विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 26 January 2023

#खंडागळे_हत्ती प्रकरण #जाधवराव व #भोसले घराणे...

 


#खंडागळे_हत्ती
प्रकरण #जाधवराव#भोसले घराणे...
कवि परमानंद ... जाधवराव व शहाजीराजे यांच्या भांडणाचा तपशील तो पुढिल प्रमाणे कवि म्हणतात नंतर आपला चुलता विठोजीराजे परलोकवासी गेल्यास राजनिती जाणनार्या महापराक्रमी शहाजीराजे याने राज्याचा भार आपल्या शिरावर घेतला. विठोजीराजेचे मुले संभाजी खेळोजी मल्लजी मंबाजी नागोजी परसोजी ञ्यंबकजी आणि वक्काजी हे सख्ये भाऊ इंद्राप्रमाणे शुर होतं. आणि मालोजीराजास दोन पुञ शहाजीराजे आणि शरीफजीराजे हे प्रभावशाली पुञ आणि हातामध्ये धनुष्य नेहमी सज्य ठेवणारे सुर्याप्रमाणे तेजस्वी मोठा परीवार सैन्य आणि इतर गुणांमुळे अद्वितीय पराक्रमी झालेले हे भाऊ मलिक अंबरच्या तंञाने चालत आणि शञूस जुमानित नसतं.
एकदा आपल्या विश्वासू नोकरांसह निजामशहा सभास्थानी सिंहासनी बसला असता.जाधवराव इत्यादी सर्व सरदार भेटून व मुजरे करून जलद घरी जाऊ लागले. एकमेकांची स्पर्धा करणारे ते राजे जाण्यास निघाले असता सभागृहाच्या दारासमोर एकच गर्दी झाली तेथे असलेल्या भा दार लोकांना बाजूला सारू लागले . आणि सामर्थ्यवान राजे कोणी घोड्यावरून तर कोणी पालखीतुन जाऊ लागले.
त्यावेळेस खंडागळे नावाच्या राजाचा आघाडीचा हत्ती दुसर्याची सैन्य तुडवीत वेगाने निघाला.सैन्यांचा चुराडा करणारा बलवान हत्ती निर्भयपणे गर्जू लागला मेघाप्रमाणे भासणार्या त्या हत्तीस कोणिही अडवू शकले नाही . आणि या हत्तीची गर्जना बलिष्ठ जाधवराव दत्ताजीस सहन झाली नाही. आणि दत्ताजीच्या आज्ञेने त्याचे सैन्य हत्तीवर भाले तलवार धनुष्य घेऊन प्रहार करू लागले पण त्या बलवान हत्तीने कित्येक सैन्य पायदळी घेतले आणि आपल्या सैन्याचा झालेला पराभव सहन न होता स्वतः दत्ताजी त्या हत्तीवर चालून गेले आणि जोरजोराने शस्ञप्रहाराने हत्तीस जेरीस आणले.हत्ती आपले डोंके हलवीत ची ची करू लागला .
तेव्हा विठोजीचे संभाजी व खेलोजी हे खंडागळ्याच्या मदतीस आले . ते दत्ताजीच्या तावडीत आलेल्या मेघाप्रमाणे असणार्या हत्तीचे रक्षण करू लागले. तेव्हा दत्ताजीने सोंड तुटलेल्या हत्तीस सोडून संभाजीवर हल्ला केला . क्रोधायनाम झालेल्या त्या दोघांमध्ये द्वंद्वयुद्ध चालले असता तेथे खुब योद्धे धावून आले व त्यांची एकच गर्दी झाली तेव्हा त्या दोघा सैन्यामध्ये हातघाईची लढाई झाली. संभाजी हा दत्ताजीवर चालुन गेला असता जाधवांच्या संबंधाकडे उघड उघड डोळे झाकून संभाजीची बाजू घेतली. दत्ताजीने हाती ढाल तरवार फिरवून आपल्या भोवती तेजोवलयच बनवले. तेव्हाच दत्ताजी पट्टा फिरवत रणभूमीवर नाचू लागला शञुबाजूंची शिरे वेगळी करीत फिरवू लागला. दत्ताजीने रणभूमीवर धुरळा उडवला तो कईत शरीरांचा . अशा वेळी त्या धैर्यवान बलवान दत्ताजीची गाठ विठोजींचे पुञ संभाजी यांच्याशी पडली असता दत्ताजी तेथे ठार झाले.
अव्दितीय क्रमे करणारा आपला मुलगा दत्ताजी यास संभाजीने ठार केले हे ऐकताच जाधवराव निम्म्या वाटेतुन परतले त्या क्रोधाविष्ठ जाधवराव जेव्हा फिरले तेव्हा अरण्ये पर्वत व्दिपे ही कापू लागली . प्राणप्रीय पुञास ज्याने मारले त्यास मी ठार करून सुड उगवीन . अशा रितीने क्रोधीष्ठ देवाप्रमाणे पराक्रमी सासरा जाधवराव, त्यांच्याशी शहाजी स्वपक्षाचे रक्षण करू लागला . आपला जावाई लढत आहे पाहून जाधवराव यांनी शहाजीच्या वासुकीप्रमाणे प्रचंड दंडावर प्रहार केला.त्या तरवारीने शहाजीस जबर मुर्छा आली आणि त्याने शौर्याने कसेतरी आपले प्राण वाचवले .
त्यावेळेस खेळोजी व इतर राजे निजामाची शिद्दी लोकांची फौज यांचा पराभव करून क्रुध्द झालेल्या गाढमुध्दी जाधवरावाने खड्ग उगारून समरांत अजिंक्य अशा संभाजीवर चाल केली तेव्हा प्रसन्नचित्त संभाजीने शञूंचा जणू काय उपहास करीत वेगाने आपल्या तरवारीस हात घातला दोन मदोन्मत हत्तीचे भयंकर असे युद्ध होते तसेच एकमेकांशी स्पर्धा करणार्या त्या दोघांमध्ये लोकांच्या अंतकरणात धडकी भरविणारे असे युद्ध झाले त्या शञुजेत्या जाधवरावाने संभाजीच्या तलवारीचे भरपुर अघात सहन करून तरवारीनेच संभाजीस जमीनीवर लोळावळे. आपल्या पुञाचा वध करणार् या त्या संभाजी ठार करून पुञाच्या वधाचा सुड उगवला .
तेव्हा निजामशाहचे अखिल सैन्य काही सुध्दा प्रतिकार करू शकले नाही. त्या दोन्ही सेनांस निजामशाहने सांत्वन करून निवारले . आपआपसांतील झगड्यापासून परावृत्त झाल्या व रणभूमीवरून संभाजी व दत्ताजी यांचे प्रेते घेऊन शोक करीत खिन्नपणे आपल्या शिबिरास गेले.
संदर्भग्रंथ
शिवभारत अ 3 श्ल. 1_57, पृ. 22_29

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...