विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 10 February 2023

रघुजी भोसल्यांकडून त्रिचनापल्लीचा किल्ला सर आणि चंदासाहेबाला कैद

 


रघुजी भोसल्यांकडून त्रिचनापल्लीचा किल्ला सर आणि चंदासाहेबाला कैद
रघुजी भोसल्यांनी कर्नाटकच्या नबाबाचा म्हणजे दोस्त अलीचा निकाल लावल्यानंतर आपले लक्ष त्रिचनापल्लीकडे दिले. त्रिचनापल्लीकडे जात असताना कडण्याचा नबाब अब्दुलनबी याच्याकडे खंडणीची
मागणी केली. नबाबाने मराठ्यास दोन लाख रुपयांची खंडणी व दोन हत्ती भेट दिले. मराठ्यांनी त्रिचपनापल्लीवर हल्ला करण्यापूर्वी चंदासाहेबास निर्वाणीचा इशारा दिला. पण चंदासाहेबाने शरण येण्यास नकार दिला.
त्यानंतर लगेच मराठ्यांनी त्रिचनापल्लीच्या किल्ल्यास वेढा घातला आणि किल्ल्यात जाणारी सर्व रसद व कुमक बंद करून टाकली. चंदासाहेबाने निराश होऊन त्याचा भाऊ बडेसाहेब यांस मदुराईहून मदतीस बोलावले.
बडेसाहेब मदुराईहून आपले सैन्य व रसद घेऊन चंदासाहेबाच्या सुटकेसाठी निघाला. पण रस्त्यातच मराठ्यांनी त्यास अडविले. त्यावेळी झालेल्या युद्धात बडेसाहेब मारला गेला.
या घटनेनंतर चंदासाहेबाचा दुसरा भाऊ सादिकसाहेब चंदासाहेबाच्या सुटकेसाठी निघाला. पण तो सुद्धा मराठ्यांकडून मारला गेला. चंदासाहेबाचे
दोन्ही भाऊ मारले गेले तरी चंदासाहेब शरण येईना. तेव्हा रघुजी भोसल्यांनी २५ मार्च, १७४१ रोजी आपल्या
फौजेनिशी किल्ल्याच्या चारी बाजूंच्या तटांवर चढून हल्ला करून किल्ला जिंकून घेतला.
रघुजी भोसल्यांनी चंदासाहेब व त्याचा मुलगा आबिदसाहेब यास कैद करून साताऱ्यास छत्रपती शाहू महाराजांकडे पाठवून दिले. साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्यावर ते सात वर्षे कैदेत होते. यानंतर रघुजी भोसले यांनी सरदार मुरारराव घोरपडे याची त्रिचपनापल्लीचे कारभारी म्हणून नेमणूक केली. एकंदरीत मराठ्यांची कर्नाटकातील ही मोहीम फारच जबरदस्त होती. या मोहिमेद्वारे मराठ्यांनी कर्नाटकातील सर्व सत्ताधिशांवर वचक तर बसवलाच पण आपल्या लष्करी सामर्थ्याचे उत्तम प्रदर्शन घडवून आणले.
ऐतिहासिक लेख वाचण्यासाठी आमच्या whats app group ला जॉइन करा..!
इतिहास विषय app download करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...