विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 12 August 2022

#हिंदनृपती_कथा_शंभुपुत्राची #शाहू_राजांचे_शासन

 


#हिंदनृपती_कथा_शंभुपुत्राची
धर्मवीर शंभूपुत्र थोरले शाहू महाराज म्हणजे मराठा साम्राज्याचे तख्त 42 वर्ष सांभाळणारे महान राज्यकर्ते. शाहू राजे यांना अजातशत्रू म्हणलं जात कारण त्यांचा प्रत्यक्ष कोणी शत्रू न्हवता.शाहू राजे तशे स्वभावाने मृदू जरी असले तरी पण गंभीर गुन्हा करणाऱ्याला कडक शिक्षा द्यायला ते धजावत न्हवते.अतिशय शांत डोक्याने निर्णय घेऊन त्यांनी इतका मोठं साम्राज्य निर्माण केलं होतं.शाहू राजांनी नेहमी आपल्या सरदारांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणीवर चालायला शिकवले.शाहू राजांच्या कारकिर्दीत शाहू राजांनी न्यायव्यवस्थेवर खूप लक्ष दिले.
फिर्याद घेऊन जर एखादा माणूस आला तर आरोपी ला शिक्षा करण्याआधी शाहू राजे त्याचा पूर्ण अभ्यास करून त्याच्या वाडवडिलांनी जर स्वराज्याची सेवा केली असेल तर त्याच्या शिक्षेत बदल केला जायचा.शाहूंच्या विरोधात अनेकांनी बंड पुकारले होते पण शाहू राजांनी त्यांचा पराक्रम,साहस,धाडस याचा विचार करून शिक्षा न देता त्यांना आपल्यासाठी लढायला प्रवृत्त केले.शाहू राजे समोरच्या माणसाच्या मनात डोकावून पाहत.परंतु जर घडलेला गुन्हा गंभीर असेल तर शाहू राजांनी मृत्युदंड दिल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.
किल्ले महिमानगड मल्हारजी कुसाजी गडकरी म्हणून होता,त्याच्याकडून बदअंमल झाला म्हणून त्याच्या जागी कुसोजी जगदाळे ला नेमला आणि मल्हारजी ने बदअंमल केला म्हणून त्याला तोफेच्या तोंडी किंवा त्याचा कडेलोट करायची शिक्षा शाहू राजांनी दिली होती.
दुसरा एक प्रसंग या ठिकाणी आवर्जून सांगावा वाटतो शाहू राजांनी कैदेतही कैद्यांना सुद्धा माणूस म्हणून वागणूक दिली होती.तुळोजी भोसले हा कैदी म्हणून आत्ताच्या वासोटा म्हणजे व्याघ्रगडावर कैदेत होता त्याला तिथली थंडी सहन होत नाही म्हणून शाहू राजांनी त्याची रवानगी वंदन गडावर केली.वंदन गडावर सुद्धा तिथं सुद्धा त्याला बरं वाटलं नाही त्याची तब्येत अजून बिघडली म्हणून त्याची शिक्षा माफ करून त्याला सोडून दिलं.
शाहू राजांच शासन हे अस होत.एकदा चंदन गडावरील किल्ले दाराच्या शेतात पळशी च्या निंबाजी पाटलांची गुरे गेली म्हणून किल्लेदाराने निंबाजी पाटलाला कैद केले आणि त्याच्या घरावर चौकी बसवली शिवाय त्याच्याकडून दंड म्हणून 10 रुपये घेतले.ही बातमी जेव्हा शाहू राजांना समजली तेव्हा शाहू राजांनी किल्लेदाराच्या पत्र लिहिलं त्यात शाहू राजांनी सांगितलं की 'जनावरे शेतात गेली ही खूप मोठी चूक नाही,तुज्या झालेल्या नुकसानीची पाहणी करायला दरबारातून सरकारी माणूस येईल त्यानुसार निंबाजी पाटलांकडून दंड घेतला जाईल सध्या तू त्यांना सोडून दे आणि घेतलेले 10 रुपये त्यांना परत देऊन त्याच्या घरावरील चौकी पहारे उठव.'
सदाशिवगडावरील बाजारपेठेत करोडी गावचे काही शेतकरी घोंगडी विकायला गेले होते तेव्हा किल्ल्यावरील करभाऱ्यांनी त्यांच्याकडून घोगड्या विकत घेतल्या आणि त्याचे निम्मि किंमत दिली.जेव्हा ही गोष्ट शाहू राजांना समजली तेव्हा शाहू राजांनी किल्लेदाराला चांगली जरब बसवली.रयतेपासून कोणतीही जिन्नस घेताना ती योग्य भावात ग्यायच्या विषयी सूचना सर्व किल्लेदारांना दिल्या.
पैठण गावात एक दिमंत सोळसकर नावाचा सरकारी माणूस नेमून दिला होता,त्यानी आपल्या मर्जीनुसार मनमानी कारभार चालू केला.एकदा तर नदीकाठी आलेल्या ब्राह्मण बायकांना दम देऊन त्याच्याकडून मौल्यवान वस्तू काढून घेतल्या ही गोष्ट राजांच्या कानावर अली तेव्हा राजांनी त्याला चांगलाच फैलावर घेत, परत अशी चूक झाली तर मुलाहिजा ठेवला जाणार नाही म्हणून ताकीद दिली.पुढं त्याला कामावरून काढून टाकला.
वरील प्रसंगातून लक्षात येत की शाहू राजांचं शासन हे लोकांच्या हिताचं होत.
संदर्भ-थोरले शाहू राजे रोजनिशी

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...