इ.स. १६७६ साली राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण
दिग्विजय या मोहिमेसाठी गेले, त्यावेळी आदिलशाही
संपवण्यासाठी त्यांनी हैद्राबादच्या गोवळकोंड्याचा कुतुबशहा
तानाशहाशी हातमिळवणी केली होती. भागानागरीत शिवाजी
महाराजांचे जंगी स्वागत झाले. कुतुबशहा तानाशह सोबत त्याचे
सल्लागार मादण्णा व त्याचा भाऊ आकण्णा तर महाराजांसोबत
सरनौबत हंबीरराव मोहिते, येसाजी कंक आणि प्रमुख सरदार
सूर्याजी मालुसरे, आनंदराव मकाजी, मानाजी मोरे, सर्जेराव जेधे,
बालाजी ढमढेरे, सोनाजी नाईक, दत्ताजी त्र्यंबक व प्रल्हाद पंत या
सर्वांनी दादमहालात प्रवेश केला.
हारतुरे आणि सरबतपान देऊन तानाशहाने हसत हसत महाराजांना
सवाल केला, “राजाजी, आपकी शाही फौज देखकर हमे बडी ख़ुशी
हो गयी, लेकीन ताज्जूब कि बात याह ही कि आपके पास हाथी
नाही देखा!”
“नही नही तानाशहाजी, हमारे पास पचास हजार हाथी है! म्हणजे
असं की हमारा एक एक सिपाही हाथि के बराबर है! जर आमच्या
माणसाची ताकत तुम्हाला आजमावयाची असेल तर हमारे सामने
खडे हुये आदमीयों से आप कोई भी आदमी चून सकते है की जो
हाथी के साथ जंग करे|” महाराजांनी मोठ्या आत्मविश्वासानं
सवालाला जवाब दिला.
कुतुबशहा तानाशहाने महाराजांसमोर असलेल्या पहाडी मर्दांकडे
नजर टाकून येसाजी कंकाकडे बोट दाखवीत विचारले, “क्या यह
सिपाही हमारे हाथी से टकरायेगा?”
“क्यू नही?” महाराजांनी हसत हसत उत्तर दिले आणि येसाजींची
हत्ती सोबत झुंजण्याचा दिवस ठरला. किल्ल्यामागील पटांगणात
मादणणाने गोलाकार माळे रचून त्यावर नागरिकांना ही झुंज
पाहण्यासाठी बिछायती अंथरल्या. महाराज आणि तानाशहासाठी
एका खास माळ्यावर शामियाना उभारला.
झुंजेच्या दिवशी नागरिकांनी माळ्यावर गर्दी केली होती,
शामियान्यात बसलेल्या महाराजांच्या चरणी येसाजींनी स्पर्श करून
आशीर्वाद मागितला आणि नंग्या समशेरीनिशी पटांगणात उतरले.
एवढ्यात साखळदंडानी बांधलेला तानाशहाचा मदांध हत्ती पंचवीस
हबशांनी पटांगणात आणला व त्यांचे साखळदंड सोडून ते
निमिषार्धात माळ्यावर जाऊन बसले.
हत्ती आणि माणसाची झुंज? कसं शक्य आहे? नागरिक
आपआपसात चर्चा करीत होते; पण महाराजंच्या माणसांना हे शक्य
होतं. आता कंबर कसून येसाजी पटांगणात उभे राहिले. हत्ती
येसाजींना पाहून चवताळून चालून आला; तत्क्षणी येसाजींनी डाव्या
अंगाला छलांग मारून हत्तीला हुलकावणी दिली.
नागरिक श्वास रोखून पाहात होते; तर तानाशाहाच्या कपाळी घाम
फुटला होता. तो जवळ जवळ ओरडलाच “सुभान अल्ला! ये मै क्या
देख राहा हुं?”. हुलकावणी दिल्यामुळे हत्ती सरळ पुढे गेला होता, तो
माघारी वळला. फिरून पिसाळून त्याने येसाजींवर चाल केली ह्याही
वेळी त्यांनी हत्तीला चकवले. सरळ लढण्याऐवजी ते हत्तीला लीलया
खेळवत होते, खिजवत होते तसतसा हत्ती बेफाम होत चालला
होता. सततच्या धावण्याने अखेर हत्तीला धाप लागली आणि त्याची
आक्रमकता कमी झाली. येसाजीजणू याच संधीची वाट बघत होते.
यावेळेस त्यांनी स्वत:हून पुढे जाऊन हत्तीला जोरदार धडक दिली.,
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, मातीत कमावलेल्या त्या
बलदंड शरीराचा धक्का बसताच क्षणभर हत्तीही
जागेवरून हलला. पण अचानक त्याने स्वतःला सावरत
येसाजींना सोंडीत पकडले. पण येसाजी हार मानतील ते
कसले? त्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावून
हत्तीच्या सोंडेतून स्वतःची सुटका करून घेतली आणि
तलवारीचा थेट वार हत्तीच्या सोंडेवर केला...!
बघणाऱ्यांना स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता...!
कुतुबशहा तर केवळ तोंडात बोट
घालायची बाकी होता. येसाजींनी
घातलेला घाव हा त्या लढाईतला
निर्णायक घाव ठरला. त्या जबरदस्त
घावामुळे हत्तीचा सगळा जोश
उतरला आणि त्याने सरळ बाहेर
धूम ठोकली., नागरिकांच्या अंगावर रोमांच उठले.
हत्ती आणि माणसाच्या झुंजीत झालेला हा विजय
माणसाचा नव्हता. कारण अशी अचाट कामगिरी
करणे प्रत्येकाला शक्य नाही. तो विजय होता येसाजी
कंक नामक सामर्थ्याचा, त्यांच्या रांगड्या हिंमतीचा!
धन्य ते येसाजी ! धन्य ती त्यांची निष्ठा !!
संदर्भ: शूर शिलेदार येसाजी कंक - इतिहास संशोधक कृष्णकांत
नाईक
आमचे असेच लेख वाचण्यासाठी आमच्या फेसबुक page .................. ला follow करायला विसरू नका.
जय भवानी जय शिवाजी
No comments:
Post a Comment