सदाशिवराव भाऊंचे उजवे हात मानले जाणारे बळवंतराव हे पेशव्यांचे जवळचे नातेवाईकही होते.
नानासाहेबांनी दिलेल्या संधीचे सोने करीत त्यांनी दक्षिण भारतातील अनेक मोहिमांत त्यांनी महत्वपुर्ण कामगिरी बजावली.१७५७ च्या कर्नाटक मोहिमेची जबाबदारी बळवंतरावांवर होती.तसेच उदगीरच्या लढाईतही त्यांचा महत्वपुर्ण सहभाग होता.
बळवंतरावांचे व्यक्तिमत्व पाहता ते अतिशय तापट स्वभावाचे, जिभेने तिखट मात्र स्वतंत्र असा दृष्टिकोन ,विचार राखून होते.त्यावेळी चंबळ नदी ओलांडून उत्तर भारताकडे जावे हा आग्रह धरून ते दिल्ली ताब्यात घेण्यासाठी ते इमाम-उल-मुल्क आणि सुरजमल जाटासमवेत निघाले.
आणि बळवंतरावांनी दिल्ली ताब्यात घेतलीही.
२२ नोव्हेंबर च्या जनकोजी शिंदेवरील अब्दालीच्या सैन्यावरील छाप्याचेवेळी ते वेळेत पोहोचू न शकल्याने टिकेचे धनीही झाले.
७ डिसेंबर १७६० रोजी नजीबखानाचा भाऊ सुलतान खान याने मराठ्यांवर हल्ला चढवला.अगदी मराठ्यांच्या खंदकापर्यंत रोहील्ले येऊन पोचले.हे पाहताच बळवंतराव हुजुरातीची फौज व गारद्यांचे सैन्य अफगाण्यांवर तुटून पडले.यात नजीबखानाचा काका खली -ऊस-रेहमान मारला गेला.तीन हजाराहून अधिक रोहिल्ले मारले गेले,जखमी झालेले वाट सापडेल तिकडे धावत सुटले.
या विजयाच्या उन्मादाच्या क्षणी एक गोळी बळवंतरावांच्या छातीत घुसली आणि घोड्यावरून पडले तशीच ती रोहिल्ली गिधाडे त्यांच्या प्रेतावर तुटून पडली.यातही काही मराठा घोडेस्वारांना घेऊन सरदार खंडेराव नाईक निंबाळकरांनी बळवंतरावांचे गर्दन अर्धिअधिक छाटलेल्या स्थितीतील प्रेत सोडवले व भाऊसाहेबांपुढे आणून ठेवले.सदाशिवराव भाऊंना या घटनेचा मोठा धक्का बसला.बळवंतरावांच्या जाण्याने मराठा सैन्याची झालेली हानी भरून निघाली नाही.
बळवंतरावांच्या पश्चात त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई सती गेल्या.पानिपतावरील पुढील आपत्तीतून त्यांचा १४ वर्षांचा मुलगा बजावला जो पुढे आप्पा बळवंत म्हणून नावारूपाला आला.
पानिपताच्या रणसंग्रामात बळवंतरावांसारख्या मातब्बराच्या जाण्याने मराठा सैन्याचे विशेषतः हुजुरातीच्या फौजेचे मनोबल पुरते खचले हे मात्र खरे.
सरदार बळवंतराव मेहेंदळे व असंख्य ज्ञात-अज्ञात शुरवीरांना विनम्र अभिवादन….
साभार हरीश जी देशमुख
No comments:
Post a Comment