बचेंगे तो औंर भी लडेंगे..
पराक्रमी पाटील दत्ताजी शिंदे.
10 जानेवारी
बेलवंडी कोठार येथील विहीर
हा शिलालेख श्रीगोंदा मांडवगण रोडवरती श्रीगोंदा पासून सात किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बेलवंडी कोठार गावात एका बारवे वरती आहे . सदर ठिकाणी दोन बारव असून एक प्राचीन चालुक्य कालीन बारव आहे . त्या बारव शेजारी दुसरी बारव आहे . त्यात हा शिलालेख कोरलेला आहे . पायऱ्या उतरताना उजव्या बाजूला ५ ओळीचा शिलालेख असून तो उठावाचा आहे . वातावरणाच्या परिणामामुळे शिलालेखातील अक्षरे जीर्ण झाली आहे ,
वाचन
१॥ श्री ज्योतिस्वरूप चर
२ ॥ णी तत्पर राणोजी सु ॥
३ ॥ त दत्ताजी सीदे नीरंतर ॥
४ ।। शके १७०७ विश्वावसु नाम ॥
५!!सवछरे....... मुख प्रतिपदा ॥
कोलोलेख.---शके १७०७ - ११ मार्च १७८५ - २ ९ मार्च १७८ ९ विश्वावसु संवत्सर
श्री ज्योतिर् स्वरुप चरणी तत्पर असलेल्या राणोजी शिंदे यांचा मुलगा दत्ताजी शिंदे यांनी शके सतराशे सात मध्ये विश्वावसु नाम संवत्सरात सदर विहिरीचे बांधकाम चालू केले व महादजींनी ते पूर्ण केले असावे . भाषा : मराठी
वाचक : श्री अनिल किसन दुधाने
शिलालेख क्रमांक 2
: देऊळगांव शिलालेख
हा लेख श्रीगोंदा मांडवगण रस्त्यावर श्रीगोंद्यापासून १५ कि . मी . वर असलेल्या देऊळगाव येथे एका पायविहीरीवर कोरलेला आहे . शेजारी महादेवाचे मंदिर आहे . लेख पाच ओळींचा व उठावाने कोरलेला असून सहजपणे वाचता येतो .
वाचन कालोल्लेख
श्री जोतिस्चरणि
तत्पर राणोजि सु
त दत्ताजी सीदे स
के १७०० शावरि ना
म सवछरे : ।।
या शिलालेखावरील अंक नीट दिसत नसल्याने त्याचे साल निश्चित सांगता येत नाही . पण दत्ताजींच्या काळात काम सुरू झाले असावे व महादजींनी ते पूर्ण केले असावे कारण शिलालेखावर शके १७०० आहे , म्हणजेच तो काळ महादजींचा येतो .
वाचक श्री . अनिल किसन दुधाणे
वरील सर्व शिलालेख
अलिजाह बहाद्दर महादजी शिंदे या ग्रंथात प्रकाशित झाले आहेत
लेखक. डॉ. पी एन शिंदे.सातारा.
@अनिल दुधाणे पुणे
#शिंदेशाही शिलालेख
No comments:
Post a Comment