आपले आदर्श
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघल साम्राज्याचा पराभव करून त्यांच्यावर यशस्वीरित्या विजय मिळवला होता आणि
आणि 17 व्या शतकात दख्खनमध्ये मराठा साम्राज्याचा पाया घातला.
पुढे मराठा साम्राज्य पाकिस्तानातील अटक शहरापर्यंत जाऊन पसरले.
ज्यांनी ज्यांनी हे मराठा साम्राज्य वाढवन्यासाठी आपला मोलाचा वाटा उचलला त्यातीलच एक प्रमूख घराणे म्हणजे ग्वालियर चे शिंदे घराणे...
शिंदे घराणे हे मूळचे सातारा जिल्हातील कन्हेरखेड गावचे होते..
शिंदे घराण्यातील अनेक शुरवीरांनी पराक्रम गाजवला आणि मराठा साम्राज्याच्या सीमा पाकिस्तानातील अटक शहरापर्यत पोहचवल्या.
त्या वीरानपैकी एक नाव म्हणजे महाराज महादजी शिंदे, ज्यांनी पाकिस्तानचा लाहोर आणि अट्टकचा प्रदेश जिंकून गुजरातच्या सोमनाथ मंदिराचे दरवाजे पाकिस्तानच्या अटक शहरातून यशस्वीरित्या हिंदुस्थानात परत आणले होते.
परतुं या मागचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला काही वर्षे मागे जावे लागेल..
गुजरातच्या सोमनाथ मंदिराबद्दल तुम्ही अनेकांनी ऐकले असेल. हे मंदिर भारतातील अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे.
जे भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग म्हणूनही ओळखले जाते.
आणि एकेकाळी हे मंदिर आपल्या अफाट संपत्तीसाठी खूप प्रसिद्ध होते...
परंतु मंदिरात असलेल्या पैशाच्या लोभापोटी अनेक परकीय आक्रमकांनी या मंदिरावर हल्ला चढवला..
परतुं
आणि या मंदिरावर सर्वात घातक आणि भयंकर हल्ला हा मुस्लिम शासक मुहम्मद गझनवीने केला.
20 नोव्हेंबर 1024 रोजी, मोहम्मद गझनवी तुर्क, अरब, बगदादी आणि अफगाण दरोडेखोरांच्या सैन्यासह मुलतानच्या प्रदेशात पोहोचला.
मुहम्मद गझनीने भारतावर ज्या जा ठिकाणी आक्रमण केले त्या त्या ठिकाणी त्याने भारतातील विविध क्षेत्रांचे इस्लामीकरण केले. इस्लाम न स्वीकारणाऱ्या काफिरांना म्हणजेच (हिंदूना) क्रूरपणे मारण्यात आले.
आणि शेवटी, इसवी सन 1025 मध्ये जानेवारी महिन्यात, मुहम्मद गझनवी गुजरातच्या सोमनाथ मंदिराजवळ पोहोचला.
यावेळी त्याने सोमनाथ मंदिराला आपले लक्ष्य केले....
आणि मंदिरातील पुजारी.
हजारो हिंदूंची हत्या करून, त्याने मंदिर पूर्णपणे नष्ट केले... आणि अनेक घृणास्पद कृत्य केली.
सोमनाथ मंदिरावरील झालेला हल्ला ही महंमद गझनीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची घटना मानली होती कारण त्याला सोमनाथ मंदिराच्या लुटीमध्ये इतकी संपत्ती मिळाली की त्याने त्याच्या जीवनात कधीच बघितली नव्हती. त्याने 20 दशलक्ष दिनारांची लूट घेतली.
अशाप्रकारे त्याने मंदिरातील अफाट संपत्ती लुटली..आणि हजारो गाढव आणि उंटावरू बांधून ते आपल्यासोबत गझनीला नेले. ज्यामध्ये सोमनाथ मंदिराचे रत्नजाडित दरवाजे देखील समाविष्ट होते.
पुढे
18 व्या शतकापर्यंत, मराठा साम्राज्य हे हिंदुस्थानातील सर्वात मोठे हिंदू साम्राज्य बनले
परंतु पानिपतच्या तिसर्या लढाईत मराठा साम्राज्याला मोठी हानी झाली .
त्यामुळे मराठा साम्राज्याचे वर्चस्व हळूहळू कमी होत गेले .त्यातून बाहेर पडणेही इतके सोपेही नव्हते.
अशा परिस्थितीत वीर मराठा योद्धा महादजी शिंदे यांनी आपल युद्ध कौशल्य आणि राजकीय सामर्थ्याने..
माळवा, बुंदेलखंड, राजपुताना, कुंजपूर, मारवाड, रोहिलखंड, मथुरा, दक्षिण भारतातील निजाम, दिल्लीतील मुघल, मुंबई, सुरत अशा अनेक मोठ्या राज्यांतील राज्यकर्त्यांचा पराभव करून हिंदुस्थानवर यशस्वीरित्या पुन्हा मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले .
आणि मराठा साम्राज्याला एका नव्या उंचीवर नेण्याचे काम श्रीमंत महादजी शिंदे यांनी केले.
अशावेळी...
1782 मध्ये मराठा साम्राज्याचा विस्तार करत असताना महादजी शिंदे यांनी
पाकिस्तानच्या लाहोर आणि अट्टकच्या प्रदेशांवर आक्रमण केले.
परंतु त्याच दरम्यान महादजी शिंदेच्या कानावर एक बातमी आली की गुजरात च्या सोमनाथ मंदिराचे दरवाजे हे लोहार चा राज्यकर्ता मुहम्मद शाह यांच्याकडे आहेत.
तेव्हा महादजी शिंदेनी ताबडतोब आपल्या सैनिकांसह मुहम्मद शाहवर हल्ला चढवला.
आणि सोमनाथ मंदिराचे दरवाजे यशस्वीपणे काढून आणि 500 पायदळ सैनिक, 500 घोडे आणि 10 हत्ती सोबत हिंदुस्थानात परत आणले.
760 (साडे एकत्र) वर्षांनंतर प्रथमच, एक भारतीय हिंदू शासक देशाबाहेर गेला आणि त्याने परकीय आक्रमकांना युद्धात पराभूत करून
आणि सुरक्षितपने ते दरवाजे हिंदुस्थानातं परत आणले होते.
त्यानंनंतर महादजींनी ते दरवाजे गुजरातच्या सोमनाथ मंदिरात पोहोचवले.
परंतु, सोमनाथ मंदिराचे दरवाजे हे एका दुसऱ्या मराठा योद्धाने जिंकून आणले म्हणून गुजरातच्या स्थानिक
राज्यकर्त्यांना हेवा वाटू लागला.
महादजी शिंदेंच्या या पराक्रमावर त्यांना अभिमान वाटायला हवा होता परंतु ते महादजी शिंदेच्या पराक्रमावर जळू लागले..
शेवटी तेथील राज्यकर्त्यांनी काही पैसे देऊन ब्राह्मणांना महादजी शिंदें यांच्या विरुद्ध उभे केले..
मग तेथील ब्राह्मण समूह महादजी शिंदे ना म्हणाला की आता ते दरवाजे पुन्हा मंदिरात बसवले जाणार नाहीत कारण
700 वर्षात हे दरवाजे घाण झाले आहेत, त्यांची पवित्रता भंग झाली आहे.
ब्राह्मनांचा हा विरोध लक्षात घेऊन महादजी शिंदेनी ते दरवाजे परत आपल्या राजधानी उज्जैनला आणले.
त्यातील एक जोडी ही आज उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात आहे.
आणि दुसरी जोडी उज्जैन च्या द्वारकाधीश मंदिरात आहे..
आणि एवढेच नाही तर उज्जैनचे महाकालेश्वर मंदिराला देखील मराठ्यांचे खूप महत्त्वाचे योगदान आहे.
कारण 12व्या शतकातील.
इल्तुमिश हा दिल्ली सल्तनतचा प्रमुख शासक होता. ज्याने 1211 AD ते 1236 AD मध्ये शासन केले आणि त्याच्या आदेशानुसार राज्य केले उज्जैन मधील महाकाल मंदिर पाडण्यात आले.
त्यामुळे भगवान महाकाल सुमारे 500 वर्षे पाण्यात होते..
नंतर मराठा साम्राज्याचा विस्तार करताना.. महादजी शिंदे यांचे वडील राणोजी_शिंदे हे माळवा प्रांताचे सुभेदार होते.
त्यांनी उज्जैनचे महाकाल मंदिर पुन्हा बांधले... आणि मंदिरात ज्योतिर्लिंगाची पुर्णप्रतिष्ठा केली..
आजचे उज्जैन मधील महाकाल मंदिर हे वीर मराठा योद्धा राणोजी शिंदे यांनी बांधलेल आहे.
अशा प्रकारे मराठा शासनकाळात या मंदिराचे वैभव पुन्हा परत आले.
आणि यासह
उज्जैनमध्ये 500 वर्षांपासून बंद असलेला कुंभमेळाही त्यांनी सुरू केला, जो दर 12 वर्षांनी आयोजित केला जातो.
अशा प्रकारे आज आम्ही गुजरातच्या सोमनाथ मंदिराचे दरवाजे हिंदुस्थानात परत आले तर ते फक्त महाराज महादजी शिंदे यांच्यामुळेच.
आमचे असेच नवनवीन लेख वाचण्यासाठी आमच्या फेसबुक page .................. ला follow करायला विसरू नका.
जय भवानी जय शिवाजी
No comments:
Post a Comment