क्षत्रिय उत्पत्ती कथन
जेव्हा पृथ्वीस नांगर नव्हता, झाडास लागले हो ते व आठरा श्वानें लागली होती तेव्हां पृथ्वीस राजा नव्हता. देव ऋषी मिळून संवाद केला की यज्ञ करावा म्हणजे जो होमांतून पुतळा निघेल तो राज्याधिकारी होईल, असें देवांनी भविष्य केले. नंतर चंदनकष्ठे व बेलकष्ठे मिळ्वून यज्ञ आरंभिला. त्यावेळी घोडयास पर होते. त्यांनी भविष्य देखिले आणि म्हणू लागले की जो ह्या घोडयावर स्वार होईल तो राज्याधिकारी, याप्रमाणे बसून होमांतून जो पुतळा निघाला तो त्या घोडयावर बसून बाहेर जाता झाला ; त्यासरसा यज्ञ विध्वंत्सून ऋषी देव जाते झाले. याप्रमाणे आकांत झाला, नंतर श्री सदाशिव येऊन ऋषीचे शांतवन करुन ऋषी मंडळ मागे आणून यज्ञ आरंभिला. देवांनी आपल्या अंगाचा मळ काढून त्यचा ऐक श्वान करुन होमापाशी रक्षिला तेव्हां त्याने अती भुभुःकार केला. त्या भुभुःकारासरसा होमांतून दुसरा दिव्य पुतळा निघाला तो कसा चतुर्भुज त्याची चिन्हें :-
एका हाती नांगर व दुसऱ्या हाती मुसळ , तिसऱ्या हाती धनुष्यबाण, चौथ्या हाती खड्ग याप्रमाणे तेजःपुंज निघाला. त्याचे तेज कोणासही सहन होईना म्हणून श्रीशंकराने झारीतील उदक मंत्रून टाकिले आणि सभोंवती धार फिरविली. त्या धारेसारखा धारराव पवार जन्मला, तो असा की हाती खड्ग घेऊन उभा राहिला, नंतर सुवा जन्मला. खड्गाचे आऊत हातावर खंडागला जन्मला. तसाच चंद्रलाभही पैदा झाला.
शंकराने अग्नीगोला केला तेथून कवडा जन्मला. चव्हाणाने पवारास प्रधान केला आणि सांगितले की, धनुष्यास बाण लावून घोडयाचे पर छेदून टाकावे. मग त्याने आज्ञा मानून पर छेदिले त्यातून पृथ्वीस राजा झाला. मग पृथ्वीस नांगर लागला मग शंकराने उदक शिंपून यज्ञ समाप्त केला. उदक शिंपितांच तेथून निकम जन्मला. मग कर्दम शोधिला तेथे कदम जन्मला, विगल शोधिला तेथे विगावक जन्मला याप्रमाणे होमाच्या पुतळ्यांचे विस्तार.
क्षत्रिय धर्म चालविणारी मराठयांची ९६ कुळे आहेत. ती या प्रमाणे :-
१
भोसले
२
गायकवाड
३
पवार
४
शिंदे
५
सावंत
६
मोहिते
७
चव्हाण
८
इंगळे
९
महाडिक
१०
कदम
११
माने
१२
काळे
१३
अंग्रे
१४
जाधव
१५
साळुंखे
१६
हंडे
१७
काकडे
१८
राणे
१९
घाटगे
२०
जगताप
२१
चालुक्य
२२
यादव
२३
ढमढेरे
२४
लाड
२५
जगदळे
२६
ढवळे
२७
दाभाडे
२८
धुमाळ
२९
थोरात
३०
दळवी
३१
नलावडे
३२
पानसरे
३३
पिसाळ
३४
मालप
३५
फाळके
३६
आंगणे
३७
सिसोदे
३८
विचारे
३९
मालुसरे
४०
तावडे
४१
मोरे
४२
खैर
४३
बागवे
४४
राऊत
४५
रेणुसे
४६
वाघ
४७
पांढरे
४८
भोगले
४९
बागराव
५०
भागवत
५१
मुळीक
५२
सुर्वे
५३
क्षीरसागर
५४
शितोळे
५५
ठाकूर
५६
शंखपाळ
५७
शिरके
५८
तुवार
५९
मधुरे
६०
म्हांबर
६१
बांडे
६२
तेजे
६३
देवकांते
६४
शलारे
६५
सांबारे
६६
फांकडे
६७
हरफळे
६८
निकम
६९
दरबारे
७०
कोकाटे
७१
ढेकळे
७२
थोटे
७३
अहीर
७४
पारटे
७५
सालव
७६
पालांडे
७७
फाटक
७८
जगधने
७९
धायबर
८०
पिंगळे
८१
फडतरे
८२
भोवरे
८३
रसाळ
८४
खंडतरे
८५
दाढे
८६
ढोणे
८७
मिसाळ
८८
पाठारे
८९
बाबर
९०
भोईटे
९१
गव्हाणे
९२
गवसे
९३
नालिंवरे
९४
ढमाले
९५
पाळवे
९६
खंडागळे
No comments:
Post a Comment