इचलकरंजीत मराठेशाहीच्या पाऊलखुणा ……
लेखक ::संजय खूळ
करविरकरांच्या पाच हजार सैनिकांनी इचलकरंजीवर केली अशी चाल
शिरढोण आणि टाकवडे येथे 5 हजार सैनीक
स्वारीचा
मुख्य उद्देश इचलकरंजी संस्थान काबीज करण्याचा होता. निम्मि फौज घेऊन
बुवासाहेब महाराज इचलकरंजी इकडे आले.निम्मी फौज आजाऱ्याकडे रवाना झाली.
आजऱ्याकडे गेलेल्या फौजेने मतिवडे, अर्जुनी, शिपूर, मडिलगे, खेड, भादवण,
या गावात लुटालूट केली. इचलकरंजी कडे आलेल्या फौजेने शिरढोन,लाट,रांगोळी व
शिरदवाड ही ठाणी घेतली. आजरे व इचलकरंजी ही दोन ठाणी वगळता करवीरकरांनी
सर्व संस्थान घेतले होते.तोफखानासह 5 हजार सैन्य शिरढोण आणि टाकवडे
याठिकाणी उतरले होते. हे सैन्य दररोज इचलकरंजीवर चाल करून येत होते. झटापट
होऊन अनेकजन जखमी होत होते. जर बुवा साहेबांनी इचलकरंजीवर स्वारी केलीच,
तर त्याचे निवारण करण्यासाठी फौजही जमा केली होती. आपले कुटुंबीय सुरक्षित
राहावे यासाठी त्यांनी सर्वांना सांगलीकर पटवर्धनांच्या हद्दीतील हरिपूर
गावात पाठविले होते.
इलाखा प्रकरण तह
चिंतामणराव आप्पासाहेब सांगलीकर आणि गोपाळराव रावसाहेब जमखंडीकर यांनी इचलकरंजी फौज पाठविली होती. व्यंकटराव रावसाहेबांनी इंग्रजी सरकारला पत्र लिहून संस्थान वाचवावे अशी विनंती केली। धारवाडचे सर कलेक्टर निसंबेट यांनी करवीरकरांची कानउघडणी केली. तरीही करवीरकरांनी आपला मनोदय न बदलल्यामुळे निसंबेटसाहेब सप्टेंबर 1827 मध्ये कोल्हापूर कडे सैन्य घेऊन निघाले. करवीरकरांनी इंग्रजी सरकारची लढाई करण्याचे टाळले. निसंबेटसाहेब यांनी सर्व विकारांवर आपले वर्चस्व ठेवण्यासाठी 2 ऑक्टोंबर 1827 मध्ये तह केला आणि ते धारवाडला गेले. याच वेळी इचलकरंजीकर यांच्या बाजूने इलाखा प्रकरण झाले.व्यंकटराव साहेबराव यांचे 16 फेब्रुवारी 1838 मध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांचे धाकटे बंधू केशवराव तात्यासाहेब गादीवर आले.मात्र करविरकरांनी पुन्हा टाबेड्राईचे प्रकरण उकरून काढे. इंग्रज सरकारच्या सांगण्यावरून करवीरकरांची ताबेदारी 1847 मध्ये त्यांनी काही अटींसह नाईलाजाने मानावे लागले. (क्रमशा)

No comments:
Post a Comment