विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 11 September 2022

प्राचीन महाराष्ट्रातील राजे भाग २ राजा सातवाहन


 

प्राचीन महाराष्ट्रातील राजे
भाग                                                   
राजा सातवाहन

पुराणांमध्ये सातवाहन कुळाचा संस्थापक म्हणून राजा सिमुक याचे नाव येते मात्र या कुळाचा संस्थापक होता ' राजा सातवाहन'. अशोकानंतर अल्पावधीतच त्याने स्वतःचे स्वातंत्र्य घोषित केले. सातवाहन हे नाव असलेली त्याची तांब्याची शिशाची अनेक नाणी सापडली आहेत. याशिवाय पैठण येथेसुद्धा सातवाहनाची अश्र्वछाप नाणी सापडली आहेत. त्याने राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला मूलक अश्मकांचे राज्य जिंकून घेतलेले असावे. म्हणजेच गोदा- प्रवरा - दुधना या खोऱ्यातील प्रदेश होय.

त्यावेळी सातवाहनांची राजधानी होती प्रतिष्ठान अर्थात पैठण. काही इतिहासकारांच्या मते जुन्नर ही सातवाहनांची राजधानी होती. मात्र आता पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे की जुन्नर ही क्षत्रप राजांची तर पैठण ही सातवाहनांची राजधानी होती. पैठण हीच त्यांची सुरुवातीपासून, दक्षिणेकडे स्थलांतरित होईपर्यंतची राजधानी होती. तिचे उल्लेख आपल्याला वेगवेगळया साहित्यातून आलेले दिसतात.

सातवाहन राजांची वंशावळ मत्स्य, वायू, ब्रह्मांड, विष्णू आणि भागवत या पुराणांत दिली आहे. परंतु त्यातील राजांचा परस्परांशी मेळ बसत नाही. मत्स्य पुराणात एकूण तीस राजांची नावे असून त्या सर्वांचा मिळून पाचशे वर्षांचा कालावधी समजला जातो.

सातवाहन हा कुळाचा संस्थापक असला तरी त्याच्या कारकीर्दीचा एकूण कालखंड, त्याने केलेला राज्यविस्तार त्याच प्रमाणे नंतर गादीवर आलेल्या सिमुक सातवाहना सोबत त्याचे असलेले नाते असे अनेक प्रश्न आजही पुराव्याअभावी अनुत्तरित राहिलेले आहेत.

-
प्राजक्ता देगांवकर

संदर्भ ग्रंथ
) सातवाहनकालीन महाराष्ट्र - डॉ. रा. श्री. मोरवंचीकर
) महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास मुसलमानपूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...