छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय दरम्यान सरलष्कर हंबीरराव मोहिते यांच्यावर बिजापुरच्या पश्चिमेकडिल पठाणंची फळी गारद करण्याची जबाबदारी महाराजांनी सोपविली होती.
येलबुर्ग्याला हंबीरावांनवर पठाणाची प्रचंड फौज चालून आली. अब्दुलरहीमखान मियान स्वतः आघाडीच्या हत्तीवर बसून या फौजेचे नेतृत्त्व करीत होता.
समोर खानाची फौज पाहून मराठ्यांना स्फुरण चढले. हात शिवशिवू लागले, तलवारी रक्त पिण्यासाठी आसुरलेल्या. मराठे गर्जना करत खानाच्या फौजेवर तुटून पडले..
मराठ्यांचा आवेश असा काही होता की पठाणांच्या देहाचे लचके तोडीत ते पुढे सरकू लागले. हा आवेश पाहून पठाण आवाक झाले
मराठ्यांचा हल्ला एवढा वेगवान होता. की खानाची फळी फुटली. खानाचे सैन्य सैरावैरा पळू लागले. खान घाबरला त्याने माहुताला हत्ती लढाईतून बाहेर काढण्याचा हुकुम दिला. माहुताने हत्ती माघारी वळवला व तो बाहेर पडू लागला.
हुसेन खान पळतोय हे सळसळणाऱ्या रक्ताच्या नागोजी जेधे (कान्होजी जेधे यांचा नातू) यांनी पाहिला त्यांनी घोड्याला टाच मारली. ताडताड घोडा फेकत हत्तीच्या आडवा उभारला .नागोजी नी जवळील भाला हत्तीच्या गंडस्थळावर फेकला, भाल्याने अचूक वेध घेतला, तसा मीया खानाला मृत्यू समोर दिसला. घाबरलेल्या मिया खानाने धनुष्याला बाण लावला नागोजी जेधे मिया खानावर चालून आला तोपर्यंत मिया खानाच्या धनुष्यातून बाण सुटला होता कच दिशी नागोजीच्या मस्तकात घुसला नागोजी त्या आघाताने घोड्यावरुन खाली कोसळला. सर्जेराव जेधे नि ते पाहिले आपला लेयोक खाली कोसळतोय .ते शर्थीने त्याच्या रक्षणासाठी धावले .पण तोपर्यंत धनाजी जाधव यांनी खानाला वेढले होते.
खान कैद झाला, पठाणांची पार वाताहात झाली, त्यांचे अनेक घोडे,हत्ती, आणि द्रव्य मराठ्यांचा हाती लागले.
पण नागोजी जेधे हे या युद्धात कामी आले होते तसा तरणाताठा पोरगा स्वतःच्या बापाच्या मांडीवर महाराजांच्या कडे पाहत धारातीर्थ पडला. सर्जेराव जेधे यांना पुत्रशोक झाला पण त्यांनी माघार घेतली नाही आणि पुढच्या मोहिमेसाठी तेहंबीरावांबरोबर निघून गेले. ही वार्ता कारी गावात समजताच नागोजींच्या पत्नी गोदूबाई सती गेल्या
संदर्भ: जेधे शकावली, सभासद बखर
आमचे असेच नवनवीन लेख वाचण्यासाठी आमच्या फेसबुक page .................. ला follow करायला विसरू नका.
जय भवानी जय शिवाजी
No comments:
Post a Comment