विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 23 March 2022

सुभेदार तानाजी मालुसरे....!! भाग पहिला

 

सुभेदार तानाजी मालुसरे....!!
भाग पहिला
पोस्त सांभार ::इंद्रजीत खोरे


कित्येक दीप विझले जरी या जगांत ।
तळपे कधीं न विझता रवी या नभांत ।।
निर्मूं असंख्य हृदयीं ' शिवसूर्यज्वाला ' ।
सर्वस्व देतील स्वयें क्षणीं मायभूला ।।
रात्रीचा पहिला प्रहर समपत आला होता. रोहीडाखोऱ्यातल्या कारी गावच्या जेध्यांच्या वाड्या बाहेर गस्तीचे पाच-पन्नास हशम पाहऱ्यावर होते.अधूनमधून गडी हुशारची आरोळी उठत होती.तेवढ्या पंधरा-वीस घोडी तिरा सारखी वाड्याच्या दिशेनं घुसली.तसे पाहऱ्यावरील हशम लगबगीनं गोळा झाले.त्यातील एकजनांन आपल्या हातातील वाऱ्यावर फरफरणारी मशाल उंचावत घोड्यावरच्या मोरक्याला निहाळीत होता.म्होरक्याला बघून हशम गडबडीत दोन पावलं माघे सरखला.मुजरा करीत म्हणाला अव सुभेदार तुम्ही..!!अन इतक्या रातीला…? घोड्यावरनं खाली झेप घेत सुभेदारांनी काकासाहेबांना आता वर्दी देण्याचा हुकूम केला.
वाड्याचा दिंडीदरवाज्या हळूच उघडत एकजण आता गेला.त्यानं काकासाहेबांच्या खासगीतल्या सेवकाला सुभेदार तानाजी मालुसरे आल्याची वर्दी दिली.थोड्या वेळात सुभेदारांना आता घेण्यात आलं.सुभेदारांना बरोबर अजून दोघ-तिघजण आता शिरली.आता शिरताच काकासाहेब वाड्याच्या हमचौकातच उभे होते. तानाजीरावांना बघताच काकासाहेबांनी विचारलं.अव काय सुभेदार..!!बरं येणं केलं.अनं ते बी इतक्या रातीला...? या.काकासाहेबांचा भारदस्त आवाज वाडाभर घुमला.जी म्हणत सुभेदार पुढं झाले.अदब मुजरे झडले.सर्वांची असतेवाईक चवकशी करून सर्वांजण सदरबैठकीवर बसले
मग काय सुभेदार.काय म्हणत्यात राजं..? बेस हायत नव्ह.आता राजगडीच असत्याल की..?व्हय जी.म्हणत तानाजींनी जाब दिला.कसल्या तरी खोल विचाररात सुभेदार आहेत हे हेरून काकासाहेबांनी थेट मुध्यालाच हात घातला.कुंचा बेत आखून तुम्ही हित पातूर आलाय म्हणायचं...?तसं म्हणताच सुभेदार जरा हुशार झालं.नाय मंझी आपुन जरा खलबत खाण्यात बसून बोलनी केली असती की काकासाहेब.बर म्हणत काकासाहेबांनी सेवकाकडे नजर टाकली.नजरेचा इशारा पकडत सेवक खलबत खाण्या कडं धावला.खोलीतील समया तेवत्या करून सर्व खोली भर त्यानं नजर फिरवली की सर्व टाकटिक हाय ते बघायला.
काकासाहेबांनी बरोबर सर्वजण उठले अनं खोलीत आसनस्थ झाले.सेवकानं दार लोटून घेतलं अनं दूर झाला.जरा खकरून सुभेदारांनी विषयाला हात घातला.
म्या काय म्हणतुय काकासाहेब.राजांकडून कोंढाण्याची जोखीम म्या आपणहून उचलली हाय.राजासनी वचन दिलं म्या की गड फते करून देतो म्हणून.वाह..!! भलेर माझ्या वाघा म्हणत काकासाहेबांनी आपल्या झुपकेदार मिशांवर पालती मुट फिरवली.अनं जरा सावरून बसले.
मोहीम म्हणलं की काकासाहेबांचा हुरूप दांडगा.
काकासाहेबांचे नाव तस बाजी.पण त्याच्या तलवारीचा जोर पाहून छत्रपतींनी त्यांना " सर्जेराव " ही पदवी बहाल केली होती. त्यांना लोक आदरानं काकासाहेब म्हणत. काकासाहेबांचे वडील म्हणजे कान्होजी नाईक जेधे. उभ्या बारा मावळांतील एक मातब्बर आसामी होती.तस बघीतलं तर बारा मावळात इतर ही तोलदार देशमुख घराणी नांदत होती.हर एक जण आपला आब राखून छत्रपतींची आणि स्वराज्याची सेवा चोक बजावीत होते.प्रत्येक देशमुखांनी आपल्या पदरी तिखट तालावरबाज मावळ्यांचा जमाव ठेवला होता.छत्रपतींचा
सांगावा येताच ह्या समशेरी राजगडाच्या सदरेवर हजर होत.
गरम दुधाचा तांब्या रिचवून खाली ठेवत सुभेदार म्हणाले
काकासाहेब तुमच्या कजाकी बेड्यातील तीनएकशे
तरणाभांड खासा पट्टेकरी आमच्या सोबतीला घ्यावा म्हणतो मी.मांडीवर थाप मारत काकासाहेब गर्जल. अव काय सुभेदार..!! का आम्हाला लाजीव ताय..!! समंध तर छत्रपतींच्या चरणावर व्हायलय आम्ही.अव ही उभी दौलत त्यांच्या कृपेनेच हाय.अनं पट्टेकरी काय घेऊन बसलाय तुम्ही.आम्ही येऊ की जातीनं तुमची कुमक कराया.काकासाहेब हे विसरून गेले होते की आपण गुप्त
बैठकीसाठी खलबत खाण्यात बसलोय म्हणून.सगळी चरच्या झाल्यावर काकासाहेबांनी सुभेदारांना दिलभरोसा दिला.हशम कोणत्या वारी ठरलेल्या ठिकाणी पाठवायचे हे सुभेदार सांगणार होते.
आतील मेळ होईपर्यंत बाहेर कोंबड्यांनी बाग दिली होती.बैठक उठली.काकासाहेबांची उरभेट घेऊन सुभेदारांनी घोडयाला टाच दिली.अशा प्रकारे याचवेळी असाच एक सात-आठजणांचा जथा कर्यात मावळातून शितोळे देशमुखांच्या वाड्यातून बाहेर पडला होता. देशमुखांनी सूर्याजीराव मालसुऱ्यांना शब्द दिला होता.गड चडनीसाठी पटाईत अनं गड आणि गडाच्या घेऱ्या बाबत खडानखडा माहीत असलेले हरहुन्नरी शंभर-एक मावळा सुभेदार तानाजीरावांच्या दीमतीस देण्याचा कबूल केलं होतं. त्याला कारणही तसच होतं.सिंहगड हा बारा-मावळ पैकी कर्यात मावळात मोडत होता.त्या कुबल इलाख्यातची पुरेपूर माहिती ही देशमुख आणि त्यांच्या हशमांना होती.तशी जुजबी माहिती लगोलग देशमुखांनी सूर्याजीरावांना आपले माहीतगार लोक पाचारण करून बैठकीतच दिली होती.सुभेदारांनचा निरोप येताच ही मंडळी हालचाल करणार होती.
सुभेदार हे सध्या आपल्या गावी म्हणजेच उमराठ्याला आले होते.आपला लेख रायबाच्या लग्नाचा भेत सुभेदारांनी आकला होता.त्याच्याच तयारी साठी सुभेदार
गावी आले होते.पण छत्रपतींना गड घेण्या बाबत दिलेलं
वचन त्यांच्या मनात उसळत होतं.सुभेदार जरी घरी लग्नाच्या तयारीत होते तरी कोंढाणा अनं त्यो उदयभान राठोड त्यांच्या डोक्यात घोळत होता.गड पटाखाली घेऊन त्या उदयभानला उभा फाडल्याशिव सुभेदारांच्या मनातील आग काय विजनार नव्हती.दोन दिवसांनी सुभेदारांनी आपल्या जमावतील अनं खास ठेवणीतील लोक जमा करून गडा बाबत खल केला. दोन हजार मावळ्यांमधून खास दोनशे मावळे निवडण्यात आले.गड चडणी साठी लागणारे सर्व साहित्य व मावळे सूर्याजीरावांच्या हवाली करून त्यांना कर्यात मावळात धाडण्यात आलं.सुर्यजींना सुभेदारांनी दुसरी एक गुप्त कामगिरी सांगितली होती.ती म्हणजे गडाचा घेरा अनं मेट यावरील पाहऱ्याचे लोक यांना आपलेसे करून घेणे. कारण हे दोन्ही पहारे महत्वाचे होते.याशिवाय त्यांना गडाला भिडता येणार नव्हते.ही गोष्ट अतिशय गुप्त रीत्या पार पडायची होती.सूर्याजीराव हे कारस्थान घडवून अंतील ह्याबद्दल सुभेदारांना शंका नव्हती.
तस बगीतल तर उदयभान सुद्धा मर्दगडी होता.मोठा बजोर समशेर.कडवा मर्दाना शिपाई तो.राजस्थानांतील जोधपूरच्या राठोडवंशांत त्याचा जन्म झाला होता.भिनाय
या गावचा हा राहणारा.याच्या बापाचें नाव शामसिंह.
शामसिंहही मोठा तालेवार योद्धा.उदयभानाचा कारभार हा उदयभानासारखाच कडक होता.किल्ल्यावर व घेऱ्यात
त्याची जरब फार होती.वेळप्रसंगी तो गडाच्या घेरा ही तपासून पाही.
किल्ल्यावर जवळ जवळ पंधराशे हत्यारबंद राजपुतांची तिखट शिवबंदी होती.म्हणजे ज्यावेळी औरंगजेबानं उदयभानाला दख्खनच्या कोंढाणा किल्ल्यावर सुभेदार म्हणून नामजद केलं.त्यावेळी सुद्धा तो मोगली सैन्य न घेता त्यानं स्वतःच्या मुलूखतील सैन्य सिंचनी करून दीड हजारा फौज फाटा संगती घेऊन त्यानं दख्खनची वाट धरली.किल्ल्यावर सर्व काही मुबलक प्रमाणात उपलब्ध होते.तोफा,बारुद,बंदुका आणि रसद गच्च भरलेली होती.
किल्ल्याला वेडा देऊन बसणं हे फार मोठं जिकीरीचं काम
होतं.त्यामुळेच छत्रपतींनी अचानक यलगार करून किल्ला जेर करण्याचा मनसुबा आकला होता.अनं त्यासाठीच तानाजीरावांनी सुद्धा तयारी दांडगी केली होती.( उदयभाना कडून फक्त एकच कसूर झाली होती.
अनं ती म्हणजे.जीतून गडाला पान लावू शकतो अशी जागा म्हणजे गडाचा घेरा अनं गडाचा मेट ह्या ठिकाणी
पाहऱ्यासाठी त्यांनी जुनेच लोक पाहऱ्यावर ठेवले होते. आणि हीच चूक त्याला महागात पडणार होती )
दुसऱ्या दिवशी सगळ्या घरातील सर्व मंडळींना भेटून.सर्वांना जरुरी त्या सूचना देऊन सुभेदार निघाले.दहा-बारा दिवसांनी परतू असा वायदा केला होता सुभेदारांनी आपल्या प्राणप्रिय पत्नीला.घरच्या सुवासिनींनी सुभेदार अनं मामांना चांदीच्या ताटात निरांचन लावून ओवाळले.हातावर दिलेली धही-साखर खाऊन सुभेदारांनी सर्वांचा निरोप घेतला.शेलारमामा व सोबतीला पाच-पंचवीस घोडा होता. घोड्याचा लगाम हाती धरून घरापासून गावातल्या दक्षिणमुखी मारुतीच्या मंदिरापर्यंत सुभेदार व मामा गप्पा मारत चालत आले.
हनुमंतरायाची यतासांग पूजा करून त्या परंमभगवता पुढे
सुभेदार नतमस्तक झाले.आणि मनोमन आपला हेतू त्यांनी वायूपुत्राच्या कानी घातला. " हे अजनीसुता तू जसा रामाला तसा म्याबी माझ्या शिवबाला.माझ्या हट्टा पाय माझ्या राजानं ही मोहिमे माझ्यावर सोपवली हाय.
माझा राजा सुखी तर प्रजा सुखी अनं तरच स्वराज्याला अर्थ हाय.यश दे " म्हणत सुभेदार उठले.पण त्या पाषाण रुपी कपीराजाला आशिर्वादासाठी आपला हात उचलताना घाम फुटला होता.कारण पुढ काय होणार आहे हे फक्त त्या जगदंबेला आणि त्यालाच माहीत होतं.
विजयवंत व्हा...!! असेच काहीसे बोल सुटले असतील. पण ते सुभेदारांच्या कानी जाणार नव्हते.प्रसन्न चेहऱ्याने
सुभेदार मंदिरा बाहेर पडले.
सुभेदार घोड्यावर बसताच एका मावळ्यांन जोरात हर हर महादेव ची हारकी दिली.तशीच ती सर्वांनी उचलून धरली
हर हर महादेवच्या जयघोषात सर्वांनी गावची वेष पार केली.आता ती मावळ्यांनची दिंडी श्री क्षेत्र राजगडा कडे
वाटचाल करू लागली.दिवस मावळतील लागला होता.
राजगड नजर टप्यात आला.बगत बगत घोडी भोसले वाडीत आली.तोपर्यंत अंधारून आल्यानं सुभेदारांनी भोसले वाडीत मुक्काम ठोकला.दुसऱ्या दिवशी दिवस फुटीला सुभेदार अनं शेलार मामा गड चढू लागले.पण आज गड चडणीच्या मार्गावर सरदार,मावले आणि सरकारी अधिकाऱ्यांची बरीच वर्दळ बघायला मिळत होती.सारा गडपायता स्वर-शिपाई,राऊत लोक अनं घोडे-जनावरांनी फुलून उठला होता.बारा मावळतील हर एक
लढाऊ आसामी हजर झाला होता.जणू लढवय्यांचा तो कुंभमेळाच भासावा.छत्रपतींनी खास बारा मावळतील हर एक देशमुखांना गड दाखल होण्यास आज्ञा केली होती.
गड चढणीला ठरावीक ठिकाणी पाणवठे होते.मोठमोठे रांजण पाण्याने भरलेले असायचे.येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची तहान भागवण्यासाठी छत्रपतींनी ती सोया केली होती.अशाच एका ठिकाणी सुभेदार आणि मामा विसाव्यासाठी थांबले.तेवड्यात मामांनी सहज म्हणून
सुभेदारांना विचारलं व्हय तान्या..आज गडाव लैच वर्दळ दिसतीया ? काय भानगड हाय.सुभेदारांना सुद्धा तोच प्रश्न पडला होता.सुभेदार म्हणाले ज्यार्ती इतका माणूस मेळ दाटून आला आहे त्या आरती छत्रपतींनी मोठ्या दाबाजोर मोहिमेचा मनसुबा आकलेला दिसतोय मामा.तेवड्यात पायदळाचे सरनोबत येसाजी कंक आणि नुकतंच मिसरूड फुटलेला त्यांचा लेक कृष्णाजी याला संगती घेऊन पाठीमागून गड चढत आले.काय म्हणत्यात सुभेदार...!! म्हणत येसाजीराव ही त्यांच्या पाशी थांबले.खुशाली विचारून सर्व मंडळी पुन्हा गड चढणीला लागली.जो तो सुभेदारांना बघताच राम राम करीत होता. सुभेदार ही हात वर करून त्याला प्रतिसात देत होते.
पाली दरवाजा नजर टप्यात आला.सनई-चौघड्याचे मंद सूर कानी येऊ लागले.दरवाजा आला.दरवाज्यात खुद्द किल्लेदार सुभानजी सिलिमकर जातीनं हजर होते.कगणीदार लाल पगडी त्यावर मोतीदार तुरा. पगडीच्या उजव्या टोकाला मोत्यांच्या लढ्या.उजव्या हाती चांदीची सलकडी.पांढरा शुभ्र पेहराव.कमरेला भगवा दुशेला अवळलेला.पायात कुरकुरनारं कोल्हापूरी पायतान.डावा हात कमरेच्या हत्याराच्या मुटीवर ठेवून किल्लेदार मोठ्या आयटीत उभे होते.येणाऱ्या प्रत्येक सरदार,मानकरी आसमींची ते आस्तेवाईक चवकशी करून त्यांची राजसदरे कडे पाठवणी करीत होते. सुभेदारांना बघताच सुभानजींनी त्यांना राम राम केला.दोन पावले जलद टाकीत सुभेदारांनी सुभानजींची उरभेट घेतली.
पाली दरवाज्यातून आत प्रवेश करताच सर्व मंडळी आई पद्मावती देवीच्या दर्शनास गेले आणि तेथून सदरेवर हजर झाले....!!
लेखन समाप्त.
पुढील भाग नंतर.
प्रस्तुत लेखन सेवा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या चरणी अर्पण करतो...!!
।। जय जिजाऊ ।।
।। जय शिवराय ।।
।। जय रौद्र शंभू ।।
Pc :- गजानन भाऊ पाटील

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...