दक्षिण दिग्विजयावरून छत्रपती स्वामींनी ऑक्टोबर १६७७ रोजी पुन्हा रायगडाकडे कूच केली.महाराज तोरगळ प्रांती असताना दक्षिणेच्या राजकारणात मोठी उलतापालत झाली.खास करून विजापूरच्या राजकारणात बदल झाले.औरंगजेबानं बहादूरखानाच्या कार्यकर्तृत्वावर कडक ताशेरे ओढले..!!कारण...! भरपूर
पैसा,लोक खर्ची घालून सुद्धा बहादूरखानाला छत्रपती शिवाजी महाराज आणि कुत्बशहाचा बंदोबस्त करता आला नाही.सबब बहादूरखानाची बदली करून त्याठिकाणी दिलेरखान पठाण याच्या कडे दक्षिणेची सूत्रे देण्यात आली.
त्यावेळी विजापुरची बरीच सत्ता ही बहलोलखानाच्या हाती होती.दिलेरखान येताच त्यानी बहलोलखानाला
भाईचाऱ्याची आठवण करून दिली.आणि त्याच्याशि हातमिळवणी केला.हातमिळवणी करण्याचं कारण अर्थातच कुत्बशाह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अडचण निर्माण करणे हे होतं.मग कुत्बशाहनं याजोडीला शह देण्यासाठी निवीन राजकारणाचा पट मांडला.विजापुरातील नंबर दोनचं एक बड प्रस्त सिद्दी मसाऊद याला अंतस्थ ताकद देण्यास सुरुवात केली.
हा सिद्दी कोण..तर सिद्दी जौहरचा जावई.सिद्दी आपला नवीन गट स्थापन केला.तो थोड्या दिसात बळजोर झाला.
गभरू झालेल्या सिद्दी पटाखाली घेणं सोपं नाही हे हेरून
दिलेरखानानं थेट कुत्बशहा कडे बोलनी लावली.आपला वकील त्यानं भागानगरच्या कुत्बशाह कडे रवाना केला.
दिलेरच्या प्रयत्नांना यश आलं.करार ठरला.
कलम
१) बहलोलखान आपली पठाणी फौज बरखास्त करेल.
२) सिद्दीनं बहलोलला सहा लक्ष होन देणे.
३)विजापूरचा किल्ला सिद्दीच्या ताब्यात देणे.
४) चतुर दिलेरखाननं गुपचूप हे चवथ कलम त्या करारात घातलं.की सर्वांनी मिळून शिवाजीशी लढायचं.
पण या कराराला रंगरूप येतअसताना इकडं छत्रपतींच्या
हुकमानं पेशवा मोरोपंत पिंगळे मोठी फौज घेऊन नाशिक प्रांती उतरले.मोठ्या मोठ्या मजला मारून मराठे अचानक दाखल झाले.मारझोड करीत त्यांनी मोठी लुट जमवली.खंडण्या घेतल्या.मोरोपंतांना जव्हार भागात अडवण्यासाठी म्हणून दिलेरखान पेडगावला आला.पण उपयोग झाला नाही.ज्या वेगानं मराठे आले त्याच वेगानं ते धुडगूस घालून निघून गेले.
करार झाल्यानं सिद्दी खळीला आला.त्याला आता विजापूर आणि किल्ल्याचे वेद लागले.त्यानी या गोष्टींन साठी हालचाली सुरू केल्या.पण त्याला एक बुरी खबर मिळाली.ती मंझे.हिरापूर या ठिकाणी मुक्कामी असताना
पठाण बहलोलखान खुदाला प्यारा झाला म्हणून.
२३ डिसेंबर १६७७ सालची ही घटना.बहलोल गेल्या मुळे
सगळे चिंताग्रस्त झाले.पण या सगळ्या घटना घडत असताना बहलोलचा हस्तक जमशिदखान पठाण यानं
तोपर्यंत विजापूरात आपला जम बसवला होता.
जमशिदनं नवीन खेळी सुरू केली.त्यानी सिद्दीला उलटा
निरोप पाठवला.की सहा लक्ष होनं पाठव.विनातक्रार तुला
विजापूरचा किल्ला हवाली करतो म्हणून.
आता सिद्दीकडे तरी कुठला पैसा.तो गप्प बसला.मग
जमशिदनं कुत्बशाहकडे निरोप पाठवला.पण त्यानीही
नकार कळवला.इकडं पगार नाही म्हणून पठाण शिपाई
जमशिदला त्रास देऊ लागले.हा सगळा डाव छत्रपती स्वामींनी हेरला आणि छत्रपती या डावात उतरले.
त्यांनी थेट जमशिदशि बोलणी सुरु केली.सहा लक्ष होन देण्याचे कबूल केले.छत्रपती बहुत जलदीनं विजापूरकडे निघाले.पण ही बातमी सिद्दी मसाऊदला
समजली.या खुदा..!! मराठ्यांकडे जर किल्ला गेला तर आपण देशोधडीला लागणार.या नुसत्या विचारांन सिद्दीला घाम फुटला.सिद्दी अस्वस्थ झाला.
सिद्दी विजापूरकडे निघाला.पण लढून किल्ला मिळणार नाही हे त्याला चांगलं माहित होतं.त्यानी नवीन शक्कल लढवली.सिद्दीनं स्वतःच्या मृत्यूची हुल उठवली.आणि
आपल्या हाताखालचे ४ हजार लढाऊ हशम त्यानी
जमशिद खानाकडे नोकरी साठी म्हणून पाठवले.आमचा सरदार मेला आहे तर आम्हाला नोकरीवर ठेऊन घ्या अशी बतावणी करून हे ४ हजार लोक साळसूदपणे विजपुरात घुसले.जमशिद या डावाला फसला.नंतर दोनच
दिवसात योग्य संधी साधून या आत आलेल्या सैनिकांनी
जमशिदला अटक केली.अपसूक्तच विजापूर सिद्दीच्या हाती पडलं.जिवंत सिद्दी मसाऊद विजापूरात शिरला.
ही बातमी छत्रपतींना समजली.आता पुढे जाण्यात अर्थ
नाही म्हणून छत्रपती पुन्हा पन्हाळगडी दाखल झाले.
एक नामी संधी हुकली.जर त्यावेळी विजापूर मराठ्यांच्या ताब्यात येत होतं तर एक वेगळा इतिहास घडला असता.
पण असो जर-तरला इतिहासा काही अर्थ उरत नाही....!!
छत्रपती शंभूराजे यांनी सुद्धा विजापूर बाबत असाच प्रयत्न करून पाहिला होता.
बुडण्याच्या मार्गावर असलेल्या विजापूरकरांना संकटकाळात छत्रपती शंभूराजे आधार वाटे.विजापूर विरुद्ध दिलेरखान चालून आला त्यावेळी थोरले स्वामी धाऊन गेले होते.ती गोष्ट स्मरून छत्रपती शंभूराजांनी
सुध्दा भरगोस मदत केली होती.छत्रपती शंभूराजांच्या कार्यकाळात सुद्धा विजापूरची सत्ता ही वजीर सिद्दी मसाऊद आणि मुख्य सरदार सय्यद मख्दुम यांच्या हातात होती.राजा नुसता नामधारी होता.विजापूरकर आणि शंभूराजांनी धूर्त औरंगजेबाचा कावा ओळखला होता.शंभूराजांनी मुगलांच्या आक्रमणाला उत्तर देण्यासाठी जबर प्रतीचढाई केली.त्यामुळे काही काळ
कहोइन औरंगजेबाला विजापूरवर लक्ष केंद्रित करावं लागल.आपल्या परीनं विजापूरकर औरंगजेबाच्या
राजकारणाला कलाटणी देण्याचा प्रयत्न करीत होते.
एकीकडे मैत्रीचा आव आणून तह करण्यासाठी आदिलशहानं यादगार अली या वकिलास औरंगजेबा-
कडे पाठवले.तर दुसरीकडे शंभूराजे यांच्या कडून मदत
मिळविव्याची खटपट केली.
विजापूरकरांचे हे दुटप्पी धोरण औरंगजेबाच्या लक्षात आले.औरंगनं वकील यादगार अलीची भेट नाकारली.
आदिलशहानं पाठविलेला हत्ती व एक अंगठीची पेशकश
औरंगजेबानं मान्य न करता परत पाठवली.साम आणि दंड या दोन नितींचा विजापूरकर दाद देत नाहीत हे धूर्त
औरंगजेबाच्या लक्षात आले.त्यांनी मग दाम आणि भेद या नीतीचा अवलंब करण्याचे ठरवले.औरंगजेबानं मुख्य वजीर सिद्दी मसाऊद आणि सय्यद मख्दुम सर्जाखान या जोडीला गळाला लावण्याचा प्रयत्न मोठ्या नेटानं चालवला.रक्ताचा एक थेंबही न सांडता त्याला आदिलशाही घशात घालायची होती.युद्धनीती न अवलंबता पोलादी पडद्याआड तो विजापूरकरांविरुद्ध
राजकारणी डावपेच खेळत होता.
औरंगजेबाच्या योजनेनुसार शहजादा आज्जमनं सिद्दी आणि सर्जाखान यांच्याशी वाटाघाटी सुरू केल्या होत्या.
सर्जाखानानं मुघलांची चाकरी पत्करावी अशी अट शहाजाद्यानं विजापूरकरांना घातली.खर्चासाठी मुघलांनी
विजापूरकरांना मदत करावी अशी अट सिद्दी मसाऊद आणि सर्जाखानानं आज्जमला कळविली.तसेच वाटाघाटींचा घोळ या जोडीने मुदामून लाबवत ठेवला.
त्यांनी औरंगजेबाला उत्तर देण्यात जानेवारी ते एप्रिल १६८३इतका वेळ लावला.
औरंगजेबाला झुलवत ठेऊन सिद्दी आणि सर्जाखानानं
यशवंतराव नावाच्या सरदारा मार्फत छत्रपती शंभूराजे यांच्या बरोबर अंत:स्थपणे मित्रत्वाच्या वाटाघाटी सुरू केल्या.यशवंतराव हा मराठा असून सिद्दी मसाऊदच्या खास विश्वासातला होता.त्याचे आणि शंभूराजांचे संबंध ही चांगले होते.पण हा यशवंतराव नेमका कोण होता हे समजत नाही.यशवंतरावनं मियानजी नावाच्या आपल्या हस्तका करवी शंभुराजांबरोबर बोलणी चालू केली.
शंभूराजांनी सुद्धा प्रतिसाद देत आपला एक हस्तक विजापुरी पाठवला आणि बोलणी सुरू केली.यशवंतराव
आणि मियानजी या वकिलानी शंभुराजांना निरोप पाठवला की " तुम्ही स्वतः लक्ष घातल्यावाचून विजापूरचा
कार्यभाग घडून येणार नाही "
छत्रपती शंभुराजांना बरोबर चाललेली गुप्त चर्चेची कुणकुण आणि सिद्दी मसाऊद व सर्जाखान यांचा
वेळेकडूपणा आज्जमच्या लक्षात आला.त्यामुळे त्याने
मुस्तफा काशी नावाच्या अफगाण सरदाराला धाडून दीर्घकाळ चाललेल्या चर्चेचा आणि वाटाघाटींचा सोक्षमोक्ष लावण्याचे ठरविले.त्याचे मसाऊद याच्याशी
विजापूरच्या किल्ल्यात गुप्त खलबत झाले.मियानजीनं
या भेटीच्यावेळी मध्यस्थ म्हणून काम केले.दोघांनी शाब्दिक पेच टाकून एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न केला.सिद्दी आपल्याला बघत नाही असे दिसताच मुस्तफानं त्याला उघड उघड धमकी देण्यास सुरवात केली.
याच सुमारास शंभूराजांनी विजपुरकरांचा एक किल्ला
(विजापूरचा ?) हस्तगत करण्याचा मोठा मनसुबा आखला होता.हा कट शंभूराजांनी अगदी योजनाबद्ध तयार केला होता.पण या कटात मियानजी सहभागी आहे असा संशय मुस्तफा काशी यास आला.त्यामुळेच मुघल-
विजापूरकर वाटाघाटी फिसकटत असून तोच विजापूरकर आणि शंभूराजांचे संबंध जुळवीत आहे असा संशय मुस्तफा काशीला येतच होता.त्यामुळे मियानजीची धरपकड करण्याचा मोगलांनी निश्चय केला.किल्ल्याच्या
बदल्यात एक गाव देतो असे सांगून मियानजीच्या नोकरानं किल्लेदाराच्या जनान्यावरील प्रमुखाला वश करून घेतला.
किल्लेदाराशी बोलणी करण्याच्या निमित्तानं जाऊन त्याला ठार करायचे आणि किल्ला ताब्यात घेऊन तो
शंभूराजांच्या हवाली करायचा असा कट रचण्यात आला होता.आणि हे कारस्थान यशस्वी करण्या कामी
शंभूराजांनी पाठवलेले आपल्या खास ठेवणीतील ६० कडवे मावळे हे आधीच किल्ल्यात दडून बसले होते.
पण नियतीला हे मजूर नसावे.किल्लेदारास या कटाचा सुगावा लागला.त्यानं या सर्व मावळ्यांची धरपकड करून त्यांची कत्तल केली.ही बातमी समजताच शंभूराजे कष्टी झाली.दुःख त्यांना किल्ला हस्तगत झाला नाही याचं नव्हतं.तर आपल्या तोलामोलाची साठ मावळे या कामी
बळी गेले याच होतं.
सिद्दी मसाऊदनं ज्यावेळी यशवंतरावामार्फत शंभुराजांकडे मदत मागितली त्यावेळी शंभूराजांना मुघल-विजापूरकर यांच्या वाटाघाटीं सुगावा लागला असावा.परस्पर मुघलांना शरण जाऊन विजापूरकर किल्ला त्यांच्या स्वाधीन करतील अशी शंका येऊन शंभूराजांनी तो शत्रूच्या हाती पडण्यापूर्वीच हस्तगत करावा या उद्देशाने वकील मियानजी मार्फत हा कट केला असावा.
हा किल्ला कोणता हे जरी समजू शकल नाही.तरी च्या अर्थी शंभूराजांनी इतकं योजनाबद्ध हा कट आखला होता
त्यामुळे हा विजापूरचाच किल्ला असावा.सिद्दी मसाऊद
आणि सर्जाखान हे मराठे आणि मुघल यांच्याशी संबंध ठेऊन स्वार्थ साधत होते हे गोष्टी शंभूराजांच्या ही लक्षात आली असावी.औरंगजेब व सिद्दी आणि सर्जाखान यांच्या शहाला काटशह देण्याचे अगदी मुत्सद्दी धोरण शंभूराजांनी अवलंबिलेले दिसते.विजापूरकरांच्या मैत्रीचे
धोरण ओळखून त्याला प्रतिसाद देत असतानाच त्यांच्या डावपेचाला योग्य उत्तर देण्याची शंभूराजांची वास्तव दृष्टीच या मागे होती असे म्हटले पाहिजे...!!
लेखन समाप्त...!!
।। जय जिजाऊ।।
।। जय शिवराय ।।
।। जय रौद्र शंभू ।।
No comments:
Post a Comment