छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी कृष्णभट्ट उर्फ आप्पाशास्त्री दीक्षित ह्यांचे बलिदान
महाशिवरात्री अवघ्या चार - पाच दिवसांवर आली होती. गावो गावच्या शिवालयात त्याची तयारी ही सुरू होती. परंतू बत्तीस शिराळा त्यास अपवाद होते. कारण गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या गावात एखादा माजलेला वळू शिरावा तशी एक मोगली तुकडी बत्तीस शिराळ्यात घुसली होती. कोणास ही मागमूस लागू न देता मोगलांनी शिराळ्याच्या कोटा जवळ पूर्ण छावणी न करताच मुक्काम टाकला होता.
दस्तुरखुद्द छत्रपती शंभाजी महाराजांना कैद करून मुकररबखान पुढे कऱ्हाड ला गपचूप निघाला होता.
परतूं शिराळ्यात ही बातमी शेवटी फुटलीच.
खबर एकूण आप्पाशास्त्री व इतरांचा धीर सुटला होता.
आता असेच तडक जावे अन मुकररबखानास मातीत मीळऊन स्वराज्याच्या धन्यास सुखरूप परत आणावे अशा विचाराने त्या रांगड्या गड्यांचे बाहू स्फुरण चढू लागले होते. कारण विचार करावयास जास्त वेळ न्हवता.
कारण इतरांच्या मदतीस थांबलो व जर मुकररब इथून पुढे कऱ्हाड ला ओलांडून पूर्वेकडील मोघली प्रदेशात पुढे गेला तर उघड्या मैदानावर त्याला अंगावर घेणे जड जाईल. म्हणून जास्त विचार न करता आप्पाशास्त्री ठाणेदारला हाताशी धरत त्याचे पथक दिमतीला घेत गावातील काही लढाऊ लोक व स्वतः आप्पा शास्त्रीनीं स्थापन केलेल्या तालमीतले तगडे मल्ल घेऊन मुकररबखनाच्या गोटावर चालून गेले.
मुकररब खान पूर्ण सावध होता. त्याने घेतलेली झेप त्यास एक आकस्मित यश देऊन गेली होती. व हे यश अलगद बादशहाच्या झोळीत टाकण्यास तो कितीही आतुर असला तरीही बेफिकिरी मुळे क्षण भरात होत्याचे नव्हते होऊ शकते हे तो जाणून होता. तसा हल्ला एक रात्र आधीच ज्योत्यजी त्यामुळे रात्रभर डोळ्यात तेल घालून पहारा देण्याचे आदेश त्याने मोघली हशमांस दिला होता.
सुरवातीस अचानक झालेल्या हल्ल्याने मोघल थोडे फार बिथरले.पण ह्या आशा प्रकारास आपल्याला कधीही कुठेही सामोरे जावे लागू शकते. ह्याची मानसिक तयारी मुकररबखानाची असल्याने त्याने त्याची संपुर्ण छावणी लगेच लढाईस तयार केली.
संख्येने जास्त असलेल्या मोगलांनी ह्या मोजक्या शिबंदीस जुमानले नाही. मराठ्यांचे प्रयत्न तोकडे पडले.
अनेक वीर गतप्राण होऊन शिराळ्याच्या त्या मातीत कायमचे मिळाले.उरलेले बरेच मराठे व स्वतः आपशास्त्री दीक्षित कैद झाले.
त्याने बत्तीस शिराळ्याच्या त्या माळवरच रात्रीच्या अंधारात आप्पा शास्त्री दीक्षित सह इतर सर्व कैद मराठा तुकडीचा शिरच्छेद करण्याचा निर्णय घेतला.
बत्तीस शिराळ्यातील मल्लशाळा, भवानी मंदिर, मारुती मंदिर व स्वामीकार्यास कामी आल्याने अप्पशास्त्रीच्या वंशजांना मौजे कणदूर येथील इनाम रुपी मिळालेली जमीन ह्याची साक्ष देते.
खरे जंत्री वरून १६८९ च्या महाशिवरात्रीची तारीख ८ फेब्रुवारी १६८९ येते. व वरील माहितीतील हल्ला महाशिवरात्रीच्या २-३ दिवस आधी झाल्याने म्हणजेच २ -३ फेब्रुवारी १६८९ ही तारीख शंभाजी महाराजांच्या अटकेच्या आसपास असल्याने त्यास जुळून येते.
No comments:
Post a Comment