विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 7 October 2022

शिलंगणाचं सोनं - संताजी धनाजीचा पराक्रम खाफीखानाच्या शब्दांत* भाग १

 



शिलंगणाचं सोनं - संताजी धनाजीचा पराक्रम खाफीखानाच्या शब्दांत*
भाग १
* फार्सी पाठ *
१) दस्तगीर व मक्तूल गरदिदन संभा-ए जहन्नमी बिसयार अज़ सरदारान नामी
२) मरहाथा अज़ तरफ राम राजा बराए ताख्त ओ ताराज मुल्क कदीम व जदीद
३) इंतिशार याफ्ता अतराफ़ अफ़वाज -ए पादशाही अल्म शुहरत बर अफ़राशता आग़ाज़ शोखी
४) व दस्त अंदाजी अज़ हद गुजरानीदा गारहाए दस्त ब दस्त नमूदंद की ब-तफसील
५) आन कलम रा रंजा दाश्तन अज़ सर रिश्ता ए दूर उफ़्तादन अस्त अम्मा अज़ान
६) जुमले संता घोरपुरा व् धना जादू की अज़ सरदारान नामी साहब पांजदह
७) बिस्त हजार सवार जरार जंगी मौजूदे बुदंद व मरहताए साहब फ़ौज
८) दीगर रफाकत व इताअत आन्हा मी नमुदंद चश्म अज़ खमहाए अज़िम अज़ आन्हा
९) ब-सरदारान फ़ौज-ए पादशाही मी रसीद ख़ुसूसन संताए नाबकार दर ताख्त
१०) ओ ताराज मामूर है हाए मशहूर व मुकाबले नमुदन ब-उमराए फ़ौज सर फ़ौज उमदा
११) चुनान शुहूरत गिरफ़्त की हरकरा बा ऊ मुकाबले व मुघतले इत्तेफ़ाक़ मी
१२) उफ़ताद सिवाए आंकी कुश्ता शुद या अज़ खमी गुश्ते असीर गर्दद या हज़िमत
१३) याफ्ता फ़ौज व बहिर ब-ग़ारत दादे जान ब-दर बोरदन हयात दोबारा दानद
१४) चारहाए कार नमी दानिस्त व हरतरफ की आन सग लाइन नाबकार बे पैकार
१५) कमर मी बस्त हैच यक अज़ उमराए जी वकार पादशाही दर मुकाबील ए ऊ
१६) कमर न मी बस्त व हर समती की बा-फ़ौज जहान आशूब रव मी आवार्द
१७) दिल शेर मर्दान रज़्म अज़ मा रा दर तज़लजोल मी अंदाख़्त चुनांची इस्माईल
१८) खान यकमराकी अज़ सरदारान तहव्वुर पेशाए मशहूर दकन गोफ्ता मी शुद व ब-शरह
१९) व तफसील-ए जंग आन न मी पर्दाजद दर मुकाबले व हम्ला ए सफ रुबाए अव्वल अज़
२०) जा बर्दाशते तमाम फ़ौज ऊ रा ब-ग़ारत बर्दा खुद ऊ रा बाद जख्मी गरदीदन
२१) दस्तगीर साख़्ता चंद माह बा ख्वाईश दाश्ता आख़िर मबलग़ कुली गिरफ्ता ख़लास नमूद
*मराठी अर्थ*
संभाच्या (छत्रपती संभाजी महाराज) अटके आणि हत्येनंतर बऱ्याच मराठा सरदारांना रामराजाकडून (छत्रपती राजाराम महाराज) (बादशाही) मुलखाची लूट करण्याचे आदेश मिळाले. त्यांच्या बद्दलच्या बातम्या /अफवा नित्यनेमाने बादशाही फौजेला समजत असत. त्यांची कीर्ती वाढत होती आणि ते करत असलेल्या लुटीची आणि कुरापतींची सीमा झाली होती. त्याचे तपशील लिहायचे झाल्यास माझ्या (खाफीखान ) लेखणीला फार दुःख होईल. असो आपण मूळ विषयापासून भरकटत चाललो आहोत त्यामुळे आता परत आपल्या विषयाकडे येऊ.
या मराठा सरदारांमध्ये संता घोरपडा (संताजी घोरपडे) आणि धना जाधव (धनाजी जाधव) नावाचे दोन सरदार होते. ते अनुभवी आणि कसलेले लढवय्ये होते आणि त्यांच्या हाताखाली पंधरा ते वीस हजारांचे घोडदळ असे. इतर मराठा सरदारांनी त्यांचे नेतेपद मान्य केले होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या फौजांनी बादशाही फौजांचे फारच नुकसान केले.
या दोघांमध्ये (संताजी आणि धनाजी ) मध्ये संता (संताजी) हा फारच दुष्ट आणि मुलखाची लूट करण्यात व बादशाही उमरावांवर हल्ले करण्यात अग्रेसर होता. त्याच्याशी ज्याची गाठ पडत असे तो एक तर मारला जात असे किंवा जखमी होत असे. त्याच्या तावडीतून जर एखादा सुटलाच तर तो फक्त त्याच्या जिवानिशी परत येत असे. त्याचे सामान आणि सैन्य काही परत येत नसत ! हा संताजी (इथे खाफीखान संताजीला 'सग' म्हणजे कुत्रा अशी शिवी देतो) जिथे असे तिथे बादशाही उमरावांना काहीही करता येत नसे कारण संताजी ने हल्ला चढवला की संताजीचा सामना करण्याची हिम्मत एकाही बादशाही सरदाराला होत नसे ! संताजीच्या नावाने भले भले शूर सरदार चळाचळा कापत असत !
इस्माईल खान नावाचा सरदार दक्षिणेतला एक अत्यंत शूर आणि कुशल सेनानी म्हणून प्रसिद्ध होता परंतु संताजींशी झालेल्या पहिल्या सामन्यातच त्याचा पराभव झाला. संताजीने त्याच्या सैन्याला लुटले आणि तो स्वतः जखमी होऊन कैद झाला. काही महिन्यानंतर मोठी रक्कम वसूल करून संताजीने त्याची सुटका केली.
~ मुंतखबुल्लूबाब, खाफीखान , पृ ४१५-४१६
भाग १ समाप्त
क्रमशः
सत्येन सुभाष वेलणकर
पुणे
विजयादशमी (५ ऑक्टोबर २०२२)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...