छत्रपती शंभूराजे...!!
सरनोबत येसाजी कंक
कृष्णाजीं येसाजी कंक
" श्री शंभो : शिवजातस्य मुद्रा द्यौरिव जायते ।
यदंक सेविनो लेखा वर्तते कस्य नोपरी ।। "
पोर्तुगीजांनी वेढ्याचे काम सात-आठ दिवस चालू ठेवूनही काही प्रगती झाली नसल्याने विजरईच्या ध्यानी आले.
विजरईला भरीला घालणारे लोक आता माघारीची भाषा बोलू लागले.दोन-तीन वेळा मराठयांची हत्यारं अंगचटिला चाटून गेल्यामुळे विजरई हादरून गेला होता.
दोन वेळा तो मरणाच्या दारातून सही सलामत सुटला होता.त्यामुळे तो निराश होऊन आपला तंबूत जाऊन बसला.त्याला समाधान फक्त एकाच गोष्टीचं होतं की आपण जिवंत आहोत.पोर्तुगीजांचा प्रत्येक हल्ला मोठ्या निकारानं येसाजीं परतावून लावला होता.अखेरचा हल्ला करावा म्हणून विजरई नेटाने उठला.त्यानं पुन्हा तोफा सुरू करण्याचा हुकूम केला.पण कसलेले गोलंदाज मराठयांच्या हल्ल्यात कामी आले होते.त्यामुळे नवीन गोलंदाज लावले.त्यांना ते काम नीट जमेना.कदी गोळा किल्ल्याच्या थेट आता पडे नाहीतर बाहेर.आता तर येसाजींनी रात्रीची छापेमारी चालू केली.यामुळे पोर्तुगीज पुरते वयतागले.पोर्तुगीजांना हा गनिमी कावा नवीन असल्याने ते गांगरले.
या आठनऊ दिवसांच्या लढाईत सरनोबत येसाजी व त्यांचे पुत्र कृष्णाजीनं शर्तीची तरवार केली.थोरल्या छत्रपती स्वामीं पासून येसाजी सरनोबत होते.लढाईचा मोठा अनुभव होता गाठीशी.उमर झाली होती.पण अजूनही गनिमांनच्या मुडक्यांची रास लावण्याची ताकद होती मनगटात.त्यामुळे तर शंभूराजांनी फोंडयासाठी त्यांची निवड केली होती.पडलेल्या भगदाडात परत
अखेरचा निर्णायक हल्ल्यासाठी विरजरईनं सैन्य तयार केलं.भलताच चेकाळून उठला विजरई.पण झालं भलतच
छत्रपती शंभूराजे सैन्यासह फोंडयाच्या कुमकेसाठी दाखल झाले.त्यामुळे विजरईचे धाबेदणाणले.मोठी पळापळ उठली.विजरईच्या नजरे समोर छत्रपतींनी आपल्या खास एक हजार घोडळाच्या संरक्षणाखाली आपले सहाशे पाऊल लोक किल्ल्यात घातले.त्यांना अडविण्याची हिमत नं विजरईत होती नं त्याच्या सैन्यात
मात्र विजरई हादरला होता.अशा परिस्थिती आपण जर छत्रपतींच्या हाती लागलो तर मराठे आपल्याला नागडे करून मारतील.( ९-११-८३ )
राजे आलेले कळताच खूप दिवसांनी गडाची नौबत धूडधूडली.येसाजीं किल्ल्याचे दार सताड उघडे ठेवले. आपल्यासाठी कुमकेस खासा राजा आलेला बघून येसाजींचा जीव आभाळा येवडा झाला.लढाईच्या गर्दीत
येसाजीं जखमी झाले होते.अंग चोरून लढणार तो सरनोबत मुळीच नव्हता.सर्वांच्या आधी आपली समशेर पेलून गनिमावरी तुटून पडणार तो वीर होता.जखमा जरा खोल असल्यातरीही ते किल्ल्याचा आतील घेरा सांभाळून होते.तशाही परिस्थिती येसाजींन शंभूराजांच स्वागत केलं.राजे आल्यामुळे मावळ्यांमध्ये नवसंजीवनी आली.मावळ्यांनी माऱ्याचा वेग दुप्पट केला.या मुळे विजरईनं ताबडतोब विचारविनिमय करून माघारी घेण्याचे ठरवले.त्याला हे माहीत होतं की हीच वेळ आहे
माघारीची नाहीतर मराठे आपल्या आपले थडगे हितच
फोंडयाच्या परिसरात बांधायला लावतील.
विजरईनं जसा माघारीचा हुकूम दिला तसे पोर्तुगीजसैन्य
आनंदाच्या भरात पळत सुटले.छत्रपतींनी तात्काळ कृष्णाजीच्या दीमतीस पाचशे स्वार-शिपाई देऊन त्यांचा फडशा पाडण्याचा हुकूम केला.मराठे जसे किल्ल्यातून बाहेर पडले तशी घनघोर लढाईला प्रारंभ झाला. पोर्तुगीजांची पळापळ उठली.मराठयांच्या बंदुका आग ओकू लागल्या.पोर्तुगीज सैनिक ही गोळागोळी करू लागले.मराठयांनी पाठीला लावलेल्या ढाली काडून
आपल्या बचावासाठी समोर धरल्या आणि पोर्तुगीजांना
नदीपर्यंत रेटत आणले.कृष्णाजीची तलवार मात्र तळपत होती.एक-दोन गोळ्या लागूनही त्यांची घोड्यावरची मांड अजूनही पक्की होती.त्यांची घारी नजर विजरईच्या शोदात होती.आपला भाला त्या विजरईच्या छाताडाच्या आरपार केल्याशिवाय कृष्णाजीं स्वस्त बसणार नव्हते.
नदीच्या काठी विजरई नदी पार करण्याच्या नादात होता.
कृष्णाजींनी आपला घोडा थेट विजरईच्या अंगावर घातला.बाजूला असलेल्या चार-पाच पोर्तुगीज सैनिकांनी थेट कृष्णाजीवर निशाणा धरून गोळ्या झाडल्या.गोळ्या वरमी लागल्यानं कृष्णाजींची शुद्ध हरपू लागली.त्यावेळी मराठ्यांची पाच-पणास घोडी कृष्णाजीच्या मदतीला आली.
आता दिवस मावळा होता.हत्यारांची खणाखणी थांबली
होती.कृष्णाजींना मावळ्यांनी उचलून किल्ल्यात आणलं. कृष्णाजींचा रक्ताळलेला देह बघून शंभूराजांचे डोळे भरून आले.त्या विराच्या देहावर आता कुठे जखमांना जागा उरली नव्हती.आधीच येसाजीही जखमी होते.त्यात कृष्णाजींही जबर जखमी झाले.कृष्णाजींपाशी बसून राजांनी त्यांना धीर दिला.येसाजींच्या व कृष्णाजींनं
सांडलेल्या इमानी रक्ता मुळे फोंडा आणि परिसर पावन झाला होता.छत्रपतींनी जवळ असलेल्या मावळ्यांना येसाजी व कृष्णाजींना तात्काळ पालखी घालून भुतोंडे या त्यांच्या गावी पोहोविण्याची आज्ञा केली.रात्र झाली होती.मावळे मिळालेली लुट किल्ल्यात घेत होते.तीनशे पोती भात.आणि दोनशे खेचरावर राहील एवढे समान माघे ठेऊन पोर्तुगीजांनी पळ काढला होता.
( १०- ११- ८३ )
कंक पिता-पुत्राची आठवण आपल्या हृदयात ठेऊन शंभूराजे स्वतःच किल्ला लढविण्यास सिद्ध झाले.दिवस फुटीला मराठयांनी पोर्तुगीजांनवर हत्याराची धार धरली.
पोर्तुगीज नदी पार करून आपल्या हद्दीत जाण्याच्या तयारीत होते.वाटेवर मराठ्यांच्या ताब्यात असलेली एक टेकडी होती.मराठ्यांनी शे-दोनशे हशम टेकडी माघे लपवून ठेवले आणि पाचपणास मावळ्यांनी टेकडीला
वळसा घालून पोर्तुगीजांवर चाल केली.घटकाभरात त्यांनी माघार घेतली अनं टेकडीकडे पळत सुटले.पोर्तुगीज ही पळणाऱ्या मराठयांच्या माघे लागले.त्यात भर म्हणजे विजरईनं उरलासुरली कुमकही दॉम रॉद्रिगो द कॉस्ताच्या ताब्यात देऊन घोडदळ ही त्यांच्या माघे लावले.मराठे टपूनच होते.पोर्तुगीज माथ्या जवळ येताच मराठयांनी
हर हर महादेवच्या जयघोषात पोर्तुगीजांवर चाल केली.
मराठ्यांच्या बंदुका कडाडूलागल्या.त्याच बरोबर घोडदळ ही पुढे सरसावले.धापा टाकत टेकडी चढून आलेल्या पोर्तुगीजांवर पुन्हा खाली पळण्याची वेळ आली. मराठ्यांच्या तलवारी बेजरब चालू लागल्या.पोर्तुगीजांच्या गोळीबारा पासून बचावासाठी मराठयांनी आपल्या ढाली समोर धरल्या.नुसत्या घोड्यांच्या टापा खाली बरेच पोर्तुगीज कामी आले.मराठयांचा प्रताप बघून विजरईला
घाम फुटला.मराठयांनी लढाई झपाट्याने टेकडीच्या पायत्याला आणली.कारण त्यांना विजरईला घेरायचे होते.एका शिलेदारांन घोड्यावरून आपला भाला इतक्या जोरात विजरईला टिपण्यासाठी फेकला पण विजरई वाचला.त्याचा कोट फाटून पोटाची बगल धरून भाला पार झाला.विजरईचं नशीब थोर.की त्यावेळी पन्नास-साठ
मुसलमानी बंदुकी दस्ता पोर्तुगीजांच्या मदतीला धावला.
नाही तर फिरंगी बियाला सुद्धा शिलक राहत नव्हते.
या बंदुकधारी मुस्लिमांना माघे रेठण्याच्या नादात पोर्तुगीजांनी नदीत उड्या टाकल्या आणि पळ काढला.
बंदुकधाऱ्यांचा फडशा पाडून मराठे नदी तीरी आले पण तोपर्यंत विजरई निसटला होता.या चकमकीत
मानू-यल-द-सिल्व्हा आणि दोनशे वीस पोर्तुगीज सैनिकांचे मराठयांनी मुडदे पाडले.
१२-११-८३ रोजी ८ वाजण्याच्या सुमारास पोर्तुगीज सैन्य दुर्भाट सोडून खालमाणेंन गोव्यात परतले.विजरई कोंदि
द आल्व्होरनं छत्रपती शंभूराजांचा इतका धसका घेतला की जुन्या गोव्यातील बों जेजूस या चर्चशेजारील मठात जाऊन राहिला.पण छत्रपती या बांडगुळ पोर्तुगीजांना कुटं सुखासुखी सोडणार होते.अजून मराठयांची हत्यारी चाल गोवा परिसरात होण्यास बाकी होती.सगळं शांत झाल्यावर शंभूराजांनी फोंडयाची पाहणी केली.पडलेलं भगदाड पाहता छत्रपतींच्या सहज मनात आलं की
" आपल्या आबासाहेबांनी किती अंगमेहनत करून
हा गड फत्ते केला.उणेपूरे तीन महिने खर्ची घालून गड हस्तगत केला.बहुदा पुन्हा जर फिरंग्यांनी चाल केली तर गड हातचा गमावून बसू.." या विचाराने छत्रपतींनी गड पाडून जवळच्या असलेल्या एका टेकडीवर नवीन गड बांधण्याचा आदेश दिला आणि त्याचे नाव " मर्दनगड "
असे ठेवले.
इकडे जखमा न सुकल्यामुळे कृष्णाजी सूर्य मंडळ भेदून गेले.स्वराज्यावर शोककळा पसरली.छत्रपती कष्टी झाले.मोतीकंनट्यातील अजून एक मोती पडला.वय झालेल्या बापा अगोदरच लेक गेला.येसाजींवर तर डोगर कोसळला.छत्रपतींनी येसाजींची जातीनं भेट घेऊन सांत्वन केले.कृष्णाजींच्या मुलगा जो कृष्णाजी ( दुसरा) नावाने सुबा चालवावा व चाहुजी कंक यासी कारभारी नेमावे असे ठरले. छत्रपतींनी मर्दुमकी गाजवल्याबद्दल येसाजींना एक हजार होन.आणि स्वामीकार्यावर खर्ची पडल्यामुळे कृष्णाजींना एक हजार होन असे दोघास बक्षीस म्हणून दिले.कृष्णाजीस सुभा देऊन लोकांचा जमाव करण्यासाठी,नेहमी चाकरीत राहावे म्हणून चाहुजी
कंक यासी कारभार चालविण्यास सांगिले.कृष्णाजींच्या सुभ्याची आसामी चालवावी व त्याचा अज्ञानं पालनकर्ता
म्हणून चाहुजीस वार्षिक सहाशे होणं देण्याचे ठरले. त्यातील चारशे होन खासा जातीस व दोनशे होन चाकरी साठी होते.
सुरवातीला पोर्तुगीजांच्या भारीभरकम तोफा आणि तोफगोळ्यामुळे फोंडा तग धरू शकणार नाही अशी किल्ल्यातील अधिकाऱ्यांची समजूत होती.पण मोठी हमरीतुमरीची लढाई होऊन देखिल किल्ला पोर्तुगीजांना
जेर करता आला नाही.स्वामींची फत्ते व्हावी यासाठी किल्ल्यावरील हवालदार,सरनोबत,सबनीस,नाईकवाडी हे फोंडयाच्या पीरास नवस बोलले होते.स्वामींची फत्ते झाल्यावर दि २-१-८४ रोजी छत्रपतींचे लाडके छंदोगामात्य कवी कुलेशांनी यांनी धर्माजी नागनाथ
यांना खास पत्र पाठवून पिरास दर वर्षी पन्नास होन उदफुल व दिवाबत्ती साठी म्हणून पाठवले....!!
आहे तितुके जतन करावे । पुढे आणीक मेळवावे ।
मऱ्हाष्ट्रराज्य चि करावे । जिकडे तिकडे ।।
लेखन समाप्त.
इंद्रजीत खोरे
प्रस्तुत लेखन सेवा छत्रपती शंभूराजे यांच्या चरणी अर्पण.
No comments:
Post a Comment