विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 23 March 2022

सरनौबत हंबीरराव मोहिते...!!

 


सरनौबत हंबीरराव मोहिते...!!
पोस्त सांभार ::इंद्रजीत खोरे
बरा शहाणा,मर्दाना,सबुरीचा,चौकस
शिपाई मोठा धारकरी गडी...!!
" सरनौबत कोण करावा.प्रतापराव पडले ही खबर
राजियांनी एकूण बहुत कष्टी झाले आणि बोलिले की,
आज एक बाजू पडली.प्रतापराव यासी आपण लेहून
पाठीविले की,फत्ते न करिता तोंड न दखवीने.
त्यासरिखे करून बरे म्हणविले.आता लष्कराचा बंद
कैसा होतो ? सरनौबत कोण करावा ? अयसा
रणमार्तंड पुन्हा न होणे.आता आपण खासा-लष्करात
येऊन लष्कर घेऊन कोकणात चिपळूण जागा
परशुरामाचे क्षेत्र आहे तेथे येऊन राहिले.मग लष्करची
पाहाणी करून लहानथोर लष्करास व पायदळ लोकांस
खजिना फोडून वाटणी केली आणि सरनौबतीस माणूस
पाहता हंसाजी मोहिते म्हणून पागेमध्ये जुमला होता.
बरा शहाणा,मर्दना,सबुरीचा,चौकस शिपाई मोठा
धारकरी पाहून त्यास " हंबीरराव " नाव किताबती देऊन
सरनौबती सांगितली.कुल लष्करचा गाहा करून
हंबीरराव यांचे ताबीज दिधले आणि फौज वरघटी
रवाना केला....!!"
श्रींच्या राज्याचे सरनौबत हंसाजी उर्फ हंबीरराव मोहिते
झाले.
|| श्री मछिवमहानुभाव सेनाधीश हंबीरराव ||
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना व प्रसार आदिलशाही मुलूख जिंकून केला होता.त्यामुळे महाराजांचे व आदिलशाही सुलतानांचे सख्य असणे संभवनीय नव्हते.तरीसुद्धा ज्यावेळी मुघलांचे आक्रमण
आदिलशाहीवर होई तेव्हा महाराजांनी आदिलशाही सुलतानास सर्व तऱ्हेने मदत देत असत.आणि तेच धोरण
छत्रपती संभाजी महाराजांनी आदिलशाही बरोबर
औरंगजेबा विरुद्ध लढताना कायम ठेवले.
सुलतान अज्जमला पन्हाळा-कोल्हापूर भागात आघाडी उघडन्याचे फर्मान मिळताच.मुघली छावणीतील खबरगीरां टकोटाक ही खबर सेनापतींच्या गोटात पावती केली. १६८२ च्या जानेवारी महिन्यात आज्जम निघाला.
त्यांच्या संगती फिरोजखान, कुलीखान,हसन अलीखान
राव अनुपसिंग,अनिरुद्धसिंग हाडाआणि सरफराजखान असे बडे बडे सरदार होते.
बरा शहाणा,मर्दना...हंबीरराव..!!
आज्जम पन्हाळ्यापासून सहा कोसांवर आल्याचे कळताच सेनापती हंबीररावांनी १५००० घोडदळ आणि५००० पाऊळलोक घेऊन आज्जमच्या पिछाडीवर
लगट केली.आज्जमला पण मराठयांनचा बेत कळल्यामुळे तो ही सावध झाला.तिरंदाज बर्चीवाले, आडहत्यारी,ढाल,तलवार आणि खंजीर हत्यारांनी मुघल लढत होते.मराठे म्हणजे मोठे हरीफ,त्यांनी तरवारीची शर्त करून भांडण दिधले.नीट चढते घोडी घालून मारामारी केली. अनेक मोघली स्वार-प्यादे मारिले
कुल फौज बुडवली.खासे खासे मारिले. फिरोजखान आणि त्याचा बेटा जखमी झाले.कुलीजखानाला मराठयांच्या बरकनदाजांणीतर पुरता घेरून त्याच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला.पण खानाच नशीब जोरावर म्हणून तो सहीसलामत सुटला.
याच कुलीजखाननं मराठ्यांन बरोबर झालेल्या लढाईची
संबंधी औरंगजेबाकडे एक विनंती-अर्ज पाठवून त्याच्या
कुपेची याचना केली.बादशहाने आलेल्या अर्जाचा विचारच केला नाही.उलट कुलीजखानाची खरडपट्टी केली. बादशहान त्याला लिहल.." तू यशस्वी झाला म्हणतोस तर आपले इतके सैन्य रणांगणावर का पडले ?
आणि तू एकटा आज्जमकडे का परतलास ?" या लढाईनंतर १८ जानेवारी १६८३ च्या सुमारास आज्जमला मराठयांनी कोल्हापूरच्या पलीकडे रेटला.
जवळजवळ हंबीरराव महिना भर आज्जमच्या पाठलाग
कर होते आणि शेवटी त्यांनी आज्जमला भवरे पलीकडे हटवले.माणिकघाट उतरून तो टेंभुर्णी मार्गे पेडगावास गेला.
१६८३ सालच्या मार्चपासून पुन्हा मुघलांनी आपल्या हालचालींना गती दिली.मिरज, कोल्हापूर , पन्हाळा या भागात मुघलांचा वावर वाढला.त्यात भर म्हणजे मिरजेच्या कोट हा आदिलशाहच्या ताब्यात होता.
किल्लेदार असदखान यांनी कच खाऊन तो मोगलांच्या
हाती सोपवला.मोघलांना आयतच घर मिळालं.१५ मार्च ते १२ एप्रिल १६८६ (शके १६०८ चैत्र मासी मुघलांनी मिरज घेल )
रुहुल्लाखान व रणमस्तखान फिरोन येऊन पन्हाळा परिसरात घुसण्याचा प्रयत्नात असता हंबीररावांनी दोघांना घेरून मोघली फौज फन्ना केली.मुघलांना जेरीस आणले.
" तो रुहुल्लाखान संगती रणमस्तखान दोघे मन्सबदार पादशहाकडील फौजेनिशी परणाल्यास आले
त्यावर सरनौबत हंबीरराव फौज सरंजामनिशी घसरले.
मुकाबला लढाईचा झाला.रावांनी युद्ध भारी केले.धोही
सारदारासी जेर केले.."
मराठयांची जिद्द आणि चिकाठी पाहून मराठे काही सहजासहजी हटणार नाही असा विचार करून
मुघलांनी काढता पाय घेतला.आणि बेळगावच्या दिशेने
घुसले.तेव्हा हंबीररावही आपलं लावालष्कर घेऊन त्यांच्या माघे लागले.
सबुरीचा,चौकस शिपाई मोठा धारकरी...हंबीरराव...!!
सरनौबत मुघलांचा हिशेब धरीत नव्हते.हंबीरराव विजापुरकरांना आपलेच समजून त्यांच्या मदतीस धावून गेले.मुघलांनी मिरज घेतल्यानंतर बेळगावाकर आपला कोट त्यांना द्यावयास तयार झाले.त्यामुळे मुघल बेळगावकडे निघाले होते.ही खबर हंबीरावांना कळताच
बेळगावचा किल्लेदार खानेअजम मुरादखान याला खलिता पाठवून कळविले की मुघलांना आसरा देऊ नये.
आम्ही एके जागी होऊन मुघलांना सजा देऊ.
कोल्हापुराहून मुघली फौज बेळगावकडे जाणार असल्याने वाटेत हुकेरीचे देसाई मंडळींना मुघल अधिकारी आपल्या बाजूस ओढण्याचा प्रयत्न करतील
हे ध्यानी धरून हंबीररावांनी अलगौंडा देसाई यासी खलिता रवाना केला.
हंबीरराव लिहितात :-
" राजश्री अलगौंडा देसाई पा.हुकेरी गोसावी यांसी -
अखडितलक्षुमिअलंकृत राजमान्ये श्री हंबीरराउ मोहिते
सेनापती जोहार विनती उपरी येथील क्षेम जाणऊन स्वकीवे कुशल लेखन करावयास आज्ञा केली पाहिजे.विशेष गनिम रोहिलाखान व रणमस्तखान यैसे मिरजेहून पनालेपावेतो आला होता.आमचे फौजेसी व गनिमासी बरा मुकाबला होऊन भांडण जाले.ते जगा गनिमाची बहुत खस्ता जाली.गनिम खटाक( खजिल)
होऊन कोल्हापूरावरून बेलगावचे रोखे जात आहे.आम्ही
सेनेसमुदायेपासी गनिमाचे पाठीवर गनिमाचा हिसाब धरीत नाही.येक विजापूर जाले तरी काय जाले.विजापूर
हा जागा पहिलेपासून आमचाच आहे.त्याची पुस्तपणा
हरबावेने आम्हांस करणे लागते.असदखान किल्लेदार
मिरजेचा याने उतावली करून गनिमास मिरज दिधले.त्याकरिता गनिमास राहावयास जागा होउन पैसा
मडीळा अहे.हली बेलगावकरावे कोट देऊ केला.म्हणऊन
तिकडे गनिम जातो त्यास बम्हीखाने अजम नुरानखान यास कागद पाठविले आहेत.की गनिमास असिराऊन देणे
तुम्ही आम्ही येक जागा होऊन गनिमास सजा पावितो.
ऐसे लिहून पाठविले.इहे पहिले या मुलुकात राजश्री गोपाळ राऊत होते.ते लष्करास सामील जाले आहेत यानी तुमचे विशई कितेक रदबदल केली की आपणांस
येक खुसीले चालत आहे.तरी हे गोस्टी बहुतच उत्तम अहे.
गनिम वाएने जात आहे.तुम्हांस कागदपत्र पाठवीन तरी
येकंदर गनिमास न भेटणे.असिरा न देणे.आम्ही लष्करानसी या प्रांते असता तुम्हांस कोण्हे गोस्टीचे काही भय नाही.राजश्री रुपाजी भोसले व राजश्री संताजी जगथाप (जगताप) यासीही बोलाविले अहे.येक जागा होऊन गनिम माश्रम गर्देस मेलवितच अहो तुम्ही आपले
वर्तमान साकळ्ये लिहून पाठवीण.बहुत काय लिहिणे.
रा.छ.१२ सफर."
वरील पत्र अतिशय बोलके आहे.बारकाईने जर आपण बघीत तर सरनौबत हंबीरराव शत्रूशी लढतांना किती सावधगिरीने वागत असत आणि शत्रूच्या हालचालींना पायबंद घालण्यासाठी किती तत्पर असत हे आपल्या लक्षात येईल.छत्रपती शिवाजी महाराजांच जे धोरण होत की " दक्षिणची बादशाही दक्षिणी यांचे हाती राहे.." बरोबर
हे धोरण हंबीररावयांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडात सुध्दा राबवल यात शंका नाही.
शिवज्योतीच्या तेजामध्ये सेनापती तो झगमगला ।।
शंभूप्रभेच्या शौर्यामध्ये सरलष्कर तो धगधगला ।।
सौदामिनीच्या लक्ष प्रकार्शी सरलष्कर तो लखलखला ।।
सह्याद्रीच्या समशेरीतुन सेनापती तो सळसळला ।।
आशा शिवचरणी व शंभूचरणी दृढ भाव बाळगणाऱ्या सेनाधीश हंबीरराव मोहिते यांना कोटी कोटी प्रणाम..!!
( इंद्रजीत खोरे )

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...