विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 October 2022

सावंत भोसले



क्षेमसिह हा सावंत भोसले घराण्याचा मुळ पुरुष. सामंत राणा लक्ष्मणसिह याचा नातू. सामंत म्हणजे मांडलिक यावरून सावंत हे पाकृत आडनाव पडले. इ.स. १३४६ च्या सुमारास विजयनगरच्या माधव मंत्र्याने गोमांतकावर स्वारी केली. त्या स्वारीत क्षेमसिहाने पराक्रम गाजविला व माधव मंत्र्याकडून चंदगड, भीमगड, व त्या खालील कोकण भागाचे अधिपत्य मिळविले. त्याचा वंशज मांगसावंत आंबोली घाटातून खाली दक्षिण कोकणात उतरला युद्धशास्त्राकरिता सुरक्षित अशा कुनकेरी येथे त्याने वस्ती केली.

क्षेमसिह हा कुलदैवतेचा महान उपासक होता. त्याने आपला पूर्वज कालभोज उर्फ बाप्पा रावळ यास प्रसन्न झालेली भवानी (व्यानमाता) आपल्या सोबत आणली होती. तिची व पूर्वजांच्या रजपूत वेशांतील प्रतिमांची त्याने कुणकेरी येथे आपल्या निवास्थानी देव्हारयात प्रतिष्ठापना केली. कुणकेरी (सावंतवाडी पासून दोन मैलावर) येथील या निवासस्थानात या भावनाची आज गेली ६५० वर्षे रोज सकाळ संध्याकाळ पूजा केली जाते सावंतवाडीचे राजघराणे पिढयान पिढया या भावनाची उपसना करीत आहे. या देवीच्या पूजेनिमित्त आजही सरकार मासिक बिदागी देत आहे.

क्षेमसिहाच वंशज भामसावंत उर्फ मांगसावंत याची समाधी होडवेड (मठ) गावी आहे. त्याला गोमान्तकालीन फोंडाकिल्यात एक मुलगा झाला. त्याचे न फोंड सावंत. फोंड सावंतचा मुलगा सोमसावंत. क्षेमसिहापासून सोमसावंतापर्यंत घराण्यात एकाच पुरुष होता. सोमसावंत यास तीन मुलगे झाले. १) गोमसावंत २) रूप सावंत ३) पायसावंत.

इ.स. १४७३ मध्ये बहामनी सरदार वजीर महमद गवान याने सावंतांचा पराभव करून विजयनगरच्या अमला खालील कुडाळ कुडाळ प्रांत मुसलमानी अमलाखाली आणला त्यांना या स्वारीत मदत करणारया गोड ब्राम्हण प्रभूकडे त्या प्रांत्ची व्यवस्था सोपवली. विजयनगरचे हिंदुराज्य व बहमनिराज्य यांच्या सतत चाललेल्या रणकंदामुळे पुढे सावंतांना कुडाळ प्रांतावरील आपली सत्ता पूर्णपणे मिळवता आली नाही. परुंतु प्रभूदेसायाना रंगाने घाटाच्या दक्षिणेकडे हिरकू दिले नाही. इ.स. १५६५ मध्ये राक्षसतगडीच्या विजयनगर चा पूर्ण पाडाव झाल्यावर आदिलशहाने कर्नाटक व निजामशहाचे उत्तर कोकण, अर्धा कुडाळ प्रांत आपल्या राज्यात शामिल केला. इ.स. १५७० च्या सुमारास आदिलशहा व निजामशहा दोघांनी मिळून सावंतावर स्वारी करून त्यांचा पूर्ण पराभव केला व सावंतवाडी त्या भागाची सरदेसाकी दिली.

राज्यस्थापना

पायासावंतचा मुलगा खेमसावंत त्याचा मुलगा फोंडसावंत व फोंडसावंतचा महापराक्रमी मुलगा खेमसावंत (ओटनेकर) यास खेमसावंतानी सावंतवाडी संस्थांनचे राज्य प्रस्थापित केले.

वंश विस्थार

१) गोमसावंत (वडील भाऊ) कुणकेरी, माणगाव, माजगाव, कलेली, सांगेली, गरवट, बंदा (निमजगाव), आवळेगाव, कडावल, कसवन, पोखरण, वर्दे, पेंडूर, पणदूर, असरोंडी, किर्लोस, कासरल, तरंदळे, कोळोशी वळीवंडे, किल्ले, सिंधुदूर्ग, शिवडाव, शिरवल व तूरळक इतरत्रही (कुनकावळे, कुपवडे, जंभवडे) डामरे

२) रूप सावंत - मधली शाखा: कुडाळ (किल्लेदार ) आकेरी, हुमरस, वेंगुर्ले, इन्सुली, कारिवडे, इन्सुली (पगा बिल्याची वाडी) इ. गावे.

३) पाय सावंत: धाकटी शाखा - राजे बहाद्दूर श्रीमंत शिवराम राजे भोसले घराणे, सावंतवाडी, हेरे (जहागीरदार)

निलेश सावंतभोसले

 

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...