प्राचीन महाराष्ट्रातील राजे
भाग ६
राजा हाल सातवाहन
राजा हाल हा सातवाहन घराण्यातील सतराव्वा राजा होता. ' गाथा सप्तशती ' वा 'गाहासत्तसई ' हा शृंगारप्रधान काव्यसंग्रह त्याने रचला असे समजले जाते. या ग्रंथामुळेच त्याचे नाव संस्कृत व प्राकृत साहित्यात अजरामर झाले आहे. गाथासप्तशती हा तत्कालीन सामाजिक स्थिती व संस्कृती यावर प्रकाश टाकणारा एकमेव महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. सोबतच महाराष्ट्रात निर्माण झालेला हा पहिलाच ग्रंथ म्हणूनही याचे महत्त्व आहे. बृहत्कथा लिहिणारा गुणाढ्य आणि कातंत्र हा व्याकरणावर लिहिणारा शर्ववर्मा हे दोघे देखील हाल राज्याच्या दरबारात होते. राजा हाल याचे आजपर्यंत एकही नाणे अथवा शिलालेख उपलब्ध झालेला नाही. मात्र त्याच्या शृंगारप्रधान काव्यामुळे तो साहित्य क्षेत्रात अजरामर झालेला दिसतो. पुरणाशिवाय त्याचा उल्लेख आपल्याला लीलावई, देशिनामाला, सरस्वतीकंठाभरण अश्या अनेक नंतर लिहिल्या गेलेल्या ग्रंथात आढळतो. या
ग्रंथांमध्ये हाल चे साम्राज्य संपूर्ण दक्षिण भारतात पसरल्याचे म्हंटले आहे मात्र आजपर्यंत हे सिद्ध करणारा पुरावा मिळालेला नाही. सोबतच हे सर्व ग्रंथ समकालीन नसल्याने व अनेक ग्रंथ हे दंतकथांवर आधारित असल्याने त्यांना इतिहास म्हणून स्थान देता येत नाही.
गाथासप्तशती सोबतच धवल नावाचा काव्यसंग्रहही यानेच रचला असे समजले जाते. या ग्रंथांमधून त्याला ' प्रतिष्ठान ' चा राजा असे म्हटले आहे. त्याची कारकीर्द, त्याच्या लढाया, राज्यशासन या इतर गोष्टींची जास्त माहिती आज उपलब्ध नाही. त्यामुळे राजा हाल सातवाहनाचे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व अद्यापही स्पश्ट झालेले नाही.
पुराणांप्रमाणे हालानंतर मंटलक, पुरींद्रसेन, सुंदर सातकर्णी, चकोर सातकर्णी व शिवस्वाती या राजांची नावे येतात. मात्र हालाप्रमाणेच याही राजांबद्दल पुरेशी साधने उपलब्ध नसल्याने त्यांचे ऐतिहासिकत्त्व सिद्ध करणे अवघड आहे. शिवस्वाती हा सातवाहन राजघराण्यातील सर्वात महत्वाचा राजा असणाऱ्या गौतमीपुत्र सातकर्णीचा पिता व गौतमी बलश्री हीचा पती असावा. शिवस्वातीच्या कालखंडात सातवाहन घराण्याची फार वाताहत झाली. शकांनी आक्रमण करून महाराष्ट्रावर ताबा मिळवला. त्यामुळे भारताचा पश्चिम भाग सातवाहनांच्या हातातून निसटला व त्यांचे सामर्थ्यही कमी झाले. असे असले तरी शकांचे पूर्वे कडील संभाव्य आक्रमण रोखण्यात मात्र ते यशस्वी झाले. महाराष्ट्रावर हल्ला करणाऱ्या शक राजवांशाचे नाव क्षहरात असे होते. त्यांचा व सातवाहनांचा सतत संघर्ष होत राहिला. तथापि कालौघात सातवाहनांना आपल्या सत्तेचे केंद्र आंध्रात स्थलांतरित करावे लागले.
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ
सातवाहनकालीन महाराष्ट्र - डॉ. रा. श्री. मोरवंचीकर
प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Sunday, 11 September 2022
प्राचीन महाराष्ट्रातील राजे भाग ६ राजा हाल सातवाहन
Subscribe to:
Post Comments (Atom)
“कोरलाईचा किल्ला”.
१३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
## धनगर व माळी समाजातील लढवय्ये ## दामाजी थोरात postsaambhar:Udaykumar Jagtap ## ## ## नायगाव ,तालुका -पुरंदर जिल्हा -पुणे , गा...
-
*राणूबाई भोसले-जाधव* राणूबाई म्हणजे शंभूराजांची दुसरी आईच.शंभूराजांचा जन्म झाला त्या दिवशी बेभान होणाऱ्या म्हणजे "राणूबाई".त्यां...
No comments:
Post a Comment