हिंदुस्थान हा प्राचीन काळापासुन शेतीप्रधान देश आहे. छत्रपती शिवरायांचे शेती विषयक धोरणवर बारीक नजर असे. राज्यातील सर्व जमिनीची मोजणी करुन सारा- आकारणी करणे हे काम महाराजाचे महसुलमंत्री अण्णाजी दत्तो सुरनीस हे या बाबतीत अत्यत कर्तबगार होते.
मोगल राज्यात शेतसारा १/२ होते. म्हणजे अर्धे मोगलाना जाई . ज्यावेळी ही गांवे स्वराज्यात आली तृव्हा महाराजांनी हे प्रमाण २/५ आसे ठेवले. म्हणजे पाच हिस्से केले जाई त्यातील २ हिस्से सरकारात जमा होई तीन हिस्से मालकाला मिळे.
शेतकऱ्याकंङे महाराज आस्थेने पाहत त्याच्यासाठी पाटबंधारे..धरण. बाधल्याचे उल्लेख आहेत. *एका भाजीच्या देठासही मन न दाखवता रास्त व दुरुस्त वर्णन ठेवणे*
महाराजांनी जमिनीची मोजणी व शेतसारा प्रतवारी ठरवली गेली.
पुर्वी काठीणे जमीन मोजली जाई.
५ हात ५ मुठी = १ काठी
१ काठी =८२ तसु
२०× २० काठ्या = १ बिघा
१२० बिघे = १ चावर
( शके १९३८ च्या भा.इ.स.म. च्या अहवालात वेगळे कोष्टक दिले आहे पुढील प्रमाणे )
२० काठ्या लांब व १ काठी रुंद= १ पांड
२० पांङ= १ बिघा
६० बिघे = १ पाव
४ पाव= १ चाहुर
१ चाहुर = ६४ कुरगी
८ नवटाक = १ चाहुर
( यातील बिघ्यास आदिलशाही बिघा संबोधले जाई )
शेतसारा आकारण्या आधी जमिनीची प्रत तपासली जात असे . जामिनीच्या बारा प्रतीच्या होत्या.
१) अव्वल २) दुम ३) सीम ४)च्यारसीम ५) बावील किंवा बावूल ६) खारवट ७) रहु ८) खारी ९) कुङ्याट १०) राजपाळ ११) तुरवटे १२ )मनुत
यापैकी
राजपाळ= झुङुपाची
खारवट= समुद्र काठची
खारी= खाङीजवळची
बावल = खङकाळ
खुरी = दगङाळ
तुरवटे = व्दिदल धान्य व ताग पिकवणारी
मनुत = झाङाच्या मुळ्या आसलेली व साफ न केलेली.
वजत = नापीक
वरकस = डोगरी
सारा -आकारणी कशी केली जात असे ते पाहु
दर बिघ्याला = १२ मण
दुय्यम = १० मण
सीम = ८ मण
च्यारसीम = ६|| मण
राजपाळ = ८ मण
खारवट = ७|| मण
बावल = ६|| मण
खुरि = ६| मण
कुड्याट = ६| मण
रहु = ५ मण
तुरवटे व मनुतही ५ मण
वजत व वरकस जमिनीवरीला आकारणी बिघ्याऐवजी नांगराप्रमाणे केली जाई . २ नांगर = ६ - ७ बिघे
हा सारा नजरमान = ५ लोकांनी तपासुन खंङीचे पिकावरुन त्यावरुण धारावसुल ठरत असे.
बागाईत जमिनीतही मोटस्थळ , पाटस्थळ, बागमळा, राई असे पोटविभाग पाडले जात.
No comments:
Post a Comment