संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर येसुबाई यांचं काय झालं?
sambhar: मासिर इ आलिंगरी
रामायण
मध्ये श्री रामाला आणि महाभारत मध्ये पांडवन 14 वर्ष वनवासात काढावी
लागले त्याचे आपल्या ला किती कौतुक , हे करताना आपण मात्र येसूबाईंनी
कैदेत काढलेले 29 वर्षाचा त्याग सहज विसरतो.(१६९० ते१७१९)
एकोणतीस
वर्षे ज्या माऊलीने स्वतःला मोगलांच्या कैदेत ठेवून शिवछत्रपतींचे
स्वराज्य अबाधित ठेवले त्या युवराज्ञी येसूबाईबद्दल इतिहासाला अधिक माहिती
नाही हे दुर्दैव कोणाचे?संभाजी महाराज आग्रा सुटकेचा मरण पावले असे समजून
काही दिवस त्यांनी विधवेच्या रुपात काढले असतील.जेंव्हा संभाजी महाराज वर
मंत्रीमंडळाकडून कट कारस्थान केले त्यावेळी राजाराम महाराजांशी पुत्रवत
प्रेम त्यांनी केले असेल.ज्याच्या वडील आणि भाऊ संभाजी महाराजांनी मारले
त्या खंडो बल्लाळ ला त्यांनी मुलगाच मानले आणि नंतर ही पुण्याई स्वराज्याला
कामी आली.नवऱ्याला हाल हाल करून ठार मारल्यावरही स्वराज्याचा गाडा
चालविण्यासाठी स्वतःचे आभाळाएवढे व्यक्तिगत दुःख बाजूला सारून
शिवछत्रपतींनी उभारलेले स्वराज्य वाचवण्यासाठी स्वतःला आणि पोटच्या
गोळ्याला शत्रूकडे तब्बल तीस वर्षे ओलीस ठेवून घेणारी ही हिमालयाइतकी उंच
स्त्री पाहिली की राष्ट्रसेवा म्हणजे काय हे आपोआप लक्षात येते.
संभजी
महाराज यांची हत्या झाली तेव्हां त्याच मुलगा शिवाजी (शाहु) हा सहा
वर्षांचा होता. म्हणून जनार्दनपंत हणमंते, प्रल्हाद निराजी, वगैरे कारभारती
मंडळींनी येसूबाई हिच्या सल्ल्यानें असें ठरविलें की शाहू महाराज वयांत
येईतोपर्यंत राजारामा महाराजनांनी त्याच्या नांवानें सर्व राज्यकारभर
पहावा. त्याप्रमाणें राजारामाचें दुसरें मंचकारोहण (सिंहासनारोहण नव्हें)
९फेब्रुवारी १६८९ रोजी झालें. यावेळीं मराठी राज्याची पूर्ण वाताहत झाली
होती. खजिना रिकामा होता, वतनदार प्रामाणिक नव्हती व किल्ल्यांचा चांगलासा
बंदोबस्त नव्हता. शंभुबमहाराजांचा हत्या झक्यावर शाहू महाराजांना गादी वर
बसवणे त्यांना शक्य सहज शक्य होते पण त्यांनी स्वराज्याचा एईचार केला आणि
राजाराम महाराजांना गादी वर बसवले.
सातारा
परळी रायगड पन्हाळा विशाळगड प्रतापगड आणि काहींकिल्ले एवढाच भाग
मराठ्यांकडे राहिला होता.बाकी ठिकाणी सर्वत्र हिरवे सैन्य धावत होते.
असे
ठरले की राजारामानें आपलें राहाण्याचें ठिकाण रायगड हें न ठेवता वारंवार
बदलीत जाऊन रायगडापासून विशाळगडापर्यंतच्या कोणत्या तरी एका किल्ल्यांत
रहात जावें, व मराठयांच्या फौजेनें त्याच्यापासून कोठें तरी जवळच असावें
त्याचप्रमाणें येसूबाईनें आपल्या मुलासह रायगडास व राजारामाच्या कुटुंबानें
विशाळगडास रहावें. राजाराम महाराज काही मोजक्या लोकांसाहित रायगड सोडला
यानंतर थोडक्याच दिवसांत (नोव्हेंबर १६८९) झुलफिकरखानानें सूर्याजी पिसाळ
नांवाच्या किल्लेदाराच्या फितुरीनें रायगड घेऊन तेथें असलेल्या येसूबाईस व
शिवाजीला औरंगझेबाकडे पाठविलें.येसूबाईंना शिवरायांची शिकवणच होती की
प्रसंगी गड किल्ले शत्रूला द्यावेत पण स्वराज्य राखावे. दिलेले किल्ले लढून
परत मिळवता येतात पण गेलेले स्वराज्य परत मिळवता येत नाही.
तिथे
औररंगझेबाने येसूबाईस आणि काही लोकांना मानाने वागवले.मात्र कैदेत
औरंगजेबाने येसूबाई व शाहू महाराजांना अत्यंत सन्मानाची वागणूक दिली .कारण
संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठे खूप आक्रमक झाले होते .त्यामुळे
औरंगजेबाचा हेतू सफल झाला नाही. पुढे तीच चूक न करता त्यांनी येसूबाई
राणीसाहेब व शाहू महाराज यांना मोठ्या इज्जतीने वागवले .गुलाल बार या
निवासस्थानाच्या आवारातच आपल्या छावणी शेजारी त्यांची राहण्याची सोय केली
गेली..
विशेषतह
औरंगझेबाच्या मुलीने झिनतउन्नीसा ने येसूबाईस आणि शाहू महाराजास प्रेमाने
वागवले.भले येसूबाई आणि राजाराम महाराज मनाने एकत्र असले तरी मात्र
औरंगझेब जवळ मात्र त्यांच्यात पटत नाही असेच दाखवले.मला माझे राज्य मिळवून
द्या असे बोलले.औरंगझेबला मात्र शाहू महाराज मुस्लिम व्हावेसे वाटत होते
मात्र त्यास नकार मिळाला पण औरंगझेब चिडू नये म्हणून प्रतापराव गुर्जर
च्या मुलांनी धर्म बदलायला.औरंगजेबाने पुढे शाहुराजांचे धर्मांतर करण्याचा
डाव आखला होता. तो हाणून पाडल्यानंतर वारंवार असे प्रसंग येऊ नये म्हणून
येसूबाई राणीसाहेब यांचे मनामध्ये शाहू राजांचे लग्न करण्याची कल्पना येऊ
लागली. पुढे शाहू राजांचे दोन विवाह पार पडले. रुस्तमराव
जाधव यांचे नातू मानसिंह यांची कन्या राजसबाई व दुसर्या कण्हेरखेडच्या
शिंद्यांच्या अंबिकाबाई .शाहू महाराजांची दोन्ही लग्न मोठ्या थाटामाटात
करून दिल्यानंतर औरंगजेबाने नववधू पाहण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा
येसूबाई राणीसाहेबांच्या काळजाचा ठोकाच चुकला. भोसल्यांच्या राजघराण्यातील
वधू संभाजी राजांची सून औरंगजेब यांच्या समोर पाठवणे येसूबाई राणी
साहेबांना योग्य वाटले नाही .म्हणून त्यांनी एक युक्ती केली .राजसबाईच्या
बरोबर आंदणी नावाची एक दासी आली होती .त्या दासी ची मुलगी विरुबाई ही
अत्यंत रूपवान व हुशार होती. तिला नवरी सारखे नटवून शाहू महाराजांच्या
बरोबर वधूच्या वेशात येसूबाई राणीसाहेबांनी औरंगजेबाकडे पाठवले .आपल्या
मराठा खानदानाचा मान येसूबाई राणी साहेबांनी औरंगजेबाच्या कैदेत असून
देखील राखला .औरंगजेबाने सुनमुख पाहून आशिर्वाद देऊन मोठ्या सन्मानाने
जोडप्यांना परत पाठवले. पुढे याच विरूबाई दासी शाहू महाराजांच्या
कुटुंबकबील्यामधे प्रमुख बनल्या
खालील संदर्भ मासिर इ आलमगीर मधला आहे जी मुघलांच्या एकांगी इतिहास आहे .
राजाराम महाराज निघून गेल्यावर १९९८ मध्ये जुल्फिकारखानाने जिंजीचा किल्ला जिंकला. किल्ल्यात राजाराम महाराजांचा जनानखाना मागे राहीला होता तो खानाच्या ताब्यात आला असे तत्कालिन मोगल बखरकार साकी मुस्तैदखान त्याच्या मासिर-इ-आलमगीरी या ग्रंथात म्हणतो. राजाराम महाराजांच्या चार स्त्रीया, तीन मुलगे व दोन मुलींना खानाने बादशहाकडे पाठवीले असे म्हणतो. मासिर-इ- आलमगिरी मधील उल्लेखानुसार बादशहाने या कैद केलेल्या लोकांना येसूबाई व शाहू महाराजांबरोबर ठेवले. शिवाय राजारामांच्या दोन मुलींची लग्ने समशेरजंग व नेकमान यांच्याशी तर संभाजीराजांच्या मुलीचे लग्न सिकंदर आदीलशहाचा मुलगा मूहिउद्दीन याच्याशी केले असे म्हणतो. मात्र राजाराम महाराजांच्या विवाहीत स्त्रीयांचे स्पष्ट उल्लेख नंतरही मिळतात एक शक्यता अशी आहे की हा जनाना म्हणजे राजाराम महाराजांच्या नाटकशाळा व दासिपुत्र/कन्या असावेत व राजाराम महाराजांच्या राण्यांना शिर्क्यांनी गिरजोजी यादवांच्या मदतीने वेल्लोरच्या जवळ पोहोचवले असावे व पुढे त्या सैन्याच्या संरक्षणाखाली महाराष्ट्रात आल्या.
१७०७पर्यंत
येसूबाई आणि शाहू महाराज महाराष्टातच होत्या.१७०७मध्ये औरंगझेब मेला.त्या
आधी त्याचा लाडका मुलगा अकबर इराण मध्ये आणि मुलगी झेबुनिस्सा
दिल्लीमध्ये मरण पावली.पण येसूबाई आणि शाहू महाराजांना परत दिल्लीबकडे
जावे लागले. औरंगझेब मरतेसमयी जवळ एक पुत्र azamshah होता. त्यानें
मराठ्यांचे उपद्रवामुळें येसूबाई मदनसिंग आणि इतर लोकांना ओलीस ठेऊन शाहू
महाराजास सोडले केलें. तेव्हां शाहूमहाराजांनी त्यांशी करार केला होता कीं
मला राज्यपद मिळाल्यास मी तुमचे आज्ञेंत वागेन. त्याजवर अजीमशानें उत्तर
केले की, जर तूं नीट वागलास तर तुझे वडिलांनी घेतलेला प्रदेशातील व भीमा
आणि गोदा या दरम्यानच्या मुलूखांपैकी कांहीं देऊं.
बाळाजी
विश्वनाथ यांनी त्यांची सुटका केली. मोगलांच्या कैदेतून छत्रपती शाहूंची
सुटका व्हावी, यासाठी ते १७०५ पासून मध्यस्थी करीत होते.येसूबाईंची सुटका
व्हायला मात्र १७१९ उजाडले.
औरंगजेबाच्या
मृत्यूनंतर दिल्ली दरबारात भांडण सुरू झाले होते. आझम शहा मेल्या नंतर
बादशाह फरूख सियर आणि त्याला गादीवर आणणारे सय्यद बंधू यांच्यात भांडण चालू
झाले . सय्यदांचा संपवणे साठी बादशाहच्या राजकारण चालू केले फारुक्षय्यर
ची सर्व कारस्थाने सय्यद बंधू ला काळात होते.बादशाह निझाम उलक जवळ गेला तर
सय्यद बंधू ना त्रासाचे होते.आता सय्यदबंधूंना मित्र शोधावे लागले.
राजकारण करण्यासाठी मराठ्यांशी मैत्री करणे सय्यद बंधू ना पर्याय नव्हता .
त्यामुळे सय्यद हुसेन अली याने पेशव्याचे मार्फत मराठी राज्याशी नवा तह
केला. त्यात शिवाजी महाराजांचे स्वराज्य बिनशर्तपणे शाहू महाराजांना
देण्याचे ठरले. शिवाय दख्खनच्या सहा सुभ्यांचा चौथ आणि सरदेशमुखी हे हक्कही
मान्य करण्यात आले. मोबदला म्हणून शाहू महाराजांनी पंधरा हजार फौजेनिशी
मदत करावी या करारनाम्यावर बादशाहकडून शिक्का-मोर्तब व्हावयाचे होते.
त्यासाठी बाळाजी विश्वनाथ फौजा घेऊन सय्यद बंधूंच्या मदतीस थोरले बाजीराव
बरोबर नोव्हेंबर १७१८ मध्ये दिल्लीस गले . दिल्लीत सत्तांतरण झाले. फरुख
सियरची मरून आता होऊन महमूदशाह गादीवर आला. १७१९च्या मार्च महिन्यात
सनदांवर नव्याने बादशाहचे शिक्कामोर्तब होऊन बाळाजी पेशवे येसुबाई,
शाहूराजे व इतर मराठी सैनिक यांची सुटका करवून साताऱ्यास येऊन छत्रपतींस
भेटले आणि या महान स्त्रीची सुटका तब्बल २९वर्षांनी झाली.
पुढे १७३१ साली येसूबाईंचा मृत्यू झाला.त्यांची समाधी आजपण सातारा जवळ माहुली च्या घाटावर दिसते.
No comments:
Post a Comment