विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 24 January 2023

वीर मुरारराव घोरपडे

 


वीर मुरारराव घोरपडे
वारंवार कुरापती काढणाऱ्या हैदरचा पुरा बंदोबस्त करावा म्हणून मराठी फौज कर्नाटकात उतरली. धुळपांचे मराठी आरमारही मदतीस बोलावले गेले. हैदरचे बळ या मराठी फौजेपुढे कमी होते. समोरसमोर हैदर लढाई करतच नव्हता.
मराठ्यांचा गनिमी कावा जणू त्याने अंगीकारला होता. बंकापुर, सावनुर येथेही चकमकी झाल्या. शेवटी सारी मराठी फौज धारवाडच्या किल्ल्यासमोर आली. दोन महिने नेटाने वेढा चालवून अखेर मराठ्यांनी शेवटी धारवाडच्या किल्ल्यावर मराठ्यांचा ध्वज फडकला हैदरच्या सैन्याला धर्मवाट देण्यात आली.
धारवाड घेतल्यावर मराठी फौज हनगळास आली. १ डिसेंबर १७६४ रोजी हैदरच्या अनवडी येथील छावणीवर मराठ्यांनी हल्ला चढवला. तुफान कापाकापी झाली.
मराठ्यांनी बेजरब घोडी चालवून झाडीत शिरून गारद्यांचे बुरुज फोडून हजार बाराशे कापून काढले. पाच सातशे धरून आणले. चहूकडून सारे उठले. पाच सातशे तोफा होत्या. त्याही आणल्या. थोडेसे मैदान असते तर खास हैदर धरला असता. झाडीने त्याला वाचवले. आमचे फौजेत २५ ते ४० माणूस व ७५ घोडे पडले असेल. मुरारराव घोरपडे यांनी मोठी मर्दुमकी केली.
या अनवडी लढाईत हैदरअलीचा मोठा पराभव झाला. तो जीव वाचवून कसाबसा पळून गेला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...