विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 8 February 2022

सरदार पवार गढी / वाडा, मलठण ता.शिरुर

 सरदार पवार गढी / वाडा, मलठण ता.शिरुर

postsaambhar::

सुरेश नारायण शिंदे


मध्यकालीन इतिहासात महाराष्ट्रातील अनेक घराण्यांनी आपले अतुलनीय योगदान दिलेले आहे, त्यात भोसले, जाधव, शिंदे, पवार, होळकर इत्यादी घराणी अग्रस्थानी आहेत. वरीलपैकी पवार घराणे हे मूळचे माळव्यातील धार येथील परमार घराण्यातीलच असल्याचे इतिहास संशोधनामुळे सिद्ध झालेले आहे. माळवा प्रदेश हा हिंदुस्थानाच्या केंद्रस्थानी असलेला भूभाग असल्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानातील राज्यव्यवस्थेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जोडला गेलेला आहे. माळव्यातील मुख्य नगर उज्जयिनी म्हणजे पुराणकाळातील भगवान श्रीकृष्णाने सांदीपनि मुनींकडे विद्याभ्यास केलेली पवित्र भूमी. इसवी सनाच्या सातव्या शतकात कनोज येथे प्रसिद्ध हर्षवर्धन याने राज्यसत्ता स्थापिली होती, त्यात माळवा अंतर्भूत झाला पण आठव्या शतकात त्यांची सत्ता लयास गेल्यावर माळव्यात परमार वंशाची सत्ता प्रस्थापित झाली. आठव्या शतकापासून इ.स.१०५५ पर्यंत परमार वंशाची सत्ता अबाधित होती, पुढे त्यांची सत्ता जाऊन यवनांची सत्ता आली. अठराव्या शतकात मात्र पवार घराण्याने म्हणजेच परमाराच्या वंशंजांनी आपली पैतृक कुलराजधानी धारानगरी पुनः प्राप्त केली हा एक अपूर्व दैवयोगच म्हणावा लागेल.
हे घराणे सतराव्या शतकाचे प्रारंभी अहमदनगर जवळील सुपे पेटा परिसरातील अनेक गावात पाटीलक्या सांभाळून होते. सुपे परगणा ही शाहजी महाराजांच्या जाहगीरीचा भाग होता. हा भाग शाहजींच्या वतीने मोकासा म्हणून बाल शिवबा हे राजमाता जिजाऊसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांभाळीत होते. दरम्यान त्यांनी स्वराज्य स्थापनेचा श्रीगणेशा केला होता त्यांस बारा मावळातील असंख्य मावळ्यांचा सहभाग होता. तत्कालीन सुपे पेट्यातील पवार घराण्याचा कर्तृत्ववान पुरूष साबूसिंग उर्फ साबाजी पवार हे शिवछत्रपतिंच्या सेवेत दाखल झाले. आपल्या शौर्य व पराक्रमामुळे नावलौकिकास आलेल्या साबूसिंग पवार यांनी आपल्या सुपे गावात कायमचे ठाणे करून त्या सुपे गावचे नामांतरण 'सुखेवाडी' असे केले. छत्रपतिंच्या सेवेत असलेल्या साबूसिंगचा होणारा उत्कर्ष हा सुखेवाडी ( सुपे) गावाजवळील हंगे या गावातील दळवी यांना पाहवत नव्हता व दळवी त्यांचा द्वेष करून झगडा काढीत होता. त्यांच्या वादातून अनेकवेळा लहानमोठा संघर्ष घडत होता. एके रात्री हंगे व सुपे ह्या गावांच्या दरम्यान असलेल्या जांभुळ ओढ्यात दळवी दबा धरून बसला होता तर साबूसिंग बेसावधपणे येत असताना, रात्रीच्या अंधारात छापा घालून साबूसिंगास ठार केले. इर्षा व वतनाच्या लालसेतून हे अघोरी कृत्य हंगे गावच्या दळवींने केले होते. साबूसिंगाचा एकुलता एक मुलगा कृष्णाजी लहान असल्याने त्यास प्रतिस्पर्ध्याकडून काही दगा फटका होऊ नये म्हणून साबूसिंगाच्या पदरच्या लोकांनी त्याला त्याच्या मातेसह आजोळी म्हणजेच संगमनेर येथे पोहचविले.
कृष्णाजीने तारुण्यात पदार्पण केल्यावर आपल्या पित्याचा म्हणजेच साबूसिंग उर्फ साबाजी यांचा मृत्यू कसा दग्याने झाला हे आईकडून कळाले तेव्हा कृष्णाजी छत्रपति शिवाजी महाराजांच्या सेवेत दाखल झाले. महाराजांनी त्यांना सुखेवाडी ( सुपे) येथे असलेल्या मोकादमीवर पुनःश्च पाठवून दिले. कृष्णाजीला बुबाजी व केरोजी असे दोन कर्तृत्ववान मुले होती, ती देखील पित्यासह छत्रपतिंच्या आश्रयास राहिली. कृष्णाजीकडे सुपे प्रमाणे वाघाळे येथील देखील मोकादमकी होती तर इ.स.१६९९ मधे मलठणची निम्मी मोकादमी ही खरेदी केली. यावेळी कृष्णाजीचे तिघे पुत्र बुबाजी, केरोजी व रायाजी हे अधिक वैभवास पोहचले होते. कृष्णाजीचे निधन निश्चित कधी व कसे झाले याबाबत कोणता ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. छ.राजाराम महाराजांच्या कालखंडात बुबाजी, रायाजी व केरोजी यांनी मोठे शौर्य व पराक्रम निश्चितपणे केला असला पाहिजे कारण छत्रपति राजाराम महाराजांनी बुबाजी पवार यांस 'विश्वासराव' हा बहुमान व सरंजाम दिला होता तर केरोजी पवार यांना ' सेनाबारासहस्त्री ' ही बहुमानाची पदवी दिली होती. केरोजीच्या शिक्क्यात "श्री राजाराम चरणी दृढभाव " अशी अक्षरे होती. पुढील काळात बुबाजी, रायाजी व केरोजी या तीन बंधूंची वेगवेगळी तीन घराणी निर्माण झाली, त्यात बुबाजीचे घराण्याचा विस्तार फार मोठा असून धार व देवास संस्थाने निर्माण झाली आहेत. रायाजीचे घराणे वाघाळकर घराणे म्हणून वाघाळे येथे तर केरोजीचे नगर देवळेकर म्हणून खानदेशातील नगर देवळे येथे प्रसिद्ध आहेत. बुबाजीचे दोन पुत्र काळोजी व संभाजी हे होते, काळोजीचा वंश माळव्यात देवास येथे स्थिरावला. बुबाजीचा धाकटा संभाजी हा छत्रपति राजाराम महाराजांपासून छत्रपति शाहू महाराजांच्या कालखंडापर्यंत लष्कर बाळगून मोहीमेवर जात असल्याचा उल्लेख आढळून येतो. संभाजी पवार या दीर्घायू कर्त्यापुरूषाने आपल्या कार्यकाळात मलठण ( ता. शिरुर ) नवीन घर बांधले व मुलांस व नातवांस नवीन पाटीलक्या व वतने खरेदी करून अहमदनगर जिल्ह्यातील निरनिराळ्या ठिकाणी वसविले. या संभाजी पवार यांस उदाजीराव, आनंदराव व जगदेवराव अशी तीन मुले होती. उदाजीरावची लष्करी कारवाई इ.स.१७०९ पासून सुरू झाली असून माळवा व गुजरात वर मोहीमा करून मराठा साम्राज्याची ठाणी वसवून हक्क स्थापित केले. इ.स.१७०९ मधे उदाजीरावांनी माळव्यातील मांडवगड येथे अनेक शतके मालव राजधानीवर मराठ्यांचा विजयी झेंडा रोवला. इ.स.१७१८ मधे छत्रपति शाहू महाराजांनी सय्यद बंधूच्या मदतीने पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखाली जे मोठे सैन्य दिल्लीस पाठवले होते, त्यात खंडेराव दाभाडे, भोसले, मल्हारराव होळकर, बाजीराव बाळाजी व उदाजी पवार यांच्या समावेश होता. माळवा व गुजरातवर अनेक मोहीमात उदाजीरावांचा प्रामुख्याने सहभाग होता. पेशवा थोरला बाजीराव व उदाजीराव यांच्यात १७३१ च्या आधी काही मतभेद झाल्याने ते सेनापति खंडेराव दाभाडे यांच्या पक्षास सामील झाले होते परंतु त्याचवर्षी सेनापति दाभाडे व थोरले बाजीराव यांच्यात डभोई नजीक असलेल्या भीलापुर येथे झालेल्या लढाईत उदाजीराव व चिमणाजी दामोदर यांचा पराभव झाला. त्याचवर्षी पेशवा बाजीराव व उदाजीराव, चिमणाजी यांच्यात समेट झाल्याने पेशव्यांनी दोघांनाहि मानाची वस्त्रे व हत्ती भेट देऊन गौरव केला. इ.स.१७३५ मधे छ.शाहू महाराज हे उदाजीरावांवर नाराज झाले होते परंतु धावडशीचे ब्रम्हेंद्रस्वामींनी काही दिवसांतच महाराजांची नाराजी दूर करून पुन्हा उदाजीरावांना दौलतीच्या सेवेत घेतले. माळवा व गुजरात येथे सुरूवातीला मराठ्यांचे वर्चस्व स्थापन करण्यात उदाजीरावांचे योगदान फार मोठे आहे. आपल्या अंगच्या धाडसाने, रणशौर्याने बादशाही मुलुखात त्यांचा दरारा निर्माण झाला होता. माळवा प्रांतात उदाजीरावांच्या पराक्रमाचे वर्णन करणारी म्हण प्रचारात आली ती म्हणजे, " जिधर उदा उधर खुदा." ब्रम्हेंद्रस्वामींनी उदाजीराव पवार यांना लिहलेला पत्राचा मायना त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा आहे. स्वामी लिहतात," सहस्त्रायु चिरंजीव विजयी भव रणधीर रणशूर अर्जुनतुल्य उदाजी पवार."



सरदार पवार गढी / वाडा, मलठण ता.शिरुर

शिक्रापूर ते मलठण सुमारे वीस कि.मी. अंतर आहे. वाटेत गणेगाव खालसा या गावाच्या हद्दीत रस्त्याच्या डाव्या बाजूला समाधि सदृश्य बांधकाम असलेल्या दोनतीन प्राचीन वास्तू दृष्टीस पडल्या मात्र त्याबाबत माहिती मिळाली नाही. दुपारी १२ वाजताच्या दरम्यान आम्ही मलठण गावात प्रवेश केला. गावात प्रवेश करतानाच भव्य तटबंदी व बुरूज दृष्टीस आल्याने प्रवासाने आलेली काहीशी मरगळ दूर होऊन शरीरात नवचैतन्य आले.

सुमारे १०० फूट रंदी व १०० फूट लांबी असलेला, चारहि कोपऱ्यावर चार बुरूज असलेल्या वाड्याच्या प्रथम दर्शनीच सरदार पवार यांच्या तत्कालीन वैभवाची जाणीव होते. सुमारे १५ फूट उंचीच्या दगडी बांधकामातील तटबंदीवर दोनतीन फूट पक्क्या भाजक्या वीटांचे चुन्यातील बांधकाम आहे. वाड्याच्या बाहेरील भागात मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला अंतर्गत भाजक्या वीटांनी बांधकाम केलेली गोलाकार विहीर असून उत्तरेस पाण्याचा रहाट आहे. याच विहिरीत उतरण्यासाठी पूर्वेस भुयारी वाट असून ती काही दगडी पायऱ्या उतरून गेल्यावर दक्षिणेकडे म्हणजे विहिरीच्या हौद्यात घेऊन जाते. ही विहीर पूर्वीच्याकाळी मलठण येथील स्थानिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवित असणार. मुख्य दरवाजाचे वरील भागात पाच फूटी उंचीच्या तीन कमानी नगारखाना पडझड झालेल्या अवस्थेत आहे. भव्य वाड्यात प्रवेश करताना दोन्ही बाजूला दगडी बांधकामातील प्रशस्त सुरक्षा रक्षकांच्या देवड्या आहेत तर डाव्या बाजूच्या देवडीतून नगारखान्यात जाण्यासाठीचा दगडी पायरी मार्ग आहे. पेशवाई कालखंडात बहुतांश सरदारांच्या वाड्याच्या प्रवेशद्वारांची सुरक्षा अरब जमातीच्या रक्षकांकडे असायची त्यामुळे पूर्वीच्याकाळी येथे देखील अरब पहारेकरी असावेत असे वाटते.
चोहोबाजूची भक्कम तटबंदीच्या आतील भागात बरोबर मध्यवर्ती भागात दुमजली व दोन चौकाचा सरदार पवारांच्या राहत्या वाड्याचे अवशेष दिसून येतात. आतील वाड्याच्या उजव्या बाजूची दुमजली इमारत असल्याची भव्य भिंतीचा विशिष्ट भाग व सागवानी तुळई तत्कालीन वैभव कथन करण्यास पुरेसे आहेत.दोन्हीहि बाजूच्या भिंतीतील दर्शनी भागात जमिनीपासून सातआठ फूट उंचीवर घडीव दगडीतील लहान कोरीव कमानीचे देवकोष्टक असावीत. बरोबर मध्यावर प्रवेशद्वाराचे घडीव दगडी जोते असून दक्षिण - उत्तर दिवाणखान्याच्या सोप्यावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. पहिल्या चौकात दोनतीन फूट खोलीचा आयताकृति घडीव दगडींचे जोते व दगडी फरसी बांधकाम चुन्याच्या मिश्रणात केलेला असून त्यांचे सांधे अशा पद्धतीने सांधलेले आहेत की हा सर्व हौदा एकाच दगडात युगशिल्पी कारागीराच्या कसबी हातांनी बनविला आहे असा निश्चित भास झाल्याशिवाय राहात नाही. त्यानंतर दुसरा चौक देखील पहिल्या सारखा असून याचे मध्यभागी तुलसी वृदांवन आहे. तीनही बाजूच्या भिंतीत कमानी रचनेचे पक्क्या वीटांचे नानाविध कोनाडे आहेत. या वाड्यात नक्कीच तत्कालीन काळात शौचकूप असावेत असे काही अवशेषांवरून वाटते परंतु निश्चितपणे सांगणे अवघड आहे. दोन्ही चौकांचे दरम्यान असलेल्या ठिकाणी एक भुयारी मार्ग असून तो काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मलठणपासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या कवठे यमाई येथील यमाई देवीच्या मंदिरात जातो तर काहींच्या मते तटबंदी बाहेरील विहिरीत निघतो.आतील दुमजली वाड्यातील अवशेषांत सर्वात जास्त लक्ष वेधून घेतात ते तेथील जागोजाग असलेले भव्य लाकडी स्तंभाचे तळखडे.
मुख्य वाड्याच्या दक्षिणेकडील आग्नेय - नैऋत्य तटबंदीत मुख्य दरवाजाखेरीज दुसरा दरवाजा असल्याचे दिसून येते मात्र तो दरवाजा दगडी बांधकामाने भरून तटबंदी समाविष्ट केला आहे. आग्नेयकडील बुरूजाच्या आतील भागात उत्तराभिमुख दुमजली सागवानी इमारत सुस्थितित असून स्थानिकांच्या म्हणण्यानुसार तो दिवानखाना आहे. पूर्वी या वास्तूवर खापरी नळीची कौले होती ती हटवून सध्यस्तितित लोखंडी पत्र्याचे आच्छादन केले आहे. सागवानी नक्षीदार खांबांच्या वरील भागात नक्षीदार कमानी लक्ष वेधून घेतात. या वास्तू शेजारीच वाड्यातील पाण्याची गरज भागविणारी बारादरी नावाची गोलाकार पक्क्या वीटांमधे चुन्याच्या मिश्रणात बांधलेली विहीर / बारव आहे. हीचे पाणी काढण्यासाठी पश्चिमेस रहाट आहे तर आत उतरण्यासाठी उत्तरेकडून बंदिस्त दवाजातून काही दगडी पायऱ्या उतरल्यावर काटकोनात पश्चिमेकडे विहिरीच्या पाण्याकडे घेऊन जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या विहिरीच्या अंतर्गत बांधकामात गोलाकार सहा कमानी असून आतील भागातून गोलाकार वास्तूच तयार केली आहे. याच्या खालील भागात देखील सहा कमानीची गोलाकार विहिरीतील वास्तू पाण्याखाली असल्याचे तेथील कर्मचारी सांगतो. विहिरीतील हा भाग म्हणजे सैनिकांचे गुप्त स्थान असावे किंवा अन्य उपयोग होत असावा. हि बारादरी म्हणजे तत्कालीन स्थापत्यशैलीचा अजोड नमुना यात दुमत शक्यच नाही. मुख्य तटबंदी व आतील राहता वाडा यांच्या दरम्यान असलेल्या मोकळ्या जागेत विविध प्रकारची शोभेची व फुलझाडे मनस्वी सांभाळली असल्याने एक प्रकारचे सौंदर्य प्राप्त झाले आहे.
सरदार पवार यांच्या वाड्यामधून बाहेर आल्यावर वाड्याच्या उत्तरेला काही अंतरावर सरदार पवार यांच्या घोड्यांची पागा असलेल्या इमारतीचे काही अवशेष दिसून आले. पूर्वी वाड्यासमोरच असलेली चुन्याचा घाणा व दगडी चाक काळाच्या ओघात इतरत्र मातीत लुप्त झाले आहे. मलठण गावचे ग्रामदैवत असलेल्या मल्लिकार्जुन मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दुपारी श्री.भोसले यांनी अगत्याने आम्हाला भोजन केले तर तेथील ग्रा.वि.अधिकारी श्री.गायकवाड यांनी त्यांचे निवासस्थानी चहापान केले. कधीकाळी दुष्काळाच्या छायेत असलेल्या या परिसरात गावात बागायती शेती केली जाते कारण डिंभे व चास या धरणाचे कालवे गेलेले आहेत
मलठणचे सरदार पवार घराण्याचा वंशवेल
१) साबूसिंह / साबाजी पवार
l
कृष्णाजी
|
----------------------------------------------------------------
| | |
१)बुबाजी २)राणोजी (रायाजी) ३) केरोजी
(सुपेकर) (वाघाळकर) (नगर देवळेकर)
|
----------------------------------------------------------------
|
१)काळुजी २)संभाजी
|
-------------------------------------------------------------------
| | |
१)उदाजीराव १) आनंदराव जगदेवराव
(मलठण) ( धार ) ( चित्तेगाव )
|
-------------------------------------------------------------------
| | | |
२)दार्कुजी मैनारावजी गोविंदराव चंद्रराव
|
३) मल्हारराव
|
४) यशवंतराव
( दत्तक )
|
------------------------------------------------------------------
| | |
मल्हारराव अनिरुद्धराव ५) संभाजीराव
(दत्तक धार) (दत्तक धार ) |
|
|
---------------------------------------------------------------
| | |
६) यशवंतराव भागुजीराव सेतुरामसिंह
| ( दत्तक धार ) |
७)धैर्यशीलराव |
|
-----------------------------------------------------------------
| |
विक्रमसिंह जगदेवराव
( दत्तक धार )
संदर्भ - १) धार संस्थानचा इतिहास
( अर्वाचीन काल )
लेखक - काशिनाथ कृष्ण लेले
शिवराम काशीनाथ ओक
इतिहास कचेरी संस्थान धार इ.स.१९२६
२) मराठी रिसासत - गो.स.सरदेसाई
®© सुरेश नारायण शिंदे, भोर
shindesn16@gmail.com

#कहाँ_राजा_भोज_और_कहाँ_गंगु_तैलीl

 



जब राजा भोज जीवित थे तो कहा जाता था-
(आज जब भोजराज धरती पर स्थित हैं तो धारा नगरी सदाधारा (अच्छे आधार वाली) है; सरस्वती को सदा आलम्ब मिला हुआ है; सभी पण्डित आदृत हैं।)
जब उनका देहान्त हुआ तो कहा गया -
(आज भोजराज के दिवंगत हो जाने से धारा नगरी निराधार हो गयी है ; सरस्वती बिना आलम्ब की हो गयी हैं और सभी पंडित खंडित हैं।)तिलक मंजरी ..
अल्पायु में सिंहासनारोहण के समय महान राजा भोज चारों ओर से शत्रुओं से घिरे थे। उत्तर में तुर्को से, उत्तर-पश्चिम में राजपूत सामंतों से, दक्षिण में विक्रम चालुक्य, पूर्व में युवराज कलचुरी तथा पश्चिम में भीम चालुक्य से उन्हें लोहा लेना पड़ा। उन्होंने सब को हराया। तेलंगाना के तेलप और तिरहुत के गांगेयदेव को हराने से एक मशहूर कहावत बनी- ''कहां राजा भोज, कहां गंगू तेली''
#भोज नाम से और भी राजा हुए हैं जैसे मिहिर भोज। हम यहां बात कर रहे हैं उन राजा भोज की जिन्होंने अपनी राजधानी धार को बनाया था। उनका जन्म सन् 980 में महाराजा #विक्रमादित्य की नगरी उज्जैनी में हुआ। #राजा #भोज_चक्रवर्ती_सम्राट_विक्रमादित्य के वंशज थे। पन्द्रह वर्ष की छोटी आयु में उनका राज्य अभिषेक मालवा के राजसिंहासन पर हुआ। प्रसिद्ध संस्कृत विद्वान डॉ. रेवा प्रसाद द्विवेदी ने प्राचीन संस्कृत साहित्य पर शोध के दौरान मलयाली भाषा में भोज की रचनाओं की खोज करने के बाद यह माना है कि राजा भोज का शासन सुदूर केरल के समुद्र तट तक था।
#
ग्वालियर से मिले महान राजा भोज के स्तुति पत्र के अनुसार केदारनाथ मंदिर का राजा भोज ने 1076 से 1099 के बीच पुनर्निर्माण कराया था। राहुल सांकृत्यायन के अनुसार यह मंदिर 12-13वीं शताब्दी का है। इतिहासकार डॉ. शिव प्रसाद डबराल मानते हैं कि शैव लोग आदिशंकराचार्य से पहले से ही केदारनाथ जाते रहे हैं, तब भी यह मंदिर मौजूद था। इतिहासकारों के अनुसार राजा भोज परमार मालवा के 'परमार' वंश' के नौवें यशस्वी राजा थे। उन्होंने 1018 ईस्वी से 1060 ईस्वी तक शासन किया। कुछ विद्वानों अनुसार परमार वंश ने मालवा पर सन् ७०० से १४०० तक राज किया। भोजराज इसी महाप्रतापी वंश की पांचवीं पीढ़ी में थे।
कुछ विद्वान मानते हैं कि महान राजा भोज (भोजदेव) का शासनकाल 1000 से 1053 तक रहा। राजा भोज ने अपने काल में कई मंदिर बनवाए। राजा भोज के नाम पर भोपाल के निकट भोजपुर बसा है। धार की भोजशाला का निर्माण भी उन्होंने कराया था। कहते हैं कि उन्होंने ही मध्यप्रदेश की वर्तमान राजधानी भोपाल को बसाया था जिसे पहले 'भोजपाल' कहा जाता था। इनके ही नाम पर भोज नाम से उपाधी देने का भी प्रचलन शुरू हुआ जो इनके ही जैसे महान कार्य करने वाले राजाओं की दी जाती थी।
#भोज_के_निर्माण_कार्य : मध्यप्रदेश के सांस्कृतिक गौरव के जो स्मारक हमारे पास हैं, उनमें से अधिकांश राजा भोज की देन हैं, चाहे विश्वप्रसिद्ध भोजपुर मंदिर हो या विश्वभर के शिवभक्तों के श्रद्धा के केंद्र उज्जैन स्थित महाकालेश्वर मंदिर, धार की भोजशाला हो या भोपाल का विशाल तालाब- ये सभी राजा भोज के सृजनशील व्यक्तित्व की देन हैं।
राजा भोज नदियों को चैनलाइज या जोड़ने के कार्य के लिए भी पहचाने जाते हैं। आज उनके द्वारा खोदी गई नहरें और जोड़ी गई नदियों के कारण ही नदियों के कंजर्व वाटर का लाभ आम लोगों को मिल रहा है। भोपाल शहर का बड़ा तालाब इसका उदाहरण है। भोज ने भोजपुर में एक विशाल सरोवर का निर्माण कराया था, जिसका क्षेत्रफल 250 वर्ग मील से भी अधिक विस्तृत था। यह सरोवर पन्द्रहवीं शताब्दी तक विद्यमान था, जब उसके तटबन्धों को कुछ स्थानीय शासकों ने काट दिया।
उन्होंने जहां भोज नगरी (वर्तमान भोपाल) की स्थापना की वहीं धार, उज्जैन और विदिशा जैसी प्रसिद्ध नगरियों को नया स्वरूप दिया। उन्होंने केदारनाथ, रामेश्वरम, सोमनाथ, मुण्डीर आदि मंदिर भी बनवाए, जो हमारी समृद्ध सांस्कृतिक धरोहर हैं।
राजा भोज ने शिव मंदिरों के साथ ही सरस्वती मंदिरों का भी निर्माण किया। राजा भोज ने धार, मांडव तथा उज्जैन में 'सरस्वतीकण्ठभरण' नामक भवन बनवाए थे जिसमें धार में 'सरस्वती मंदिर' सर्वाधिक महत्वपूर्ण है। एक अंग्रेज अधिकारी सीई लुआर्ड ने 1908 के गजट में धार के सरस्वती मंदिर का नाम 'भोजशाला' लिखा था। पहले इस मंदिर में मां वाग्देवी की मूर्ति होती थी। मुगलकाल में मंदिर परिसर में मस्जिद बना देने के कारण यह मूर्ति अब ब्रिटेन के म्यूजियम में रखी है।
गुजरात में जब महमूद गजनवी (971-1030 ई.) ने सोमनाथ का ध्वंस किया तो इतिहासकार ई. लेनपूल के अनुसार यह दु:खद समाचार शैव भक्त राजा भोज तक पहुंचने में कुछ सप्ताह लग गए। तुर्की लेखक गरदिजी के अनुसार उन्होंने इस घटना से क्षुब्द होकर सन् 1026 में गजनवी पर हमला किया और वह क्रूर हमलावर सिंध के रेगिस्तान में भाग गया।
तब राजा भोज ने हिंदू राजाओं की संयुक्त सेना एकत्रित करके गजनवी के पुत्र सालार मसूद को बहराइच के पास एक मास के युद्ध में मारकर सोमनाथ का बदला लिया और फिर 1026-1054 की अवधि के बीच भोपाल से 32 किमी पर स्थित भोजपुर शिव मंदिर का निर्माण करके मालवा में सोमनाथ की स्थापना कर दी। विख्यात पुराविद् अनंत वामन वाकणकर ने अपनी पुस्तक 'द ग्लोरी ऑफ द परमाराज आफ मालवा' में 'कोदंड काव्य' के आधार पर तुरूष्को (तुर्को) पर भोजराज की विजय की पुष्टि की है। यही कारण था कि बाद के काल में मालवा पर भी मुस्लिम आक्रांताओं का लगातार आक्रमण होता रहा और खासकर धार एवं भोपाल को योजनाबद्ध निशाने पर लिया गया।
#राजा_भोज_का_परिचय : महान चक्रवर्ती सम्राट वीर विक्रमादित्य राजपूत परमार के वंशज थे महाराजाधिराज सम्राट भोज. परमारवंशीय राजाओं ने मालवा के एक नगर धार को अपनी राजधानी बनाकर 8वीं शताब्दी से लेकर 14वीं शताब्दी के पूर्वार्ध तक राज्य किया था। उनके ही वंश में हुए परमार वंश के सबसे महान अधिपति महाराजा भोज ने धार में 1000 ईसवीं से 1055 ईसवीं तक शासन किया।
महाराजा भोज से संबंधित 1010 से 1055 ई. तक के कई ताम्रपत्र, शिलालेख और मूर्तिलेख प्राप्त होते हैं। भोज के साम्राज्य के अंतर्गत मालवा, कोंकण, खानदेश, भिलसा, डूंगरपुर, बांसवाड़ा, चित्तौड़ एवं गोदावरी घाटी का कुछ भाग शामिल था। उन्होंने उज्जैन की जगह अपनी नई राजधानी धार को बनाया। राजा भोज को उनके कार्यों के कारण उन्हें 'नवसाहसाक' अर्थात् 'नव विक्रमादित्य' भी कहा जाता था। महाराजा भोज इतिहास प्रसिद्ध मुंजराज के भतीजे व सिंधुराज के पुत्र थे। उनकी पत्नी का नाम लीलावती था।
#ग्रंथ _रचना : राजा भोज खुद एक विद्वान होने के साथ-साथ काव्यशास्त्र और व्याकरण के बड़े जानकार थे और उन्होंने बहुत सारी किताबें लिखी थीं। मान्यता अनुसार भोज ने 64 प्रकार की सिद्धियां प्राप्त की थीं तथा उन्होंने सभी विषयों पर 84 ग्रंथ लिखे जिसमें धर्म, ज्योतिष, आयुर्वेद, व्याकरण, वास्तुशिल्प, विज्ञान, कला, नाट्यशास्त्र, संगीत, योगशास्त्र, दर्शन, राजनीतिशास्त्र आदि प्रमुख हैं।
उन्होंने ‘समरांगण सूत्रधार’, ‘सरस्वती कंठाभरण’, ‘सिद्वांत संग्रह’, ‘राजकार्तड’, ‘योग्यसूत्रवृत्ति’, ‘विद्या विनोद’, ‘युक्ति कल्पतरु’, ‘चारु चर्चा’, ‘आदित्य प्रताप सिद्धांत’, ‘आयुर्वेद सर्वस्व श्रृंगार प्रकाश’, ‘प्राकृत व्याकरण’, ‘कूर्मशतक’, ‘श्रृंगार मंजरी’, ‘भोजचम्पू’, ‘कृत्यकल्पतरु’, ‘तत्वप्रकाश’, ‘शब्दानुशासन’, ‘राज्मृडाड’ आदि ग्रंथों की रचना की।
'#भोज प्रबंधनम्' नाम से उनकी आत्मकथा है। हनुमानजी द्वारा रचित रामकथा के शिलालेख समुद्र से निकलवाकर धार नगरी में उनकी पुनर्रचना करवाई, जो हनुमान्नाष्टक के रूप में विश्वविख्यात है। तत्पश्चात उन्होंने चम्पू रामायण की रचना की, जो अपने गद्यकाव्य के लिए विख्यात है।
आईन-ए-अकबरी में प्राप्त उल्लेखों के अनुसार भोज की राजसभा में 500 विद्वान थे। इन विद्वानों में नौ (नौरत्न) का नाम विशेष रूप से उल्लेखनीय हैं। महाराजा भोज ने अपने ग्रंथों में विमान बनाने की विधि का विस्तृत वर्णन किया है। इसी तरह उन्होंने नाव व बड़े जहाज बनाने की विधि का विस्तारपूर्वक उल्लेख किया है। इसके अतिरिक्त उन्होंने रोबोट तकनीक पर भी काम किया था।
मालवा के इस चक्रवर्ती, प्रतापी, काव्य और वास्तुशास्त्र में निपुण और विद्वान राजा, राजा भोज के जीवन और कार्यों पर विश्व की अनेक यूनिवर्सिटीज में शोध कार्य हो रहा है।
#भोज_का_साम्राज्य : उदयपुर की ग्वालियर प्रशस्ति में लिखा है कि सम्राट भोज का राज्य उत्तर में हिमालय से, दक्षिण में मलयाचल तक और पूर्व में उदयाचल से पश्चिम में अस्ताचल तक फैला हुआ था। इस सम्बन्ध में निम्न श्लोक इस प्रकार है -
आकैलासान्मलयर्गिरतोऽ स्तोदयद्रिद्वयाद्वा।
भुक्ता पृथ्वी पृथुनरपतेस्तुल्यरूपेण येन॥१७॥[4][5]
कुछ विद्वानों का मत है कि सम्राट भोज का राज्य लगभग संपुर्ण भारतवर्ष पर ही था। उसका अधिकार पूर्व में डाहल या चेदि, कन्नौज, काशी, बंगाल, बिहार, उड़ीसा और आसाम तक था । दक्षिण में विदर्भ, महाराष्ट्र, कर्णाट और कांची तक तथा पश्चिम में गुजरात, सौराष्ट्र और लाट तक, तथा उत्तर में चित्तौड़ साँभर और काश्मीर तक था। चम्पू रामायण में भोज को विदर्भ का राजा कहाँ गया है और विदर्भराज की उपाधि से विभुषित किया गया है। [6][7] भोज के राज्य विस्तार को दर्शाता हुआ और एक श्लोक इस प्रकार है -
केदार-रामेश्वर-सोमनाथ-सुण्डीर-कालानल-रूद्रसत्कैः ।
सुराश्रयैर्व्याप्य च यःसमन्ताद्यथार्थसंज्ञां जगतीं चकार ॥२०॥
इसी से स्पष्ट है कि भोज ने अपने साम्राज्य के पूर्वी सीमा पर सुंदरबन स्थित सुण्डिर, दक्षिणी सीमा पर रामेश्वर, पश्चिमी सीमा पर सोमनाथ तथा उत्तरी सीमा पर केदारनाथ सरिख विख्यात मंदिरों का निर्माण तथा पुर्ननिर्माण किया था। भोज ने काश्मीर में कुण्ड भी बनवाया था। भोज के साम्राज्य विस्तार पर विद्वानों में थोडा मतभेद हो सकता है क्योंकि भोज की साम्राज्य सीमाएं विस्तिर्ण किंतु थोड़ी अस्थिर रही। [9] भोज का काश्मीरराज्य भी इतिहास में दर्ज है। विश्वेश्वरनाथ रेउ ने राजा भोज से सम्बन्धित राज्यों की सुचि में काश्मीरराज्य के विषय में लिखा है कि राजा भोज ने सुदूर काश्मीरराज्य के कपटेश्वर ( कोटेर ) तीर्थ में पापसूदन का कुण्ड बनवाया था और वह सदा वहीं के लाए हुए जल से मुँह धोया करता था । इसके लिये वहाँ का जल मंगवाने का पूरा पूरा प्रबन्ध किया गया था ।

सम्राट राजा भोज परमार (पवार)

 सम्राट राजा भोज परमार (पवार)

माळव्यातील परमार घरण्यातील एक विद्वान व कलाभिज्ञ थोर राजा. वाक्‌पतिराज ऊर्फ मुंज याचा धाकटा भाऊ सिंधुराज यांचा पुत्र. सिंधुराजाच्या मृत्यूनंतर परमारांच्या गादीवर इ. स. सु. १००० मध्ये ते आले. त्यांच्या जन्ममृत्यूंच्या सनांविषयी तसेच राज्यारोहणतिथिविषयी इतिहासात मतैक्य नाही. त्यांच्या कारकीर्दीतील उपलब्ध कोरीव लेख इ. स. १०२० ते १०४७ दरम्यानच्या काळातील आहेत. ते स्वतःस त्रिभुवननारायण अशी उपाधी लावीत असे. त्यांच्या कर्तृत्वाविषयी भोजप्रबंध या ग्रंथात विपुल माहिती मिळते. राज्यारोहणानंतर त्यांनी आपली राजधानी उज्जयिनीहून (उज्जैन) धारानगरी (विद्यमान धार) येथे नेली. त्यामुळे त्यांना धारेश्रव हे नामाभिधान मिळाले.
भोज यांनी प्रदीर्घकाळ राज्य केले. या काळात त्यांनी चितोड, बांसवाडा, डूंगरपूर, खानदेश, कोंकण इ. भाग घेऊन भारतातील मोठ्या भूप्रदेशावर आपले स्वामित्व स्थापिले होते. बुंदेलखंड वा बाधेलखंड हे प्रदेश वगळता नर्मदा नदीच्या उत्तरेकडील मुलूख व दक्षिणेकडील गोदावरी नदीपर्यंतच्या भूप्रदेशावर त्यांचे आधिपत्य होते. इ. स. १०४३ मध्ये मुसलमानांच्या आक्रमणाला आळा घालण्यासाठी हिंदु राजांचा एक सहासंघ स्थापन झाला होता त्यातही भोजा यांनी सहभाग घेतला होता, असे परंपरा सांगते. भोज हे सतत युद्धांत गुंतला असले, तरी विद्या आणि कला यांना त्याने दिलेला आश्रय आणि त्याची ग्रंथसंपदा यांमुळे परमारांची कीर्ती भारतीय इतिहासात अजरामर झाली आहे. त्यांनी मंदिरे बांधली, तद्वतच भोपाळजवळ एक तलाव खोदला. उज्जयिनी व धार येथील अवशेषांपैकी भोजशाला, राजमार्तंड नावाचा राजमहल, जयस्तंभ, सरस्वतिसदन पाठशाला आणि काही मंदिरे अवशिष्ट असून भोजशाला भोजराजाकी निसाल किंवा कमाल मौला या नावाने प्रसिद्ध आहे. येथे त्या वेळी वेदशाक्याभ्यासाची सोय होती. त्यांनी संस्कृत विद्येस उत्तेजन देऊन राज्यात विद्यालये व पाठशाला स्थापन केल्या. भोज विद्वान होते आणि विद्वानांचा चाहता होते. परिमल वा पद्मगुप्त, धनपाल, भट्ट गोविंद, विद्यापती भास्कर भट्ट इ. विद्वानांना व पंडितांना त्यांचा उदार आश्रय होता. भोज यांनी स्वतः ग्रंथ लिहिले व विद्वानांकडून लिहूनही घेतले.
त्यांनी साहित्याचे विविध प्रकार हाताळले होते. त्यांच्या ग्रंथांपैकी राजमृगाङ्‌क, राजमार्तण्ड, विद्वज्जनवल्लभ प्रश्नज्ञानम्, आदित्यप्रतापसिद्धांत, सरस्वतीकण्ठाभरण, व्यवहारसमुच्चय, चारुचर्या, समरांगण-सूत्रधार, युक्तिकल्पतरु, विश्रांतविद्याविनोद इ, ग्रंथ प्रसिद्ध आहेत. समरांगण-सूत्रधार व युक्तिकल्पतरु ह्या दोन ग्रंथांत त्यांनी शिल्पशास्त्र, वास्तुकला, चित्रकला तसेच शासनव्यवस्था, सैन्याचे प्रकार, नौकानयन, कर व अर्थव्यवस्था इ. विविध विषयांची सांगोपांग चर्चा केली आहे. यांशिवाय चम्पुरामायण, विद्याविनोद यांसारख्या ग्रंथांवरून त्यांनी काव्य हा विषयही सहजतेने हाताळलेला दिसतो. तसेच त्यांचे शालीहोत्रम्, शब्दानुशासनम्, सिद्धांतसंग्रह, सुभाषितप्रबंध इ. ग्रंथही महत्त्वपूर्ण आहेत. टेओडोर आउफ्रेख्ट या जर्मन भारतविद्या पंडिताने भोज राजांच्या तेवीस ग्रंथांचा उल्लेख आपल्या ग्रंथसूचीत केला आहे. तसेच अल्‌-बीरूनी या अरबी इतिहासकारानेसुद्धा आपल्या इतिहासविषयक ग्रंथात भोज परमारांच्या लेखनासंबंधी गौरवोद्‌गार काढले आहेत. धारानगरीत सरस्वतीकंठाभरण नावाच्या पाठशाळेतील कूर्मशतक व भर्तृहरीच्या कारिका दगडांवर कोरलेल्या असून ते कोरीव लेख आजही पाहावयास सापडतात.
भोज हा पराक्रमी व विद्वान राजा होते. त्यांची सर्व धर्मांविषयी समान व उदार दृष्टी होती. ‘त्रिविधवीर चूडामणी’ हे त्याला दिलेले उपाधिदर्शक विशेषण त्यांनी सर्वार्थाने सिद्ध केले, हे त्यांच्या चरित्रावरून स्पष्ट होते.
ही म्हण का रुढ झाली ?
कित्येक राज्यांनी भोज राज्यावर आक्रमण केले, चाल करून गेले पण कोणालाही राजा भोजला हरवणे शक्य झाले नाही. अशाच महत्वाकांक्षी राजांपैकी दोन राजे म्हणजेच दक्षिणेचे कलचुरी नरेश गांगेय व चालुक्य नरेश तैलंग, म्हणजेच आपल्या म्हणीतले “गंगू तेली”.
होय, गंगू तेली कोणी एक व्यक्ती नसून राजा गांगेय व राजा तैलंग यांचे एक विडंबनात्मक नाव आहे.
या दोन राजांशी राजा भोजचा कसा संबंध आला व ही म्हण प्रचलित कशी झाली आता ते पाहूया. एकदा गांगेय व तैलंग यांनी मिळून भोज राज्यावर हल्ला केला.
भले मोठे सैन्य घेऊन अगदी जिंकण्याच्या अपेक्षेने केल्या गेलेला हा हल्ला होता. पण इतके सामर्थ्य असून सुद्धा राजा भोजने त्यांना अशाप्रकारे हरवले, की कोणत्याही लढवय्यासाठी ही अत्यंत शरमेची, लाजीरवाणी बाब ठरावी.
दोघांनाही राजा भोजच्या कौशल्यापुढे व दिव्य परक्रमापुढे शस्त्र टाकावे लागले. आपले प्राण वाचण्यासाठी, अक्षरशः नाक घासून, गुडघ्यावर बसून जीवदान मागावे लागले.
दोन राजे मिळून सुद्धा एकट्या भोज राजाच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकले नाहीत, या उलट आपला मान घालवून बसले.
याच लढाई नंतर धारच्या प्रजाजनांनी दोन्ही राजांची खिल्ली उडवत, त्यांना अपमानित करण्याकरिता “कहां राजा भोज, कहां गंगू तेली” असे म्हटले व तेव्हा पासून ही म्हण उदयास आली.
हिचा मूळ वापर, स्वतः ला अति हुशार समजणाऱ्या व्यक्तीला त्याचा पातळीची जाणीव करून देण्यासाठी करतात. याचे पुरावे देखील इतिहासकारांना मिळाले आहेत.
संदर्भ: 1. Bhatia, Pratipel, Paramars : a Study in the Political and Cultural History of Their Kingdom, New Delhi, 1970.
2. Ganguly, D. C. History of the Paramara Dynasty, Dacca, 1933.
3. Jain, K. C. Malwa Through the Ages, New Delhi 1972.
4. Majumdar, R. C. Ed. The Struggle for Empire, Bombay, 1971.
५. ओक, शि. का.धारसंस्थानचा संक्षिप्त प्राचीन इतिहास, धार १९१९.

श्रीमंत उदाजी राजे पवार



  श्रीमंत उदाजी राजे पवार

postsaambhar ::



श्रीमंत उदाजी राजे पवार हे स्वराज्य मधील प्रमुख मात्तबर योद्धे व राजकीय मुत्सद्दी होते.

छत्रपती ताराराणी साहेब व भारतीय सम्राट श्री.छत्रपती शाहु महाराजांचे प्रमुख सरदार होते.1709 पासून त्यांचा पराक्रम सुरू झाला तो 1728 पर्यत दिल्लीवर आपला मराठा साम्राज्याचा झेंडा रोवण्यापर्यत सुरूच होता.छत्रपती शाहूंची हक्काची वसुली संपूर्ण उत्तर भारतात त्यांनी चौथाई देशमुखी वसूल केली.ते वसूल साताऱ्यात पोहच करत असत.
धार माळवा गुजरात काठवाड राजस्थान पानिपत पर्यत त्यांना अधिकार प्राप्त होते.धार ची जहागिरी सर्व प्रथम त्यांना च मिळाली होती.
यांनी बाळाजी विश्वनाथ व बाजीराव प्रधानाच्या अगोदर पासूनच उत्तर भारतात आगेकूच केली होती.उदाजी राजेंचा स्वभाव तापट व आक्रमक असल्याने व स्वाभिमानी मराठे असल्याने पेशवे प्रधानांचे व त्यांचे फार काही जमले नाही याच मुळे त्यांची क्षमता असताना त्यांच्या कडून धार प्रांताची जहागिरी काढून घेण्यात आली.
छत्रपती संभाजीराजे प्रमाणेच शूरवीर तान्हाजी,सेनापती हंबीरराव मोहिते,सेनापती संताजी,सेनापती धनाजीराव,यांच्या प्रमाणेच शूरवीर व आक्रमक सरदार म्हणून त्यांचा नावलौकिक होता. एक स्वतंत्र राजांसारखा त्यांचा सन्मान व दरारा होता.
काही इतिहासकारांनी त्यांचा पराक्रम जाणूनबुजून झाकोळला हस्त लिखित स्वरूपात लिहिला गेला नाही.
छत्रपती शाहू कालखंडात इ.सन १७३४मध्ये उदाजींनी सिध्दी अंबर अफवाणी याच्याशी सामना करत त्यांचे शिर कापून आणले.
छत्रपती शाहू महाराज मोघलांच्या कब्जात दिल्लीत असतानाच उत्तरेत उदाजींनी आपला जोर दाखवायला सुरुवात केली होती.छत्रपती शाहू महाराज स्वराज्यातील पुण्यात आल्यानंतर ताराराणी पक्ष सोडून शाहूंच्या सोबत सर्व बंधू सह सामील झाले.
बाजीराव प्रधान यांच्या अगोदर पासूनच माळवा व गुजरात या प्रांतात मराठ्यांचा जम बसविण्यात उदाजी राजेंनी प्रमुख योगदान दिले. धार, मलठण, कवठे यमाई इत्यादी ठिकाणी उदाजी पवार यांची सरंजामी इनामे होती. त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासात राजे धार पवार घराण्याचे योगदान मोठे आहे.
3 फेब्रुवारी 1760 रोजी त्यांचा स्मृतिदिन यानिमित्ताने श्रीमंत उदाजी राजे पवार यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन💐🙏

॥ नरवीर तानाजी मालुसरेंचे एक अपरिचीत युध्द. ॥


 ॥ नरवीर तानाजी मालुसरेंचे एक अपरिचीत युध्द. ॥

तानाजी मालुसरे असे नाव घेतले कि लगेच आपल्याला त्यांच्या सिंहगडावर केलेल्या पराक्रमाची आठवन होते. सर्व सामांन्यांसाठी त्यांचे चरित्र या एकट्या प्रसंगापुरतेच मर्यादित झाले आहे. परंतु त्यांनी इतर केलेल्या पराक्रमांविषयी सर्व सामांन्यांना अजीबातच माहिती नाही. तानाजी मालुसरेंचे संगमेश्वरचे युध्द हे असेच अपरिचीत युध्द आहे, ज्या युध्दाला हवे आहे तेव्हडे महत्व देऊन लेखकांनी जगासमोर मांडले नाही. हा तानाजींवर झालेला अन्यायच आहे.
संगमेश्वरी असतांना शत्रुंनी केलेल्या अकस्मात हल्ल्या दर्म्यान तानाजींनी कमालीचे धाडस दाखविले होते. त्या प्रसंगाचे तपशिलवार वर्णन पुढिल प्रमाने_
दाभोळ, चिपळून, संगमेश्वर काबीज झाले, राजापुर लुटले गेले. ह्या बातम्या धडा-धड आदिलशाहाच्या कानावर आदळत होत्या. तो या बातम्यांनी अस्वस्थ झाला. त्याने लगेच श्रूंगारपुरच्या सुर्याजीस आदेश केला. तो त्याला म्हणाला_ "तो (शिवाजी राजे) आमचा उघड शत्रु राजापुरवर चालुनजात असतांनाहि त्यास तु का अडविले नाही? असो ते जाउदे तो आता प्रत त्याच मार्गाने जवळ आला आहे. तेव्हां त्यास तेथे अडव (त्याच्याशी युध्दकर). आदिलशाहाने आशा प्रकारचा आदेश सुर्याजीला करताच हे काम अतिशय कठिण असतानांही सुर्याजीने करण्याचे धाडस दाखविले. आदिलशाहाच्या दबावाखाली सुर्याजीने शिवरायांविरोधात उघड-उघड शत्रुत्व धारण केले.
तेव्हां सुर्याजीं सुर्वे श्रूंगारपुरला होता त्याने लगेच शिवाजी राजांच्या संगमेश्वरी असलेल्या सैन्यावर धावा बोल्ला. संगमेश्वरी शिवरायांचे सैन्य अल्पसे होते. या अल्पशा सैन्याला सुर्याजीच्या सैन्याने चोहो बाजुंनी घेरले. शिवरायांच्या या सैन्याचे नेत्रुत्व तेव्हां पिलाजी निळकंठरावांकडे होते. आपले सैन्य शत्रुंनी चोहो बाजुंनी घेरले आहे, असे जेव्हां पिलाजींना समजले तेव्हां पिलाजीं फ़ार भयभीत झाले. शत्रुंना सामोरे जाऊन त्यांच्याशी युध्द करण्यापेक्षा युध्दातुन पळून जानेच त्यांनी योग्य समजले. ते आपला जीव वाचवण्याच्या भितीने संगमेश्वरहून पळुन जाऊ लागले. तोच भितीने कापणात्या त्या पिलाजीला आपल्या लोकांनामागे सोडुन पळुन जातांना तानाजी मालुसरेंनी पाहिले. तानाजीं सारख्या प्रतापि पुरुशाला हे अजिबात खपनारे नव्हते. तानाजींनी भ्याड पिलाजींना पळतांना पाहताच त्यांचा पायीच पाठलाग करून त्यांना हातात धरेले आणि त्यांचा उघड धिक्कार केला. तानाजी मालुसरे पिलाजीस म्हणाले_ "या युध्दात मी तुझा साह्यकर्ता आहे. तु आपल्या लोकांना संकटात टाकूण पळून जातोयस... हि खरच खेदाची गोष्ट आहे. आजपर्यंत तु तुझ्या प्रराक्रमांच्या एवढ्या बढाया मारत होता त्या सगळ्या बढाया कुठे गेल्या? ज्या शिवाजी महाराजांनी तुला मोठेपण (संम्मानाची जागा) देऊन सांभाळले. तु त्यांचा सरदार असतांनाहि सैन्य टाकुन स्व:तच पळुन जातोयस? आणि याची तुला खंतही वाटत नाही...." असे कित्येक कठोर शब्द बोलुन तानाजींनी पिलाजींना कैद केले. पिलाजीं घाबरलेले पाहुन तानाजींना वाटले पिलाजींची हि दशा पाहुन इतरही मावळ्यांची हिंमत खचेल, त्यामुळे पिलाजींना मोकळे सोडण्यापेक्षा कैदेतच ठेवणे योग्य असा विचार करुन तानाजींनी पिलाजीला जवळच असलेल्या एका दगडाला दोरखंडाने बांधुन ठेवले. पिलाजींना दगडाला बांधुन ठेवल्यान्नंतर तानाजी मालुसरेंनी स्व:तच सैन्याचे नेत्रुत्व केले.
ताजाजी मालुसरेंनी पिलाजी निळकंठराव सुभेदार यांना एका दगडाला दोरखंडांनी बांधुन ठेवल्यानंतर प्राणाचा किंचितही मोह नसलेल्या तानाजींनी व त्याच्या सोबती मावळ्यांनी शत्रुंवर जोरदार हल्ला चढवला. तानाजीं शत्रुंवर चालकरुन जातांना शत्रुंनीही तानाजींस रोखण्याच्या द इशेने पुढे सरसाव केला. आता दोन्ही सैन्य एकमेकांना भिडनार आणि रक्तताची त्राही त्राही होणार तोच मराठ्यांच्या मागच्या तुकडीने तानाजींच्या सक्षणासाठी शत्रुंवर बाणांचा वर्षाव केला त्यामुले तानाजींच्या समोर येणारी शत्रुची तुअकडी घायाळ झाली आणि याचा फ़ायदा उचलत तानाजींच्या नेत्रुत्वाय्खाली मावळ्यांनी शत्रुची दाणा- दाण उडवली. तानाजींची मागची तुकडी शत्रुंच्या पुढे सरसावणार्या तुकड्यांवर बाणांचा वर्षाव करी व बाणांनी जखमी झालेल्या शत्रुंच्या सैन्याला तानाजीं व सोबती मावळे कापुन काढित. मावळ्यांनी तानाजींच्या नेत्रुत्वाखाली शत्रुंशी रात्रभर झुंज दिली व शत्रुंच्या हातपाय कापलेल्या व धडापासुन मंडके वेगळे पडलेल्या शवांचे ढिगच्या ढिग मावळ्यांनी रनांगणांत रचले. शेवटी सुर्याजीला या युध्दात मोठे नुकसान सोसावे लागले. त्याला त्याच्या सैन्याची सर्वत्र दशा झालेली दिसताच ताने युध्दातुन पळ काढला. शेवटी वीर तानाजी मालुसरेंचा व सोबती मावळ्यांचा या युध्दात विजय झाला.
संदर्भ :- शिवभारत.
वरील दिलेल्या चित्रात दगडाला बांधलेला व्यक्ती हा पिलाजी निळकंठराव आहे व हातात तलवार घेतलेली व्यक्ती वीर तानाजी मालुसरे आहेत.

छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी कृष्णभट्ट उर्फ आप्पाशास्त्री दीक्षित ह्यांचे बलिदान


 छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी कृष्णभट्ट उर्फ आप्पाशास्त्री दीक्षित ह्यांचे बलिदान

महाशिवरात्री अवघ्या चार - पाच दिवसांवर आली होती. गावो गावच्या शिवालयात त्याची तयारी ही सुरू होती. परंतू बत्तीस शिराळा त्यास अपवाद होते. कारण गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या गावात एखादा माजलेला वळू शिरावा तशी एक मोगली तुकडी बत्तीस शिराळ्यात घुसली होती. कोणास ही मागमूस लागू न देता मोगलांनी शिराळ्याच्या कोटा जवळ पूर्ण छावणी न करताच मुक्काम टाकला होता.
दस्तुरखुद्द छत्रपती शंभाजी महाराजांना कैद करून मुकररबखान पुढे कऱ्हाड ला गपचूप निघाला होता.
परतूं शिराळ्यात ही बातमी शेवटी फुटलीच.
खबर एकूण आप्पाशास्त्री व इतरांचा धीर सुटला होता.
आता असेच तडक जावे अन मुकररबखानास मातीत मीळऊन स्वराज्याच्या धन्यास सुखरूप परत आणावे अशा विचाराने त्या रांगड्या गड्यांचे बाहू स्फुरण चढू लागले होते. कारण विचार करावयास जास्त वेळ न्हवता.
कारण इतरांच्या मदतीस थांबलो व जर मुकररब इथून पुढे कऱ्हाड ला ओलांडून पूर्वेकडील मोघली प्रदेशात पुढे गेला तर उघड्या मैदानावर त्याला अंगावर घेणे जड जाईल. म्हणून जास्त विचार न करता आप्पाशास्त्री ठाणेदारला हाताशी धरत त्याचे पथक दिमतीला घेत गावातील काही लढाऊ लोक व स्वतः आप्पा शास्त्रीनीं स्थापन केलेल्या तालमीतले तगडे मल्ल घेऊन मुकररबखनाच्या गोटावर चालून गेले.
मुकररब खान पूर्ण सावध होता. त्याने घेतलेली झेप त्यास एक आकस्मित यश देऊन गेली होती. व हे यश अलगद बादशहाच्या झोळीत टाकण्यास तो कितीही आतुर असला तरीही बेफिकिरी मुळे क्षण भरात होत्याचे नव्हते होऊ शकते हे तो जाणून होता. तसा हल्ला एक रात्र आधीच ज्योत्यजी त्यामुळे रात्रभर डोळ्यात तेल घालून पहारा देण्याचे आदेश त्याने मोघली हशमांस दिला होता.
सुरवातीस अचानक झालेल्या हल्ल्याने मोघल थोडे फार बिथरले.पण ह्या आशा प्रकारास आपल्याला कधीही कुठेही सामोरे जावे लागू शकते. ह्याची मानसिक तयारी मुकररबखानाची असल्याने त्याने त्याची संपुर्ण छावणी लगेच लढाईस तयार केली.
संख्येने जास्त असलेल्या मोगलांनी ह्या मोजक्या शिबंदीस जुमानले नाही. मराठ्यांचे प्रयत्न तोकडे पडले.
अनेक वीर गतप्राण होऊन शिराळ्याच्या त्या मातीत कायमचे मिळाले.उरलेले बरेच मराठे व स्वतः आपशास्त्री दीक्षित कैद झाले.
त्याने बत्तीस शिराळ्याच्या त्या माळवरच रात्रीच्या अंधारात आप्पा शास्त्री दीक्षित सह इतर सर्व कैद मराठा तुकडीचा शिरच्छेद करण्याचा निर्णय घेतला.
बत्तीस शिराळ्यातील मल्लशाळा, भवानी मंदिर, मारुती मंदिर व स्वामीकार्यास कामी आल्याने अप्पशास्त्रीच्या वंशजांना मौजे कणदूर येथील इनाम रुपी मिळालेली जमीन ह्याची साक्ष देते.
खरे जंत्री वरून १६८९ च्या महाशिवरात्रीची तारीख ८ फेब्रुवारी १६८९ येते. व वरील माहितीतील हल्ला महाशिवरात्रीच्या २-३ दिवस आधी झाल्याने म्हणजेच २ -३ फेब्रुवारी १६८९ ही तारीख शंभाजी महाराजांच्या अटकेच्या आसपास असल्याने त्यास जुळून येते.

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...