विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 12 August 2022

#शाहूंचे_सेवक_लाला_गुलाबराव_खेत्री

 


#शाहूंचे_सेवक_लाला_गुलाबराव_खेत्री
छत्रपती थोरले शाहू महाराज म्हणजे मराठा स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारा महान राजा.थोरले शाहू यांच्या जीवनात अनेक प्रसंग घडले अनेक घटना घडल्या पण इतिहासात मात्र या विषयी जास्त संशोधन केले गेले नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे.त्यामुळे थोरल्या शाहू राजांच्या कारकिर्दीचा सखोल अभ्यास करत असताना अनेक नवनवीन व्यक्ती,घटना आणि प्रसंग यांचे संदर्भ सापडत आहेत त्यातील एक व्यक्ती म्हणजे लाला गुलाबराव खेत्री.
शाहू राजे मुघलांच्या कैदेत असताना शाहू राजांना मध्यप्रदेश मधील खरगोण प्रांताची जहागिरी बादशहाने शाहू राजांना दिली होती. शाहू राजांनी खरगोण च्या जहागीरी वर लक्ष द्यायचं काम दिल होत,लाला गुलाबराव खेत्री ला तो ते प्रामाणिकपणे पार पाडायचा त्याच्या बदल्यात त्याला महाराजांनी प्रतिदिवस 2 रुपये अशे वर्षाचे 720 रुपये दरवर्षी वंशपरंपरेने लावून दिले होते.शाहू राजांना बादशहाने दिलेल्या जहागिरी मधून मिळणाऱ्या मिळालेल्या मोकास उत्पन्नातून दिवशी 2 रुपये हे लाला गुलाबराव खेत्री याला द्यायची सोय व्यवस्थित लावून दिली.
लाला ही त्याची पदवी असावी कारण त्याच्या मुलांच्या नावपुढं सुद्धा लाला लावल्याचे आढळून आलय.शाहू राजे पुढं कैदेतून सुटले छत्रपती झाले गुलाबराव खेत्री ला त्याचे 720 रुपये दरवर्षी वेळेवर मिळायचे परंतु नंतर च्या काळात ते 720 रुपये मिळणे बंद झाले.गुलाबरावचे वंशज त्या खरगोण च्या जहागिरीची व्यवस्था चोख पाहत होते तरी त्यांना त्यांचा मोबदला मिळत न्हवता,तेव्हा गुलाबराव खेत्री चा मुलगा लाला प्रतापराव खेत्री हा सातारा मध्ये आला.त्यांनी शाहू राजांना विनंती अर्ज लिहून आपल्याला वंशपरंपरेने मिळत असलेले सालमाही उत्पन्न 720 रुपये आता काही वर्षांपासून मिळत नसल्याचे सांगितले.शाहू राजांना आपल्या वडिलांनी केलेल्या सेवेची आठवण करून दिली.शाहुराजांनी सुद्धा त्या प्रदेशातील देशमुख,देशपांडे यांनी सांगून प्रतापराव खेत्री याला वार्षिक 720 रुपये पुत्रपोत्रादी वंशपरंपने द्यायच्या सूचना दिल्या.
शाहू राजांनी आपल्या सरदार,सेवक,सरंजाम,ब्राह्मण यांना आशा प्रकारचे अनेक इनाम बक्षिसी दिल्याने त्यांना काही इतिहासकार दानधर्म करण्याच्या स्वभावावरून कर्णाची उपमा देतात.
संदर्भ-छत्रपती थोरले शाहू महाराज रोजनिशी।

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...