विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 8 August 2022

इचलकरंजी, सं स्था न. भाग ५ ना रा य ण रा व व्यं क टे श आणि अ नू बा ई..घोरपडे

 



इचलकरंजी, सं स्था न. 

भाग ५
ना रा य ण रा व व्यं क टे श आणि अ नू बा ई..घोरपडे

यापुढें नारायणरावतात्यांची कारकीर्द येते. ही कारकीर्द पंचवीस वर्षाच्या अवधीची असून तींत इचलकरंजी संस्थानाच्या वैभवाचा कळस झाला म्हटलें तरी चालेल. त्या संस्थानाचें वैभव इतकें वृध्दिंगत होण्यास तात्यांची करामत कारण नसून त्यांच्या मातोश्री अनूबाई यांचेच कर्तृत्व होय. (अनुबाई पहा.) मुलगा संस्थानाचा कारभार व सरदारीचा बोजा सांभाळण्याजोगा होण्यापूर्वीच व्यंकटराव वारले त्यामुळें तीं दोन्ही कामें नीट चालतील अशा तजविणी योजणें अनूबाईंचें कर्तव्य होतें.

नानासाहेब पेशवे व त्यांचे बंधू हे अनूबाईचे भाचे असल्यामुळें त्यांनीं तात्यांचा पुरस्कार करण्याचें मनावर घेतलें व त्यांच्या वडिलांकडे सरदारी होती तीच त्याजकडे कायम करून प्रत्येक स्वारींत त्याजकडे कांहींना कांहीं तरी कामगिरी सोंपविली इतकेंच नव्हें तर इनामें तैनाता देऊन मोठमोठया मामलती सांगून व मुलुखगिरींत संस्थानिकांकडे खंडणी करार करण्याच्या बोल्या त्यांजवरच सोंपवून त्यांस लाखों रूपये मिळवून दिले. व्यंकटराव वारल्यावर शाहूनें सबंध आजरे महाल अनूबाईस इनाम करून दिला.

पूर्वी गोकाकचा देसाई शिवलिंगप्पा म्हणून होता. त्यानें बंडावा केल्यामुळें सावनूरचा नबाब अबदुल मजीदखान यानें त्यावर स्वारी केली. तेव्हां तो देसाई पळून चिकोडीकर देसायाच्या आश्रयास जाऊन राहिला. नबाबानें त्याचें देसगतीचें वतन त्याचाच भाऊ अमीन आप्पा म्हणून होता त्यास दिलें. इकडे चिकोडीकरानें शिवलिंगप्पास दगा करून मारून टाकिलें व त्याचे मुलगे लखमगौडा व शिवरामगौडा म्हणून होते त्यांस कैदेंत ठेविलें. प्रस्तुतच्या प्रसंगीं त्या दोघां मुलांनीं आपली मुक्तता करण्याविषयीं प्रार्थना केली व त्यांनां आश्रय दिला.

यावेळीं पेशवें कर्नाटकांत आले होते व त्यांचा धारवाड काबीज करण्याचा मनसबा ठरला होता. तेथें मोंगलांचा किल्लेदार पृथ्वीसिंग म्हणून होता. त्याजकडे राजकारण करून शिबंदी खर्चाबद्दल त्यास ३५००० रूपये देऊन तारीख १३ रोजीं श्रीमंतांनीं तो किल्ला व त्याखालचा सरंजाम ताब्यांत घेतला व तेथील मामलत तात्यांस दिली. पुन: सन १७५४ च्या कर्नाटकाच्या मोहिमेंत महादजीपंत पुरंदरे व नारायणरावतात्या हेच मुख्य सरदार होते. पुरंदरे व तात्या यांनीं प्रथमच गोकाकचें ठाणें देसायापासून हिसकावून घेऊन माजी देसायाचे दोन मुलगे तात्यांच्या आश्रयास राहिले होते त्यांसच त्यांनीं या वेळीं हें देसगतीचें वतन देऊन गोकाकचें ठाणें आपल्या ताब्यांत ठेविलें. देसायाच्या मुलांनीं यावेळीं कृतज्त्रताबुध्दीनें हुनशाळ हा गांव तात्यांस इनाम दिला. नंतर हें लष्कर श्रीरंगपट्टणापर्यंत जाऊन त्यानें कित्तुर, सोंदें, सावनूर, बिदनूर, चित्रदुर्ग, रायदुर्ग, श्रीरंगपट्टण, बसवापट्टण, कनकगिरी या नऊ संस्थानांपासून एकंदर खंडणी ३८७०००० रूपये घेतली. संस्थानिकाशीं खंडणीचा ठराव तात्या यांच्या विद्यमानें होत असे. सन १७५५ च्या मे महिन्यापर्यंत हा मजकूर झाला. नंतर तात्यांनीं पाच हजार फौजेसह धारवाडास छावणीस रहावें याप्रमाणें पेशव्यांचा हुकूम झाल्यावरून पुरंदरे पुण्यास गेले व तात्या धारवाडास राहिले. स्वारीच्या सुरूवातीस गोकाक परगणा तात्यांनीं घेतला होता त्याची मामलत पेशव्यांनी त्यांसच सांगितली.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...