विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 12 October 2022

सरदार सूर्याजी पिसाळ देशमुख भाग 2

 




सरदार सूर्याजी पिसाळ देशमुख
भाग 2
जे जे लोक शिवसेना सोडून गेले त्यांना बाळासाहेब आणि कट्टर शिवसैनिक सूर्याजी पिसाळ म्हणायचे.तर हा सूर्याजी पिसाळ मराठ्यांच्या इतिहासतिक सर्वात गद्दार माणूस पण आता इतिहासात वेगळी वेगळी मते असतात . सूर्याजी पिसाळ खरच इतका गद्दार होता का?
वाईच्या वतन साठी / देशमुखीसाठी मराठ्यांची राजधानी रायगड मोगलांच्या घशात घातली, असा त्याच्यावर आरोप आहे. आज फितुरीचं दुसरं नाव म्हणून त्याचंच नाव घेतलं जात आहे.संभाजी महाराज यांच्या मृत्यू नंतर झुल्फिकारखान ने रायगड ला वेढा घातला.मराठ्यांची राजधानी ल वेढा अन राजा च नुकतीच हत्या झाला होता.तरी पण मराठयानी आठमहिने किल्ला निकराने लढवला.किल्ला इतका दुर्भेद्य की लढून तो बहुधा मोगलांस प्राप्त झाला नसता. वेढा घालून आठ महिने झाले, तथापि ईतिकादखानाचे (जुल्फिकारखानाचे) पाऊल यत्किंचित् पुढे पडेना. बादशहाने सारखी त्यास निकड लाविली; आणि त्याच्या मागणी प्रमाणे सामान फौजा सर्व काही तयार करून पाठविले. तेव्हा खानाने कपटविद्येचा प्रयोग केला. सूर्याजी पिसाळ हा एक हुशार गृहस्थ वर किल्ल्याचे बचावास होता किल्लेदार म्हणून. त्यास वाईची सुभेदारी देण्याचे आमिष दाखवून खानाने फितूर केले. किल्ल्याचे दरवाजे उघडून सूर्याजीने मार्गशीर्ष शु. 2 रविवार ता. 3-11-1689 रोजी मोगलांचा आत प्रवेश करून दिला. त्या आधीच आधीच राजाराम महाराज काही निवडक लोकसंहित रायगडावरून निसटले होते.जिवास अपाय करणार नाही अशी खानाकडून शपथ घेववून नशिबाला बोल लावीत येसु बाईंनी मुलामंडळींसह खानाचे स्वाधीन झाली.
ही कथा जनमानसात प्रसिद्ध आहे.
मराठेशाहीचा मागोवा - डॉ. जयसिंगराव पवार या मध्ये सांगितलेला हा खरा मागोवा.
सूर्याजी पिसाळ फितूर नव्हता याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे रायगड मोगलांच्या हाती गेल्यानंतर काही काळात तो पुन्हा राजाराम महाराजांच्या सेवेत रूजू झाला. एवढेच नव्हे, तर राजाराम महाराजांनी त्याला वाईची देशमुखी दिली.
सुर्याजी नाईक पिसाळ देशमुख यांचा शिक्का...१)फारसी शिक्का भाषांतर:-सुर्याजी वल्द फिरंगोजी नाईक पिसाळ देशमुख परगणा वाई निशानी नांगर 1101
@pachivada_ozarde.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...