पोस्तसांभार ::आशिष माळी
हेमाद्रि
हा यजुर्वेदी, वत्सगोत्री ब्राह्मण होता. काही प्रमाणात दोषी असला तरी
खिलजी आक्रमणाचा सर्व दोष एकट्या हेमाद्री उर्फ हेमाद पंतांना देणे चूक
आहे.आज जी आपण ज्वारी खात आहोत, तेही ह्या हेमाडी पंतांमुळे. अनेक मंदिरही
ह्यांचीच देणगी आहे. मोडी राजलिपीही ह्यांनीच केले. पण हे मूळचे
मराठा(महाराष्ट्री) नसून कर्नाटकातील कारवारच्या दक्षिणेस दक्षिण कन्नड
भागातील होते.
आठव्या
शतकापासून भारतावर अनेक यवनी आक्रमणे होत होती. पंजाब चे अनेक राजे,
शिवाय प्रतिहार, गुर्जर, राजपूत ,काश्मिरी ब्राम्हण राजे यांनी ही आक्रमणे
थोपविली होते. दक्षिणेकडील अनेक राज्यांना नैसर्गिक संरक्षण मिळाले होते.
त्यामधील चोळ, पांड्य, चालुक्य, सातवाहन, आदी राज्यांना यवनी आक्रमणाची
काळजी नव्हती. राजा राजेंद्र चोलच्या काळातच सोमनाथ मंदिर लुटले गेले. जर
त्यावेळी दळण वळण आणि संचार व्यवस्थित असता, तर कदाचित या राजाने हे होऊ
दिले नसते.
हेमाडी
पंत यांची निश्चितच मोठी चूक होती, यात दुमत नाही. जरी यादव राजे असले,
तरी सर्व कारभार हेमाडी पंताकडेच होता. त्यावेळी महाराष्ट्रात कर्मठपणा
इतका वाढला होता की, संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या बंधूंनाही ह्याचा त्रास
झाला. पैठण ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती.
1.भारताचे अनेक राज्य हे हत्ती दल केंद्र स्थानी मानून युद्ध करत होते.
2. अनेक मोठी सैन्ये, पायदळ, हत्ती आदी पारंपरिक साधने अवलंबित होते. त्यामानाने तुर्क-अरबी-मंगोल आक्रमकांनी घोडा वापरला.
3. त्यांच्याकडे असलेले चपळ घोडदळ, तलवारी,भाले आदी अस्त्रे हे भारतीय अस्त्रांहून सरस होते.
4.
हेर खाते: यादव साम्राज्याला हेरखाते होते की नव्हते याची शंका होती.
खिलजी, काफुर हे अचलपूर म्हणजे महाराष्ट्रात आले, तरी ह्यांना वार्ता
नव्हती. यांचे सैन्य दुसरीकडे गुंतलेले होते. शिवाय या यवनी लोक कडे खूप
मोठे सैन्य आहे, असे भासावलेले होते. प्रत्यक्षात यादव सैन्य पुढे त्यांचे
सैनिक 30% च होते. अवघ्या पाच हजारात यांनी देवगिरी जिंकले, पण मागे मोठे
सैन्य येत आहे अशी अफवा उठविली. यादवांकडे कोणत्याही प्रकारची गुप्तवार्ता
नव्हती . त्यांनी सरळ-सरळ शरणागती पत्करली.
5.
राजाचे प्रधान हेमाडी पंत हे पूजा कशी करायची, सोवळे कसे असावे अश्या
गोष्टीकडे गुंतून राहिले. प्रजेतील क्षात्रतेज घटले. सैनिक आणि सैन्य
पराक्रम दुय्यम झाला. हेमाडी पंताने या कडे लक्ष दिले असते, तर कदाचित यवनी
सत्ता दक्षिणेत वाढली नसती. पण हा जर तर चा खेळ आहे.
अनेक कारणे होती. यात हेमाडी पंत आणि त्या आधीच्या प्रधानांचा दोष होता.
देवगिरीच्या
राजा यादवाद्वारे सर्व आदेश सोडण्याचें व दरबाराचे कागदपत्र ठेवण्याचें
काम त्याच्याकडे होतें. हेमाद्रि हा उदार, विद्येचा भोक्ता व स्वत: विद्वान
असल्यामळें, विद्वान लोकांनां त्याच्याकडे आश्रम मिळत असे. तो धार्मिल,
सुशील व शूरहि होता.
देवगिरीच्या महादेव व रामदव राजांच्या कारकिर्दीत होऊन गेलेला प्रधान आणि ग्रंथकर्ता. त्यांनी प्रधान पदा शिवाय अनेक पुस्तकं लिहला.
- धर्मशास्त्रावरील ग्रंथाच्या ''श्रीकरणाधिप'' ''नावाचा ग्रंथ लिहिला.
- धार्मिक आचारविचारांनां सुव्यवस्थित लोकांना संगण्या साठी देण्याची मूळ चतुर्वर्गचिंतामणि नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथांची (१) व्रतखंड, (२) दानखंड (३) तीर्थखंड व (४) मोक्षखंड अशीं चार खंडें आहेत. आणखी परिशिष्टासारखें परिशेषखंड नावांचें पांचवें खंड आहे. त्यांत देवता, श्राद्ध, मुहूर्त, प्रायश्र्चित वगैरे विषयांसंबंधी विवेचन आहे.
- वाग्भटाच्या वैद्यक ग्रंथावर आयुर्वेदसायण नांवाची टीका व बोपदेवाच्या मुक्ताफळ नामक ग्रंथावरहि टीका त्यानें लिहिली आहे.
- आज महाराष्ट्रात सर्वत्र जे हेमाडपंथी मंदिर दिसतात ती याच्या पद्धतीने बांधलेले.ही देवळें चालुक्य शिल्पपद्धतीची असून त्यांत चुना न भरतां मोठाले दगड एकमेकांनां जोडलेले असतात.
- असेही म्हणतात की अर्वाचीन मोडी लिपि हेमाडपंतानें प्रचारांत आपली असें म्हणतात
- महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती वाढविण्याच्या काम त्यांनी केले. ज्वारी चे पीक मोठ्या प्रमाणात त्यांनीच आणले.
संदर्भ
केशव पाध्ये यांचे पुस्तक हेमाद्री.
No comments:
Post a Comment