विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 26 January 2023

२१ विरुद्ध १०,००० ची लढाई

 

२१ विरुद्ध १०,००० ची लढाई 
लेखन ::सचिनदादा पवार 












इतिहासाची पानं चाळताना कधी कुठे काय सापडेल नेम नाही. पहिल्या महा युद्धावरील एका इंग्लिश लेखकाचं पुस्तक वाचताना शीख रेजिमेंटची ओळख करून देण्यासाठी सारागरी युद्धाचा एक संदर्भ सापडला. त्या युद्धाचा प्रभाव की ते युद्ध शीख रेजिमेंट ची ओळख झालं म्हणून मग मीही जरा शोध शोध केली. आणि हाती लागलेली माहिती अचाट अद्भुत आणि अविश्वसनीय होती पण ती घडली होती १८९७ साली आणि या युद्धाच्या इंग्रजांनी पद्धतशीर नोंदी ठेवल्या आहेत म्हणून विश्वास बसतो. आता म्हणाल असा विश्वास न ठेवण्या सारखं झाला तरी काय ? विश्वास ना ठेवण्या सारखी गोष्ट म्हणजे शीख रेजिमेंट चे २१ शीख १०,००० पश्तुन आफ्रिदी अफगाणांना विरुद्ध उभे ठाकले होते. अविश्वसनीय २१ विरुद्ध १०,००० ? पण सत्य आहे. हे असं जगाच्या इतिहासात कदाचित असं एकमेव युद्ध आहे ज्यात तुकडीतील सर्वच्या सर्व सैनिकांना सर्वोच शौर्यपदक प्राप्त झालं.
सन १८९७ इंग्रजांचा भारतातील राज्य स्थिरस्थावर झाला होतं. पण त्याच बरोबर त्यांचा राज्य विस्तारही चालू होता. त्यात भारताच्या उत्तरेला (आताच्या पाकिस्तान मध्ये) अफगाणिस्तानच्या सीमेवर इंग्रजांना पश्तुनी आफ्रिदी टोळक्यांची बंडाळी भेडसावत होती. उत्तरेतील विस्तार स्थिर स्थावर करण्यासाठी ब्रिटिश सैन्याने लेफटेनंट कर्नल जॉन हौग्टन यांचा नेतृत्वा खाली शीख रेजिमेंटच्या ५ तुकड्या रवाना केल्या. लेफटेनंट कर्नल जॉन हौग्टन आणि त्याचा सोबत्यांनी हुंदूकुश पर्वत मधील समान टेकड्यांवर तळ ठोकला आणि आसपासच्या प्रदेशावर बऱ्या पैकी नेतृत्व मिळवलं. तरी मध्ये आधे शत्रूची टोळधाड येऊन धडका द्यायची.
लेफ्टनंट कर्नल जॉन हौग्टन आणि त्याच्या सोबत्यांनी ज्या ठिकाणी तळ ठोकला होता त्या समान टेकड्यांच्या रांगांवर छोटेखानी गढीवजा दोन किल्ले होते. त्यातील एका किल्ल्याच नाव आहे फोर्ट गुलिस्तान आणि दुसऱ्याच नाव आहे फोर्ट लॉकहार्ट. हे दोन्ही किल्ले एकमेकांपासून खूप जवळ आहेत. या किल्ल्या मधील अंतर ७.४ कमी आहे. पण या किल्ल्याचा भौगोलिक स्थान असे आहे की एका किल्यावरून दुसरा किल्ला दिसत नाही. त्या मुळे त्या दोन किल्ल्यान मध्ये हेलिओग्राफ संदेश पाठवण्या साठी इंग्रजांनी एक पोस्ट उभी केली तिचा नाव सारागरी किंवा सारागढी. सारागढी म्हणजे काही खरी खुरी गढी नव्हती वा काही खास बांधकाम असं नव्हतं. ३ ४ दगडाची घरं आणि एक उंच मचाण सारखा सिग्नल टॉवर ज्याचावरून २ किल्लयानामध्ये हेलिओग्राफ सिग्नल द्वारे संवाद साधला जायचा. याच सिग्नल पोस्ट वर २१ शिखांची एक तुकडी तैनात होती तिचा म्होरक्या होता हवालदार इशार सिंग. या तुकडीच काम म्हणजे आजू बाजूचा प्रदेशावर नज ठेवायची आणि दोन किल्ल्यान मध्ये सिग्नल द्वारे संवाद साधायचा.
१२ सप्टेंबर १८९७ रोजी सकाळी १०,००० पश्तुन आफ्रिदी अफगाण सैन्याने हेय दोन्ही किल्ले घेण्याच्या उद्देशाने केला. अर्थात या हल्ल्याचा प्रथम आघात पडला सिग्नल पोस्टवर म्हणजे सारागढी कारण मजबूत बांधकाम किंवा सौरक्षक भिंत अस काही नव्हतं. सारागढी पडली कि दोन किल्लायनाचा एकमेकांशी काही संबंध राहणार नव्हता आणि सर्वात महत्वाचा इथे खूप कामही म्हणजे फक्त २१ सैनिक होते. आणि उरलेले किल्ले एक एक करत घेणं सोपे होतं.
सारागढीवर झालेला हल्ला लेफ्टनंट कर्नल जॉन हौग्टन फोर्ट लॉकहार्ट वरून दुर्बिणीतून पाहत होता. आणि गुरुमुख सिंग ने सारागढी वरून पाठवलेल्या सिग्नल द्वारे आकलन करीत होता. त्याने त्याच्या नोंदवहीत साऱ्या गोष्टी नोंदवल्या होत्या. पुढे त्याच्या मित्राने म्हणजे मेजर याते याने जॉन हौग्टन याच्या आयुष्यावर एक पुस्तक लिहलं त्यात त्या साऱ्या नोंदी त्याने मांडल्या. कर्नल जॉन हौग्टन याच्या नोंदी प्रमाणे घडलेला प्रसंग असा.
सकाळी ९ वाजता १०,००० अफगाण सैन्याने सिग्नल पोस्टवर हल्ला केला. त्याच वेळेस गुरुमुख सिंगने फोर्ट लॉकहार्ट वर सिग्नल पाठवला की आमच्यावर हल्ला झाला आहे. कर्नल जॉन हौग्टन ने फोर्ट लॉकहार्ट वरून सिग्नल पाठवला की आता कुमक पाठवू शकत नाही. अशावेळेस त्या २१ जणांनी ठरवलं की खंबीर पण उभे राहायचं आणि शत्रूचा मुकाबला करायचा. आणि त्या प्रमाणे २१ जणांच्या फळीने शत्रूची प्रथम लाट अंगावर घेतली. भगवान सिंग सर्वप्रथम जखमी झाला आणि त्याच्या पाठोपाठ लाल सिंग. लालसिंग आणि जिवा सिंग, भगवान सिंग याचा मृतदेह घेऊन चौकीच्या आतील बाजूला आले. शत्रूने चौकीच्या भिंतीचा काही भाग पडला. त्याच पाठोपाठ कर्नल जॉन हौग्टन परत सिग्नल द्वारे सांगितलं की शत्रू ची संख्या १०,००० ते १४,००० आहे. एकीकडे युद्धाचा होता आणि अफगाण सैन्याचे म्होरखे शिखांना सारखे अमिश दाखवत होते आम्ही हुद्दा देऊ पैसे देऊ तुम्हाला सुखरूप जाऊन देऊ. पण भूलेल तो शीख कसला. शेवटी चौकीची सर्व भिंत पडली होती. शत्रूसैन्य आत घुसला होतं. आता हात घाईची लढाई चालू होती. अशाच गोंधळात इशार सिंग नि त्याच्या सैन्याला आजून आतल्या भागात जाऊन दरवाजा बंद करण्याची आज्ञा दिली आणि स्वतः मात्र शत्रू सैन्याला रोखत रोखत शाहिद झाला. शत्रू भिंतही फोडली आणि एक एक करत एक एक सरदार धारातीर्थी पडला. त्या वेळेस गुरुमुख सिंग सिग्नल टॉवर वर सिग्नल देत होता खाली अशी परिस्थिती आलेली पाहिल्यावर. त्याने कर्नल जॉन हौग्टन कडे सिग्नल बंद करून बंदूक उचलून लढायची परवानगी मागितली. ती मिळताच सिग्नलच यंत्र ठेऊन देऊन गुरुमुख बंदूक घेऊन खाली आला आणि लढता लढता २० शत्रू सैन्य यमसदनी पाठवून स्वतः देह ठेवला.
त्याचा नंतर ब्रिटिशांची कुमक आली दोनीही किल्ल्यातील सैन्याने सारागढीवर वर हल्ला केला आफ्रिदी अफगाण सैन्यला पळवून लावला आणि १४ सप्टेंबर १८९७ ला सारागढी परत घेतली. आफ्रिदी पश्तुन अफगाणांच्या मते त्यांचे १८० सैनिक कमी आले तर ब्रिटिश रेकॉर्ड नुसार ५०० ते ६०० अफगाण कामी आले आणि २१ ब्रिटिश सैनिक.
२१ विरुद्ध १०००० उतरलेले २१ तर गेले पण जाताना शत्रूचे ६०० सैनिक मारले. काय ती लढाई झाली असले. एका एकाने किती जणांना अंगावर घेतला असेल. किती तो वेडेपणा असेल. माघारी फिरण्याचा विचार कोणीच केला नसेल का ?
शत्रूची लाटे मागून आलेली लाट तोडत २१ शिखांचा मजबूत खडक झिजून गेला. मागे एक सोनेरी दैदप्तमान इतिहास ठेवून गेला. भले हा इतिहास कमी जणांना माहित असेल पण ज्याला माहित असले त्याला वेड लावल्या शिवाय राहत नाही. प्रथम ऐकल्यावर एखाद्या कॉमिक मधील कथावत वाटणारी हि लढाई. पुरावे चाळल्यावर मात्र मनावर एक खोल पण भव्य दिव्य छाप सोडते.
या लढाई मध्ये २१ शिखांनी दाखवलेला पराक्रम एवढा मोठा होता कि त्या सर्व च्या सर्व २१ सरदारांना ब्रिटिश शासनाने इंडियन ऑर्डर ऑफ मेरिट नावाचं पदक दिलं. हेय पदक व्हिक्टोरिया क्रॉस च्या तोल मोलाचं आणि इंग्लिश राजा किंवा राणीच्या हस्ते दिला जाणारं. आणि आताच म्हणाल तर परमवीर चक्र च्या तोडीचं.व्हिक्टोरिया क्रॉस त्या काळी फक्त गोऱ्या ब्रिटिश लोकांना दिला जात होता. जगाच्या इतिहासात असं प्रथमच झाल असले एखाद्या सैन्य तुकडीतील प्रत्येक सैनिकाला मरणोपरांत परमोच शौर्य पदक मिळाले.
ब्रिटिश अजून हि या युद्धाची आठवण म्हणून १२ सप्टेंबर सारागढी डे म्हणून ब्रिटन मध्ये साजरा करतात. भारतात शीख रेजिमेंट हि १२ सप्टेंबर सारागढी डे म्हणून साजरा करते.
या सारागढी च्या युद्धात सम्मेलीत झालेल्या २१ शीख सैनिकांची नवे खालील प्रमाणे :
१) हवालदार इशार सिंग
२) नायक लाल सिंग
३) लान्स नायक छंद सिंग
४) शिपाई सुंदर सिंग
५) शिपाई राम सिंग
६) शिपाई उत्तर सिंग
७) शिपाई साहेब सिंग
८) शिपाई हिरा सिंग
९) शिपाई दया
१०) शिपाई जीवन सिंग
११) भोला सिंग
१२) शिपाई नारायण सिंग
१३) शिपाई गुरुमुख सिंग
१४) शिपाई जीवन सिंग
१५) शिपाई गुरुमुख सिंग
१६) शिपाई रॅम सिंग
१७) शिपाई भगवान सिंग
१८) शिपाई भगवान सिंग
१९) शिपाई भूटा सिंग
२०) शिपाई जीवन सिंग
२१) शिपाई नंद सिंग
लंडन गॅझेट मध्ये ११ फेब्रुवारी १८९८ मध्ये आलेली बातमी खालील प्रमाणे
'4. The Commander-in-Chief deeply regrets the loss of the garrison of Saragarhi, a post held by 21 men of the 36th Sikhs, and he wishes to record his admiration of the heroism shown by those gallant soldiers. Fighting against overwhelming numbers they died at their post, thus proving their loyalty and devotion to their Sovereign while upholding to the last the traditional bravery of the Sikh nation'
या युद्धा बद्दल राणी व्हिक्टोरियाच्या ब्रिटिश संसदे मध्ये काढलेलले उद्गार
“It is no exaggeration to record that the armies which possess the valiant Sikhs cannot face defeat in war”
या शौर्याचं स्मारक अजून सारागढीवर येथे आहे. तिथे २१ शिखांची नावे व पराक्रम वाचावयास मिळतो. हि लढाई जगभर मध्ये सारागढी ची लढाई म्हणूच प्रसिद्धी पावली.
आपल्या शैक्षणिक किंवा शासकीय ठिकाणी अजून तरी मी कधी या युद्ध विषयीं ना ऐकलं होता ना पहिल. हा आपला दैदिप्तयम इतिहास आहे आणि त्याचा प्रचार प्रसार अभ्यास आपण केला पाहिजे एवढा मारा नक्की.
जो बोले सोनिहाल सतश्री अकाल.
कृपया एक नोंद घ्यावी मला या २१ शिखांचे छायाचित्र कुठेच मिळाले नाही. अगदी कर्नल जॉन हौग्टन याच्या पुस्तकात ही नाही. खाली जे छाया चित्र देत आहे
ते फक्त संदर्भासाठी की त्या काळातले ते शीख सैनिक कसे दिसत होते. आणि काही १४ सप्टेंबर १८९७ ची आहे म्हणजे कर्नल जॉन हौग्टन याने सारागढी परत घेतल्या नंतरची.
अधिक संदर्भासाठी काही छायाचित्र सोबत जोडली आहेत.
१) ज्या माणसा मुळे हे शौर्य जागा समोर आलं तो कर्नल जॉन हौग्टन
२) समकालीन शीख सैनिक म्हणजे ते २१ अशाच पेहरावात असावेत डाव्या बाजूने जमादार, हवालदार, शिपाई, बिगुलवाला
३) हेलिओग्राफ यांच्यात सूर्यप्रकाशाचा व भिंगांचा उपयोग करून दूरपर्यंत सिग्नल पाठवता येतात. आणि संवाद साधता येतो.
४) सारागढी चे भौगोलिक स्थान
५) सारागढी, फोर्ट लॉकहार्ट व फोर्ट गुलिस्तान यांचे भौगोलिक स्थान
६) फोर्ट गुलिस्तानचा कर्नल जॉन हौग्टन याने काढलेलं छायाचित्र
७) १४ सप्टेंबर १८९७ ला सारागढी परत मिळवल्या नंतर. सारागढी च्या अवशेषांवर उभे राहिलेले शीख सैनिकांचे जॉन हौग्टन याने काढलेलं छायाचित्र
८) १४ सप्टेंबर १८९७ ला सारागढी परत मिळवल्या नंतर. सारागढी च्या अवशेषांवर उभे राहिलेले शीख सैनिकांचे जॉन हौग्टन याने काढलेलं छायाचित्र
९) १४ सप्टेंबर १८९७ ला सारागढी परत मिळवल्या नंतर. शत्रू सैन्याचा ध्वज सोबत शीख सैनिक
१०) फोर्ट गुलिस्तानमध्ये काढलेलं छायाचित्र डावीकडून प्रथम बसलेला कर्नल जॉन हौग्टन सोबत इतर ब्रिटिश अधिकारी आणि दोन शीख सैनिक
११) इंडियन ऑर्डर ऑफ मेरिट पदक
१२) सारागढी येथील स्मारक
१३) सारागढी येथील स्मारकवर २१ वीरांची नावे.
१४) कर्नल जॉन हौग्टन याचा जीवन चरित्र पुस्तकाचे मुखपृष्ठ
१५) लंडन गॅझेट मध्ये आलेली माहिती

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...