प्राचीन महाराष्ट्रातील राजे
भाग ३
राजा सिमुक
राजा सातवाहनां नंतर पुराणामध्ये उल्लेख असलेला राजा सिमुक हा सातवाहन राज्याचा सत्ताधीश झाला. साधारणपणे इ.स.पू. २३२ च्या सुमारास तो राजगादीवर आला असावा. मौर्य सत्तेस उतरती कळा लागली बघून त्याने आपला राज्यविस्तार केला. त्याचे राज्य कोकण, पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकापर्यंत पसरलेले होते. शुंग राजांचे काही वंशज मध्य भारतात आणि दक्षिण बिहार मध्ये तग धरून होते त्यांचे सामर्थ्यही सिमुकाने नष्ट करून टाकले.
सिमुकाला सातकर्णी नावाचा महापराक्रमी मुलगा तर कृष्ण नावाचा भाऊ होता. त्याने संपूर्ण महाराष्ट्र व आंध्रातील काही प्रदेश जिंकून घेतला म्हणून त्याचा 'दक्षिणापथपती' असा गौरवाने उल्लेख केलेला आपल्याला दिसतो. आंध्र प्रदेशावर आक्रमण करणारा हा पहिलाच सातवाहन राजा असल्याने पुराणकारांनी त्याला आंध्र असे संबोधले आहे. सिमुकाची ' राया सिमुक ' अशी नाणी हैद्राबाद जवळील करीमनगर येथे मिळालेली आहेत. सिमुकाची राजधानी ही पैठण च होती.
सिमुखाचा उल्लेख नाणेघाटातील प्रतीमालेखात ' राया शिमुक सातवाहनो श्रीमतो ' म्हणजे
' प्रसिद्ध राजा शिमुक सातवाहन ' असा येतो. ही नाणेघाट येथील लेणी सिमुकाची सून असलेल्या नागणिका हिने बांधून घेतली.
पुराणांमध्ये सिमुकास सिंधुक, क्षिप्रक, सिसुक, शिशुक्रोध अशा नावांनी संबोधले आहे. पुरणांनुसर त्याने २३ वर्षे राज्य केले. मृत्यू नंतर सिमुकाचा मुलगा सातकर्णी हा अल्पवयीन असल्याने भाऊ कृष्ण राजगादीवर बसला. त्याने साधारण १८ वर्षे राज्य केले. नाशिकच्या क्रमांक तीनच्या लेण्यात कृष्णाचा उल्लेख आपल्याला सापडतो. तसेच त्याच्या अमात्याचाही शिलालेख इथे आहे यावरून हा परिसर कृष्णाने जिंकून घेतल्याचे दिसते. काही ठिकाणी कृष्णाचा उल्लेख ‘कण्ह‘ असा ही येतो. या राजाचे कोणतेही नाणे आज उपलब्ध नाही.
कृष्णा नंतर सातवाहनांनचा बलाढ्य असा ‘सातकर्णी’ हा राजा झाला.
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ ग्रंथ
१) सातवाहनकालीन महाराष्ट्र - डॉ. रा. श्री. मोरवंचीकर
२) महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास मुसलमानपूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे
३) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Sunday, 11 September 2022
प्राचीन महाराष्ट्रातील राजे भाग ३ राजा सिमुक
Subscribe to:
Post Comments (Atom)
“कोरलाईचा किल्ला”.
१३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
## धनगर व माळी समाजातील लढवय्ये ## दामाजी थोरात postsaambhar:Udaykumar Jagtap ## ## ## नायगाव ,तालुका -पुरंदर जिल्हा -पुणे , गा...
-
*राणूबाई भोसले-जाधव* राणूबाई म्हणजे शंभूराजांची दुसरी आईच.शंभूराजांचा जन्म झाला त्या दिवशी बेभान होणाऱ्या म्हणजे "राणूबाई".त्यां...
No comments:
Post a Comment