विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 23 March 2022

संताजी,मालोजी,बहिर्जी घोरपडे....!!

 

संताजी,मालोजी,बहिर्जी घोरपडे....!!
पोस्त सांभार ::इंद्रजीत खोरे




श्रींच्या राज्याचे सेनापती श्री संताजी घोरपडे यासी मानाचा मुजरा....!!
" महाराष्ट्राचे महाभारत " म्हणून ज्या कालखंडाचा इतिहासकार गौरव करतात तो हाच कालखंड आहे.त्यास
" स्वातंत्र्ययुद्धाचा कालखंड " असेही म्हटले जाते.हे युद्ध स्वातंत्र्य निर्माण करण्यासाठी नव्हते,तर शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वातंत्र्या च्या रक्षणासाठी होते मराठयांचे हे स्वातंत्र्य जेवढे महान होते,तेवढीच त्यांची हे स्वातंत्र्यरक्षण करणारी मसलतही महान होती.
२६ सप्टेंबर १६८९ रोजी वेषांतर करून राजाराम महाराज व इतर सरदार आणि सहकाऱ्यांना घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास पन्हाळागड सोडला.आणि कर्नाटक " जिंजी " कडे कूच केले.लक्ष्मेश्वर परगण्यातून जात असता तेथील मोगल अधिकाऱ्यांना महाराजांचा सुगावा लागला तेव्हा ते ससैन्य पाठलाग करू लागले.
अशा परिस्थितीत वरदा नदी मार्गात आडवी आली.
महाराजांनी बहिर्जी घोरपडे व मालोजी घोरपडे या बंधूंच्या मदतीने ही नदी पार करून पाठलाग करणाऱ्या मोगलांना हुलकावणी दिली.पण पुढे जाताच पुन्हा मोगल आडवे आले.शत्रूसैन्यास थोपवून धरण्याची कामगिरी संताजी जगतापास सांगून महाराज बहिर्जी,मालोजी घोरपडे व रुपाजी भोसले यांच्यासह पुढे निसटले.
या संकट प्रसंगाचे वर्णन करताना केशव पंडित म्हणतात :-
" हेरांकडून शत्रूंच्या हालचालींची बातमी ऐकूनही तो
भीमपराक्रम ,स्थिरबुद्धी व महातेजस्वी राजा(राजाराम
महाराज ) धैर्यापासून चळला नाही.नंतर थोर अशा
घोरपडे घराण्यातील बहिर्जी आपल्या मालोजी
नावाच्या भावासह श्री राजाराम महाराजांच्या सेवेला
धावला.
" हनुमानासारखा सामर्थ्यवान,आपल्या सैन्याने
विष्ठित,राजारामच्या चरणी विनम्र व स्थिरभक्तीमान
महाबाहू,रणमार्तंड व शत्रूचे मर्दन करणारा असा
बहिर्जी राजाला म्हणाला..." आपण कर्नाटकास
चलावे.मार्गात जी जी विघ्ने उत्पन्न होतील ती ती
तुमच्या प्रसादाने तुमच्या चरणाचा आश्रय करून मी
हे विभो निवारण करीन..."
" नंतर ब्राह्मणांनी परिवेष्टित असा तो राजाराम आपल्या सैन्य व बहिर्जी यासह ती मोठी नदी ( वरदा ) पार करून पुढचा मार्ग आक्रमू लागला.राजारामाला पकडण्याच्या इच्छेने म्लेंच्छपतीच्या सैन्यपालांनी आपल्या सैन्यसह
त्याच्या मार्गातील सर्व वाटा रोखून घरल्या.तेव्हा
राजारामचे प्रिय करण्याच्या इच्छेने मदोध्दत झालेल्या महाराष्ट्री भालाइतानीही त्यांच्याबरोबर ठिकठिकाणी युद्ध केले.
" जेव्हा ते चिंताविष्ट,परिश्रांत व भुकेने व्याकुळ झाले आणि त्याची वाहने अगदी थकून गेली तेव्हा राजारामच्या
प्रभावेकरून धैर्यावान,अत्यंत वीरबली,पराक्रमी व शिवराजांनी सांभाळ केलेले असे ते संताजी जगताप व
रुपसिंह भोसले आपल्या सैन्यासह उपकाराची फेड करण्यासाठी पुढे सरसावले व महाराजांस नमस्कार करून मधुर वाणीने बोलले की," युद्धलालसेने उन्मत झालेले आतताई व कवचधारी म्लेंच्छ तुम्हास जिंकण्यासाठी सर्व बाजूंनी चालून येत आहेत.तेव्हा आम्ही आमच्या प्राण पणाला लावून त्यांच्यावर विजय मिळवू.तू सर्वांचा राजा व सर्व जगताचा प्राण आहेस.
तेव्हा हे महाराज,तू त्या दुष्टबुद्धीच्या नजरेस न पडता निघून जा."
" म्लेंच्छ सेना मोठी आहे असे पाहून तो भूमिपती राजा आधिरहीत मनाशी विचार करू लागला की " यांच्याशी युद्ध केल्याने सांप्रत मला कोणती फलप्राप्ती होईल...
कर्नाटकाला त्वरित जाऊन मी मोठे उपाय योजीन.अशा प्रकारचा निश्चय करून त्या बुद्धिमान राजाने सैन्याच्या तोंडावर संताजीला ठेऊन आपण रुपसिंहाला बरोबर घेऊन तो पुढे गेला.गाव,गावळीवाडे,दुर्ग,खेडी,खोऱ्यातील
खेडी,चांडाळगृहे वगैरे मागे टाकीत राजा तुंगभद्रेच्या तीरावर पोहोचला..."
तुंगभद्रेच्या तीरावर शिमोग्यास पोहोचण्यापूर्वी राजाराम महाराजांस बीदनूरच्या राज्यातून प्रवास करावा लागला.
या वेळी बिदनूरच्या राज्यावर राणी चन्नम्माराज्य करीत होती.दरम्यान राजाराम महाराजांचा पाठलाग करणाऱ्या
मोगली सैन्यास बिदनूरच्या राज्यात शिरल्यावर समजून चुकले की,राणीनं महाराजांस साहाय्य दिले आहे.तेव्हा
मोगलांनी मराठयांच्या राजास आपल्या ताब्यात देण्याविषय राणीस तंबी दिली.
राजाराम महाराज बिदनूरच्या राज्यात शिरताच जणू काय आपण त्यांच्या पाठलाग केला अशा थाटात चन्नम्माने बतावणी केली तरी त्यामुळे मोगल फसले नाहीत त्यांनी राणीने राजाराम महाराजांस केलेल्या साहाय्याची बातमी औरंग्याकडे त्वरेने कळवली.तेव्हा त्याने क्रुद्ध होऊन राणीचा मोड करण्यासाठी भली मोठी जंगी फौज राणीच्या राज्यावर पाठवली खरी..त्यात शर्जाखान,
जाँनिसारखान आणि मतलबखान या तिघां कसलेल्या सरदारांचा समावेश होतो.पण या सर्व मोगली फौजेचा फन्ना संताजी घोरपडे यांनी उडवला.
बिदनूरच्या राज्यातून तुंगभद्रा गाठण्यात राजाराम महाराज यशस्वी झाले.पण संकटांनी त्याचा पिच्छा सोडला नाही.ते पन्हाळगडाहून कर्नाटकात निसटल्याची खबर जशी औरंग्याला लागली तसे त्यांन सर्व किल्लेदार,ठाणेदार व सरदारांना राजाराम महाराजांना पकडण्याचे हुकूम दिले.
विजापूरचा सुभेदार सय्यद अब्दुलखान बाऱ्या हा या वेळी त्या प्रदेशात हजर होता.त्याला तसाच हुकुम मिळाला.तेव्हा खानानं आपलं लावा-लष्कर घेऊन तातडीने कूच केली.दिनरात दौड करून खान शिमोग्याच्या परिसरात दखल झाला.
तुंगभद्रा गाठण्यासाठी सगळ्यांनीच पराक्रमाची शर्थ केली
गनीमास संताजी जगतापन रोखलं होतं.रुपसिंह
मालोजी,बहिर्जी यांनी महाराजांस नदीच्या तीरावर आणलं. तिथं जाईपर्यंतही अचाट झगडा करावा लागला
गनिमांनी तमाम वाटा रोखलेल्या त्यांच्याशी दोन हात करत,त्यांना चुकवत पुढे जावं लागतं होतं.तीन दिवस लढाया नि चकमकींचा हमामा सुरू होता.दगदग,धावपळ जीवाहून जास्त झाली.अंगात त्राण राहिला नाही. विश्रांतीची गरज महाराजांनी बोलून दाखवली तेव्हा तुंगभद्रेच्या पात्रात मध्यभागी सुभानगड होता.तिथं
मुक्काम केला.
श्रम अतोनात झालेले.कष्ट नि प्रयत्नांनाही शेवटी मर्यादा होतीच.नदीच्या अलीकडच्या काठावर हिरा नावाच्या गावात रुपसिंह भोसले,संताजी जगताप,अंबाजी भोसले आपल्या जमावानिशी थांबले आणि इतर मंडळी महाराजां बरोबर होती.पहाटेच्या प्रहरी खान चालून आला
मराठेही सावध होते.तुंबळ मारामारी चालू झाली.मराठेही आपल्या राजासाठी शर्थीन झुजत होते.पण मोगली संख्याबळ जास्त असल्यानं महाराजां तेथून निसटन
भागच होतं.शेवटी महाराजांनी वेषांतर करून बहिर्जी घोरपड्यांनी त्यांना तातडीन गडा भाहेर काडून नदी पार केली.
आता दंगल शांत झाली होती.बरेच मराठे झुंजीत पडले होते.आणि कैद ही झाले होते महाराजांचा वेष धारण करणारा मोगलांना सापडला होता.त्यांना वाटलं राजाराम महाराज सापडले म्हणून.अब्दुल्लाखानानं ही खुशीची खबर तातडीने औरंग्याला कळवली.बीचाऱ्या औरंग्यानं लगेच हमीदुद्दीनखानाला राजाराम महाराजां बंदोबस्तात
छावणीत घेऊन येण्याचा हुकूम केला.पण लवकरच दुसरी बातमी आली की कैद केलेल्या मराठयांत राजाराम महाराज नाहीत.बहिर्जी घोरपड्यांनी त्यांना सहीसलामत
बाहेर काढलं होतं.
या दुसऱ्या बातमी मुळे औरंग्या भलताच रागाला गेला.अन त्यानं अब्दुल्लाखानाची विजापूरच्या सुभेदारीहुन बदली केली.कैद केलेल्या मराठयांना विजापूरच्या किल्ल्यात डांबून ठेवण्याची हुकूम देण्यात आला.या कैद्यांमध्ये मालोजी घोरपडे सुध्दा होते.
संताजी घोरपड्यांनी सागरच्या पिडीनायकाला हाताशी धरून ऐवजखान जो विजापूरच्या किल्ल्याच्या कैदखाण्याचा फौजदार होता त्याच्या कुटुंबकबील्याला दस्त करून दबाव आणून या कैद्यांना सोडवण्याच्या प्रयत्न केला होता.पण फसला.काही मराठे पळून जाण्यात यशस्वी झाले.पण तेवड्यात किल्ल्याला जाग आली.आणि पुन्हा इतर मराठयांची धरपकड करण्यात आली.ही बातमी औरंग्याला समजल्यावर त्यानं सर्वांची गर्दन मारण्याचा हुकूम दिला.त्यात मालोजी घोरपडे सुध्दा होते.
अखेरीस बऱ्याच संघर्षनंतर मराठयांनी आपला राजा जिंजीला सुखरूप पावता केला.नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात( सन १६८९) कर्नाटकात व खुद्द जिंजीमध्ये
असणाऱ्या मराठी लोकांनी राजाराम महाराजांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केल्याने मद्रास इलाख्यातले राजकीय रंग पालटू लागले.मराठयांनी जिंजीत आपली नवीन राजधानी उभी केली.दरबार सज्ज झाला.मराठयांच्या इतिहासात एक नवे पर्व सुरू झाले.
राजाराम महाराजांचा हा जिंजीचा प्रवास मराठयांच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे.मार्गातील अनेक जीवघेण्या संकटांशी हमतोल मुकाबला करीत.नाना वेष
नाना रूपे धारण करीत त्यांना हा प्रवास करावा लागला.
शिमोगा व बंगलूर या ठिकाणी त्यांच्यावर जिवावरच बेतलं पण श्रींच्या आशिर्वादाने त्यातून सुखरूप सुटका झाली.रुपसिंह भोसले,बहिर्जी घोरपडे,मालोजी घोरपडे,संताजी जगताप,खंडो बल्लाळ या स्वामिनिष्ठ लोकांनी जीवाची बाजी लावून मराठयांच्या राजाच रक्षण केलं.त्यांच्या सेवेचा मोल करता येणार नाही हे निश्चित.
जिंजीच्या या प्रवासात राजाराम महाराज पकडले गेले असते तर दक्षिणेतील मराठी सत्तेचा मूळ स्रोतच नष्ट झाला असता आणि आसेतुहिमाचल इस्लामी सत्तेचे साम्राज्य पसरविण्याची औरंग्याची महत्वकांक्षा सफल झाली असती.
Pc :- गजानन भाऊ पाटील

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...