1] नंतर मुसेखान बलवान यवनानी परिवेष्टीत,मत्तराज घाटगेनी रक्षिलेला व हत्तीप्रमाणे मदोन्मत्त असे मांडलीक चोहो बाजुने असलेला फत्तेखान शिवराजास जिँकण्याच्या इच्छेने त्वरीत पुरंदराच्या स्वारीवर निघाला. फत्तेखानाने आपल्या बलाढ्य सेनेचा तळ पुरंदराच्या थोड्याच अंतरावर दिला.ते शत्रुचे सैन्य समीप आलेले पाहुन शहाजीपुत्र शिवरायानी गडाच्या शिखरावर युद्धाची दुंदुभि वाजविली.मग गर्विष्ठ व पराक्रमी मुसेखान व अनेक धैर्यवान वीर बरोबर घेऊन मानी फत्तेखान पुरंदरगड लागलीच चढु लागला.मेघाना विदीर्ण करणारी गर्जना करीत ती प्रचंड सेना त्या गडावर चढत असताना तिच्या पिछाडीस फत्तेखान, आघाडीस मुसेखान, डाव्या बगलेस फलटणचा राजा आणी उजव्या बाजुस मत्तराज घाटगे होते.
2] चोहोकडुन गड चढु लागलेल्या शत्रुना पाहुन गडावरुन तोफांच्या तोँडातुन सुटणार्या जळजळीत लोखंडी गोळ्यांचा, बंदुकीँच्या गोळ्यांचा, मोठमोठ्या शिळांचा, दारुच्या बाणांचा, गोफणीच्या दगडांचा शिवरायांच्या शुर सैनिकानी शत्रुवर अतिशय वर्षाव केला. गडावरुन सोडलेल्या मोठमोठ्या शिळांखाली येऊन बरेच आदिलशाही सैन्य बेचिराख झाले. तोफातुन सुटणार्या तप्त लोखंडी गोळ्यानीदेखिल बर्याच आदिलसैन्याचे तुकडे झाले.गडावरुन सुटणार्या दारुच्या बाणानी आदिल सैन्याची दाणादाण उडवु लागले.गडाच्या तटास बिलगलेले आदिलसैन्याची दाणादाण उडाली व ते माघारी फिरुन आपल्या तळाकडे निघाले.
3] आपल्या सेनेचा पराभव केलेला पाहुन मुसेखानाने आपल्या पराक्रमी वीराना धीर देऊन पुन्हा वेगाने गडाची चढण्याचे आदेश दिले. पुरंदरचा चढ चढणार्या त्या शत्रुसैन्यास क्रोधाने पाहुन गोदाजी, भीमाजी,कावजी आदि प्रभ्रुतीने त्यांच्यावर चोहोबाजुने हल्ला चढवला.तेव्हा अशरफशहाशी बाहुबलोन्मत्त सदोजी, क्रुद्ध मुसेखानाशी गोदाजी जगताप, मिनाद व रतन यांच्याशी भैरव वाघ, शुर घाटग्यांशी भीमाजी वाघ असे लढु लागले व अत्यंत मानी गदाधारी व प्रबळ सैन्यानीयुक्त असा कावजी पुष्कळ सैन्याशी लढत होते. क्रोधाने बेफाम झालेल्या गोदाजीने जोराने चाल करुन मुसेखानाच्या छातीत तीक्ष्ण भाला खुपसला, परंतु कवच घातलेल्या मुसेखानाने तो भाला दोन्ही हातानी उपसुन भाल्याचे दोन तुकडे केले.इकडे सदाजी अशरफशहाशी तलवारीने निकराचा लढत होते.भीमाजी वाघाने भयंकर शक्ती धारण करणार्या घाटगेच्या दंडावर तीक्ष्ण प्रहार केला, युद्धविशारद घाटग्यानेदेखिल भीमाजीच्या मनगटावर प्रहार केला,परंतु भीमाजी घाटगेशी निकरानेच लढत होते.मिनाद व रतनु या दोघांशी एकटा भैरव वाघ लढत होते,तथापि त्या एकट्यानेच त्या दोघावर विजयश्री प्राप्त केली.क्रुद्ध व अग्नीप्रमाणे तेजस्वी कावजीने जोराच्या गदाप्रहाराने शेकडो शत्रुसैन्य लोळविले.
4] गोदाजी जगताप यांचा भीमपराक्रम =
बलवान मुसेखानाने गोदाजीचा भाला मोडल्यानंतर तो क्रुद्ध होऊन त्याने काळ्या कावळ्याच्या उदराप्रमाणे दिसणारी तलवार हातात घेतली व त्याने शेकडो पठाणांचे तुकडे केले. परंतु मुसेखानाने गोदाजीचे हे क्रुत्य पाहुन त्याच्या डाव्या बाहुवर तलवारीचा वार केला.ते दोघेही हातात तलवारी घेऊन एकमेकाविरुद्ध निकराचे लढत होते व एकमेकांच्या शस्त्रप्रहारानी जखमी झालेले हे दोघेही एकदम रक्ताच्या धारानी प्रुथ्वीला अभिषेक करु लागले, क्षणमात्र तेथे त्या दोघांचे बरोबरीचे युद्ध झाले,परंतु गोदाजीने मुसेखानावर वरचढ केली.मग मुसेखानाने गोदाजीच्या मस्तकावर तलवार हाणली तो वर गोदाजीने मुसेखानास खांद्यापासुन मध्यभागापर्यँत चिरले व त्याचे दोन तुकडे केले.त्यासोबतच त्याने आदिलाचे पुष्कळ सैन्य मारले.
5] अशरफशहानी जे जे आयुध घेतले ते ते सदाजीने तोडुन टाकले व त्यास यमसदनी पाठवले. नंतर आपल्या सैन्याची वाताहत पाहुन मत्तराज घाटगे, मिनाद,रतनु व गर्विष्ठ फत्तेखान आपल्या शिल्लक राहिलेल्या पराभुत सैन्यासह विजापुर गाठले.अशा प्रकारे पुरंदरावर पुष्कळ सैन्यासह चालुन आलेल्या फत्तेखानाचा शहाजीपुत्र शिवरायराजानी बलाने मोड केला
No comments:
Post a Comment