गेल्या आठवडाभर औरंगजेब पातशाहाला झोप येत नव्हती.पातशाही छावणीतले मुल्ला-मौलवि सुद्धा या प्रश्नानं वयतागले होते.त्याला कारण ही तसंच होते. पातशाहाला एक मराठा भलाईत आपल्या छाताडावर येऊन उभा आहे.तो आपला भाला पेलून आपल्याला भोकसन्याच्या तयारीत आहे आशा प्रकारचे स्वप्न पडत होता.गंडे-दोरे झाले.कोंबडा उतरून झाला.शेवटी शेवटी तर पातशाहा वरून उतरवलेला कोंबडा मुल्ला-मौलविच गपचूप खाऊ लागले.पण स्वप्नांची मालिका काय थांबली नाही.सगळे हवालदिल झाले.बड्या बड्या सरदारांना तर पातशाह या स्वप्नांच्या नादात खुदाला प्यारा होऊ नये म्हणजे झालं असच वाटू लागलं.आणि याचं दरम्यान संताजी घोरपड्यांच्या गोटातला खास नजरबाज बीऱ्या आपल्या दोन-तीन साथीदारांन बरोबर मुघली छावणीत शिरला.सगळी छावणी नजरे खाली घातली.पहारे कुटं आणि किती हशम आहेत.आत येण्याच्या किती वाटा आणि बाहेर जाण्याच्या किती.गुलालबार म्हणजेच औरंगजेबाचा मुख्यतंबू भोवती किती हशमांचा आणि कसा पहारा आहे.त्यांच्या पाळ्या कोणत्या वेळी बदलतात.छावणीत लढाऊ आसामी आणि बुणघे किती बिनघोर बाहेर पडण्यासाठी वाट कोणती.ही सगळी माहिती गोळा करून बीऱ्या दहा-बारा दिवसांनी पन्हाळागडी आपल्या धन्या समोर हजर झाला.
सगळ्या माहितीचा बीऱ्यानं एक बारीक नकाशा तयार करून घेतला होता.फेरफटक्यासाठी म्हणून संताजीराव आणि बीऱ्या वाघ दरवाजा पार करून गड उतार झाले.
सगळी माहिती गुप्त ठेवायची होती म्हणून का खटाटोप होता.बीऱ्याला तरी कुट माहीत होते की आपल्या धन्याच्या डोसक्यात काय इचार हाय त्यो.गड उताराच्या वाटेवर एका वळणावर संताजींनी झाडाची सावली बघून
बयटक मारली.बीऱ्यानं कमरदाबात खवलेला नकाशा बाहेर काढला आणि चवड्यावर बसला.सगळी हकीकत आणि माहिती बीऱ्यानं हळुवार आपल्या धन्याच्या कानी घातली.सगळं डोक्यात शिरताच संताजींच्या कानपाळ्या
रस रसून उठल्या.दूरवर नजर फेकत संताजींनी सगळा बेत आपल्या डोक्यात खेळून बघीतला.यश नक्कीच होतं
आणि ते पदरात घालणारा जोतिबा थोर होता.
दिवस मावळतीकडे झुकला.दिवे लागणीची वेळ झाली होती.त्यात राजाराम महाराज गडावर मुक्कामी होते.त्यामुळे संताजी विचारांच्या तंद्रीत उठले आणि बीऱ्या सोबत पुन्हा गडदाखल झाले.पण बीऱ्यानं सांगितलेली खबर डोक्यात पिंगा घालत होती.
एक डाव औरंगजेबाला आपल्या हत्याराचे पाणी पाजू ही त्यांची खूप दिवसांची इच्छा होती.आता अडचण एकाच गोष्टी होती.ती म्हणजे राजाराम महाराज म्हणजेच आपल्या धन्याची परवानगी.ती मिळाली तर आपण खुद्द जातीनं पातशाहाच्या गुलालबारवरती मारत्या समशेरीचा दाबजोर हल्ला करून त्याची गर्धन मारून धन्या समोर पेश करू.या विचारांच्या नादात संताजीराव राजाराम महाराजांच्या दालना समोर आले.खासगीतल्या कारभाऱ्यास महाराजांना भेटण्याची अर्जी केली.कारभारी परत येताच संताजींना आता बोलावल्याच सगीतलं.
मुजरा करून संताजीराव राजाराम महाराजांन समोर पेश झाले.रात्रीच का येणं केलं असावं या विचारात महाराजांनी संताजींना हटकल " काय संताजीराव का येणं केलं.काही अडचण..? कोणती खबर..? संताजीराव उतरले " नाही तस नव्हव.एक अर्जी होती आपण म्हणल्यास पेश करतो..!! महाराज.बोला की..!! आवंडा
गिळत अगदी हाळू आवाजात संताजी महाराजांना औरंगजेबाच्या खास गोटावरच हल्ला करण्याचा भेत सांगू लागले.तो सगळा करीना आयकताच महाराज हादरले.
महाराज जवळ जवळ संताजींनवर भडकले.काय वेडबीड लागलं आहे का तुम्हाला.चार-पाच लाखांच्या गर्दीत तो औरंग अगदी मदोमद बसला असता तुमच्या डोक्यात हा विचारच कसा आला.काय म्हणावं या वेढाला.आपल्या शिवबंदीची मोजदात केली तर खचून तीस-चाळीस हजारच्या वरती जात नाही आणि तुम्ही तर थेट मुघली छावणीवरच हल्ला करण्याच सांगत आहात.
जरा सबुरीच्या स्वरात संताजीराव महाराजांना सांगू लागले.की सगळी शिवबंदीची गरज नाही.आपल्या गोटातले खास निवडक तीन हजार हशम फक्त काफी होतील.संताजींच्या हट्टा पुढं महाराजांना हसावं की रडावं हेच कळत नव्हतं.संताजीरावांच्या मनगटाच्या ताकदीचा आणि कुशल रणनीतीचा महाराजांना पूर्ण दिलभरोसा होता.पण हकनाक संताजींन सारखा तोलामोलाचा लढाऊ आसामी महाराज खर्ची घालण्यास तयार नव्हते.
पण संताजीराव हटायला तयार नव्हते.त्यांना काही करून महाराजांचा होकार हवा होता.महाराजही विचार करत होते की नजाणो संताजीराव म्हणत्यात तस जर झालं तर मात्र राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळेल.
सगळा राजकीय पट आपसूक आपल्या म्हणजेच समस्त मराठा मंडळाच्या ताब्यात येईल.या सर्व शक्यतांचा सगळ्या बाजूंनी विचार करून त्यांनी होकार दिला.परवानगी देताच महाराजांनी आपल्या गळ्यातील मोती कंटा काढून तो संताजींच्या गळ्यात घातला.आई जगदंबा यश देणारी थोर आहे पण तुम्ही जपून असा.संताजींनी मुजरा केला आणि निघाले.
महाराजांनी पुन्हा त्यांना थांबवलं आणि म्हणाले.
" संताजीराव काळ मोठा कटीन आहे.अशा बाक्या प्रसंगी तुम्हा सारखा आसामी दुरावनं आम्हाला परवडणारे नाही
तुमच्या येण्या कडे आम्ही नजर लावून आहोत याच भान असुध्या.औरंग मोठ्या खुर कानाचा त्यामुळे थोडी गुप्तता पाळा.ही मोहीम फक्त तुम्हा आम्हाला ठाऊक येवड करा.
या..!! जय भवानी...!! भरल्या डोळ्यांनी संताजीरावांनी महाराजांचा निरोप घेतला.रिवाज नसतानाही पन्हाळ- गडाचे दार रात्रीच्या समई उघडले गेले.संताजी,बहिर्जी
मालोजी घोरपडे इतर सरदार आणि त्यांना साथ देणारा जाणकुर्बान दोन हजार मावळा आपल्या घोड्यावरची मांड पक्की करून तीन दरवाजा उतरू लागला.
विशाळगड येताच धनाजी जाधवांच्या गोटातील अजून एक हजार घोडा संताजींच्या दीमतीस आला.सर्व सरदार आणि मावळे गुमान राहून संताजींच्या मागे आपला घोडा दामटीत होते.कारण कुणालाच या हल्ल्याची आणि तो पण पातशाही छावणीवर करण्याचा नियोजन केले आहे याची कल्पना नव्हती.तीन हजाराचा तळ पुरंदर किल्ल्याच्या थोडा दूर मावळतीकडे पडला होता. संताजींनी ताबडतोप सिंहगडचे किल्लेदार जे सरनोबत प्रतापरावजी गुजर यांचे सुपुत्र सिधोजी गुजर यांना भेटण्याचा मनसुभा व्यक करून त्यांना छावणीत येण्याची विनंती केली.खलिता हाती पडताच सिधोजींनी छावणी जवळ केली.उर भेट घेत दोघांनीही खुशालीची विचारपूस केली.रात्री जेवण उरकताच संताजींनी एकांतात विषयास हात घातला.राव एक जोखमीचा बडा मानसुभा मनी ठेऊन आम्ही या इलाख्यात उतरलो आहोत.आम्हाला तुमची कुमक हवी आहे.काय संताजीराव अव्ह हे काय बोलणं झालं व्हय..!!आम्ही अनं तुम्ही दोघ ही स्वराज्याचे सेवक कुमक तुम्हाला नाही ध्याची तर मग कुणाला देयची.आपल्या मांडीवर थाप मारत संताजीराव खुश झाले. पुढचा बेत खुला करत संताजीरावांनी आपण पातशाही छावणीवर आणि ते पण खासा पातशाहा वर हल्ला करणार असल्याच सगीतलं.जगदंबेची इच्छा असेल तर त्याची गर्धन मारून महाराजांना पेश करण्याचा मनसुभा त्यांनी बोलून दाखवला.
सिंहगडी सिधोजींच्या हाती पाचशेंचा जमाव होता. त्यातील तीनशेचा जमाव आणि हजार भर घोडदळ असा
सराजम सिधोजींच्या दीमतीस देऊन त्यांना पुण्याच्या बाहेर मुळा-मुटा तीरी म्हणजे जीतून नदीला उतार मिळतो
अशा कुबल ठिकाणी त्यांना दबा धरून बसायचे होते.
कारण पातशाही छावणीवर हल्ला करून संताजी हे झपाट्याने सिंहगड जवळ करणार होते.समजा मुघल पाठिशी पडले तर त्यांना थोपवण्यासाठी ही ताज्या दमाची कुमक असावी म्हणून सिधोजींना ही जबाबदारी देण्यात आली होती.आतापर्यंत फक्त राजराम महाराज
संताजी घोरपडे आणि सिधोजी गुजर यांनाच फक्त या
हल्ल्या बाबत माहिती होती.आठवडा लोटला होता छावणी करून इतर जे प्रमुख सरदार मंडळी होती त्यांनाही समजेना की आपण हींतं छावणी करून का आहोत.आता त्यांना समजून सांगण्याची वेळ होती.मालोजी घोरपडे,विठोजी चव्हाण,रखमाजी मोहिते आणि इतर दोघा-तिघांना संताजींनी आपल्या बीचव्यात बोलावलं बीऱ्यानं तयार केलेला नकाशा समोर होता. सर्वांना या हल्ल्याबाबत सांगण्यात आलं.असा भयंकर हल्ला आणि तोही पातशाही छावणीवर म्हणजे मरणच. या नुसत्या विचारानेच सर्वजण मनी हादरून गेले.पण संताजीरावांच्या हुकमी डावपेचावर आणि काटेकोर नियोजनावर त्यांचा पूर्ण भरोसा होता.
संताजीरावांनी सर्वांना नकाशा नीट समजून सांगितला. आपापल्या कमगिऱ्या नेमून दिल्या.दोन हजारच्या चार तुकड्या करण्यात आल्या.पहिल्या बिनीच्या तुकडीची
जबाबदारी त्यांनी मालोजी घोरपड्यांकडे दिली.दुसरी तुकडी त्यांनी स्वतः कडे ठेवली.तिसरीचे नेतृत्व विठोजी चव्हाणा कडे दिले आणि चवतीचे रखमाजी मोहित्याकडे
तुळापुराच्या धावणीची वाट आधीच बीऱ्यानं हेरून ठेवली होती.पुरंदर वरून तुळापूर हे अंदाजे पासस्ट ते सत्तर कि.मी हे अंतर होते.आणि तुळापूर ते सिंहगड हे अंतर
अंदाजे सत्तर ते ऐंशी कि.मी इतकं होतं.म्हणजे पुरंदर हुन निघायचं तुळापूरात पोहचून हल्ला करायचा आणि त्याच जलद गतीनं सिंहगड गटायचा.श्रावण सरींचा खेळ अखंड चालूच होता.शुक्रवारच्या संध्याकाळी दिवस मावळतीला दोन हजार घोडा पुरंदरावरून झेपावला.दिवे घाट उतरून फुरसुंगी गाव डाव्या बाजूला आणि लोणीकंद उजव्या बगलेला ठेवून घोडी रात्रीच्या पहिल्या प्रहरी वाघोली गावच्या शिवारात शिरली.थोडं पुढे जाताच
इंद्रायणी नदी लागली.तिच्या काटा काटानं घोडी जरा धीम्या गतीनं सरकू लागली.कारण गस्तीच्या पथकांना चुकवायचं होतं.गस्ती पथक निघून गेल्याचे समजताच घोडदळानं तुफान वेग पकडला.आता मालोजींची बिनीची तुकडी पुढे आली.तीचं मुख्यकाम म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या तुकडीला औरंग पातशाहाच्या मुख्यतंबू पाशी बिनदिक्कत आणून सोडणे.आणि चवथी तुकडी ही छावणी भर हुलढ माजवून जाळपोळ करणार होती.
छावणी नजर टप्प्यात येताच दोन हजार मराठा तलवारी सर्रकन बाहेर पडल्या.छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना स्मृन घोडदळ पुढे सरसावले.बिनीच्या तुकडीनं आपला हात सईल सोडला.
छावणीत शिरताच पाच-पन्नास पहारेकऱ्यांना डोळ्याचं पाथ लवण्याच्या आता गारद करण्यात आलं.आणि मुख्य
तंबु कडे चाल केली.गुलालबारच्या स्वरक्षणार्थ हजार-दीड हजार मुघली हशम होते.पाच पन्नास तोफा कायम सज्ज होत्या.त्यावर शंभर-एक गोलंदाज तयनात होते.
पण मराठ्यांचा जोर इतका भयानक होता की या सर्वांना सावरण्याची फुरसतच मिळाली नाही.बघत बघत दंगलीनं
रौद्र रूप धारण केले.दुसरी तुकडी पोहचताच संताजी आणि बहिर्जी घोरपड्यांनी घोड्यावरून खाली उडी मारली.त्यात दोनशे मावळे ही खाली उतरले.आतामात्र
कापाकापीला उत आला.मुघली मुडक्यांची रास पडू लागली.तोफखाना पूर्णपणे गारद करण्यात आला.
चवत्या तुकडीनं जाळपोळ करण्यास सुरवात केली. यामुळे छावणी भर गोंधळ निर्माण झाला.पळापळ उठली
यात पळणाऱ्या लढाऊ मुघली हशमांना मराठे टिपत होते.कुनाला कुणाचा मेळ राहीला नव्हता.म्हणजे छावणीत नेमकं काय चाललं आहे हेच कुणाला कळेना.त्यात जितें दारूगोळा कोटार होते तिथं एका मावल्यानं आपल्या हातातील मशाल भिरकावून दिली.काही क्षणात कांटाळ्या बसणारे स्फोट होऊ लागले
छावणीत आता आगीचे साम्राज्य पसरले होतं.जनावरांना
निवाऱ्या साठी जी छपरे बांधली होती तीही पेटली. त्यामुळे घोडे,उंट,गाई-गुरे सोडून ध्यावी लागली.ती छावणीच्या अंतर्गत रस्त्यावर आल्यामुळे एकच खळबळ उडाली.इकडे संताजी,बहिर्जी औरंगजेबाच्या तंबूत शिरले
मुघली रक्ताची रंगपंचमी खेळून लालेलाल झालेले संताजीराव हे जणू रणमार्तंडा सारखे दिसत होते.
त्यांना बघताच खोजे,सेवक ओरडत पळू लागले.त्यांची भेदक नजर औरंग पातशाहाला शोधत होती.चार-पाच
दालनं पालती घातली पण पातशाहा काय सापडत नव्हता.इकडं बाहेर आता चवथी तुकडी तिन्ही तुकड्यांना सामील झाली.मराठ्यांनी औरंग पातशाहाच्या गुलाबारला टाकलेला वेढा मुघली सैन्याला फोडता येईना.मुघलांनी जीवाची बाजी लावून वेढा फोडण्याचा प्रयत्न चालवला होता.पण मराठे ही हट्टाला पेटले होते.तुफानी मारामारी जुंपली होती पण मराठे मुघलांना इंच भर ही पुढे सरकून देत नव्हते.आणि संताजीराव,बहिर्जी व मावळे पातशाहाचा शोध घेत होते.जणांनी दालनात शिरलेल्या मावळ्यांनी काही खोज्यांना व बेगमांना थेट चोप दिला
तसा आतील कालवा वाढला.येवडा मोठा दुनियेचा पातशाहा पण मराठयांच्या भीतीमुळे त्याला आपल्या जनानखान्यात आपल्या बायकांच्या गराड्यात लपून बसावं लागलं.मराठ्यांनी मुघली स्त्रियांवर हत्यार धरले नाही हेच नशीब.नाहीतर औरंगजेबा सकट बऱ्याच घरातील पुरुषांवर पुन्हा निकाह लावण्याची वेळ आली असती.मात्र मराठ्यांनी जर थेट कत्तल उडवली असती तर मग पातशाहा ही सापडला असता.औरंगजेब नावाच्या
ग्रंथाची तिथंच समाप्ती झाली असती.पण ह्या झाल्या
जर-तर च्या गोष्टी.
आता छावणी काहीशी भानावर आली होती.थोडी सावरासावर झाली होती.बाहेरील मुघली सैन्याची गर्दी वाढू लागली तसा विठोजी आत धावला.बराच शोध घेऊन देखील पातशाहा सापडला नाही.विठोजीनी बाहेरील परिस्थिती संताजींच्या कानी घातली.आता जास्त वेळ थांबण्यात अर्थ नव्हता.नाहीतर सगळेच गारद होण्यास वेळ लागला नसता.हे ध्यानी घेऊन संताजीसह सगळे बाहेर पडले.बाहेर येताच संताजींनी तंबुचे तानावे तोडण्याचा आदेश दिला.तानावे तोडताच एका झटक्यात
तंबू जमीन दोस्त झाला.बहिर्जीनी त्या वरील सोन्याचे कळस तलवारीच्या फटक्या सरशी बाजूला केले.एका मावळ्यानी ते संताजींना आणून दिले.आता पहाट झाली होती.आपल्या घोड्यावर मांड जमवून बसताच संताजींनी नरड्याची घाटी फुलवून हर हर महादेवचा जय घोष केला.तोच जय घोष सर्व मावळ्यांनी उचलून धरला.
आता मराठा घोडदळ वेगानं बाहेर पडू लागले.थोडा गोधळ होताच.त्याचा फायदा घेत मराठयांनी आपली घोडी बाहेर काढली आणि वेगाने इंद्रायणी पार करून हुल म्हणून आळंदीची दिशा धरली.दिवस फुटीला पुन्हा घोड्यांची तोंडं पुण्याच्या दिशेला करून भरगोस वेग पकडला.मुळा-मुटा तीरी जिथं सिधोजी आपल्या जमावानिशी होते तिथं त्यांना सावध करून मराठे सिंहगडाच्या दिशेनं सरकले.आता उजाडलं होतं तास-दोन तासांनी सिधोजीं सुद्धा माघार घेतली सिंहगडी परतले.जखमी मावळ्यांची मलम-पट्टी करण्यात आली.
दोन-तीन दिवस गडपायत्याला मुकाम करून संताजीराव रायगड इलाख्यात उतरले.तोपर्यंत मराठ्यांनी औरंग पातशाहाच्या छावणीवरती केलेल्या हल्ल्याची बातमी बारुदा सारकी फुटली.दिल्लीचा आलमगीर औरंगजेब
मराठयांच्या भीतीनं आपल्या जनानखान्यात दडून बसला
औरंगजेबाला हेही कळून चुकलं की आपण कितीही बल्याड आणि ताकदवान असलो तरी मराठयांच्या तलवारीची पाती आपल्या नरड्यापर्यंत पोहचू शकतात.
दिवस वर येऊ लागला तस मराठ्यांनी केलेलं नुकसान
दिसू लागलं.अख्खा तंबु जमीनदोस्त झाला होता. त्यावरील सोन्याचे कळस मराठ्यांनी गायब केले होते.
सोन्याचे होते म्हणून नव्हे.तर मराठ्यांचा आस्करा पातशाहाला दाखण्यासाठी हा भीम पराक्रम केला होता.
दीड-दोन हजार मुडदा तर खासा पातशाहाच्या गुलालबार तंबु भोवती पडला होता.आणि इतर ठिकाणी तर वेगळेच. हल्ल्यामुळे औरंगजेब मनी चरकला होता हाबकून गेला होता.चार-पाच लाखांच्या घेऱ्यात हजार-दोन हजार मराठे यावेत आणि ते ही आपल्या मारण्यासाठी ही कल्पनाच त्याला सहन होत नव्हती.आणि आपलं इतकं मोठं लावालष्कर असून ही सगळे साले निकम्मे हरामी एकही कामाचा नाही याच त्याला दुःख होतं.पातशाहानं ताबडतोब आपल्या हेर खातील प्रमुखास बोलावून घेतले आणि मराठ्यांनी केलेल्या हल्ल्या कामी मराठयांचा प्रमुख सरदार कोण होता याची माहिती काढण्यास सांगितली.ज्याआरती हजार दोन हजार सोबत्यांना घेऊन हा सरदार आपल्या वर चाल करून येत असेल तर नक्कीच हा कसलेला कुशल सेनानी असला पाहिजे. आणि ह्याला आपल्या बाजूने आपण वळवला तर काय बहार येईल.या नुसत्या विचारानेच औरंग पातशाहा सुखावला खरा. पण अस कदीच होणार नव्हतं.
सिंहगडाहुन निघालेले संताजी रायगडाच्या बेचक्यात उतरले.कारण रायगडाला इतिकादखानाचा वेढा पडला होता.खाना कडे भरभक्कम म्हणजे तीस-चाळीस हजाराची फौज होती.त्यामानाने संताजींकडे फार थोडी फौज होती.तरी पण खानाला झटका देण्याच्या इराध्याने मराठे उतरले होते.रात्रीच्या किर अंधारात मराठयांनी चाल केली.मुघली सैन्य हुशार होण्या अगोदरच मराठ्यांनी जोर लावला.दोन-एकशे मावळे सोबत घेऊन संताजींनी थेट
खानाच्या गोटावर हल्ला चढवला.खाना तयार होऊन बाहेर पडेपर्यंत मावळ्यांनी दोन-तीनशे मुघल आडवे पाडून चार-पाच हत्ती साखळदंडातून मुक्त केले आणि पळवले.मुघलांचा कसला वाढू लागल्यानं संताजींनी माघारीचा हुकूम दिला.मराठे कळोक्यात पांगले. मराठ्यांच्या संखेचा अंदाज नं आल्याने खानानं पाठलाग केला नाही.
पाच हत्ती आणि सोन्याचे कळस घेऊन संताजी घोरपडे पन्हाळागडी दाखल झाले.खूप दिवसांनी असा दाबजोर
विजय मिळवला होता.राजराम महाराज तर बेहद खुश झाले होते.महाराजांनी ताबडतोब गडावरील तोफांचा आवाज काढण्याचा हुकूम दिला साऱ्या गडभर साखर वाटण्यात आली.जंगी दरबार भरवून महाराजांनी हर एक मावळ्याला साजेसे बक्षीस दिले.विठोजी चव्हाणाला
" हींमत बहाद्दर " असा किताब तर मालोजी घोरपड्यांना
" अमिरुलमराव " हा किताब. बहिर्जी घोरपड्यांना
" हिदुराव " या किताबानं नावाजण्यात आले.
शेवटी संताजी घोरपड्यांन कडे बघताच महाराजांना मालोजी घोरपड्यांची याद आली.घोरपड्यांच्या घराला साजेशी खेळी घोरपडे बांधुनी करून दाखवली होती.
महाराजांना त्या सर्वांचा सार्थ अभिमान वाटत होता
संताजी समोर येताच महाराज म्हणाले
" मराठ्यांचा अस्करा.मराठयांची हिमत आलमगिर औरंगजेबास दाखवली फार थोर कार्य केलं.धन्या तुमची "
आता संताजी घरोपडे हे नुसते संताजी नव्हते.तर ते आता " ममलकतदार " झाले होते....!!
लेखन समाप्त.
प्रस्तुत लेखन सेवा ही सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या चरणी अर्पण....!!
( इंद्रजीत खोरे )
।। जय जिजाऊ ।।
।। जय शिवराय ।।
।। जय रौद्र शंभू ।।
No comments:
Post a Comment