महाराष्ट्रीय 'वाकाटक' राजवंश
पोस्तसांभार ::सतीश राजगुरे
हरिषेण' हा वत्सगुल्म शाखेचा शेवटचा ज्ञात राजा होय. त्याच्यानंतर एक-दोन राजे होऊन गेले असावे, पण त्यांची नावे माहीत नाहीत. इ स ५५० च्या सुमारास माहीष्मतीच्या 'कलचुरी' राजाने विदर्भात राज्य स्थापन केले, असे दिसते. त्यावरून हरिषेणानंतर लवकरच वाकाटकांचे राज्य नाश पावले असावे.
'वाकाटक' हे अत्यंत शांतता प्रिय राजे होते. वाकाटकांच्या काळात विदर्भाची अत्यंत भरभराट झाली होती.
त्यांचे साम्राज्य उत्तरेत माळव्यापासून दक्षिणेत तुंगभद्रेच्या खोऱ्यापर्यंत आणि पश्चिम समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत पसरले होते.
त्यांचे राज्यशासन कार्यक्षम होतेच शिवाय राज्यात सर्वत्र शांतता, सुव्यवस्था आणि समृद्धी नांदत होती. त्यांनी न्यायाने राज्यकारभार चालवला आणि विदर्भाचे नाव उज्ज्वल केले! म्हणून त्या काळाला विदर्भाच्या प्राचीन इतिहासातील सुवर्णयुग म्हणता येईल.
त्याकाळात विदर्भात संस्कृत आणि प्राकृत वाङ्मय, कला कौशल्य व व्यापार यांना उत्तेजन मिळून विदर्भाची कीर्ती सर्वदूर पसरली होती. (उदा. कालिदास लिखित 'मेघदूत')
वाकाटक राजांनी धर्म, विद्या व कला यांना उदार आश्रय दिल्यामुळे त्यांचा अभूतपूर्व विकास झाला. त्यांनी अनेक मंदिरे बांधली. तसेच अनेक यज्ञ केले आणि पौराणिक धर्माचाही पुरस्कार केला.
विविध प्राण्यांचा शिल्पपट्ट, गुहा क्र. १७, अजिंठा
वाकाटक' घराण्याचे वैशिष्ट्य म्हणजे या घराण्यातील राजे, महाराजे यांनी केलेल्या कामांचे अनेक शिलालेख आणि ताम्रपट बनवले. विदर्भातच नव्हे तर विदर्भाच्या बाहेरही शेतात माती खोदताना किंवा घराच्या बांधकामासाठी पाया खोदताना वाकाटकांचे ताम्रपट नागरिकांना सापडले आहेत. अजिंठ्याच्या लेण्यांमधील शिलालेखातही वाकाटकांची बरीच माहिती आहे. त्यामुळे वाकाटकांचा बराच इतिहास समोर आला आहे.
चित्रस्त्रोत: मराठी विश्वकोश
संदर्भ व माहितीस्रोत:
१. भारतीय संस्कृतिकोश खंड ८
२. मराठी विश्वकोश
No comments:
Post a Comment