विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 7 December 2022

मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी,काळीकुटट घटना

 



मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी,काळीकुटट घटना

लेखन :प्रकाश लोणकर
२०० वर्षांपूर्वी-१७ नोवेंबर १८१७ ला मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी,काळीकुटट घटना घडली.शनिवारवाड्यावर डौलाने फडकणारा जरिपटका उतरवून त्या जागी इंग्रजांचा युनियन jack चढविला गेला आणि तो पण ब्रिटीशांचा हस्तक असलेल्या आमच्याच माणसाकडून-बाळाजीपंत नातू कडून!
५ नोव्हेंबर १८१७ ला मराठा इंग्रजांच्या युद्धाची सुरुवात खडकी येथे झाली,मराठ्यांनी जोरदार चढाई केली पण हि लढाई अनिर्णीत राहिली.त्यानंतर १६ नोवेंबर १८१७ ला येरवडा येथे झालेल्या दुसऱ्या लढायीत मात्र घरभेद्यांमुळे इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला.गोखले,विंचूरकर,पटवर्धन हि मंडळी पेशव्यांच्या तोफखान्या जवळ होती .५००० पायदळ असलेले हे सरदार -बापू गोखले सोडून-स्वस्थ बसली व इंग्रजांना आपल्या तोफखान्या पर्यंत येऊ दिले.ब्रिटिशा नि त्याच तोफा मराठ्यान विरुद्ध वापरल्या.बापूने अशा अवसानघातकीपणा बद्धल मराठे सरदारांची भरपूर निर्भत्सना केली.बापूने बाजीरावास ताबडतोब पुणे सोडून सासवडच्या दिशेने निघायचे सुचविले.पण असे केल्यास उर्वरित मराठा सैन्याच्या मनोबलावर त्याचा विपरीत परिणाम होईल ह्या आशंकेने बाजीराव्ने तसे करण्यास सुरुवातीस नकार दिला होता,पण पराभव दिसू लागल्यावर त्याने बापूच्या दुसऱ्या निरोपानुसार पुणे सोडले.जर बाजीराव पुण्यातच राहिला असता तर एल्फिन्सटन ने त्याला तिथेच कैद केले असते व मराठ्यान बरोबरच्या युद्धाचा निकाल तेव्हाच लागला असता व जे घडावे अशी एल्फिन्स्टन ची पण इच्छा होती.याउलट,बाजीरावला अशा होती कि आधी काबुल केल्या प्रमाणे शिंदे,भोसले ,होळकर आदी सरदार ब्रिटीशां बरोबर युद्ध सुरु झाल्यवर आपल्या बाजूने लढतील .
पण तसे काही घडले नाही.
दुसरा बाजीराव पेशवेपदी नियुक्त झाल्यापासूनच इंग्रजांनी मराठ्यांमध्ये दुही ची बीजे रोवण्यास सुरुवात केली होती.पैसा,वतन,जागिरी आदीची आमिषे दाखवून तसेच पेशव्यांना मदत केल्यास इंग्रजांचे राज्य आल्यावर कारवाई करण्याच्या धमक्या पण दिल्या.राष्ट्रविघातक कृत्यात सामील होऊन परकीयांना मदत करणाऱ्यांची त्या काळात पण कमी नव्हती.अशा घरभेदी लोकात बाळाजीपंत नातू अग्रणी होता.विविध सरदारान बरोबरची बाजीरावची बोलणी,चर्चा,आखीत असलेल्या योजना,डावपेच आदी सर्व बाबींची माहिती तो एल्फिन्स्टन ला पुरवित असे.तसेच,काठेवाडचा सर् सुभा विठोबा दिवाणजी,महिना ५० रुपयात पेशव्यांच्या बातम्या इंग्रजांना पुरविणारा गणेशपंत,आंग्र्यांचा दिवान बापू भट,पेशव्यांचा स्वतःचा वकील राघोपंत,चिमणाजी नारायण अशी मातब्बर मुत्सद्धी मंडळी पण स्वार्थापायी एल्फिन्स्तानला सामील झाली होती,अपवाद होता तो केवळ बापू गोखले ह्यांचा!हा बापू गोखले २० फेब्रुवारी १८१८ रोजी आष्टी येथील लढायीत मोजक्या स्वामिनिष्ठ सैनिकांनीशी इंग्रजांवर तुटून पडला व गोळी लागून स्वराज्य संरक्षणासाठी बळी गेला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...