विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 October 2022

शिंदे घराणे - द ग्रेट मराठा

 



शिंदे घराणे - द ग्रेट मराठा

पोस्तसांभार ::नरेंद्र पाटील 

इसवी सन पूर्व काळात वैशाली गणराज्य हे सूर्यवंशी राजा विशाल यांनी स्थापन केले, तिथे सुर्यवंशी क्षत्रिय राज्य करीत होते. पण नंतर जेव्हा नंद घराण्याचं राज्य तिथे आले तेव्हा अतिशय विपरीत परिस्थिती आली आणि ते नंद राजे अत्याचार करू लागले तेव्हा कित्येक सुर्यवंशी क्षत्रिय राजे दिल्ली,पंजाब,महराष्ट्र अशा ठिकाणी गेले.वैशाली गण राज्यातून आलेले म्हणून ते वैस अथवा बैस क्षत्रिय म्हटले गेले.ह्याच बैस राजघराण्यात हर्षवर्धन राजा झाला.

इसवी सनाच्या सहाव्या शतकानंतर बैसवाडा येथून श्रीरामसिंग हे दक्षिणेत महाराष्ट्र मध्ये आले.त्यांच्या दोन मुलांपैकी एक रतनसिंग है सिंदखेड येथे राहिले,आणि त्यामुळे ते शिंदे म्हटले गेले.शिंदे घराणे हे सूर्यवंशी बैस शाखेचे राजपूत घराणे आहे.श् दोन्ही मुलांची वंशावळ वाढत जाऊन आजचे शिंदे घराण्याचा विस्तार वाढत गेला, रतनसिंह यांच्या वंशातील एक पुरुष पुढे कर्नाटक मध्ये गेले.आणि श्री रामसिंह यांचा जयसिंह यांच्या वंशात पुढे रविराव हा पुरुष झाला. शिंदे घराणे हे शेष वंशी ही आहेत,अर्थात प्रभू श्रीरामचंद्र यांचा लहान भाऊ भरत यांच्या वंशात तक्षक नावाचा राजा झाला ,जो की नाग अवतार मानण्यात येतो,तसेच लक्ष्मण यांना सुद्धा श्रीहरी च्या शेषनागाचा अवतार मानण्यात येतो. पण भरत किंवा लक्ष्मण हे मूळचे सूर्यवंशी घराण्यात आहेत आणि नंतर ते शेष वंशी मानले जातात,शेषवंश हा सुर्यवंशाचाच एक भाग आहे.

शिंदे घराण्याचे गोत्र कौंडिण्य आहे,तर वंश हा सुर्यवंश आहे.देवक समुद्री वेळ अथवा मरिदी चा वेल आहे. या घराण्याचा वेद यजुर्वेद - मध्यंदिन आहे, मंत्र गायत्री मंत्र आहे, ध्वजाचे चिन्ह श्रीसूर्यनारायण आणि शेषनाग असे आहे, गोत्राचे प्रवर अंगिरस,बृहस्पती आणि कौंडिण्य असे आहेत.हत्यार तलवार आहे.मूळची राजधानी राजस्थान मध्ये रणथंबोर तसेच, राजस्थान मधील नागौर,कर्नाटक मध्ये पत्तदकल,बदामी आहेत.सध्याची एक शाखा ग्वाल्हेर येथे आहे.या घराण्याची कुलदैवते ही प्रामुख्याने, करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी, श्री रामवरदायिनी,श्रीतुळजाभवानी,तसेच श्री ज्योतिबा अशी आहेत.

काही इतिहास कारांच्या मते कर्नाटक मध्ये जो सेंद्रक वंश होता.राजस्थानथे साधारण इसवी ३०० ते ४०० मध्ये नागवंशाच राज्य होऊन गेले,राजस्थान, रणथंब ही शिंद्यांची राजधानी सांगितली जाते तर बदामी सुद्धा सांगितली जाते,चालुक्य काळात पुन्हा हे घराणे भरभराटीस आले,यदवांशी काही काळ लढाया झाले तर कदम-कदंब - चालुक्य अश्या राजघराण्यांशी संबंध होते.आज ही शिंद्यांच्या देव्हार्यात नागाची आणि श्रीसूर्याची पूजा अर्चना मोठ्या मनीभावाने केली जाते.! सेंद्रक या नावापासून शिंदे हे नाव प्राप्त झाले. सेंद्रक हे अगदी पूरातन काळापासून व सर्वशृत असे मध्यभारत कालीन घराणे आहे. ते मुळच सिंध पंजाब प्रांताचे राजे होते. पुढे तापीच्या दक्षिणतिरी खानदेशी वसाहती केल्या. सेंद्रक घराण्यातील भिल्लशक्ती व जयशक्ती यांचे पूर्वकालीन ताम्रपट आजतागायत त्यांच्या स्मृती करीत आहेत. शिंध्यांच्या कुळस्वामी कोल्हापूरजवळ ज्योतिबा वाडी येथे असून रत्नागिरीस देऊळ आहे. त्याची प्रत्येक चैत्र्यात जत्रा भरते.सेंद्रक घराण्यात,ताथवडाकर शिंदे, दसपटीचे शिंदे, कुडाळकर शिंदे, तोरगळकर शिंदे,नेसरीकर शिंदे, घेडवाडकर शिंदे,कण्हेरखेडकर शिंदे,म्हैसाळकर शिंदे,मळणगावकर शिंदे,पिंगोरकर शिंदे, धारवाडकर शिंदे सरकार ही घराणी उदयास आली.

कण्हेरखेडचे पाटील जनकोजी राव शिंदे होते ते राणोजीराव शिंदे यांचे वडील तर शिवशाहीत नेसरीकर घराणे होते,वेडात मराठे वीर दौडले सात या नेसरीतीळ लढाईत प्रतापराव गुजर यांच्यात सोबत विठोजी शिंदे हे सरदार होते,विठोजीराव शिंदे हे शेद्रे बेंद्रे सातारा या गावचे,शाहू छत्रपती यांच्या पहिली पत्नी अंबिकाबाई या शिंदे घराण्यातील,सतराव्या शतकात राणोजीरावांच्या पासून शिंद्यांची जी घोड दोड सुरू झाली ती शेवट 1818 पर्यंत म्हणजे एक शतक चालली,

मराठ्यांच्या प्रत्येक रणसंग्रामत शिंदे घराणे हे अग्रगण्य होते,शिव पूर्व काळात शिंद्यांची घराणी,चालुक्य राष्ट्रकूट,बहामनी, व नंतर आदिलशाही या काळात सुद्धा आपला दरारा कायम राखून होती, रुस्तमराव, झुजारराव,रविराव हे मानाचे किताब या घराण्याकडे होते,सह्याद्रीच्या रांगेतील ताथवडा या किल्ल्याची किल्लेदारी,पुरंदर,धारवाड चंदगड,तोरगल,तिकोना किल्ल्याची किल्लेदारी या घराण्याकडे होती,छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या लढ्यात हे घराणं सक्रिय झाले,यात काळोजी शिंदे ताथवडा,फुलाजी शिंदे तिकोना,विठोजी,यमाजी,महिमाजी शिंदे,बाजीराव शिंदे तानाजीराव शिंदे असे अनेक शूर सेनानी होऊन गेले.

शिंदे घरण्याच्या शाखा:१)ताथवाडकर,२)पिंगुरीकर,३)कुडाळकर(सातारा, सिंधुदर्ग)४)वेंगुर्लाकर,५)दसपटी चिपळूनकर, ६)मजरे दादरकर, ७)पेढांबेकर,८)तिवरेकर,९)नांदीवेसकर, १०मोरवणेकर, ११)दळवटणेकर, १२)कुंभार्लीकर,१३)नेसरीकर,१४)नुलकर, १५)तळेवाडीकर, (नेसरी व आटपाडी),१६)तळसंदेकर,१७)तोरगलकर, १८)संबरगीकर,१९)निपाणीकर,२०)मुंगळीकर, २१)जमखंडीकर,२२)सांबरेकर,२३)बदामीकर, २४)बेंगलोरकर, २५)शिमोगाकर,(कर्नाटक), २६)तंजावरकर (तामिळनाडू ),२७)ग्वाल्हेरकर मध्यप्रदेश ),२८)बडोदेकर (गुजरात), २९)कण्हेर खेडकर , ३०)जांबकर ,३१)आकाडकर,३२)कोरेगावकर,३३)हुमगावकर, ३४)कोपार्डेकर,३५)जखणगावकर,३६)खटावकर, ३७)अपसिंगेकर,३८)वाईकर,३९)लिंबकर, ४०)राणंदकर, ४१)कराडकर, ४२)आसू शिंदेवाडीकर,४३) सालपेकर, ४४) आसनगावकर, ४५) ल्हासुर्णेकर ४६)माथेरानकर,४७)नेरळकर ,४८)पुणेकर, ४९)वेळेकर,५०)पुनाळेकर(मावळप्रांतकर) ५१)तिन्ही वाघोली गांवकर,(वाघोली पुणे,वाघोली सातारा,वाघोली कवठेमहंकाळ,)५२)नाशिककर,५३)सिन्नरकर, ५४)पुणतांबेकर,५५)संगमनेरकर, ५६)अहमदनगरकर, ५७)संजीवनी टाकळीकर,५८)वारीकर(कोपरगाव), ५९)श्रीगोंदाकर, ६०)चांदाकर (नेवासा),६१)बुलढाणाकर,६२)नागपूरकर , ६३)मोहपेकर,६४)नळगावकर,६५)अमंळनेरकर, ६६)धुळेकर ,६७)मळंणगावकर,६८)तिसंगीकर, ६९)कूंडलापुर कर ७०)घाटनांद्रेकर,७१)खरसिंगकर, ७२)भिलवडीकर,७३)पलुसकर,७४)तासगावकर, ७५)बेंद्रीकर, ७६)आरवडेकर ,७७)माजंर्डेकर,७८)वाघापुरकर, ७९)कवठेएकंदकर,८०)बेणापुरकर, ८१)जरंडीकर,८२)जतकर, ८३)देवीखिंडकर,

८४)चिंचणीकर,८५)मनेराजुरीकर,८६)उपळावीकर,८७बोरगावकर (वाळवा)८८) इस्लामपूरकर, ८९) करंजवडेकर,(वाळवा). ९०) टोप संभापूरकर,९१)शिराळाकर,९२)आष्टाकर,

९३)म्हैसाळकर,९४)नरवाडकर, ९५)कवठेगूलंदकर,९६)मल्लेवाडीकर, ९७)बुधगावकर ,

९८)धाराशिवकर,९९)तेरकर,१००)ढोकीकर, १०१)उस्मानाबादकर,

१०२)माढाकर,१०३)टणुकर,१०४)करमाळाकर, १०५)सांगोलाकर,१०६)पंढरपूरकर, १०७)मंगळवेढेकर ,१०८)तोंडलेबोंडलेकर,१०९)माळशिरसकर, ११०)अकलूजकर,११२)दौलताबादकर,(औरंगाबाद ),

११३)लोनिकंद ११४) तांबवे कोपर्डे

.......इ. १६८ गावे ९६कुळी मराठा शिंदे घराण्यातील शिंदे यांची आहेत

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...