विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 9 August 2022

इचलकरंजीत मराठेशाहीच्या पाऊलखुणा ……भाग १४

 

इचलकरंजीत मराठेशाहीच्या पाऊलखुणा ……
लेखक ::संजय खूळ

भाग १४
करविरकरांच्या पाच हजार सैनिकांनी इचलकरंजीवर केली अशी चाल
करविरकरांना इचलकरंजी संस्थानाला पेशव्याकडून होणारी मदत पाहवत नव्हते. त्यामुळे ते कोणत्या ना कोणत्या खुरापती नेहमी करत होते. दुसरे नारायण वेंकटेश हे 1827 रोजी मरण पावले. त्यांना व्यंकटराव व केशवराव अशी दोन मुले, तर कृष्णाबाई, मंनाबाई, सुंदराबाई, यमुनाबाई आणि वारणाबाई अशा पाच मुली होत्या. सांगलीच्या पटवर्धनांचा आणि इचलकरंजीकरांचा सख्यसंबंध होऊनही उभय कुलांची सोयरीक झाली नव्हती. दुसरे नारायण वेंकटेश यांनी नवीन पद्धत सुरू केली. आपल्या पाचही मुली सांगलीकरांना दिल्या. पाचवी मुलगी वारणाबाई”गिरीजाबाई” या नावाने प्रसिद्ध झाल्या. दुसरे व्यंकटराव नारायण यांच्या निधनानंतर थोरले पुत्र तिसरे व्यंकटराव नारायण ऊर्फ व्यंकटराव रावसाहेब गादीवर आले. याला इंग्रज सरकारकडून फारसा अडथळा झाला नाही. पण करवीरकर बुवासाहेब यांनी जोरदार विरोध केला.
याबाबत त्यांनी इंग्रजांना पत्र लिहिले.
इचलकरंजी संस्थान खालसा करावे इचलकरंजी संस्थाने आपल्या ताब्यातील आहे. दुसरे व्यंकटराव नारायण यांच्या नंतर त्यांच्या मुलाकडे संस्थान असावे, की करवीरकरांत खालसा करावे हे अधिकार आमच्याकडे आहेत. त्यामुळे करवीरकर सरकारांमध्ये इचलकरंजी संस्थान खालसा करावे अशी मागणी इंग्रजी सरकारकडे करण्यात आली. सरकारने पेशवाई कारकिर्दीपासून दप्तराचे दाखले तपासले आणि इचलकरंजी संस्थान खालसा करता येणार नाही, असे कळवले. त्यानंतर बुवासाहेबांनी आपली ताकत दाखवून इचलकरंजी संस्थान ताब्यात घेण्याची तयारी केली. सैनिकांच्या जोरावर इचलकरंजीकर व कागलकरांवर हल्ल्याचा निर्णय घेतला. 30 डिसेंबर 1825 या दोन संस्थांवर हल्ला न करण्याचा तह करवीरकरांबरोबर झाला असतानाही युद्धाचा निर्णय घेण्यात आला. इंग्रजी सरकारने या हल्ल्यास विरोध केला असतानाही करवीरकर स्वार, पायदळ व तोफ आदी सामान घेऊन स्वारीस निघाले. 10 हजार प्यादे व 4 हजार स्वार या मध्ये होते. या फौजेने कागलकर व भाऊमहाराज यांच्या गावात ठाणी वसविली आणि चिंचणीकर पटवर्धन यांचे भोज, एकसंबा आदी गावे लुटली.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...