विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 25 January 2023

बायजाबाई आणि जयाजीराव शिंदे

 



बायजाबाई आणि जयाजीराव शिंदे :
बायजाबाईने जमेल तितकी टक्कर दिली पण तिने दत्तक घेतलेल्या जनकोजीने (दुसरा) पार गुडघे टेकले. १८३३ ते १८४३ अशी दहा वर्षे त्याने कारभार केला, १८४३ मध्ये त्याचा मृत्यू झाला अन दुर्दैवाने त्यालाही मुलबाळ नव्हते त्यामुळे त्यांची पत्नी ताराबाई शिंदे हिने हनुमंतराव शिंदे यांचा मुलगा भगीरथराव याला दत्तक घेतले. पुढे हाच जयाजीराव शिंदे या नावाने
ओळखला गेला. बायजाबाई या काळातही सक्रीय होत्या अन त्यांचे भाऊ त्यात त्यांना मदत करत होते. जयाजी शिंदे जेंव्हा कारभार पाहू लागले तेंव्हा त्यांना त्यांचे कारभारी असलेले दादा खासगीवाले यांनी बायजाबाईंच्या भावाने जशी अप्रत्यक्ष रित्या सत्ता स्वतःच्या हाती ठेवली होती तसेच काम केले. दिनकर राव शिंदे यांनी काही काळ सूत्रे आपल्या हाती घेतली तेंव्हाच्या कळातच १८५७चे बंड देशात घडले होते. हे जयाजीराव शिंदे गायकीच्या ग्वाल्हेर घराण्यातले एक उत्तम गायकदेखील होते. चंदेर प्रदेश ( आताचा एमपी मधील अशोकनगर जिल्हा ) नंतर ग्वाल्हेरमध्ये सामील करण्यात आला. १७ जून १८५८ रोजी ह्यूज रॉज याने ग्वाल्हेर खरे तर खालसा केले असते पण आणखी बंडाळ्या होऊ नये म्हणून त्यांनी जयाजीरावाला पुन्हा सिंहासनावर बसवले पण सर्वाधिकार कमी करून!

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...