भाग १
कर्नाटकगतं भूपं श्रुत्वा स यवनेश्वर : | बलानि प्राहीणोत्तत्र स्वयमन्वागमद्वली || राजा
( म्हणजे छत्रपती राजाराम ) कर्नाटकात गेला असे ऐकून त्या यवनेश्वराने (
औरंगझेबाने ) तिकडे आपले सैन्य पाठविले व तो पराक्रमी (बादशहा) स्वत:ही
मागोमाग गेला पुढे …. वीस मुक्काम [प्रवास] केल्यावर राजाचा पराक्रम
त्याच्या [बादशहाच्या ] कानी आला,कर्नाटकातील राजे एकजुटीने राजाराम
महाराजांच्या मागे सैन्य, आर्थिक बळ पुरवून उभे राहिले . या द्वारे संपन्न
[स्वमित्र बलसंपन्न ] छत्रपती राजाराम आपणास लढाई देण्यास येत आहे हे
ऐकून औरंगझेब मनात घाबरला,[दीनमनाभवत ] शिव छत्रपतींनी व तत्पूर्वी
शहाजीराजे यांनी उभारलेले दक्षिणेतील स्वराज्य असे कामी आले
,----------------------------- मुळात रायगडचा किल्लेदार चान्दोजी काटकर
होता, शिवाय येसाजी कंक अधिकारी ,इतिहासकारांनी सूर्याजी पिसाळ वर
किल्ल्याच्या बचावास होता असे शंभर वर्षापूर्वी लिहिले , सूर्याजी पिसाळ
किल्लेदार नव्हताच वा वर किल्ल्यात नव्हता, याची कागदपत्रे पुढे आली पण या
प्रसंगी फितुरी केली म्हणून सूर्याजी पिसाळ मराठी मनात रुजविला की पुढे
१९६८ आदरणीय जयसिंगराव पवार सरांनी यावर सविस्तर लेख इतिहास संशोधन
मंडळाच्या निबंध संग्रहात लिहूनही सूर्याजी पिसाळ हा फितुरीसाठी मराठीत
प्रतिशब्द म्हणून प्रचलित राहिला, म्हणून या विषयी सविस्तर लिहावे लागते
आहे, • सूर्याजी पिसाळ म्हणजे प्रसंगी धनाजी जाधव यांस देखील उर्मट बोलून
टिंगल करणारा गृहस्थ,तो त्या काळातील एक 'enterprising ' व्यक्ती, पिसाळ
यांच्या म्हणण्यानुसार निहार्खन गौरी फौजदार याच्याकडे वाईची देशमुखी अडकली
होती,फिरोन कोणी पिसाळाची देशमुखी म्हणेल त्यास पायलीभर मीठ चारावे असे
म्हटले जाई कारण मातुश्री पिलाऊ यांनीच ती त्यास विकली होती,पण सूर्याजीने
बराच पैसा खर्चून व झुल्फिकारखानासोबत रायगड वेढ्यात कामगिरी बजावून ती
परत मिळवली , , सूर्याजीने रायगड वेढ्यात काय कामगिरी बजाविली ? ती फितुरी
होती का ?याचा शोध घेतल्यास काय सामोरे येते? रायगड नोव्हे १६८९ ला पडला
,झुल्फिकाराने जानेवारी १६९० लाच पिसाळाना देशमुखी परत केली.पुढे पिसाळ
यांच्यातच देशमुखीचा वाद लागला, राजाराम महाराज , ताराराणी यांनी पुढे
सूर्याजी व वंशजांना वतने दिली आहेत , राजाराम महाराजांनी नाते जोडले
एवढ्याच बाजू सांगून आणखी कलुषित इतिहास मांडला जातो , निष्कर्ष वेगाने
काढले जातात , सूर्याजीने पैसे खर्च करून देशमुखी मिळवली हा एक मान्य
मुद्दा मात्र प्रसंगी त्याची वतन पत्रे बनावट , आमची खरी असे त्याचे
वाटणीदार म्हणतात तो लष्करी मोहिमात असे ही देखील मान्य बाब म्हणता येते
मात्र देशमुखी मिळविण्यासाठीरायगड वेढ्यात त्याने काय कामगिरी बजाविली ?
काहींनी तो किल्ल्याच्या बचावास होता असे[च] लिहिले पण का ? खरे तर रायगड
पडल्यावर झुल्फिकाराने त्याला जानेवारी १६९० मध्ये देशमुखी दिली , त्या
पत्राच्या मागे सानसाद सोबत त्याने रायगड घेण्यात चाकरी केली असा शेरा आहे,
वतन तंट्यात त्याचे विरोधक अन्यत्र म्हणतात याने रायगडाला मोर्चे लावले
दरामतीत पडून खानास गड हस्तगत करून दिला. म्हणजे तो मुघालाची चाकरी करत
होता . आता त्याचे वतन पुढे त्याने झुल्फिकारास सोडून छ राजाराम यांची
चाकरी धरल्यावर राजारामांनी दिले , पुढे राजारामांच्या मंत्र्यांसमोर
विरोधी पक्ष गेल्यावर त्याचे वतन गेले. पुन्हा राजारामांनी दिले, मग शाहू
आल्यावर सूर्याजीची विरोधी पिसाळ मंडळी त्वरित शाहू महाराजांकडे तक्रार
घेऊन गेले त्यांच्या बाजूने धनाजी जाधव राहिले तेव्हा सूर्याजीने त्यांची
टिंगल ही केली “मी काही जाधव यादव नव्हे ! तुम्ही कऱ्हाडची देशमुखी दहा
हजार रुपयाची घेतली !ऐसा काही आपण नव्हे !, अधिक खर्च केलाय,” शाहूंनी
धनाजी जाधव यांचे म्हणणे नाकारले व सूर्याजी जे म्हणतोय ते का नाकारायचे
असा सवाल केला; दोही देत असता बळजोरीने वस्त कसे द्यावे असा शाहू
छत्रपतींनी सवाल केला या भांडणात दोन्ही पिसाळ पक्ष बाजूला सारून शाहूंनी
स्वत: कडेच वतन घेतले, [१६०७- १६०९] पुन्हा इतकेच नव्हे शाहू राजांनी
त्याला पुन्हा वतन बहाली केली [१६१०]! सूर्याजीची छत्रपती शाहूंनी पाठराखण
केली हा यातील महत्त्वाचा मुद्दा आहे !
*साभार:---नीरज साळुंखे*
*साभार:---नीरज साळुंखे*
No comments:
Post a Comment