वसईस जहाज बांधणारे कुशल पोर्तुगीज कारागीर होते. रुय लैतांव व्हीयेगस व त्याचा मुलगा फेर्नाव व्हीयेगस लैतांव या नौशिल्यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांनी आपली पहीली वीस लढाऊ गलबते (Sanguicis) बांधण्यास सुरवात केली. ही जहाजे आपन सिद्ध्याच्या विरोधात बांधत आहोत, असे शिवाजी महाराजांनी जाहीर केले होते. कारण तसे जाहीर केल्या शिवाय पोर्तुगीज त्यांच्या जहाचांना कल्याण भिवंडी खाडीतुन बाहेर पडुन देणे शक्य नव्हते. उपरोक्त पोर्तुगीज नौशिल्यांच्या हाताखाली तीनसेचाळीस कामगार व इतर लोक काम करीत होते. अर्किव्ह इस्कोरिकु ऊल्यामारीनुमध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पोर्तुगीज सिपाई होते असा उल्लेख आहे. म्हणजे याचा अर्थ असा असला पाहिजे कि जहाज बांधणारे तीनसेचाळीस पोर्तुगीज कामगार. पुढे इ.स.१६६८ मध्ये विजरई ने एक जाहीर नामा काढला मोगल अदिलशाहा व शिवाजी यांच्या सैन्यामध्ये नोकरीस असलेल्या पोर्तुगीज लोकांनी मायदेशी परत जावे अशी आज्ञा केली. शिवाजी महाराजांचे आरमार एकदा तयार झाले कि सिद्धींच्या बरोबर त्याचा त्रास आपनास ही होणार या भितीने शिवाजी महाराजांची नोकरी सोडून द्यावी, म्हणून वसई च्या कॅप्टन आॅतोनियु द मेलु कास्त्रु याने प्रयत्न केले. परिणामी ही सर्व लोके शिवाजी महाराजांची नोकरी सोडुन वसई व मुंबई येथे पळून गेली. अशा रितीने इसवी सन १६५७ ते १६५९ च्या दरम्यान शिवाजी महाराजांची वीस जहाजे बांधुन तयार झाली. याच सुमारास सिद्धी, विजानुर व पोर्तुगीज यांच्या ताब्यातील भाग वगळून बाकीचा उत्तर कोकण (कुलाबा जिल्हा) शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला होता. इसवी सन १६६१ ते १६६३ मध्ये विजापुरकरांच्या दाभोळ बंदरावर शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हल्ला केला सुर्व्यांचे श्रुंगारपुर घेतले व राजापूर लुटले. या हल्ल्यामुळे जवळ पास रत्नागिरी चा सर्व समुद्र किनारा शिवाजी महाराजांकडे म्हणजे स्वराज्यात आला होता. अस्या वेळी आरमार वाढविण्याची आवश्यकता तीव्रतेने भासु लागली.
इसवी सन १६६२ च्या मे महीन्यात गोव्याच्या गवर्नर ला दाभोळचा सुभेदार राघो बल्लाळ याने शिवाजी महाराजांची पाच लढाऊ गलबते (Sanguiceis) एक तारु (pataxo) करंजाच्या नदीत अडकून पडली होती, त्यास समुद्रात जाऊन द्यावे असी आज्ञा केली. ह्याच गव्हर्नर एखादा धाडसी इसम पाठवुन गुप्तपणे गलबते जाळुन टाकावीत अशी आपल्या एका अधिकारीयास सुचना केल्याचा उल्लेख आहे. चौलच्या कॅप्टन ने पोर्तुगीजाना लिहिलेल्या पत्रानुसार (ऑगस्ट १६६४) वरच्या चौलमधे शिवाजी महाराज पन्नास तारवे बांधत होते आणि त्यातील सात तारवे बाहेर पडण्याच्या तयारीत होती. " शिवाजी चे वाढते आरमारी सामर्थ्य ध्यानात घेउन शिवाजी च्या तारवांना समुद्रात जाऊन देऊ नये असे धोरण पोर्तुगीजांचे होते." इसवी सन १६६७ च्या अखेरीस शिवाजी महाराजांच्या वाढत्या सामर्थ्याबद्दल विजरई कोंदी द सांव्हिसेंती याने एका पत्रात व्यक्त केलेले मत " शिवाजीचे नौदल ही मला भितीदायक वाटते कारण त्याच्या विरुद्ध आम्ही सुरवातीला कारवाई न केल्यामुळे त्यानी किणार्यावर किल्ले बांधले आणि आज त्या जवळ पुष्कळ तारवे आहेत. पण ही तारवे मोठी नाहीत."
संदर्भ:-
¤ शिवाजी महाराजांचे आरमार:- भा.कृ.आपटे (मराठ्यांचा इतिहास खंड १)
इ.स.१६६४ चौल कॅप्टन पत्र सारांश
इ.स. १६६७ विजरई कांदी द सांव्हीसेंती याच्या पत्रातील उल्लेख
{क्रमश्यः}
No comments:
Post a Comment