विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 26 January 2023

संताजी आणि धनाजी ने रुस्तम खानाची गुर्मी अखेर जीरवलीच!

 

सर सेनापती संताजी घोरपडे

संताजी आणि धनाजी ने रुस्तम खानाची गुर्मी अखेर जीरवलीच!
रात्रीचा दुसरा पहार होता रुस्तम खानाने सातार्याच्या किल्ल्याला वेढा देवून खूप दिवस झाले होते. खानाची छावणी सुस्त झोपली होती. पण पहारा चोख होता. शाबिण्याचे स्वार सत्रूचा माघ घेण्यासाठी दूर दूर पसरले होते. रुस्तम खानाची राहुटी गेंडा माळावर लागली होती.
अचानक सांकेतिक शिट्या वाजू लागल्या. रानात अचानक शांतता आली छाबिण्यासाठी गेलेल्या स्वारांचे घोडे अचानक थांबले. अचानक घोड्यांचे कान टवकारले. घोड्यावर बसलेले स्वार घोडा का थांबला याचे अंदाज घेवू लागले त्यातला एक शिपाई घोड्याला म्हणाला ” अचानक क्यों रुके हो क्या तुम्हे सामने संताजी और धनाजी दिख रहे है क्या ” असे म्हणतो न म्हणतो आहे तो पर्यंत समोर शेकडो घोड्यांच्या पावलांचे आवाज ऐकू आले. छाबिण्यासाठी आलेल्या स्वरांची बोबडी वळली त्यांनी घोडे मागे वळवून रुस्तम खानाची छावणी सावध केली. हि बातमी किल्ल्यावर हि समजली सांकेतिक बंदुकीचा बार कधीच सेनापती संताजीच्या बर्कान्दाजानी उडवला होता.
किल्ल्यातील शिवबंदीत अचानक चैतन्य संचारले खूप महिन्यापासून सातार्याच्या किल्ल्याला रुस्तम खानाने वेढा दिला होता. सारा दान पाणी बंद होता. किल्ल्यातील शिव बंदी खूप दिवसापासून उपाशी किल्ला लढवत होती. किल्ल्यातील बर्कान्दाजानी किल्ल्याच्या जन्ग्यात बंदुका रोखून सज्ज झाले.
रुस्तम खान हि बातमी बातमी एकून हसला. काही मुठभर मराठे आपल्यावर हल्ला करायला येतातच कसे असा मला प्रश्न पडला. त्याने आपला मुलगा घालीब याला मराठ्यांचा समाचार करायला पाठवली. ५ हजार घोड दल आणि ५ लढाऊ हत्ती घेवून घालीब निघाला. रुस्तम खान हत्तीवर चढून सारी छावणी सावध करू लागला. आपल्यावर हल्ला करायला दुसरा तिसरा कोणी आला नसून संताजीच असावा हे त्याने पहिल्याच झटक्यात ओळखले होते. आणि संताजीचे सैतानी डोके आपली २० हजार घोडदल ६ हजार बरकंदाज आणि ५ हजाराचा पायदळ बुडवू शकते हे त्याला माहित होते.
सातार्याच्या स्वारीचे नेतृत्व रामचंद्र पंतानी संताजीकडे दिले होते आणि ते स्वत्त हि या लढाईत सामील झाले होते. अष्ट प्रधान मंडळातील कारभारी पहिल्या वेळी एखाद्या लढाईत सामील झाले होते. त्याचा कारण होते संताजीची असामान्य असा गनिमी कावा. संताजी सोबत असताना पराभव अशक्य असेच गणित त्या काळी मराठा सैन्याचे झालेले असे. त्यांच्या सोबतीला वीर योद्ध धनाजी जाधव ,शंकराजी नारायण ,मानाजी मोरे, जावजी पार्टे, पारखे असे धुरंदर होत. पुढे बहालोहीया पायदळ आणि लहानसे घोड दल असे मराठ्यांचे सैन्य रचना होते. काही हत्ती हि मराठ्यांच्या सैन्यात होते मध्यभागी स्वता सरसेनापती संताजी सैन्याचे नेतृत्व करत होते. गालिब खानाला बाप येई पर्यंत धीर धरवला नाही त्याने आक्रमण केले.
अजस्र हत्ती त्याने मराठ्यांच्या घोड दलावर सोडले मराठी घोड दल बिचकले. ते थोडे मागे सरकले. गालिब खान थोडा पुढे आला . घनघोर युद्ध झाले. मराठी बर्कांदाजांच्या प्रखर बंदुकीच्या मार्याने हत्ती बुजले. ते मागे वळले. आणि आपल्याच सैन्याला चिरडू लागले. त्यामुळे मोघल फौजेत हा हा कार मजला इतक्यात रुस्तम खान स्वत्त ५ हजाराची राखीव फौज घेवून आला. आता संताजीने नवीन चाल चालली आपले मागे ठेवलेले हत्ती पुढे आणले. आणि मोघलांच्या घोड दलात घुसवले. त्या हत्तींनी सोंडेच्या तडाख्याने मोघालांचे घोड दल उलट पालट केले. मग रुस्तम खानाने आपल्या राखीव फौजेला हल्ला करायचा आदेश दिला. तो हल्ला इतका तीव्र होता को मराठ्यांची पुढची फळी चेचून निघाली. झुंजणारी पथके मागे फिरू लागली. हल्ला तीव्र होताच संताजीने माघार घेतली. मराठी सैन्य पळू लागले. हे पाहून खानाला चेव चढला. त्याने आपल्या मुलासह मराठ्यांचा पाठलाग सुरु केला.
पण अचानक पळणारे मराठे थांबले. गालिब मराठे अचानक का थांबले याचा विचार करू लागला . पण रुस्तम खान समजून गेला. या अगोदरही संताजीने त्याला पाणी पाजले होते. मराठ्यांनी आपल्याला फसवले आहे .पळणे हा त्याच्या एका योजनेचाच भाग आहेहे समजायला त्याला वेळ नाही लागला. अचानक डोंगर कपारीतून बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव झाला धनाजी जाधव , रामचंद्र अमात्य,संकार्जी नारायण यांच्या नेतृत्वाखालील ५ हजाराची राखीव फौज डोंगराच्या आडोश्यातुन बाहेर आली. घनघोर युद्ध झाले पण या अडगळीच्या जागेत मराठ्यांचा राज होता सपाट जागेवर युद्ध करणाऱ्या खानाचे डोंगर कपारीत काही चाले नासे झाले. औरंगजेबाने अनेक वेळा संताजी धनाजीचा पाठलाग करू नये असे बजावून हि पाठलागाचा मोह त्याला आवरला नव्हता.
मोघलांच्या पायदालावर धनाजी जाधव आणि शंकर नारायण तुटून पडले. त्यामुळे मोघालांचे पायदळ बिचकले. त्यांना सावरायचे प्रयत्न खान करू लागला त्या संधीचा फायदा घेवून संताजीने आपले बहालोया पायदळ मोघलांच्या पिचाडीला आणले मग मागून आणि पुढून दोन्ही बाजूने हल्ला झाला. खानच्या निशाण नौबत्तीचा हत्ती मराठ्यांनी पडला.
लढाई सुरु असताना सातार्याच्या किल्ल्यात ३ महिन्यापासून सातार्याच्या किल्ल्यावर बंद असणाऱ्या हंबीर राव मोहिते आपल्या निवडक शिव बंदी घेवून गड उतरले. त्यंनी मोघलांच्या छावणीवर हल्ला केला. तिथे लढाऊ माणसेच नव्हती. त्यांनी बुन्ग्याना हाकलून छावणी लुटली. खानच्या २ बायका, मुलगी , आई कैद केल्या. हंबीर राव लुट आणि कैदी घेवून परत गडावर गेले.
लढाई आपल्या हातातून निसटली आहे हे खानच्या कधीच लक्षात आले. तरीही तो त्येशाने लढत होता. पण जेव्हा आपला कबिला मराठ्यांनी कैद केला आहे अशी खबर त्याला मिळाली तेव्हा तो हताश झाला. जगण्यापेक्षा मेलेले बरे असे त्याला वाटू लागले त्याने आपला हत्ती सरळ मराठ्यांचा सैन्यात घुसवला. मराठी तीरांदाजनी त्याच्यावर जळत्या बाणाचा वर्षाव केला. काही जळते बाण त्याला लागले. अंगावरच्या भरजरी वस्त्रांनी लगेचच पेट घेतला. बंदुकीचे छर्रे लागून आधीच तो जखमी झाला होता.
जखमी खान अचानक बेशुद्ध झाला आणि जखमी पक्षा प्रमाणे तो हत्तीच्या अंबारीतून खाली कोसळला. मानाजी मोर्यांनी त्याला लगेचच आपल्या गोटात आणले. बापाला मराठ्यांनी घेरले हे घालीब खानाने पहिला लगेचच तोही बापाच्या मदतीला आला पण मराठ्यांनी तलवारी आणि बाणांनी जखमी केले. तोही घोड्यावरून खाली पडला. मराठ्यांनी त्यालाही कैद केले.
मध्यरात्री सुरु झालेली लढाई सकाळ पर्यंत समाप्त झाली. ‘जय शिवाजी जय भवानी चा गजर सातार्याच्या आकाशात दुमदुमला .खूप मोठी लुट मिळाली आणि संताजीच्या लष्करी काल्कीर्दीत अजून एक मनाचा तुरा खोवला गेला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...