!!शिवाजी महाराजांचे आरमार!!
भाग १
शिवाजी महाराजांचे आरमार जर आपण पाहीले तर ते किती बलाढ्य होते याची प्रचिती येते. पोर्तुगीज,इंग्रज, डच, फ्रेंच, फीरंगी हे आरमारी सत्ता असलेली बलाढ्य साम्राज्ये ही शिवरायांनी निर्माण केलेल्या आरमारी सत्तेला भित होते याचे पुरावे त्यांच्याच पत्रात आढळतात. हे लिखान करताना समकालीन पत्रे, सभासद बखर, जेथे शकावली, मराठ्यांचा इतिहास, पोर्तुगीज साधने अस्या साधनांचा आधार घेतला आहे.
शिवरायांनी हिंदवी स्वराज्याच्या आरमाराची बांधणीची पावले ही १६५५ --५६ ला जावळी ताब्यात घेतल्यानंतर उचलली गेली. त्याचे कारण म्हणजे जावळी तसेच राजगड स्वराज्यात आला व स्वराज्याच्या सिमा या समुद्रा पर्यंत जाऊन पोचल्या. त्या मुळे जंजिरे कर सिद्धी हा उपद्रव करु लागला तसेच इतर आरमारी सत्ताधारी ही समुद्र किणारच्या प्रदेशात उपद्रव करीत. तसेच "ज्याचे आरमार त्याचा समुद्र" हे पाहता स्वराज्याचे आरमार असणे हे स्वराज्याच्या हितासाठी व सिमा बळकटी साठी, राज्य बळकटी साठी खुप महत्वाचे होते. जेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याच्या सिमा समुद्राला जाऊन मिळाल्या तेव्हा सिद्धी, टोपीकर (इंग्रज), फिरंगी (पोर्युगीज), वलंदेज (डच), व फरासीस (फ्रेंच) या सागरी सत्तांशी संबंध आला. यातील सिद्धी उर्फ हबशी यांचे मुख्य आरमारी ठाणे जंजिरा बेटावर होते. सिद्धी समुद्रात चाचेगीरी करी आणि कोकण किणार्यावर जाळपोळ, लुटमार, व बाटवा बाटवी करणे हा त्यांचा नित्त्याचा उद्योग होता. हिंदू धर्म बाटवणे, बायका पळवणे, त्याना बाटवणे, त्याना भोगणे हा सिद्ध्यांच्या उद्यागातील एक भाग होता. १६५७ कंल्याण भिवंडी ताब्यात घेऊन राजापूर पर्यंतचा भाग काबीज केला. तेव्हा सिद्धी शी संपर्क- संघर्ष होणे अपरिहार्य होते. (कृष्णाची अनंत सभासद बखर मधील सारांश) "सिद्ध्याच्या लोकांनी राजियांच्या देशास उपद्रव मांडीला. पुढे राजियास राजापुरीचे सिद्धी, घरात जैसा उंदिर तैसा शत्रु यास कैसे तजबिज करावे म्हणून तजबिज पडली. सिद्ध्याचे पारिपत्य करण्याकरीता शिवाजी महाराजांना आरमार उभारण्याची निवड होती.आरमार निर्मिती मुळे इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच या सत्तांना शह बसुन समुद्रात त्यांच्या बरोबरीने सार्वभौमत्व सिद्ध होणार होते. अगदि याच राजकिय कारणाकरीता शिवाजी महाराजांनी समुद्रात आरमार उभारले. 'दर्यास राजियांनी पालाण घातले" रघुनाथ बल्लाळ यांची नेमणूक तळे घोसाळे राजापुरीपावेतो होऊन सर्व दर्याकिणारा मोकळा केला.
इ.स.१६५७ मध्ये कंल्याण भिवंडी घेतल्यावर कल्याण खाडीत सुमुहुर्ताने आपल्या आरमाराची पहीली पठाणे तरकी केली. आरमार बांधणीस सुरवात झाली. पोर्तुगीज दप्तरातील साधनाप्रमाणे शिवाजी महाराजांनी इ.स.१६५९ ला मराठ्यांच्या आरमाराची मुहूर्त मेढ रोवली. त्याचा तपशील असा " अदिलशहा चा बंडखोर सरदार शहाजी याच्या एका मुलाने वसई व चौलकडील प्रदेश काबीज केला असुन तो बलीष्ठ झाला आहे. त्याने काही लढाऊ गलबते भिवंडी, कंल्याण व पनवेल या वसई तालुक्याचे बंदरामध्ये बांधली आहेत. त्यामुळे आम्हाला सावध राहणे भाग झाले आहे. हि गलबते समुद्रात फिरुन न द्यावी म्हणून (पोर्तुगीज) कॅप्टन ला आम्ही आज्ञा केली आहे की, त्याने सदर गलबते बंदरातुन बाहेर येऊन देऊ नयेत."
संदर्भ:-
¤ शिवाजी महाराजांचे आरमार:- भा.कृ.आपटे
मराठ्यांचा इतिहास खंड पहीला
¤ सभासद बखर ¤ पोर्तुगीज साधने
{क्रमश्य:}
No comments:
Post a Comment