विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 27 January 2023

छत्रपती शिवरायांचे ७०० पठाणी सैन्य

 


छत्रपती शिवरायांचे ७०० पठाणी सैन्य

लेखन ::श्री नागेश सावंत

छत्रपती शिवाजी महराजांच्या सैन्यात ७०० पठाणाची तुकडी सेवेत असल्याचे काही स्वघोषित शीवव्याख्याते , कादंबरी , चित्रपट व मालिकांमधून दर्शविण्यात येते. सदर लेखात शिवाजी महाराजांच्या सैन्यातील ७०० पठाणांचे सत्य नक्की काय त्यासंबंधी संदर्भसाधनातून येणाऱ्या नोंदीचा आढावा घेऊ.
  • सदर ७०० पठाणांची नोंद चिटणीस बखर “ विजापूरचे पादशाहीतून सातशे पठाण बदलून चाकरीस राहावयास आले. त्यांस ठेवावे न ठेवावे , ऐसा विचार पडला. विजापुरकरांचा आपला द्वेष. हे मुसलमान यांचा भरवसा मानावा कसा? म्हणून विचार करिता. गोमाजी नाईक पानसंबळ हवालदार, जिजाबाईसाहेबांचे लग्न जाले ते समयी. जाधवराव यांनी त्यांचे सेवेसी दिल्हे होते. शाहाणे, वडिलांचे चाकरीचे विश्वासू जाणून त्यांजवरी इतबार ठेवून , त्यांची अब्रू वाढवून सेवा घेऊ लागले होते. त्यांनी उत्तर केले कि “ महाराज राज्य आक्रमण करणार. आले लोक न ठेवतील तरी परराज्यातील चांगले नामी माणूस कसे येईल ? “ ते सलाह फार चांगली जाणून ठेविले. त्यांची सरदारी राघो बल्ल्हाळ अत्रे यांसी सांगितली.”
सदर बखर हि उत्तरकालीन असून लेखनकाळ १८१० म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर १३० वर्षांनी लिहिलेली बखर. सदर बखरीतील नोंद पाहता शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरवात केली त्या सुमारास विजापूर दरबारातील ७०० पठाण चाकरीस आले. शिवाजी महाराजांना मुसलमानांवर भरवसा नाही असे खुद्द बखरकार सांगत आहे. अश्यावेळी गोमाजी नाईक यांनी मध्यस्थी करून राज्यवाढीसाठी सैन्याची गरज लागणार त्यामुळे त्यांना ठेवून घ्यावे असा सल्ला दिला . त्यामुळे महाराजांनी त्यांना ठेवून घेतले परंतु त्यांना विशेष लष्करी पद न देता त्यांना सरदार राघो बल्ल्हाळ अत्रे यांच्या देखरेखीखाली ठेवले.
  • सदर ७०० पठाणांची शिवदिग्विजय बखरीतील नोंद “ सातशे पठाण स्वार दौलताबादकरांकडील दिल्लीहून बेरोजगार सर्व देश फिरोन , महाराजांचा प्रतापोदय ऐकून महाराजांच्या आश्रयास आले. गोमाजी नाईक यांच्या सल्यावरून शिवाजी महाराजांनी चाकरीस ठेविले.
सदर बखर हि उत्तरकालीन असून लेखनकाळ १८१८ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर १३८ वर्षांनी लिहिलेली बखर. सदर बखरीतील नोंद पाहता ७०० पठाण हे सर्व देश फिरून बेरोजगार असल्याने कामासाठी ते शिवाजी महाराजांच्या आश्रयास आले. त्यांना स्वराज्याशी काही घेणे देणे न्हवते.
  • चिटणीस बखरीतील एक नोंद :- शिवाजी महाराजांनी विजापूर दरबारात बादशहाच्या भेटिस जावे असे शहाजी महाराजांना वाटे तशी सूचना त्यांनी बालवयातील शिवाजी महाराजांना केली. ( साधारण वय ८ ते १० ) तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या मनातील व्यथा बोलून दाखवली.
“आपण हिंदू व हे यवन परम नीच , यापरते नीच दुसरे नाही. अंत्यजादिकांचा संपर्क करितात. त्यांची सेवा करणे, त्यांचे अन्न भक्षणे, आर्जव करणे , त्यास नमस्कार करणे, हा माझे प्रकृतीस फार त्रास उत्पन्न होतो. यवन गोवधादी करितात. ब्राम्हणवध व निदा धर्माची हे पाहाणे परम अनुचित दिसते. आपण रस्त्यांनी जाता गोवध होतो. ते पाहताच त्याचा शिरच्छेद करावा ऐसे वाटते व श्रम वाटतात. गाईस पिडा करणाऱ्यांचा शिरच्छेद करावा असे मनात येते. परंतु वडील काय म्हणतील हे चित्तात वागते यास्तव उपाय नाही. नाहीपेंक्षा केलाच असता. अमीर- वजीर यांचे घरी जाणे हे माझे चित्तास योग्य वाटत नाही. एखादे समयी स्पर्श झाल्यास स्नान करावे, दुसरी वस्त्रे घ्यावी, ऐसे करू लागले. आणि याअन्वये सांगून पाठविले.
सदर नोंदीच्या आधारे आपणास शिवाजी महाराजांच्या मनात मुस्लीम बादशाह व मुस्लीम लोकांविषयी घृणा होती असे दिसते.
चिटणीस बखरीतील सदर नोंदीस समकालीन व विश्वसनीय शिवभारतातील नोंदीचा आधार मिळतो
(शिवभारत १७:२१) शिवाजी महाराज लहानपणापासून यवनांचा अपमान करत आले आहेत
चिटणीस बखर विजापूर दरबारातून तर शिवदिग्विजय बखर दिल्लीतून ही पठाणी तुकडी आल्याचे नमूद करते
सदर दोन्ही उत्तरकालीन बखरीतील नोंदीला कोणताही समकालीन संदर्भ आढळून येत नाही. सदर ७०० पठाणाच्या सैन्याच स्वराज्यातील योगदान काय कोणतीच लहानात लहान कामगिरीही आढळून येत नाही.
टीप :- चीटणीस व शिवदिग्विजय बखरीत इतरही प्रसंग वर्णन आलेले आहेत मग ते देखील मान्य करणार का ? त्यावेळी ही उत्तरकालीन बखर , कोणतीतरी नंतर त्यात हे लिहिलं आहे वैगरे बोंब ठोकणार
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ :- सप्तप्रकरणात्मक चरित्र
शिवभारत

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...