मराठाशाहीतील कुरघोडीचा एक डाव म्हणजे 'पुरंदर कोळी दंगा'.
पोस्तसांभार ::शुभम सरनाईक
नाट्याचे खरे चरित्रनायक :
या
सर्व घटना विसाजी केशव साने आणि बाबा सरनाईक यांच्या आज्ञेप्रमाणे होत
होत्या. या द्वयिंनी दुर्गाची मालकी घेताच पुण्यास बाळाजी जनार्दन भानू
उपाख्य नाना फडणवीस यांना निरोप पाठविला की हे सर्व कृत्य आम्ही श्रीमंत
रावसाहेबांच्या निर्देशानुरूप केले आहे. या उपरांत पुण्याहून कुठलीही
कार्यवाही झाली नाही. याच सुमारास नाशकास गोविंद तात्यांना एका अज्ञात
इसमाने आषाढ कृष्ण षष्ठीस लिहून कळवले की हे सर्व श्रीमंतांच्या इच्छेनुसार
होत असून त्यांनी हे सर्व बाबा सरनाईकांकरवी करवून घेतले. तस्मात् हे
सिद्ध होते की प्रत्यक्ष अंमलबजावणी विसाजी आणि बाबांनी केली असली तरीही
त्यांच्या सूचना करणारे वास्तविक सूत्रधार कर्नाटकात बसलेले श्रीमंत
रावसाहेब होते. पुढे त्यांनी शपथपूर्वक या कृत्याशी आपला संबंध नसल्याचे
दर्शविले तदापि ती वरपांगी राजकीय स्वीकृती होती हेच उघडपणे निदर्शनास
येते.
उपसंहार :
- सकृद्दर्दशनी अजूनही पुरंदर कोळ्या-बेरडांकडेच असल्याने पेशव्यांनी त्यांच्याशी तडजोड करून बाह्यदर्शनी गड हस्तगत केला ज्यात कोळी-बेरड लोकांनी पुरंदर भविष्यात पुनरपि पुरंदरे किंवा सरनाईकांच्या स्वाधीन करू नये अशी अट ठेवली जिच्यावर पेशव्यांकडूनही स्वीकृती मिळाली.
- कर्नाटक मोहिमेत बापूंनीही आपले त्यागपत्र रावसाहेबांना अर्पिले पण त्यांची कशीबशी समजूत काढून त्यांना श्रीमंतांनी राजसंन्यास घेण्यापासून परावृत्त केले. बापूनेही भविष्यात यथासमय आपले शहाणपण, प्रसंगावधान दाखविले आणि या हलाहलास पचविले.
- आबांनी मात्र अवसानघातकी बुद्धीने या सर्व कारस्थानास आपल्या स्वामीने दिलेले पारितोषिकच समजून मनास लावून घेतले. लौकिकी डाग लावून न घ्यावा हेच ब्रीद आचरून कुणास या घटनाक्रमाबाबत विचारणाही केली नाही. अखेर या धक्क्याचे पर्यवसान शालिवाहन शके १६८७ (ख्रिस्ताब्द १७६५) मध्ये मार्गशीर्ष कृष्ण पंचमीस आबांच्या निजधामास मार्गस्थ होण्यात झाले.
- रामाजी इत्यादिक सरनाईक मंडळींवर तर प्राणांत संकटच ओढवले. चांबळीचे आपले निवासस्थान सोडून आशेची किमपी किरण दिसत नसल्याने निरुपाय होऊन त्यांना सासवडला विठ्ठल शिवदेव दाणी विंचूरकरांच्या वाड्यात आश्रय घ्यावा लागला. एकूणच त्यांची परिस्थिती दयनीय झालेली जाणवते. यात भरडून निघाल्यावर या घराण्याकडून सरनाईकी गेली ती तद्नंतर प्राप्त झाली नाही आणि ते नाममात्र सरनाईक राहिले.
- हा वृत्तांत श्रवण करून सासवडला आलेल्या आबांना कुठल्या मुखाने सामोरे जावे या कल्पनेने त्यांचे कारभारी राघो गंगाधर अत्र्यांचा थरकाप उडाला आणि ते परागंदा झाले. पुढे त्यांनी संन्यास घेतला की जीव दिला याचेही वर्तमान बराच काळ कळले नाही.
- कामठ्यांचीही कर्ती माणसे या सर्वात खर्ची पडून त्यांचीही अपिरिमित हानी झाली, शिवाय घरदारावर धाडी पडल्या ते सांगणे नकोच. ग्रह फिरले की देवघरातूनही भूतं बाहेर निघतात ते हेच.
एकूणच चुलत्या-पुतण्याच्या कलहात येन केन प्रकारेण सहभागी असलेल्या कऱ्हेपठारावरील अनेक कर्त्या लोकांची या सगळ्या घटनाक्रमात वाताहत झाली असे दिसून येते तसेच श्रीमंत माधवराव सरकारांचेही षठं प्रति षाठ्यम् नीतीच्या मार्गे शत्रूंवर वचक बसवण्याचे राजकारणपटुत्वही उमगते.
माहिती स्रोत : श्री कृष्णाजी वासुदेव पुरंदरे संपादित पुरंदरे दफ्तर खंड ३
तळटीपा
[1] The important fort of history is the Purandar Fort — Steemkr
[6] Purandar Fort , Pune
No comments:
Post a Comment