मलिक अंबर म्हणजे महाराष्ट्राला मिळालेला एक कुशल योद्धा
लेखन :आशिष माळी
4)आजची
औरंगाबाद ही देणगी मलिक अंबर ची.मलिक अंबर ने खडकी शहर वसवले पुढे त्याचे
रूपांतर औरंगझेब च्या नावाखाली औरंगाबाद झाले .औरंगाबादला एक मोठं महानगर
वसवलं, तटबंदी उभारली, पाण्यासाठी नहर ए अंबर बांधली. मलिक अंबर ने
शहराच्या जलव्यवस्थापनाची योग्य काळजी घेतली,त्या करिता हर्सूल तलाव,अंबरी
तलाव(सलीम अली) ह्यांची निर्मिती केली
5)डोक्यावरून
मैला वाहण्याची पद्धत आणि वेठबिगारी हे त्याने सगळ्यात पहिल्यांदा बंद
केलं(स्वतः गुलाम असल्यामुळे त्याला याची कणव आली असावी) .
6)जमीन
मापण्याची दशमान पद्धत ही त्यानेच विकसित केलेली पद्धत.त्या पद्धतीचा
उपयोग अजून ही होत असे.मुघल आदिलशाही कुतुबशाही टिपू अश्या अनेक
सत्ताधारिकांनी या पद्धदतीच वापर केला.
7)शिवाजी
महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांना त्यानेच निजामशाहीत आणलं आणि वतन
दिलं, आज औरंगाबाद बसस्टँड परिसर हा मालोजीपुरा म्हणून ओळखला जातो तो
त्यांनी त्यांच्या नावाने वसवलेला पुरा.
ब्राह्मणांसाठी मलिक अंबरने स्वतंत्र पंडित खाणे सुरू केले होते.
9)असं
म्हणतात कि भारतात खापरी नलाद्वारे पाणीपुरवठा पध्दत ही मलिक अंबरनेच
आणली. दुरवरुन पाणी आणुन साठवण्याची ही पध्दत दुष्काली भागात ही त्याने
यशस्वीपणे वापरली.
निजामशाही दोन, पहिली अहमदनगरची 15 व्या शतकातील आणि दुसरी हैद्राबाद ची 17 व्या शतकातील.
नगरच्या निजामशाही मूळ मराठी ब्राम्हण मलिक अहमद- हा अहमदनगरच्या निजामशाही घराण्याचा मूळ पुरुष होता. याचा आजोबा बहिरंभट नांवाचा ब्राह्मण असून तो गोदावरीच्या उत्तरेस विदर्भातील पाथरी नांवाच्या शहराचा देशपांडे होता. एक दुष्काळांत याचा आजोबा आपल्या तिमाजी नांवाच्या मुलास घेऊन विजयानगराकडे गेला. बहामनी सुलतान अहमदशहा वली याच्या सैनिकांनी विजयानगरच्या स्वारींत तिमाजीस कैद केले व गुलाम म्हणून आणलें. त्याला मुस्लिम बनवून मलिकनायन नांव ठेवलं पुढें सुलतान महंमद यानें काम बघून बढती दिली आणि निजाम-उल्मुल्क ही पदवी देऊन तेलंगणा च्या प्रांतावर त्याची नेमणूककेली . परंतु निजामउल्मुल्कनें मलिक अहमद नांवाच्या आपल्या मुलास नेमणुकीच्या जागीं पाठविलें, व आपण स्वत: सुलतानाच्या दरबारींच राहिला. येथें त्यानें खानेजहानविरुद्ध कारस्थान रचून सुलतानाच्या आदेशानुसार त्याचा हत्या केली व आपण स्वत: कारभारी झाला. यानंतरचा सुलतान जो महंमदशहा याच्या कालखंडात निजामउल्मुल्कनें आपल्या अगोदरच मोठ्या असलेल्या जहागिरींत बीड व मराठवाड्यामधील कित्येक जिल्ह्यांची भर टाकली व आपल्या मुलास तेलंगणाच्या सुभेदारीवरून परत बोलावून त्याची दौलताबाद सुभ्यावर नेमणूक केली. निजामउल्मुल्काचा खून झाल्यानंतर त्याचा मुलगा मलिक अहमद यानें बंड करून तो स्वतंत्र झाला सन 1489 ला , व स्वत:स निजामशाहा ही पदवी त्यानें लावून घेतली. तीच पुढें अहमदनगरच्या सर्व राजांनीं लाविली व त्यांच्या राज्यास यामुळएंच निजामशाही असें नांव पडलें. शिवाय मूळ पुरुष बहिरंभट याच्या स्मरणार्थ या वंशांतील प्रत्येक शहा आपल्याला बहिरी अशी पदवी लावून घेत असे.
ही त्याची खुलदाबाद ला असलेली समाधी !
No comments:
Post a Comment