसाहेब, जनकमता गुणवंताबाई, दुर्गासिंह सेनापती यांना अटक करून मुंबई येथे बूचर बेटावर अलग अलग ठेवण्यात आले. डिसेंबर १८५७ ला Mr. Rose हे बूचर बेटावर जाऊन त्यांनी महाराजांना कारस्थानाचा कबुली देण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. अर्थात तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज अथवा इतर कुणीही कबुली दिली नाही.
मार्च १८५८ ला त्यांना कराचीला पाठवण्यात आले. त्यांना एकमेकांना भेटूही दिले जात नव्हते. त्यानंतर इतरांना काही काळानंतर सोडण्यात आले. छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज आणि त्यांच्या पत्नी आनंदीबाईसाहेब याना जुलै १८८५ मध्ये सोडण्यात आले. परत आल्यांनतर छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज आपल्या पत्नी समवेत पुण्यातील भवानी पेठेत घर क्र ५४३ येथे राहू लागले. तिथेच त्यांनी १ जून १८९२ ला आपला देह ठेवला. महाराजांनी त्यांच्या हयातीत ब्राम्हो समाजाची दीक्षा घेतली असल्याने त्यांचा अंत्यविधी त्याच पंथानुसार करण्यात आला.
आजही छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज उर्फ जंगली महाराज यांची समाधी पुण्यातील भवानी पेठेत आहे. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे लहान बंधू यांचे देखील नाव श्रीमंत छत्रपती शाहजी महाराज असल्याने गफलत करू नये. दोघांचा कार्यकाळ वेगळा आहे.
आजच्या १८२ व्या जयंतीनिमित्त छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज उर्फ जंगली महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा ...!
फोटो १. छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज उर्फ जंगली महाराज यांच्या भवानी पेठेतील समाधीचा.
२. दत्तकविधानानंतर छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज उर्फ जंगली महाराज आणि त्यांच्यासोबत श्रीमंत दुर्गासिंह सेनापती
© श्रीमंत राजेभोसले वावीकर

जगदाळे यांचा संक्षिप्त इतिहास

 


जगदाळे यांचा संक्षिप्त इतिहास
पोस्त सांभार :शेखर शिंदे
"जगदाळे घराणे" हे मुळचे धार येथील राजे पवार यांच्या घराण्याची शाखा होय.पवार घराण्यापासून जगदाळे,निंबाळकर आणि पोकळे हि घराणी निर्माण झाली.जगदाळे घराणे ९६ कुळी मराठा घराणे आहे.हे घराणे १६५९ पासून मराठा साम्राज्यात म्हणजेच स्वराज्यात समाविष्ट झाले.पानिपत च्या युद्धात गाजवलेल्या भीम पराक्रमासाठी हे घराणे प्रसिद्ध आहे.
घराण्याचा विस्तार
बहामनी काळापासून या घराण्याला सुमारे १६८ गावाची मसूर परगणा येथील देशमुखी होती.नंतर शिवशाही आल्यामुळे वतनदारी पद्धत बंद झाली आणि देशमुखी च्या ऐवजी जगदाळे घराण्याने सर-पाटीलकी स्वीकारली.मसूर परगण्यातीलच काही गावाची पिढीजात सर-पाटीलकी शिवाजी महाराजांकडे सुद्धा होती.त्यावेळी या घराण्याला मसूर,गराडे व दौंड-लिंगाळी येथील दीडशे गावांची सर-पाटीलकी मिळाली[१].जगदेवराव जगदाळे हे या घराण्याचे मूळ पुरुष समजले जातात.
इतिहास
मसूरच्या जगदाळ्यांनी आदिलशाहीची परंपरेनं चाकरी केली. अर्थात महाराजांना विरोध करणं त्यांना भागच पडलं. महादाजी जगदाळे हे तर शाही नोकर म्हणून अफझलखानाच्या सांगाती प्रतापगडच्या आखाड्यात उतरले. त्यात खान संपला. शाही फौजेची दाणादाण उडाली. महाराजांनी त्याचे हात तोडले. याच महादाजीला आठदहा वर्षाचा पोरगा होता. जिजाऊसाहेबांनी अगदी आजीच्या मायेनं या पोराला आपल्यापाशी सांभाळला[२]. त्याला शहाणा केला. तो स्वराज्याचाच झाला.
सरदार जगदेवराव जगदाळे,सरदार महादजी जगदाळे,सरदार मल्हारराव जगदाळे,सेनापती आबाजीराव जगदाळे,सरदार यशवंतराव जगदाळे,सरदार पिराजीराव जगदाळे असे अनेक पराक्रमी मराठा योद्धे या घराण्यात होऊन गेले.
सरदार यशवंतराव जगदाळे व सरदार पिराजीराव जगदाळे यांनी पानिपतच्या लढाईत भीम-पराक्रम गाजवला दत्ताजीराव शिंदे यांच्यासमवेत ते नजीबखान याच्या विरुद्ध बुराडीघाट च्या लढाईत लढले.शिंदे यांच्या बरोबरच या दोन सरदारांनी आपल्या प्राणाची आहुती या संग्रामात दिली[३].
गणेशोत्सवाची सर्वात जुनी परंपरा
या संदर्भातच १७३२ मधील नोंद उपलब्ध असून, गराडे या सासवडजवळील गावाची सर-पाटीलकी जगदाळे यांची होती.तर पोट-पाटीलकी थोरले बाजीराव पेशवे आणि त्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी विकत घेतली होती. ती नानासाहेब पेशवे यांनी पुरंदरे यांना देऊन टाकली. या पाटीलकीचे हक्क आणि मानपान याविषयी कलम असून, "गणेश गौरी पुरंदऱ्यांच्या पुढे व मागे जगदाळे यांच्या' असा स्पष्ट उल्लेख आहे.गराडेसारख्या गावातदेखील गणेश-गौरीची प्रथा पूर्वापार चालत होती आणि तेथेसुद्धा मिरवणुकीने मानाच्या क्रमांकासह प्रतिष्ठापना होत होती.वंश परंपरेनुसार पहिला मान जगदाळे यांना होता [४]
संदर्भ :
1. ↑ जगदाळे कैफियत- मराठा इतिहासाची साधने
2. ↑ बाबासाहेब पुरंदरे - मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व
3. ↑ पानिपत- विश्वास पाटील आणि पेशवा दफ्तर
4. ↑ भारत इतिहास संशोधक मंडळ
साभार-कोरेगाव तालुक्यातील मराठ्यांचा इतिहास

Saturday, 22 January 2022

जैतुगीदेव,

 जैतुगीदेव,

पोस्तसांभार :शंतनू जाधव 



जैतुगीदेव, ज्यांना जत्रपाल म्हणूनही ओळखले जाते, ते भारतातील दख्खन प्रदेशातील सीना (यादव) राजवंशाचे शासक होते. त्याने काकतीय साम्राज्यावर यशस्वीरित्या आक्रमण केले आणि त्यांना यादवांचे अधिराज्य स्वीकारण्यास भाग पाडले.
त्याचे वडील भिल्लमदेव यांच्या कारकीर्दीत, जैतुगीने कल्याणच्या आणि देवगिरीवर कब्जा करण्याच्या शत्रूच्या प्रयत्नांना प्रतिकार करत, होयसला राजा बल्लाळ II विरुद्ध त्याच्या वडिलांच्या युद्धात भाग घेतला. भिल्लमदेवाला शेवटी होयसलांविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. कमकुवत सेन शक्तीचा फायदा घेत, काकतीयांनी यादव साम्राज्याच्या पूर्व भागावर आक्रमण केले. काकतीय जनरल महादेव यदुवंशी, गर्वपद शिलालेखाद्वारे प्रमाणित केल्याप्रमाणे, क्षत्रिय मराठ्यांची राजधानी देवगिरी येथे पोहोचले. तीन राजवंश - यादव, होयसला आणि काकत्या - कल्याणीच्या चालुक्यांचे पूर्वीचे सामंत होते. यादवांनी स्वत: ला चालुक्यांचे खरे उत्तराधिकारी मानले आणि म्हणूनच काकतीयांनी त्यांचे वर्चस्व ओळखले पाहिजे अशी अपेक्षा केली.
एकदा यादव-होयसला संघर्ष शांत झाला आणि यादव शक्ती स्थिर झाली,
1194 मध्ये गझनीचा सुलतान घियाथ अल-दीन मोहम्मद याने मोहम्मद घोरीला महाराष्ट्रावर हल्ला करण्यासाठी पाठवले, चक्रवर्ती जैतुगीदेव महाराज तेव्हा काकत्याशी लढायला जात होते. मग त्याला माहिती मिळाली की "महंमद घोरीने महाराष्ट्रावर हल्ला केला आहे." मग चक्रवर्ती जैतुगीदेव महाराज स्वतः मोहम्मद घोरीशी लढायला निघाले आणि त्यांचे सामंत खानदेशचे सुभेदार सोमनाथराव काकत्याशी लढण्यासाठी निघाले, चक्रवर्ती जैतुगीदेव महाराजांनी लढाईत मोहम्मद घोरीचा पराभव केला. आणि सुभेदार सोमनाथरावांनी काकाट्यांचा लढाईत पराभव केला.
यानंतर मोहम्मद घोरीने महाराष्ट्रावर तीनदा हल्ला केला, 1195, 1196 आणि 1197 मध्ये, जेव्हा जेव्हा त्याने महाराष्ट्रावर हल्ला केला तेव्हा महाराज जैतुगीदेवने त्याला महाराष्ट्रातूण पळून लावले होते.
रुद्रला त्याचा भाऊ महादेव याने गादीवर नेले, ज्याचा मुलगा गणपतीला मराठ्यांनी युद्धात कैद केले. काही वर्षांनी (शक्यतो 1198 मध्ये) मराठ्यांविरुद्धच्या लढ्यात महादेवही मारला गेला. जैतुगीने काकतीय प्रदेश आपल्या थेट राजवटीखाली आणण्याचा प्रयत्न केला, पण तसे करण्यात त्यांना अपयश आले. म्हणून, 1198 च्या सुमारास, त्याने गणपतीला सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याला काकतीय साम्राज्यावर सेन सामंत म्हणून राज्य करू दिले. असे दिसते की गणपती आयुष्यभर मराठ्यांशी एकनिष्ठ राहिले.
३१ ऑगस्ट इ.स.१२००
वयाच्या पस्तीसाव्या वर्षी महाराज जैतूगीदेव यांचे निधन झाले.
जैतूगीदेव हे महाराज चक्रवर्ती सिंघणदेव यांचे वडिल जैतूगीदेव होते. तर आजोबासाहेब भिल्लमदेव हे चालुक्यांचे सामंत होते. महाराज भिल्लमदेव यांनी ११८७ मध्ये स्वतःला स्वतंत्र घोषित करुन सेऊन साम्राज्याची स्थापना केली, त्यांनी ११८७ मध्ये देवगिरि येथे किल्ला बांधला आणि देवगिरिला आपली राजधानी बनवली, ११८८ मध्ये त्यांनी गझनीचा सुलतान घियथ अल-दीन मुहम्मदचा सेनापती महम्मद गोरी याला महाराष्ट्राच्या सीमेवरुन पिटाळून लावले होते. त्यांनी ११८७ - ११९१ पर्यंत महाराष्ट्रवर राज्य केले होते, ११८९ मध्ये त्यांनी सूरातूर येथे झालेल्या लढाईत होयसळ शासक बल्लालाचा पराभव केला होता, ११९१ मध्ये ते युद्धात बल्लाल सोबत लढता लढता विरगतित मरण पावले होते. त्यांच्या नंतर त्यांचे पुत्र महाराज जैतूगीदेव हे राजे झाले, त्यांनी ११९१-१२०० पर्यंत राज्य केले होते. तिथे दुसरी कडे उत्तर भारतात मोहम्मद गोरीने घियथ अल-दीन मुहम्मद याच्या साठी ११९२ मध्ये निर्णायकपणे अजमेरचे सम्राट पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला, मंग यानंतर त्याने कनैजचा राजा जयचंद याचा पराभव केला, असे करुन घुरीड वंशाचे वर्चस्व भारतात प्रस्थापित झाले, यानंतर ११९४ मध्ये गझनीचा सुलतान घियथ अल-दीन मुहम्मद याने मोहम्मद गोरीला महाराष्ट्राच्या स्वारीवर पाठवले, मोहम्मद गोरी याने माळवा आणि गुजरात हे दोन राज्य काबीज करत महाराष्ट्रावर आक्रमकण केले, तेव्हा महाराज जैतूगीदेव यांनी त्याला महाराष्ट्राच्या सीमेवरुन पिटाळून लावले.
यानंतर मोहम्मद गोरीने तीन वेळा महाराष्ट्रावर स्वारी केली, ११९५ मध्ये, ११९६ मध्ये आणि ११९७ मध्ये, त्याने जेव्हड्या वेळा महाराष्ट्रावर स्वारी केली तेव्हढ्याच वेळा महाराज जैतूगीदेव यांनी त्याला पिटाळून लावले होते. महाराज जैतूगीदेव वारंगळचा राजा महादेव याच्या सोबत युद्ध करण्यासाठी वारंगळला गेले, त्यांच्या सोबत युवराज सिंघणदेव सुध्दा गेले होते, तेव्हा ते १२ वर्षाचे होते, महाराज जैतूगीदेव यांनी वारंगळ येथे महादेव सोबत युद्ध केले, युद्धा मध्ये महाराज जैतूगीदेव सोबत युवराज सिंघणदेव शत्रूंशी धैर्याने लढत होते, या युद्धात महाराज जैतूगीदेव विजयी झाले, आंध्र हे राज्य आता सेऊन साम्राज्याच्या अधिपत्याखाली आले. यानंतर ३१ ऑगस्ट १२०० मध्ये वयाच्या पस्तीसाव्या वर्षी महाराज जैतूगीदेव यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर महाराज सिंघणदेव वयाच्या १५ व्या वर्षी सेऊन साम्राज्याचे चक्रवर्ती झाले
 

Wednesday, 12 January 2022

सरलष्कर दरेकर गढी - आंबळे

 




























सरलष्कर दरेकर गढी - आंबळे

postsaambhar ::

Saurabh Madhuri Harihar Kulkarni

#पुढचीमोहीम

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आंबळे गावात सरलष्कर दरेकरांची ऐतिहासिक गढी आहे. आंबळे हे गाव सासवडपासून माळशिरस घाट रस्त्यावर १८ कि.मी अंतरावर आहे. गावात प्रवेश करतानाच गढीचा भव्य तट पहायला मिळतो. येथे दोन वाडे पहायला मिळतात. एक वाडा आता काही प्रमाणात नवीन बांधकाम करून खिळ्यांच्या भव्य प्रवेशद्वार व बुरूजासह बांधलेला आहे. त्याच्या समोरच दगडी तटबंदीचा अजून एक भव्य वाडा आहे. तो दुमजली आहे आणि आकर्षक आहे. आतमध्ये लाकडी कलाकुसर आणि भव्यपणा पहायला मिळतो. काळाच्या ओघात काही ठिकाणी पडझड झालेली पहायला मिळते तर काही ठिकाणी नवीन बांधकाम या गढीबाहेर एक पुरातन बारव आहे ती खूपच मोठी आहे आणि बांधण्याची रचना वेगळीच आहे. समोरच एक तटबंदी असलेला अजून एक वाडा दिसतो तो म्हणजे देऊळ वाडा. वाड्यात ५ मंदिरे आहेत. श्रीराम मंदिर एकदम अप्रतिम. तुळजाभवानी, विष्णू व गरूड यांचे मंदिर आहे.
इ.स.१७५७ मध्ये कर्नाटकामधील कडाप्प्याचा नवाब अब्दुल मजिदखान याच्यावर केलेल्या स्वारीत खंडेराव दरेकर यांनी पराक्रमाची शर्थ केली. कोलार, होसकोट, बाळापूर हा परिसर कडप्पा संस्थानात येत होता. नवाव अब्दुल मजिदखान याने मराठ्यांना खंडणी देण्यास नकार दिला. म्हणून सप्टेंबर १७५७ च्या सुमारास कडण्यावर मराठ्यांनी स्वारी केली. कडाप्प्याच्या किल्ल्यावर मोर्चे लावले. इ.स. २४ सप्टेंबर १७५७ या दिवशी अब्दुल मजिदखानाबरोबर घनघोर लढाई झाली. मराठ्यांच्या वतीने खंडेराव दरेकर, इंद्रोजी कदम, सोनजी भापकर, विसाजी कृष्ण विनीवाले लढले. या युद्धात नवाब मारला गेला. खंडेराव दरेकर यांनी पराक्रमाची शर्थ केली. मराठ्यांनी शत्रूचे ९ हत्ती, ५०० घोडे जिंकून आणले. नवाबाचे ४०० सैन्य ठार झाले व १ हजार सैनिक जखमी झाले. या युद्धात संभाजी बाजी घोरपडे मृत्यू पावले. शत्रुपक्षाने १० लाख रुपये कबूल केले व तह झाला. याबद्दल नानासाहेब पेशव्यांनी खंडेराव यांना तर्फ कडेपठार यातील मौजे 'आमळे' हा गाव इनाम दिला. त्या इनामाच्या सनदेमध्ये पेशवे लिहितात. "तुम्ही बहुत राज्यात एकनिष्ठपणे सेवा करीत आलात व सालगुदस्त अब्दुल मजदखान पठाण संस्थान कडप्पे याचे लढाईत जीवाची आशा तीलतुल्य न धरिता सिपाईगिरीची शर्त केली. हे जाणोन तुम्हावरी कृपाळू होऊन मौजे आमळे हा गाव इनाम दिला."
इ.स. १३ डिसेंबर १७७२ रोजी छत्रपती रामराजा यांनी नारायणराव यांना पेशवाईची वस्त्रे दिली तेव्हा त्या वेळी अष्टप्रधानांनाही वस्त्रे देण्यात आली. मुजुमदार, चिटणीस, वाकनीस ही पदे पूर्वीच्याच आसामींना दिली. 'सरलष्कर पदाची वस्त्रे 'खंडेराव दरेकर यांना दिली. भोसले बंधू, मुधोजी-सावाजींच्या इ.स. १७७२-७३ मध्ये झालेल्या बेबनावप्रसंगी जो कलह झाला त्या वेळी एलिचपुरचा नवाब मुधोजींस मिळाला म्हणून साबाजींनी एलिचपूरावर स्वारी केली. महिना-पंधरा दिवस लढण्याचा निकर झाला. साबाजींनी आपला वकील भवानी शिवराम यास मराठयांकडे पाठवून फौजेची मागणी केली. त्यावरून पेशव्यांनी २५ हजार फौज खंडेराव दरेकर यांच्या हाताखाली साबाजीच्या मदतीस पाठविली. साबाजी आणि खंडेराव दरेकर यांनी एलिचपूर येथे मोर्चे बसविले.
दरेकरांच्याकडे इ.स. १७९५ साली १ लाख १६ हजार ८५ रुपयांचा सरंजाम होता. त्यामध्ये त्यांच्याकडे मामले बीड व पाथरी येथील चौथाई अंमल व पुणे प्रांतातील आम हा गाव इनाम व मौजे जलगाव, उंडवडी व नायगाव या तीन गावांचा मोकासा भडारे येथील आबडपैकी चौथाई अंमल, माळवा, सागर परगणे, तरेपरड इ. गावांतील एकूण सरंजाम. वरीलप्रमाणे खर्डाच्या लढाईच्या प्रसंगी खंडेराव दरेकरांचे सुपुत्र हणमंतराव यांनी पराक्रम केल्याची नोंद आढळते.
याच घराण्याची एक शाखा भोसरे,ता.खटाव ,सातारा येथे आहे..श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी श्रीमंत सरदार सयाजी दरेकर यांना भोसरे, लोणी, वडखल, खातगूण,खटाव,हुसेनपूर , किल्ले महिमानगड या आणि इतरही गावांमध्ये मोकासा दिला होता... याच श्रीमंत सरदार सयाजी दरेकरांचे सध्याचे वंशज भोसरे,ता. खटाव येथे आहेत..तसेच आंबले येथेही त्यांचा वाडा आहे...
साभार - डाॕ सदाशिव शिवदे सर
टीम - पुढची मोहीम

Thursday, 6 January 2022

कदम कुळाचा इतिहास

 कदम कुळाचा इतिहास

पोस्तसांभार :: प्रा. डॉ. सतीश कदम 9422650044

प्राचीन काळी चेरचोलपांडत्रसातवाहनवाकाटकपल्लवकदंबचालुक्यराष्ट्रकूट यासारख्या दिग्गज घराण्यांनी राज्यकारभार केला. यातील कदंब घराण्याने सुमारे एक हजार वर्षे कर्नाटकगोवा आणि ओरिसा याठिकाणी सत्ता गाजवूनही ते इतिहासात दुर्लक्षित राहिले.

त्रिलोचनला कदम घराण्याचा मूळ पुरूष मानला जातो. त्यांच्या उत्पत्तीचा संबंध कदंब वृक्षाशी लावला जातो. त्यामुळे कदंब कुळ म्हटले जाते. कदंबांची राजकीय कारकीर्द ही इ.स. ३५३ मध्ये मयुरवर्माने कर्नाटकातील उत्तर कनाडा जिल्ह्यातील बनवासी या ठिकाणी स्थापन केलेल्या राजधानीपासून होते. पल्लव दरबारात अपमान झाल्यानंतर कदंबाचे स्वतंत्र राज्य निर्माण केलेमयूरवर्मानंतर पुढे कंगवर्माभगीरथरघूकाकुस्थवर्माशांतीवर्माकृष्णवर्माकुमारवर्मा यासारखे पराक्रमी राजे होऊन गेले. या राजांनी पुढे हळशीउच्छंगी या स्वतंत्र राजधान्यातून बेळगांवखानापूरसंपगावसिरसीसावनूरशिमोगाहुबळी या परिसरावर राज्य केले. या दरम्यान कदंबांनी प्रथमच कन्नडला प्रशासकीय भाषेचा दर्जा दिला. इ. स. ५४३ मध्ये बदामीचा चालुक्य राजा पुलकेशीने कदंबाचा शेवटचा राजा कृष्णवर्मा दुसरा याचा पराभव करून राज्य जिंकले. तरी कर्नाटकातील बनवासीहनगलहळशींगेसांतलिगे येथे कदंबांची छोटी राज्ये १२ व्या शतकापर्यंत कायम होती. कदंब घराण्याची माहिती देणारा सर्वात मोठा संदर्भ कर्नाटकातील तालगुंड येथील शिलालेख असून अशाप्रकारचे अनेक शिलालेख सापडले आहेत.

कर्नाटकप्रमाणेच गोव्यातही कदंबांनी इ.स. १००७ ते १२३७ पर्यंत साम्राज्य गाजवले. षष्ठीदेव हा गोव्यातील कदंब वंशाचा संस्थापक असून त्यानंतर पुढे जयकेशीगुहल्लदेवपेर्माडी यासारखे राजे होऊन गेले. आज गोव्यात दिसणारी ग्रामव्यवस्था ही कदंबांनी दिलेली देणगी आहे. गोव्याची ग्रामदेवता सप्तकोटेश्वराची उभारणी कदंब राजांनी केली. याचाच पुढे छत्रपती शिवरायांनी जिर्णोद्धार केला. गोव्याच्या कदंबांचे आरमार भक्कम असून त्यांना कोकण चक्रवर्ती ही पदवी होती.

गोपिकापट्टण म्हणजे गोवा ही कदंबांची राजधानी असून या घराण्यात जयकेशीपेरमाडी यांच्या उज्वल कारकिर्दीबरोबरच कमलादेवीमहादेवीलक्ष्मीदेवी यासारख्या कतृर्त्ववान स्त्रियाही होऊन गेल्या. याच पेरमाडीच्या पत्नी कमलादेवींनी संपगाव तालुक्यातील देगावे (कर्नाटक) याठिकाणी इ. स. ११४७ मध्ये  कमलनारायण आणि महालक्ष्मीचे सुंदर असे बांधलेले आहे.

आपल्या कार्यकाळात कदंबांनी गोव्यामध्ये गद्यानाहोन्नूबेलेव्हाईजहगा यासारखी आपल्या नावानी नाणी पाडली होती. ज्यावर कमळ आणि सिंहाचे चित्र असून कदंबांनी सोन्याची नाणी पाडली होती हे विशेष आहे. गोव्याच्या अनेक भागात कदंबांचे शिलालेखताम्रपट सापडतात. गोव्याला वैभव प्राप्त करून देण्याचे काम कदंब राजांनी केल्यामुळेच तेथील बस वाहतुकीला कदंबा ट्रान्सपोर्ट हे नाव देऊन सरकारने या घराण्याचा गौरव केला आहे.

कर्नाटक आणि गोव्यानंतर कदंब घराण्याने ओरिसा राज्यातही प्राचीन काळापासून आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यानुसार धर्मखेडीप्रतापदेव यासारख्या राजांनी ओरिसात कदंबांची सत्ता निर्माण केली. त्यानुसार पुढे पुरीअंगूलअथम्लीकमांडपा या परिसरात कदंबांची सत्ता होती. इंग्रजांच्या काळात ओरिसात कदंब जमीनदार म्हणून छोट्या छोट्या संस्थानात विभागला होता. या संस्थानांना तेथे १९ तोफांची सलामीचा मान होता. आजही तेथे कदंबांची मोठी जमीनदार घराणी आहेत.

खर तर कदंब म्हणजे कदम असून ते मूळचे सुर्यवंशीयमानव्य गोत्रीसिंह हे त्यांचे लांच्छनलाल रंगाचे निशाणझेंड्यावर अर्जुनाप्रमाणे वानर होते. कर्नाटकगोव्यानंतर कदम सर्वत्र विखुरले गेले त्यावेळी प्रसंगानुरूप त्यांना भिसेभोगकोकाटेराजगुरूनुसपुतेमहालेडोकेकोरडेबोबडेसातपुतेधुमाळ इत्यादी आडनावे मिळाली.

मध्ययुगीन कालखंडातही कदमांनी विविध सत्तामध्ये आपले नाव राखले. बहामनी कालखंडात (१४२१) फक्रुद्दीन निजामी यांनी 'कदमराव पदमरावनावाचे काव्य लिहून पद्मराव राजाविषयी माहिती दिली आहे. तर गोव्यांमध्ये कदंबाच्या अगोदर बहामनी सत्तेचे मुख्य सेनापती म्हणून खूप कदम हे मुख्य सेनापती होते. तर विजापूरच्या आदिलशाहीत बंकापूरच्या पर्वतराव कदमांनी आदिलशाही विरोधात केलेले बंड मोठे गाजलेले. छत्रपती शिवरायांच्या कालखंडात अनेक कदमांनी स्वराज्याची सेवा केली. राजांनी काढलेल्या कर्नाटक मोहिमेत तामिळनाडूचा बलगंडापूरमचा किल्ला जिंकल्यानंतर त्याची किल्लेदारी शहाजी कदम यांच्याकडे दिली होती. पुढे शिवरायांच्या निधनासमयी सर्वत्र संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. अशावेळी राजगडावर राजांसोबत जी जाणकार मंडळी उपस्थित होती त्यात बाजी कदमांचा समावेश होता. याची बाजीने पुढे छत्रपती राजारामांना सावलीप्रमाणे सोबत राहून मोठी मदत केली.

स्वराज्यात दोन-तीन बाजी कदम होऊन गेले. पैकी इ. स. १७२० च्या संदर्भानुसार मोगलांच्यावतीने रावरंभा निंबाळकरांची जहागिरी सांभाळतांना पुणे आणि बारामतीची आठ वर्षे जहागिरी ही बाजी कदमांकडे होती. 

छत्रपती शाहूंच्या कारकिर्दीला सुरूवात होताना अमृतराव कदमबांडे यांची फार मोठी मदत झाली होती. त्यामुळे शाहुंनी या घराण्याला विशेष सन्मान देत अमृतरावाचा पुतण्या मल्हाररावांचा विवाह आपली कन्या गजराबाईसोबत केला होता. कदमबांडे घराण्यात अमृतरावासोबत संताजीरघूजीकंठाजीगोजानी यांनी मोठी कामगिरी केली. कंठाजी कदमांची गुजरात प्रांतात मोठी दहशत होती.

या त्रिंबकरावांची मुलगी बडोद्याच्या पहिल्या सयाजीराव गायकवाडांना दिली होती. कदमबांडे घराण्याकडे नंदूरबाररनाळातोरखेडकोपर्लीठाणेधुळे या ठिकाणची जहागिरी होती. याचसोबत अहमदनगर जवळील आळकुटी याठिकाणीही कदमबांडेची मोठी गढी आहे.

छत्रपती शाहूंच्या काळात सापचे इंद्रोजी कदमांची कारकिर्द खूप गाजली. तुळजाभवानीचे मुख्य पुजारी म्हणून कदम कार्यरत असून याच घराण्यातील आनंदरावांची मुलगी महादजी शिंदेंना दिलेली होती. ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचा कारभार याच कदमांनी चालविला. आजही तेथे डंकेवाले कदम आणि हत्तीवाले कदम यांच्या नावाने बाजार आहेत.

बुवाजी कदम हे गोपालदुर्गचे किल्लेदार होते. तर पानिपतात भगवंतराव व पर्वतराव कदम यांनी मोठी कामगिरी केली. फलटणजवळील गिरवीचे कदमांचे बडोद्याच्या गायकवाडाशी सोयरिक असून यादवराव तुकाजी कदमांना सयाजी गायकवाडांची मुलगी रडूबाई दिली होती तर बाळासाहेब कदम यांच्या मुलीचा विवाह बडोद्याच्या शिवाजीराव गायकवाडांसोबत झाला होता.

एकंदर प्राचीन कालखंडापासून कदम घराण्याचा इतिहास उज्वल असून या घराण्यातील एखाद्याने कुठेही गद्दारी केल्याचे इतिहासात नमूद नाही. आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात कदम विखुरलेले असून कर्नाटकगोवाओरिसा या राज्यामध्ये कदम कुलाचा अभ्यास शिकविला जातो. मात्र चालुक्यपल्लववाकाटक यांना अभयदान देणाऱ्या कदंबांचा इतिहास महाराष्ट्रातील अभ्यासक्रमात नाही. मल्हारराव होळकरांच्या झंेड्यातील लालरंग त्यांना कदमाप्रती आदरभाव म्हणून ठेवला होता. कर्नाटक सरकार बनवासी येथे दरवर्षी करोडो रूपये खर्चुन कदंब महोत्सव भरविते. २००५ साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी एका नौसेनिक तळाचे नाव आय.एन.एस कदंबा ठेवले आहे. उडिया भाषेतील कदंब गाथातेलगूतील कदंबकुलकन्नडमधील कावेरी महात्म्य यासारख्या ग्रंथात या घराण्याचा इतिहास पहायला मिळतो. जॉर्ज मोरिससारख्या इंग्रजाने कदमकुळावर संशोधनात्मक लिखाण केलेल आहे. एक हजार वर्षे सत्तेत राहिलेल्या कदंब घराण्याचा इतिहास महाराष्ट्राला अनभिज्ञ असावा हे आश्चर्यकारक आहे.dr. satish kadam


सुरत बदसुरत



महाराजांनी शाहिस्तेखान सारख्या बड्या सरदाराची फटफजिती केल्यानंतर त्यांच्या नावाचा मोठा बोलबाला अखंड हिंदुस्थानात झाला आणि मोगलांची मोठी बेइज्जती झाली औरंगजेबाला दिलेली चपराक कमी वाटली म्हणून की काय महाराजांनी बादशहाचे सुरतेसारखे अत्यंत श्रीमंत शहर लुटून दुसरा दणका द्यायचे ठरवले पुरेपूर तयारी करून सुरतेवर हल्ला देखील केला 6 जानेवारी 1664 पासून पुढे सतत 5 दिवस मराठ्यांनी सुरतेवर हल्ला केला व ती लुटून घेतली महाराजांनी हल्ला केला तेव्हा सुरतेचा प्रमुख मोगल अंमलदार इनायतखान हा पळून जाऊन किल्ल्यात लपून बसला होता आणि त्या भित्र्या खानाने किल्ल्यातून युक्त्या लढविण्यास प्रारंभ केला . महाराज सुरतेस येऊन एक दिवस झाला होता सुरत बेचिराख होत होती धनवान लोकांचे वाडे मराठे खणून काढून संपत्ती बाहेर काढत होते अशा परिस्थितीत खानाने आपला एक तरुण वकील वाटाघाटीसाठी महाराजांकडे पाठविला. त्याने आपल्याबरोबर वाटाघाटीनी

जी कलमे आणली होती, ती महाराजांना थोडीसुद्धा पसंत पडली नाहीत. ते उद्गारले, "खानाची असली कलमे स्वीकारायला आम

"आम्हीही काही बायका नाही. मला तुमच्याशी काही बोलायचे आहे," काही बायका नाही आहोत!" तेव्हा तो वकील उसनन म्हणाला, असे म्हणत एकदम तलवार उपसून त्याने महाराजांवर झडप घातली पण महाराजांचा अत्यंत दक्ष व चपळ असा शरीररक्षक त्यांच्या जवळ उभा होता. वकील धावून येत असता त्याने महाराज व वकील यांच्यामध्ये आपल्या तलवारीचा असा अचूक वार केला की, वकिलाची तलवार महाराजांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्याचा हात वरच्या वर उडविता

गेल; परंतु खुनी वकील इतक्या वेगाने महाराजांवर तुटून पडला होता की, त्याच्या धडकीबरोबर तेही खाली कोसळले. खुनी महाराजांचा अंगावरच पडल्याने महाराज रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत, असे दृश्य दिसू लागले. मारेकऱ्याने महाराजांचा खून केला, ही वार्ता वाऱ्यासारखी मराठ्यांच्या लष्करात पसरली. तेव्हा सुडाच्या भावनेने पेटून उठलेल्या मराठ्यांनी सुरतेत जो सापडेल त्याची कत्तल करा, अशा आरोळ्या ठोकल्या आणि तलवारी सरसावून कत्तलीला सुरुवातही केली परंतु सुदैवाने महाराजांना फारशी दुखापत झाली नव्हती. त्यांनी

वेळीच स्वत:ला सावरले आणि सुरतेमधील लोकांची कत्तल थांबवण्याचा आदेश दिला. त्याचबरोबर लष्कराच्या कैदेत असणाऱ्या सर्व गुन्हेगारांना

व कैद्यांना समोर आणण्याचा हुकूम दिला. खुनी वकिलासह चौघा जणांची डोकी उडविण्यात आली आणि इतर चोवीस जणांचे हात तोडण्यात आले. इतर कैद्यांमध्ये मि. अँथनी स्मिथ नावाचा एक इंग्रज कैदी होता. त्याचा हात तोडण्याची पाळी आली तेव्हा तो हिंदुस्थानी भाषेत खच्चून ओरडला, “एकपरी डोके उडवा; पण हात नको." त्याचे

डोके उडविण्यासाठी मराठ्यांनी त्याची हॅट काढलीसुद्धा; परंतु महाराजांनी कसला तरी विचार करून त्याला जीवदान दिले व त्याची शिक्षा थांबवली. याच स्मिथने पुढे कैदेतून सुटका झाल्यानंतर हा प्रसंग सविस्तर वर्णिला आहे. आपल्या राजावर झालेल्या खुनी हल्ल्याने मराठे खवळून गेले होते. आता त्यांनी सुरतेतील सर्व घरांना आगी लावून दिल्या. घरे व वाडे

जमीनदोस्त केले. सुरत खरोखरच बेसुरत दिसू लागली. आगी एवढ्या भयानक होत्या, की धुरांच्या लोटांमुळे दिवस रात्रीसारखा व रात्र दिवसासारखी वाटू लागली. अशा प्रकारे मराठ्यांच्या राजवरील प्राणसंकट एका शूर मराठा अंगरक्षकाच्या दक्षतेमुळे टळले त्या मर्द मावळ्याने थोडा जर गाफीलपना केला असता तर हिंदवी स्वराज्याची स्वप्ने तिथेच विरली असती पण तो मर्द मराठा कोण होता याचा संदर्भ कुठे सापडत नाही वरील कथा ही English Records Of Shivaji ( 1659- 1682) यावर आधारित आहे त्या इंग्रजांना मावळ्यांची नावे माहीत नसावी म्हणून च त्या मावळ्याचे नाव कळू शकत नाही 

अशा या असंख्य अपरिचित शूरवीर मावळ्यांना शिवविचार प्रतिष्ठान परिवारातर्फे एक मानाचा मुजरा 🙇🏻‍♂️🚩🧡

Saturday, 1 January 2022

#युवराजकुमार_मार्तंडराव_मल्हारराव_पवार.

 #युवराजकुमार_मार्तंडराव_मल्हारराव_पवार.

(देवास छोटी पाती.)
पोस्त्साम्भर :महेश पवार

युवराजकुमार मार्तंडराव मल्हारराव पवार यांचा जन्म दि १९ फेब्रुवारी १९१९ रोजी देवास राॅयल पॅलेस राजवाड्यात झाला.
त्यांनी लहान बहीण राजकुमारी शशिप्रभा राजे यांच्यासह राजवाड्यात विविध ब्रिटिश आणि भारतीय शिक्षकांकडुन खाजगीरित्या शिक्षण घेतले.
फेब्रुवारी १९३४ मध्ये प.पू. मल्हारराव यांचे निधन झाल्यानंतर हे कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाले. तेथे मार्तंडराव सेंट मेरी हायस्कूलमध्ये शिकले आणि माध्यमिक शालेय शिक्षणासाठी केंब्रिज विद्यालय येथे गेले.
त्यानंतर ते डेहरा डून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये सामील झाले आणि त्यानंतर इंग्लंडमधील सँडहर्स्ट मिलिटरी कॉलेजमध्ये आणि 1943 मध्ये ब्रिटिश सैन्यात भरती झाले.
स्वातंत्र्यानंतर, ते दुसऱ्या ग्रेनेडियर्स रेजिमेंटमध्ये होते.नंतर दीर्घ आजाराने दि 30 सप्टेंबर 1970 रोजी त्यांचे निधन झाले.
त्यांची एक मुलगी श्रीमंत कुमारी गीतराजे पवार ज्यांनी व्हाइस अॅडमिरल सुरेश बांगरा यांच्याशी लग्न केले हे कुटुंब पुणे महाराष्ट्रात राहते.
आज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...