भारतावर इंग्रजी सत्तेचे आगमन
लेख :आशिष माळी
भारताच्या इतिहासमध्ये एक प्रश्न नेहमीच विचारला गेला
इ.
स. 24 सप्टेंबर 1599 ला जेव्हा शेक्सपियर हॅम्लेट हे नाटक लंडनच्या थेम्स
नदीजवळ लिहीत होता, तेव्हा त्याच्या काहीशे मीटर अंतरावर जगामध्ये
वर्चस्व गाजवणार्या
"ईस्ट इंडिया कंपनी"च्या स्थापनेसाठी वाटाघाटी चालू होत्या. सोने, रुपे,
मसाल्याचे पदार्थ ह्यांच्या व्यापारासाठी नवीन आणि जुने धाडसी नाविक,
व्यापार्यांनी
समभाग घेऊन ही आस्थापना(कंपनी) स्थापली. ब्रिटिशांनी हिला इ. स. 31
डिसेंबर 1600 मान्यता दिली. जवळजवळ १५ निष्फळ अभियाने झाल्यानंतर
पहिल्यांदा सर विल्यम हौकिंकच्या नेतृृत्वात नौका 1608ला सुरतला
पोहोचल्या. त्याला मुघलांकडून मुंबई, ठाणे, सुरतला वखार आरंभण्याची
अनुज्ञाप्ती(परवाना) मिळवायची होती. इ. स. 1609च्या एप्रिलपासून श्री.
विल्यम 3 वर्षे जहांगीर दरबारात राहिला. खूप वेळाने त्याला भेट दिली. इ. स.
1611 ला सुरतला वखारीची अनुज्ञाप्ती मिळाली. त्यासह जहांगीरने त्याला एका
बाई(बायको) भेट दिली.
तिथून इंग्रजांची सत्ता सातत्याने वाढली. काहीशे इंग्रजांनी साधारण 1.5 कोटी भारतीयांना 200 वर्षात गुंडाळले.
No comments:
Post a Comment