मराठाशाहीतील कुरघोडीचा एक डाव म्हणजे 'पुरंदर कोळी दंगा'.
पोस्तसांभार ::शुभम सरनाईक
पुरंदरचा अधिकार :
पुरंदर
किल्ला ख्रिस्ताब्द १६५६ साली ५ पिढ्यांपासून किल्लेदारी चालत आलेल्या
सरनाईक घराण्याकडून शिवछत्रपतींनी काढून घेतला होता. १७०० च्या सुमारास या
गडाच्या रक्षणाचे कार्य छत्रपती राजाराम महाराजांनी कोळी, बेरड लोकांना
दिले होते परंतु छत्रपती शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात पुनरागमनाने
कोळ्या, बेरडांचे दिवस पालटले आणि गडाची किल्लेदारी पुनरपि सरनाईकांकडे
आली. त्यावेळी गड सचिवांच्या अधिकारात असून त्यावर किल्लेदार म्हणून सरनाईक
विराजित होते. पेशव्यांनी पुरंदर आपल्या ताब्यात घेतल्यावरही सरनाईकांना
पदावरच ठेवले आणि पुढील काळात पुरंदर, रुद्रमाळ/वज्रगड अनुक्रमे आबा आणि
बापू यांना सुपूर्द केले जी त्यांची सत्तास्थाने बनली. या सर्वांमुळे कोळी,
बेरड खप्पा झाले होते ज्याचा परिणाम कसा झाला हे दिसेलच.
पुरंदरे घराणे[4]
सरनाईक मंडळी :
नीलकंठ
महादजी आणि शंकराजी महादजी या सरनाईक सहोदरांच्या वादात हस्तक्षेप करून
शिवछत्रपतींनी ख्रिस्ताब्द १६५६ च्या बलिप्रतिपदेस जो पुरंदर घेतला तो पुढे
शाहू महाराजांकडून गणेश शंकराजी सरनाईक यांनी तब्बल अर्ध्या शतकानंतर
मिळवला. यानंतर पुरंदरची सरनाईकी गणेशपंतांच्या तर वज्रगडाची त्यांचे बंधू
मनाजीपंतांच्या वंशजांकडे होती. रावसाहेबांच्या काळात ख्रिस्ताब्द १७६४
साली पुरंदरावर बापूजी सखाराम, रामाजी सखाराम तर वज्रगडावर माणकोजी गंगाधर
ही सरनाईक मंडळी सक्रिय होती.
No comments:
Post a Comment