विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 7 December 2022

मराठा इतिहासात मधील सर्वात अवघड प्रश्न " नाना साहेब पेशव्यांनी आंग्रेंचे आरमार का बुडविले? " भाग १

 



मराठा इतिहासात मधील सर्वात अवघड प्रश्न " नाना साहेब पेशव्यांनी आंग्रेंचे आरमार का बुडविले? " भाग १

लेखन :आशिष माळी
मराठा इतिहासात मधील सर्वात अवघड प्रश्न . या मध्ये अनेक लोकं मध्ये मतभेद आहे. त्यामुळे दोन्ही बाजू मांडतो. मुळात हा प्रश्न ऐरणीवर सध्या आहे कारण महाराष्ट्र मधील राजकारण .सध्याच्या मराठा विरुद्ध ब्राम्हण (मुळात राजकीयच जास्त) वादामध्ये नानासाहेब पेशवे विरुद्ध आंग्रे च संघर्ष जास्त चर्चिला जातो.
तुळाजी आंग्रे चे मूळ चित्र १७५६ मध्ये यूरोप मधील ( Literaraly magzine of univeraal review ) मासिकं मध्ये छापून आलेले आणि विषय होता विजयदुर्ग च विजय. मराठ्यांचा हा सरखेल कान्होजी आंग्रे इतकाच पराक्रमी होता. शेकडो किलोमीटर दूर मंगलोर आणि केरळ मधील कलिकात विजय हे मराठ्या इतिहासातील दुर्लक्ष पराक्रमाचा अभिजात नायक . पण दुर्दैव म्हणजे 30 वर्ष मराठ्यांच्या कैद्येत राहून मरण आले.
काहि लोकांचे म्हणणे आहे की नाना साहेब पेशवे यांनी वैयक्तिक आकासा पोटी आंग्रे च आरमार बुडवले.
तर काही लोकांचे म्हणणे आहे की त्यावेळची परिस्थिती अशीच होती की नानासाहेब पेशवे ना पर्याय नव्हता.
काहीही असो त्या वेळी मराठ्यांचे आरमार ची ताकद कमी झाली. इंग्रजांचा उदय झाला . ज्याच्या हाती समुद्र , त्याच्या हाती सत्ता ही शिवाजी महाराजांची उक्ती त्याकाळच्या सत्ताधारी कडून दुर्लक्षित झाले. पर्यायाने इंग्रजांनी प्रभुत्व मिळाले. आणि मराठ्यांच्य विनाशाला अनेक कारणे पैकी एक कारण हे ही होते.
नानासाहेब आणि तुळाजी आंग्रे मध्ये वाद का होता याचे नक्किं कारण कळत नाही. पण १७४९ ल शाहू महाराज चे निधन झाल्यावर छत्रपती राम राजा ल आपल्या बाजूला नानासाहेबांनी वळवून घेतले.रामराजा हा ताराबाई च नातू . पण नानासाहेब आणि तुळाजी मध्ये पटले नाही. नानासाहेबांनी मराठा राज्यावर एककलमी सत्ता बनवली . पण तुळाजी तितकाच पराक्रमी त्यामुळे त्या दोघात जमले नाही. तुळाजी आंग्रे ने नानासाहेब पेशवे संघर्ष चालू केला.
पार्श्वभूमी
प्रतापराव गुजर यांचे धाकटे चिरंजीव सिधोजी गुजर यांनी 1690 पुढे काम करून मराठा आरमार स हातभार लावला. त्याकाळी कान्होजी आंग्रे पण मराठा आरमार मध्ये कार्यरत होते. सिधोजी गुजर पुन्हा देशावर निघून गेले आणि कान्होजी कडे आरमार एकटवले .
सन १६९४ ते १७०४ पर्यंत कान्होजींनी कोकणपट्टीतले मोगलांनी व सिद्दीने जिंकलेले केलेले मराठ्यांचे सर्व किल्ले जिंकून परत घेतले. राजारामां महाराजांनी त्यांची खुश होऊन त्यांना ‘सरखेल’ हा किताब दिला . सन १६९६ मध्ये कान्होजींनी कुलाबा किल्ला जिंकून ते आपले मुख्य ठाणे केले. राजाराम महाराजांच्या निधनानंतर (तारीखकान्होजी नी आपले इमान राखले.
औरंगजेबच्या मृत्युनंतर मोगलांनी शाहूं महाराज सुटका केली. शाहूंनी सन १७०७ साली स्वतःस राज्याभिषेक केला. त्या दरम्यान ताराबाई व संभाजीराजेंचे पुत्र शाहू यांच्यामध्ये गादीबद्दल भांडण सुरू झाला.
ताराबाई ची बाजू घेऊन कोकणात कान्होजी शाहू महाराजांना प्रवेश करू दिला नाही. एकदा तर कान्होजी ने शाहू महाराजांचे पेशवे बहिर्जी पिंगळे यांना कैद केले. पण बाळाजी विश्वनाथ यांनी मुत्सद्दी पणाने त्यांची सुटका केली शिवाय कान्होजींना शाहू महाराज कडे वळवले. शाहू महाराजांनी आरमाराचे सर्व आधिपत्य त्यास दिले. अशा प्रकारे ते शाहूंच्या पक्षात सामील झाले (फेब्रुवारी १७१४) व अखेरपर्यंत छत्रपती शाहूंकडे प्रामाणिक राहिले.
कान्होजींची सत्ता कोकण किनाऱ्यावर कोट मांडवेपासून ते त्रावणकोरपर्यंत पसरली. ही गोष्ट तत्कालीन सिद्दी , मुघल, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज व डच ह्या परकीयांस आणि जंजिऱ्याच्या सिद्दीस देत होती. इंग्रज, डच, पोर्तुगीज व फ्रेंच ह्यांनी कधी स्वतंत्रपणे तर कधी संयुक्तरीत्या कान्होजींवर चढाई केली. पण प्रत्येक वेळी त्या सर्वांचा पराभव झाला. आंग्र्यांच्या अंमलाखालील सागरी प्रदेशांतून जाणाऱ्या जहाजास दस्तक (परवाना) घ्यावयास भाग पाडून समुद्रावर त्यांनी आपले निर्विवाद स्वामित्व प्रस्थापिले आणि सिद्दीस वारंवार माघार घेण्यास भाग पाडले. कान्होजींनी पंढरपूर, आळंदी, जेजुरी आदी अनेक देवस्थानांना इनाम तसेच पैसे दिल्या. कुलाबा व विजयदुर्ग येथे जहाजे बांधण्यासाठी त्यांनी बंदर बनविल्या. त्यांची जहाजे कच्छपासून त्रावणकोरपर्यंत सागरात निर्वेधपणे संचार करीत. त्यांना सेखोजी, संभाजी, मानाजी, तुळाजी, येसजी आणि धोंडजी असे सहा मुलगे होते. कान्होजी च्या मृत्यू नंतर सेखोजी आरमार प्रमुख झाले. पराक्रमी सेखोजि ने सिद्दीचा चांगलाच बंदोबस्त केला होता. छत्रपती आणि पेशवे या दोघांबरोबर चांगले संबंध ठेवून त्यांनी मराठ्यांच्या आरमाराचा विकास केला. पण अल्पायुषी सेखीजी १७३३ साली ते मरण पावले. सेखोजी मरण पावल्यावर संभाजी आणि मानाजी यांच्यात सरखेलपदावरून कलह निर्माण झाला. पहिल्या बाजीराव पेशव्यांनी दोघा बंधूत मध्यस्थी करून सन १७३५ मध्ये संभाजीस ‘सरखेल’ हा किताब आणि सुवर्णदुर्ग किल्ला तर मानाजीस ‘वजारत-म-आब्’ हा किताब आणि कुलाबा किल्ला दिला.
संभाजी आंग्रे चे वापर pirate of carrebean चित्रपटात करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...