हिंदुस्तानातील इतिहासातील सर्व " शिंदे घराणे "
यांचा इतिहास
लेख :: हनुमंत शिंदे सरकार
“शिंदे” घराण्याने इतिहासात किती महत्वाचं स्थान कमावलं आहे हे बघून थक्क व्हाल!
अठरा पगड जाती जमाती’ असलेल्या आपल्या महाराष्ट्राला अनेक वर्षांचा इतिहास आहे. गड किल्ले, सह्याद्री पर्वतांची रांग, ७५० किमीचा समुद्र किनारा अशी ओळख या आपल्या राज्याची आहे. याच महाराष्ट्राला जसा कित्येक वर्षांचा इतिहास आहे तसा आपल्या आडनावांचा देखील इतिहास आहे.
आपल्या राज्यात बहुतांश आडनावं ही शहर अथवा गावावरून पडली आहेत, तर काही आडनावांवर भौगोलिक, नैसर्गिक, सामाजिक, संस्कृती या घटकांचा प्रभाव आढळून येतो. वर्षानुवर्षे काही आडनावं, घराणी प्रसिद्ध आहेत, जसं की भोसले, मोहिते, पवार आणि सध्या एक आडनाव गाजतंय ते म्हणजे शिंदे, आजच्या लेखात आपण quora वर विविध मंडळींनी शिंदे आडनावामागचा इतिहास सांगितला आहे तो जाणून घेऊयात….
सर्वप्रथम प्रसाद चव्हाण यांनी सांगितलेला इतिहास पाहू :
शिंदे आडनावाचा बराच मोठा इतिहास आहे. महाराष्ट्रात आणि आजच्या कर्नाटक प्रांतात शिंद/ सेन्द्रक हे राजघराणे इसवी सन ३३० ते इसवी सन १००० या बऱ्याच मोठ्या कालखंडात थोड्या बहुत फरकाने सत्तेत होते. चंद्रवल्ली ( जिल्हा चित्रदुर्ग ) येथिल शिलालेखात सिंद घराण्याचा उल्लेख येतो. आजच्या गोवा आणि उत्तर कोकण मध्ये सत्तेत असलेल्या कदंब घराण्यातील राजकन्येला विवाह हा अजानबाहू शिंद यांच्याशी झाला होता. ( संदर्भ. संजय सोनवणी सर ब्लॉग)
पश्चिमेकडील चालुक्य घराण्यांतील दुसर्या पुलिकेशीचा (इसवी सन ६०९-६४२) मामा श्रीवल्लभसेनानंदराव हा सेंद्रक घराण्यांतील होता. नवसरी जिल्ह्यांत बगुम्रा येथील दानपत्रांत सेंद्रक राजांची लहानशी वंशावळ आहे; तींत भानुशक्ति, त्याचा मुलगा आदित्यशक्ति, व त्याचा मुलगा पृथ्वीवल्लभनिकुंभल्लशक्ति यांचीं नांवें आहेत; व कल्चुरी किंवा चेदिशकाचें ४०६ वें वर्ष (म्हणजे इ. स. ६५५) त्यावर दिलें आहे.
सेंद्रक महाराज पोगिल्ली हा पश्चिम चालुक्य घराण्यांतील विजयादित्याचा (इ. स. ६८०-६९७) मांडलिक होता, व त्याच्या राज्यांत वनवासी प्रांतांतील नागरखंड जिल्हा व जेदुगुर नांवाचें खेडें (हें म्हैसूरमधील शिमोगा जिल्ह्यांतील अर्वाचीन जेड्ड असावें) होतें असा म्हैसूरमधील वळगांबे येथील एका शिलालेखांत उल्लेख आहे.
या राजांनां भुजगेंद्र अथवा नागवंशाचे राजे असें एका शिलालेखांत म्हटलें आहे.( संदर्भ. केतकर ज्ञान कोष) शिंद हे घराणे स्वतःला नागवंशी मानत असत आणि आजचे शिंदे घराणे हेही नागवंशी मानतात.
शिंद घराण्याच्याया तीन वेगवेगळ्या शाखा होत्या. त्यातील एक कराड, दुसरी जुन्नर तर तिसरी शाखा ही सिंदवाडी येथील होती. मुघल आणि बहमनी काळात ही शिंदे घराण्याचे बरेच उल्लेख आहेत.
No comments:
Post a Comment