भारताच्या समुद्री इतिहासातील विलक्षण घटना छत्रपती शिवाजी महाराजांची बसरूर (बेदनूर) (उडुपी कुंदापूर तालूका) मोहीम...
postsaambhar::
'सचिन पोखरकर'
१६६५ फेब्रुवारी रोजी महाराजांनी सिंधुबंदी व धार्मिक चालीरीती झुगारून देऊन स्वतः सैन्याचे नेतृत्व करून दोन बलाढ्य देशांच्या पलीकडील राज्यावर आरमारी मोहीम काढतो हि तत्कालीन भारताच्या समुद्री इतिहासातील विलक्षण घटना आहे...
भारताच्या हजारो वर्षांच्या आरमारी परंपरेस खंड पडलेला असताना अनेक धार्मिक चालीरितींचा ऊत आलेला असताना आणि लढाऊ आरमार बाळगण्याची पोर्तुगीज- इंग्रज- फ्रेंच- डच-सिद्दी यांच्याशिवाय अन्य कोणासही परवानगी नसताना छत्रपती शिवाजी महाराजांनी २४ ऑक्टोबर १६५७ रोजी कल्याण-भिवंडी काबीज करून तेथे मराठा आरमाराची (भारतीय आरमाराची) मुहूर्तमेढ रोवली...
या विलक्षण घटनेनंतर अवघ्या ८ वर्षांमध्ये समुद्रावरील प्रबळ अशा पोर्तुगीज व डचांच्या विरोधात तसेच कर्नाटक प्रांतातील प्रबळ आदिलशाही सत्तेविरोधात शिवरायांनी आरमारी मोहीम काढली आपल्या आरमारी अधिकाऱ्यांना व सेनेला पाठवून त्यांनी हि मोहीम पूर्ण केली असती मात्र एवढी मोठी जोखीम पत्करून शिवरायांनी हि मोहीम काढली व शत्रूने कोणतीही हालचाल करायच्या आत ती पूर्ण देखील केली...
या बसरूर मोहिमेचे फार मोठे पडसाद मराठा व भारतीय समुद्री इतिहासावर पडले त्यामुळे समुद्रावर मराठ्यांची सत्ता निर्माण होऊ शकते हा दृढ आत्मविश्वास आपल्यात निर्माण झाला आणि भविष्यात मराठा आरमाराने आपल्या यशाची पताका हिंदी महासागरावर फडकवत ठेवली...
मध्ययुगात कोणत्याही हिंदू अगर मुस्लिम राजाने हिंदुस्थानात आरमार बांधले नव्हते एवढे मोगल बादशहा पण ते सुध्दा समुद्रावर हतबल असत त्यांची सत्ता समुद्रावर चालत नसे अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांनी आपल्या सामर्थ्यानिशी राजकीय परिस्थिती अनुकूल नसताना सुद्धा आरमार बांधण्याचा प्रयत्न केला ही त्या काळी फार मोठी कामगिरी होती त्यांच्या कामगिरी मुळेच ते....,
“The Father of the Maratha Navy and the Creator of the Indian Marchantile Marine बनले.....”
No comments:
Post a Comment